नवी दिल्ली – केंद्रातील आणि अनेक राज्यांतील सत्ता गमावलेल्या काँग्रेसने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज थेट पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले. मोदी सरकार हुकूमशहासारखे वागत असल्याचा आरोप सोनियांनी केला.
दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी तसेच पक्षाची नव्याने बांधणी करण्याच्यादृष्टीने विचारविनिमय करण्यासाठी काँग्रेस कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत झाली. या बैठकीत बोलताना सोनियां म्हणाल्या, ‘मोदींचे सरकारमधील सहकारी तसेच भाजपचे नेते प्रक्षोभक विधाने करत असताना मोदींनी त्याकडे दुर्लक्ष करण्याची सोयीस्कर अशी भूमिका घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत मोदी यांची जी रणनीती होती त्याचाच हा पुढचा अंक आहे. यामागे दोन समाजांमध्ये दुही निर्माण करण्याचा उद्देश स्पष्टपणे दिसत आहे.’ केंद्र सरकार आपल्या कर्तव्यापासून दूर जात आहे. जनहिताच्या कामांकडे दुर्लक्ष केलं जात आहे, असेही सोनिया यावेळी म्हणाल्या. भाजपचे सरकार शेतकरीविरोधी असून त्याविरोधात देशभरात आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा सोनियांनी यावेळी दिला.
Archive for January 13th, 2015
0
मोदी सरकार हुकूमशहा प्रवृत्तीचे – सोनिया गांधी
0
दुष्काळग्रस्त शेतक-यांसाठी २ हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत

मुंबई, दि. १३ – राज्यातील दुष्काळग्रस्त शेतक-यांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य सरकारने २ हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहिर केली. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.पीक नुकसानीचा सामना करावा लागलेल्या शेतकऱ्यांना २६ जानेवारीपर्यंत मदतीचे वाटप करण्यात येणार असून मदतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. राज्यातील शेतक-यांसाठी देण्यात येणारी रक्कम पुढीलप्रमाणे आहे. नाशिक विभागाला ३८६.६२ कोटी, पुणे विभागाला ७.५० कोटी, औरंगाबाद विभागाला ८४५.५५ कोटी, अमरावती विभागाला ५००.९३ कोटी रुपये, नागपूर विभागाला २५९.४० कोटी रुपये देण्यात आले आहेत. विभागीय आयुक्ताकडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तहसिलदारांना हा निधी वितरीत झाला आहे. २६ जानेवारीपर्यंत तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. बँक खाते नसलेल्या शेतकऱ्यांचे पंतप्रधान जनधन योजनेखाली खाते उघडून मदतीची रक्कम जमा करण्यात येईल. खात्यामध्ये मदतीची रक्कम जमा झाल्यानंतर त्यांना गरजेनुसार रक्कम काढता यावी, यासाठी सर्व बँकांना त्यांच्या शाखांमध्ये पुरेशी रोख रक्कम उपलब्ध करण्यात येणार आहे.
0
विषारी दारुमुळे ३१ जणांचा मृत्यू

लखनौ – उत्तरप्रदेशातील लखनऊ आणि उन्नावमध्ये विषारी दारु पिऊनमृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या ३१ वर पोहोचली आहे. तर १०० हून अधिक जणांवर रुग्णालायत उपचार सुरु आहेत.
सोमवारी रात्री ही घटना घडली. मलिहाबादमधील दातली गावत ही विषारी दारु बनवण्यात आली होती. ही विषारी दारु पिऊन लखनऊमध्ये आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला तर उन्नाऊमधील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दारु विक्रेत्याला अटक केली आहे. दरम्यान, गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी प्रकऱणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकऱणातील दोषींवरही तात्काळ कारवाई कऱण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत.
0
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास एक हजार दंड

नवी दिल्ली- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सिगारेटच्या सुट्या विक्रीवर बंदी घालण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास यापुढे एक हजार रुपये दंड केला जाईल असाही मंत्रालयाने ठेवला आहे. सध्या सर्वाजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास केवळ २०० रुपये दंड केला जातो. याच बरोबर तंबाखूजन्य पदार्थ विक्रीचे वय १८ वरून २१ करण्याचेही मंत्रालयाने ठरवले आहे.
0
मनसेला खिंडार, दरेकरांसह चार नेते भाजपात

