पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for January 18th, 2015

पैसे घ्या, पण मत आपलाच द्या – केजरीवाल 0

पैसे घ्या, पण मत आपलाच द्या – केजरीवाल

Arvind Kejriwal pitted against Jagdish Mukhi
नवी दिल्ली – भाजपाने तुम्हाला मत देण्यासाठी पैसे देऊ केले तर ते पैसे घ्या, पण मत मात्र आपच्या उमेदवारालाच द्या असे विधान आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी रविवारी केले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आपने आयोजित केलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. दिल्लीमधील राजकीय वातावरण तापत चालले असून, सर्वच पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगले आहे.
निवडणुकीच्या काळात भाजपवाले तुमच्याजवळ येतील तुम्हाला पैसे देऊ करतील. नाही म्हणून नका ते पैसे घ्या पण मत मात्र आपच्याच उमेदवाराला द्या असे विधान केजरीवाल यांनी केले.
केजरीवाल एवढयावरच थांबले नाहीत तर, काही पक्ष तुमच्याजवळ आले नाहीत तर, तुम्ही त्यांचे कार्यालय गाठा आणि त्यांच्याकडून पैसे घ्या असे वक्तव्य त्यांनी केले. केजरीवालांच्या या विधानाचा भाजपानेही चांगलाच समाचार घेतला. भ्रष्टाचार विरोधी लढयाचे कार्यकर्ते आता स्वत:चा भ्रष्टाचाराला पाठिंबा देत आहेत. अरविंद केजरीवालांनी त्यांच्या विधानाबद्दल माफी मागावी अशी मागणी भाजपाने केली.

ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय 0

ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय

rohit-sharma
मेलबर्न – भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या तिरंगी मालिकेतील दुस-या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर चार गडी राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाला हा विजय मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला.
ऑस्ट्रेलियाने सहा गडी गमावून आणि एक षटक राखून भारताचे २६८ धावांचे लक्ष्य पार केले. ऑस्ट्रेलियाचा तिरंगी मालिकेतील हा सलग दुसरा विजय असून, भारताची मालिकेतील सुरुवात पराभवाने झाली आहे.
शेवटच्या तीन षटकांमध्ये दोन्ही संघांना विजयाची समान संधी होती. ब्रॅड हॅडीन आणि जेम्स फॉकनर या जोडीने ऑस्ट्रेलियाचा विजय साकारला. ऑस्ट्रेलियाकडून एरॉन फिंचने सर्वाधिक (९६) धावा केल्या.
भारताने ठेवलेल्या २६८ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्य ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली होती. संघाचे अर्धशतक पूर्ण झाले त्यावेळी डेविड वॉर्नरच्या रुपाने भारताला पहिले यश मिळाले.
त्यानंतर आलेल्या वॉटसन ४१ धावा करुन बाद झाला. त्यानंतर स्टीव्हन स्मिथ मैदानात उतरला. फिंचने स्मिथच्या साथीने तिस-या विकेटसाठी १०१ धावांची भागीदारी साकारली. स्मिथला अर्धशतक पूर्ण करण्यास तीन धावा हव्य असताना अश्विनने त्याला बाद केले. त्यानंतर शतकाच्या दिशेने वाटचाल करणा-या फिंचला उमेश यादवने ९६ धावांत रोखले.
तत्पूर्वी भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी कऱण्याचा निर्णय घेतला होता. भारताने सलामीवीर रोहित शर्माच्या दमदार शतक आणि सुरेश रैनाच्या अर्धशतकाच्या जोरावर आठ गड्यांच्या मोबदल्यात ५० षटकात २६७ धावा केल्या.
भारताने फलंदाजीस सुरुवात केल्यानंतर पहिल्याच षटकात भारताला शिखर धवनच्या रुपात धक्का बसला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत वारंवार संधी मिळूनही चांगली खेळी कऱण्यात अपयशी ठरलेला शिखर धवन याही सामन्यात साफ अपयशी ठरला. सलामीला मैदानात उतरलेला शिखर धवन केवळ दोन धावा करुन तंबूत परतला. स्टार्कच्या गोलंदाजीवर तो फिंचकडे झेल देत बाद झाला. तर अजिंक्य रहाणेही १२ धावा करुन बाद झाला.
ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कसोटी मालिकेत तडाखेबाज शतकी खेळी साकारणारा आक्रमक विराट कोहलीनेही निराशा केली. त्याने नऊ धावा केल्या. त्याला आस्ट्रेलियाच्या फॉकनरने बाद केले. त्यानंतर आलेल्या सुरेश रैनाच्या साथीने रोहितने डावाला आकार देण्यास सुरुवात केली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १२६ धावांची महत्वाची भागीदारी साकारली.
सुरेश रैनाने ५१ धावा केल्या आणि तो बाद झाला. त्यानंतर रोहितने मेलबर्नच्या मैदानावर दमदार शतक साजरे केले. १३९ चेंडूत त्याने १३८ धावा केल्या. परदेशी भूमीवरील तिसरे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचे त्याचे हे चौथे शतक आहे. रैनानंतर आलेला कर्णधार महेंद्रसिंग धोनी १९ धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने रोहितसह ५१ धावांची भागीदारी केली. अश्विन पटेल आणि भुवनेश्रर कुमार भोपळा न फोडताही माघारी परतले आणि भारताचा डाव २६७ धावांवर संपुष्टात आला.