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र करणारे प्रवीण दरेकर, वसंत गीते, रमेश पाटील या तीन माजी आमदारांसह मनसेचे नेते अखिलेश चौबे यांनी मंगळवारी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. यामुळे मनसेत मोठे खिंडार पडले आहे.
वसंत गीते यांच्या प्रवेशामुळे नाशिक महापालिकेतील राजकीय गणिते बदलण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावेळी राजकारणात अशक्य काहीच नसते, अशी प्रतिक्रीया रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली.
विधानसभा निवडणुकीत मनसेच्या निराशाजनक पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारुन प्रवीण दरेकर आणि वसंत गीते या दोघांनीही मनसेच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर या दोघांनीही पक्षनेतृत्वावर टिका केल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही त्यांचा राजीनामा स्वीकारत सर्वांना धक्का दिला होता. तेव्हापासूनच ते भाजपाच्या संपर्कात असल्याचे समोर आले होते. त्यानंतर, प्रवीण दरेकरांनी काही वर्षांपूर्वी दिलेली सुरक्षा जीपही राज ठाकरे यांनी परत पाठवून दिली. त्यामुळे दुखावलेल्या दरेकर यांनी मनसेला सोडचिठ्ठी द्यायचे नक्की केले. प्रवीण दरेकर, वसंत गीते, रमेश पाटील या तीन माजी आमदारांसह मनसेचे नेते अखिलेश चौबे यांनीही मनसेला जय महाराष्ट्र केल्याने मनसेसाठी हा मोठा हादरा समजला जात आहे. दरेकर आणि गीते यांच्या प्रवेशामुळे उत्तर मुंबई, रायगड आणि नाशिकमधील भाजपची ताकद वाढणार आहे.
0
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मद्यविक्री दुकानांवर कार्यवाही – राहुल रंजन महिवाल

यवतमाळ दि. 13 : परवानाधारक मद्यविक्री दुकानांना शासनाने निर्धारित करून दिलेल्या वेळेतच मद्यविक्री करणे किंवा दुकाने उघडी ठेवने आवश्यक आहे. मात्र नियमांचे उल्लंघन करत जिल्ह्यातील काही दुकाने रात्री उशीरापर्यंत तर सकाळी लवकर मद्यविक्री करत असल्याच्या तक्रारी आहे. या विक्रेत्यांनी वेळेच्या बाबतीत नियमांचे उल्लंघन केल्यास परवाना रद्द करण्यासारखी कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांनी आज गार्डन हॉल येथे विविध कामांचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सुचना केल्या. बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, डॉ.राजेश अडपावार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित काही दुकानांमध्ये सकाळीच मद्यविक्री होत असल्याने त्याचे वाईट परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. काल पालकमंत्र्यांनीही जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा केली होती. त्या अनुषंगाने अशाप्रकारे मद्यविक्रीची दुकाने आढळून आल्यास कार्यवाही करण्यासोबतच अशा दुकानांवर अचानक धाडी घालण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांना केल्या. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विषयांचाही आढावा घेतला. तहसिल कार्यालयांमध्ये प्रतिक्षालय बांधण्याचे नियोजन असून त्यासाठी बांधकाम विभागाने 15 दिवसात अंदाजपत्रक सादर करावे. पुरसंरक्षक भिंती बांधकामास प्रादान्य दिल्या जावे, अशा सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. जिल्ह्यातील प्रत्येक विभागाने आपापल्या विभागाचे व्हिजन डॉक्युमेंट सादर करण्यासोबतच वैशिष्टयेपुर्ण कामे घेण्याबाबत प्रस्ताव द्यावा, असे ते म्हणाले.अतिक्रमण मोहिमेतंर्गत दुकाने हटविलेल्या छोट्या व्यावसायिकांचे पुणर्वसन करणे आवश्यक आहे. त्यासाठी योग्य जागेची निवड करण्यासोबतच सदर पुनर्वसन कशा पध्दतीने करता येईल यासाठी नियोजन करण्याचा सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितास केल्या. वन जमीनीवरील लीज पट्टे, राजस्व अभियानाअंतर्गत दिनांक 23 जानेवारी रोजी जिल्हाभर घेण्यात येणाऱ्या महाशिबीराबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला.तत्पुर्वी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत चालु वर्षातील कामांचा आढावा घेतला. आर्थिक वर्ष संपायला काही महिनेच शिल्लक असल्याने कामांना गती देण्यासोबतच निधी शिल्लक राहणार नाही याची दक्षता घेण्याबाबत त्यांनी संबधीतास सांगितले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील वर्षाच्या नियोजनाचा तसेच यंत्रणांकडून प्राप्त प्रस्तावांचाही आढावा घेतला.
0
विटंबना करणाºया आरोपींस अटक करा, जमावाची उपविभागीय कार्यालयावर धडक