 

January 18, 2015 in क्रीडा
आठवड्यांत सात राज्यपालांची नियुक्ती – गृहमंत्री 0

आठवड्यांत सात राज्यपालांची नियुक्ती – गृहमंत्री

Rajnath Singh at press conference
नवी दिल्ली – येत्या १५ ते २० दिवसांमध्ये बिहार, पंजाब आणि आसाम या राज्यांसह सहा राज्यात नव्या राज्यपालांची नियुक्ती करण्याची सरकारची योजना असल्याची माहिती रविवारी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली.
सध्या बिहार, आसाम, मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांच्या राज्यपालांची पदे रिक्त आहेत. पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील येत्या २१ जानेवारीला निवृत्त होत आहेत. तर हिमाचल प्रदेशचे राज्यपाल उर्मिला सिंग यांचा २४ जानेवारीला पाच वर्षांचा कार्यकाल संपत आहे.
पश्चिम बंगालचे राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठी यांच्याकडे सध्या बिहार आणि मेघालय या राज्यांचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. तर नागालँडचे राज्यपाल पी.बी. आचार्य नागालँडसह आसाम आणि त्रिपुरा या राज्यांचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत. तामिळनाडूचे राज्यपाल के.रोसैह आणि ओडिशाचे राज्यपाल एस.सी. जामीर पुढील काही महिन्यांत निवृत्त होत आहेत. या दोनही राज्यपालांची निवृत्ती संपुआ सरकारच्या काळात नियुक्ती करण्यात आली होती. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर संपुआ सरकारच्या काळात नियुक्त कऱण्यात आलेल्या अनेक राज्यापालांनी राजीनामे दिले होते. एनडीए सत्तेत आल्यानंतर शीला दिक्षित(केरळ), एम.के नारायणन(प.बंगाल), अश्वनी कुमार(नागालँड), बी.एल.जोशी(उत्तर प्रदेश), बी.व्ही.वांछू(गोवा), शेखर दत्त(छत्तीसगड) आणि व्ही.के.दुग्गल(मणिपूर) यांनी राजीनामे दिले होते. मिझोरमचे राज्यपाल व्ही. पुरुषोत्तम यांची नागालँडला बदली केल्यानंतर राजीनामा दिला होता तर महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी मिझोरमला बदली केल्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला होता.

January 18, 2015 in मुख्य पान
पालकमंत्री राठोडांनी केली बसस्थानकाची सफाई 0

पालकमंत्री राठोडांनी केली बसस्थानकाची सफाई

ST station-3
यवतमाळ, दि. १८ – यवतमाळ बसस्थानकावर अचानक सकाळी उपस्थित होऊन पालकमंत्री संजय राठोड यांनी हातात झाडू घेवून साफसफाई केली. जनजागृती समितीच्यावतीने दर रविवारी बसस्थानकावर सफाई मोहीम राबविण्यात येते. त्या मोहिमेत पालकमंत्र्यांनी आज प्रत्यक्ष हातात झाडू घेऊन सहभाग घेतला.
यावेळी आ.मदन येरावार, जनजागृती समितीचे अजय मुंधडा, मनोज औदार्य, विनोद आरेवार, निलास झेंडेकर आदी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी यावेळी परिसराची पाहणी केली. त्यानंतर सफाई मोहिमेत भाग घेतला. परिसरातील कचरा गोळा करून मोहिमेचे त्यांनी कौतून केले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना पालकमंत्र्यांनी प्रत्येकाने स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे, असे सांगितले. अस्वच्छतेमुळे अनेक आजार पसरतात. शासनाने स्वच्छतेसाठी अनेक उपक्रम सुरू केले आहे. प्रत्येकाने त्यात सहभागी होण्यासोबतच या सामाजिक कार्यात हातभार लावणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथसुध्दा दिली. आमदार मदन येरावार यांचेही यावेळी भाषण झाले. यावेळी विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