उमरखेड, दि. १३ – तालुक्यातील अमडापूर (तांडा) फाट्यावर लावलेले शुभेच्छा फलक फाडून एका समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहे. या प्रकरणी चौकशी करून आरोपींना त्वरीत अटक करा या मागणीसाठी नागरिकांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली.
स्थानिक बाजार समितीच्या प्रांगणातून नागरिकांनी मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी कार्यालयात सभा घेतली. शुभेच्छा फलक फाडून विटंबना करणाºया समाजकंटकाचा निषेध करून आरोपीच्या अटकेची मागणी केली. यावेळी संजय पालतीया, शिवलाल राठोड, मारोती राठोड, सेवादास महाराज, अविनाश रुढे, भिमदेव चव्हाण, रामू चव्हाण, अरविंद आडे, रमेश चव्हाण, उत्तम जाधव, गोपाल राठोड, अरविंद रूंढे याच्यासह नागरिक उपस्थित होते.
0
योगपटू श्रध्दा मुंधडाने राष्ट्रीय योगा चॅम्पीयनशिपमध्ये चार पदक

यवतमाळ, दि. १३ – भारतीय योगपटू ‘रबर की गुडिया ’ या नावाने ओळखल्या जाणारी श्रध्दा राजीव मुंधडा हिने ३९ वी राष्ट्रीय योगा चॅम्पीयनशिपमध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करून १७ ते २५ वयोगटातमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करून ३ सुवर्ण व एक रौप्य पदक प्राप्त केले.
महाराष्टÑ राज्य या स्पर्धेमध्ये दुसºया उपविजेत्या क्रमांकावर स्थिरावला. श्रध्दा मुंधडा हीने महाराष्टÑ राज्याला चॅम्पीयनशिप मिळवून देण्यासाठी मोलाची कामगिरी केली. ही स्पर्धा २६ ते २९ डिसेंबर २०१४ पर्यत हैद्राबाद(तेलंगणा राज्य) येथील विजया भास्कर रेड्डी इनडोअर स्टेडियमच्या प्रांगणात पार पडला. संपूर्ण भारतातून विभिन्न राज्यातुन जवळपास ११५० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. १७ ते २५ वर्षे वयोगटातील महिला गटांमधुन सर्वात जास्त पदके महाराष्ट्र राज्यालाप्राप्त झाली. दि.२७ डिसेंबर प्रथमदिनीच श्रध्दा हिने आवश्यक आसनामध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करून सर्वात जास्त १८७ अंक घेवून प्रथम स्थान पटकावुन सुवर्ण पदक प्राप्त केले. दि.२८ डिसेंबर दुसºया दिवशी योगा सहयोगी गायत्री वारे (चिपळून ) हिच्या सोबत आर्टीस्टिीक पेअर योगा चव रिदमिक पेयर योगात उत्कृष्ट प्रदर्शन करून एक सुवर्ण व एक रौप्य पदके प्राप्त केले. दि.२९ डिसेंबर तिसºया दिवशी रिदमिक सिंगल फेरीमध्ये आपल्या सर्वोत्कृष्ट प्रदर्शनाला स्थिरता देवून एक सुवर्ण पदकावर पुन्हा शिक्कामोर्तब केले. श्रध्दा मुंधडा हिला ५ व्या एशियन योगा चॅम्पीयनशिप दुबई येथे होणार आहे. त्यामध्ये श्रद्घा भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. या योगा चॅम्पीयनशिप मध्ये स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पश्चिम बंगाल, व्दितीय क्रमांकावर हरियाणा व तृतीय क्र मांकावर महाराष्टÑ राज्याला सामाधान मानावे लागले. या यशाचे श्रये आपले कुटुंब, मित्रपरिवार, योगगुरू अनिता पाटील यांना देते.
0
दिलीप खंडाळकर ठरला ‘यवतमाळ श्री २०१५’ चा मानकरी

यवतमाळ, दि. १३ – यवतमाळ अर्बन को.आॅप.बॅकेच्या सुवर्ण जयंती वर्षानिमित्त युवक दिनाचे औचित्य साधून निर्धार बहुउद्देशिय संस्था, विशुद्घ विद्यालय संस्था, बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, जिल्हा बॉडी बिल्डर्स अॅण्ड फिटनेस असोशिएशनच्या वतीने जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये वणी येथील दिलीप खंडाळकर हा ‘यवतमाळ श्री २०१५’ चा मानकरी ठरला.
स्पर्धेमध्ये ६० किलो आतील वजन गटात अय्युब खान प्रथम, दिनेश राजूरकर दुसरा, राजेश क्षीरसागर तीसरा, विक्की चक्रे चौथा क्रमांक पटकावला. तर वृषभ लोधाया याला प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. तसेच ६० किलो वरील वजन गटात दिलीप खंडारकर याने प्रथम क्रमांक पटकावला. तर मोहम्मद आवेझ याने दुसरा, रामेश्वर राजूरकर याने तिसरा तर आकाश शेंद्रे याने चौथा क्रमांक पटकावला. प्रोत्साहनपर बक्षीस मो. अकील याना देण्यात आले. ज्यु. मी. इंडीया योगराज शिंगे यांच्या स्टेज शोने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ अर्बन बँकेचे अध्यक्ष भाऊसाहेब मारोडकर तर प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश शिंदे, एन.डी. देशपांडे, राजलक्ष्मी पतसंस्थेचे संचालक क्षीतीज तायडे, सुशिल कोठारी, अमोल बोदडे, प्रदिप वादाफळे उपस्थित होते. बक्षीस तिवरण पालकमंत्री संजय राठोड याच्या हस्ते करण्यात आले.यावेळी हरीहर लिंगनवार, प्रवीण पांडे, राजेंद्र गायकवाड, प्रविण निमोदीया उपस्थित होेते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पराग पिंगळे यांनी तर संचालन अनंत पांडे यानी केले. या स्पर्धेसाठी निर्धार बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष पराग पिंगळे,विवेक सज्जनवार, विशाल नांदेकर, अमर शिंदे, प्रसाद पिंगळे, संतोष खंडारे, कपील पोनीकर, रवी लोखंडे, रवी बोचरे, प्रकाश सज्जनवार, सुरज जैन, पराग कळंबे, अतुल कुमटकर यानी सहकार्य केले.
0
अभियांत्रीकी विद्यार्थीनीचा संशयास्पद मृत्यू , प्रेमप्रकरणातून खून केल्याची चर्चा
यवतमाळ, दि. १३ – येथील शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालयाच्या विद्यार्थीनीचा चौसाळा जंगलात संशयास्पद मृतदेह आढळल्याची घटना आज मंगळवारी १३ जानेवारी रोजी घडली. दिप्ती मेश्राम (१९) रा. नांदगाव खंडेश्वर असे मृतक विद्यार्थीनीचे नाव आहे.
शहरालगत प्रसिद्घ असलेल्या चौसाळेश्वर मंदिरा जवळील जंगलात एका झाडाला अज्ञात युवतीने गळफास घेतल्याचे काही नागरीकांच्या निदर्शनास आले. याबाबतची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यावेळी घटनास्थळावर एक बॅग सापडली असून त्यामध्ये शासकीय अभियांत्रीका महाविद्यालयाचे ओळखपत्र सापडले. त्यावर दिप्ती मेश्राम असे नाव असल्यामुळे तीची ओळख पटली. विद्यार्थीनीची आत्महत्या की हत्या असा प्रश्न निर्माण झाला आहे. मृतदेह झाडाला लटकून होता, त्यावेळी विद्यार्थीनीचे पाय जमीनीला टेकलेले होते. त्यामुळे मृत्यू बद्दल संशय व्यक्त होत आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच विद्यार्थीनीच्या मृत्यूच्या मृत्यूचे कारण उघड होणार आहे. दरम्यान मुलगी एक महिन्या होऊनही नांदगाव (खंडेश्वर) येथे न आल्यामुळे तीच्या आई वडीलांनी यवतमाळ शहर पोलीसात महिन्याभरापूर्वी तक्रार दिली होती. तसेच पोलिसांनी तीचा प्रियकरालाही पोलीसांनी अटक करून पिसीआर घेतला. मात्र प्रियकराने कोणतेही माहिती पोलीसांना दिली नसल्याने युवतीचा शोध लागला नव्हता. मात्र आज सदर युवतीचा मृतदेह आढळला असून प्रेमप्रकरणातून तीचा खून झाल्याची चर्चा आहे.
0
वाघिनीच्या हल्ल्यात महिला जखमी
झरी (यवतमाळ) ,दि. १३ – तालुक्यातील मुकुटबन येथील जंगलात सरपन जमा करण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघिनीने हल्ला केल्याची घटना आज दुपारी दोन वाजता घडली. या हल्ल्यात शकीलाबानो शेख वहाब (५५) ही महिला जखमी झाली.
मुकुटबन येथील पाच महिला आज सरपन जमा करण्यासाठी जंगलात गेल्या होत्या. यावेळी त्यांना जंगलात वाघिन आणि दोन बछडे दिसले. वाघ आपल्या दिशेने येत असल्याचे लक्षात येताच सर्व महिलांनी तेथून पळ काढला. अशातच धावत असताना शकीलाबानो शेख वहाब ही महिला खाली पडल्याने जखमी झाली. जखमी महिलेला तात्काळ वणी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी रत्नपारखी यांना विचारले असता त्यांनीही या घटनेला दुजोरा दिला. परिसरातील मार्की, शेकापूर आणि मांगली परिसरात यापूर्वी वाघाने गाई-बैलांवर हल्ला चढवला होता. आता गावालगत असलेल्या जंगलात सरपन जमा करणाºया महिलांवर वाघिनीचा हल्ला झाल्याने परिसरात दहशत पसरली आहे. आता तरी वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी गावकºयांनी मागणी केली आहे.