January 18, 2015 in विदर्भ
पोलिओ लसिकरणाचा पालकमंत्र्यांच्याहस्ते शुभारंभ 0

पोलिओ लसिकरणाचा पालकमंत्र्यांच्याहस्ते शुभारंभ

222
यवतमाळ, दि. १८ – पल्स पोलिओ लसिकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयीत मातोश्री प्रतिक्षालयात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी झाला. यावेळी पालकमंत्र्यांनी काही बालकांना लस पाजून मोहिमेची सुरूवात केली.
यावेळी नगराध्यक्ष सुभाष राय, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रेमानंद निखाडे, डा.पांडे, डॉ.मनोज सक्तेपार, डॉ.विजय कावलकर, आयएमएचे जिल्हाध्यक्ष डॉ.देशमुख आदी उपस्थित होते. यासह जिल्ह्यात ठिकठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.आरती फुफाटे तसेच उपाध्यक्ष व सभापतींच्याहस्ते शुभारंभ करण्यात आला. सदर मोहिम जिल्हाभर राबवित असतांना एकही बालक सुटणार नाही याची काळजी घेण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या. पहिल्या टप्यात जिल्ह्यात एकूण २ लाख ६६ हजार बालकांना पोलिओ लस देण्यात येत आहे. त्यासाठी ग्रामीण भागात २३४३, शहरी भागात २७५ असे २६१७ बुथ सुरू करण्यात आले आहे. तसेच ग्रामीण व शहरी भागात ५१९ ट्रांझीट टिम तसेच ११४ मोबाईल पथके नेमण्यात आली होती. या पथकांनी ठिकठिकाणी बालकांचा शोध घेऊन त्यांचे लसिकरण केले. लसिकरणापासून सुटलेल्या बालकांना पुढे काही दिवस लस देण्याचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

January 18, 2015 in विदर्भ
मोबाईल दुकानाला आग, दोन लाखाचे साहित्य खाक 0

मोबाईल दुकानाला आग, दोन लाखाचे साहित्य खाक

IMG-20150118-WA0027
नेर , दि. १८ – तालुक्यातीन धनज माणिकवाडा येथील मोबाईल दुकानाला आग लागून मोबाईलसह अन्य साहित्य खाक झाल्याची घटना शनिवारी रात्री १२.३० वाजता घडली. अफजल पठाण यांचे धनज येथेच केजीएन मोबाईल व दुरुस्तीचे दुकान आहे. द्वेषभावनेतून काल रात्री दुकानचा टीन वाकऊन टायरला आग लावुन दुकानात फेकुन दिला. त्यामुळे दुकानातील साहित्याने पेट घेतल्याने आगिने रौद्ररुप धारण केले. या दुकानातून धुर निघत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले. यावेळी नागरिकांनी पुढाकार घेऊन पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. यामध्ये मोबाईल, रिचार्ज व्हाऊचर यासह विविध साहित्य जळून खाक झाले असून दोन लाखाचे नुकसान झाले आहे.

January 18, 2015 in विदर्भ
निम्नपैनगंगा प्रकल्पग्रस्ताची फसवणूक, बाजार समिती उपसभापतीसह माजी सरपंचावर गुन्हे दाखल 0

निम्नपैनगंगा प्रकल्पग्रस्ताची फसवणूक, बाजार समिती उपसभापतीसह माजी सरपंचावर गुन्हे दाखल

dharan 10
माहुर (नांदेड), दि. १८ – विदर्भ-मराठवाड्याच्या सिमेवरील बहुचर्चीत निम्न पैनगंगा प्रकल्पात शेतजमिन गेलेल्या शेतकºयाची ७ लाखाने फसवणूक केली आहे. या प्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व सरपंचाविरूद्घ गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने मांडवी पोलिसांना दिले आहे. त्यावरून पोलिसांनी खंबाळ््याचे माजी सरपंच तथा किनवट बाजार समितीचे उपसभापती बळीराम दुलसिंग राठोड (४०), माजी सरपंच गणपत अमरसिंग आडे (५५) याच्याविरूद्घ गुन्हे दाखल केले.
निम्न पैनगंगा प्रकल्पाची मुख्य भिंत ही खंबाळा गावात असून तीन वर्षापासून काम सुरू झाले आहे. येथील शेतकरी बाब्या जाब्या राठोड यांची ४ एकर ०.७ आर शेती या प्रकल्पाच्या भिंतीमध्ये गेली आहे. त्या मोबदल्यात शेतकºयाला ७ लाख ८ हजार ३४३ रुपये १९ मार्च २००९ रोजी भारतीय स्टेट बँक शाखा मांडवी येथील खात्यात जमा करण्यात आले. त्यानंतर बाजार समितीचे उपसभापती बळीराम राठोड, माजी सरपंच गणपत आडे या दोघांनी संगणमत करून शेतकºयांस भूलथापा देऊन तुमच्या नावे एवढी रक्कम जमा राहील्यास सरकारला कर द्यावा लागणार म्हणून तुम्ही एवढी रक्कम जमा ठेऊ नका असे सांगितले. त्यानंतर बॅकेतून स्वत:च्या खात्यात सात लाख रुपये वर्ग करून घेतले. सात लाख रुपयाचे पाच वर्षात दुप्पट पैसे देण्यात येईल असे आश्वासन दिले होते. मात्र सहा वर्ष होऊनही डिपॉझीटची पावती व पैसे मिळाले नाही. त्यामुळे शेतकºयाने मांडवा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली मात्र पोलीसांनी धुडकावून लावले होते. शेवटी शेतकºयाने किनवट येथील प्रथमश्रेणी न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यात मांडवी येथील स्टेट बँकेचे सुनील नुरसिंग राठोड, अशोक भाटु राठोड यांनी साक्ष ग्राह्य धरण्यात आली. न्यायालयाने बळीराम राठोड व गणपत आडे याच्याविरूद्घ फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश मांडवी पोलिसांना दिले असून गुन्हा दाखल करण्यात आला.

 

January 18, 2015 in महाराष्ट्र
ट्रक अपघातात महिला ठार 0

ट्रक अपघातात महिला ठार

index
यवतमाळ, दि. १८ – भरधाव ट्रक घरात शिरल्याने झालेल्या अपघातात महिला घटनास्थळीच ठार झाल्याची घटना आज सकाळी ६.३० वाजता दरम्यान शहरालगत असलेल्या किन्ही येथे घडली. संगीता दामोधर गायधने रा. किन्ही असे मृत महिलेचे नाव आहे.
ट्रक क्रमांक एम.एच. ४४ / ८३०५ हा आर्णीकडून यवतमाळकडे जात होते. किन्हीगावात येताच ट्रकचालकाचे भरधाव वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या घरात शिरला. त्यावेळी संगीता गायधने ही महिला अंगणात सडा टाकत होती. ट्रकच्या जबर धडकेत महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सदर ट्रक हा शालेय पोषण आहारासाठी लागणारे खाद्यतेल यवतमाळकडे घेवून जात होता. ट्रक घरात शिरल्याने गायधने यांच्याघराची पडझड तर झालीच. शिवाय दुकाकी क्रमांक एमएच २९/ ७४३७ व बैलगाडीचे नुकसान झाल्याची नोंद पोलिसांनी केली. या घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. घरात शिरलेला ट्रक के्रनच्या सहाय्याने बाहेर काढावा लागला. याप्रकरणी संजय देवराव गायधने (४०) यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी चालक मोतीराम संभाजी चाटे रा. परळी जि.बीड याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून अटक केली. या घटनेमुळे किन्हीत हळहळ व्यक्त होत आहे.

January 18, 2015 in विदर्भ
घाटंजीत प्रेमीयुगुलाची आत्महत्या, ओळनीने एकमेकांना बांधून जीवन संपविले 0

घाटंजीत प्रेमीयुगुलाची आत्महत्या, ओळनीने एकमेकांना बांधून जीवन संपविले

IMG-20150118-WA0032_resized 20150118_11485620150118_130948
यवतमाळ, दि. १८ (विशेष प्रतिनिधी) – कुटुंबीयानी लग्नाला विरोध केल्याने प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची घटना आज रविवारी १८ जानेवारी रोजी सकाळी घाटंजी तालुक्यातील घाटी येथे उघडकीस आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सुवर्णा भास्कर नारनवरे (२१) रा. बेलोरा , श्रीकांत अवधुत डगमल (२५) रा. घाटी घाटंजी असे मृतक प्रेमीयुगुलाचे नाव आहे. सुवर्णा ही घाटंजी येथील गिलाणी महाविद्यालयात बि.ए.भाग एक ची विद्यार्थीनी होती. तर श्रीकांत हा सेन्ट्रींगचे काम करीत असून युवती त्याची मामेबहीण होती. नातेवाईक असल्याने दोघांचेही एकमेकांच्या घरी जाणे येणे होते. अशातच दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यांनी साथ जीयेंगे साथ मरेंगेची शपथ घेतली होती. अशातच त्यांनी आपल्या कुटुंबीयाना लग्न करुण देण्याची मागणी केली होती. यावेळी नातेवाईकांनी लग्नास विरोध केला होता. दरम्यान नारनवरे कुटुंबीयांनी सुवर्णासाठी विवाहयोग्य वर शोधणेही सुरू केले होते. त्यामुळे त्या दोघांनीही आपली जीवनयात्रा संपविण्याच निर्णय घेतला . काल रात्री त्यांनी ओळणीने एकमेकांना बांधून गुरांचा बाजार भरत असलेल्या परिसरातील विहीरीत उडी टाकुन आत्महत्या केली. दरम्यान आज सकाळी ते दोघेंही घरी न आल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केल्यानंतर विहीरीत मृतदेह आढळून आले. या घटनेची माहिती मिळतााच घाटंजी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामण रुग्णालयात पाठविण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून बेलोरा व घाटी घाटंजी परिसरात खळबळ उडाली आहे.