पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for January 2nd, 2015

डॉ. गोवारीकर यांचे निधन 0

डॉ. गोवारीकर यांचे निधन

DR
पुणे- अवकाश संशोधन, हवामान आणि लोकसंख्या या तीन क्षेत्रात संशोधन करणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर (८१) यांचे पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. मूलभूत समस्यांची जाण असणारा संशोधक अशी डॉ. गोवारीकर यांची ख्याती होती. पॉलिमर केमिस्ट्रीत त्यांनी केलेले संशोधन जगभर गाजले. डॉ. विक्रम साराभाई यांच्यासोबत भारतीय अवकाश तंत्रज्ञानाच्या प्रगतीतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
डॉ. गोवारीकर यांच्या नेतृत्वाखाली १९८३ मध्ये एसएलव्ही तीन यान ही मोहीम यशस्वी झाली होती. पंतप्रधानांचे विशेष सल्लागार म्हणून १९९१ ते १९९३ या काळात त्यांनी काम केले होते. त्यांनी १९९४ ते २००० दरम्यान मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्षपद भूषवले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ते माजी कुलगुरू होते.
अनेक पुस्तके आणि शेकडो विज्ञान निबंध त्यांच्या नावावर आहेत. ‘आय प्रेडिक्ट’ हे भारतीय लोकसंख्येवरील भाष्य करणारं त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. पद्मश्री, फाय फाऊंडेशन पारितोषिक, नायक सुवर्णपदक, अनेक विद्यापीठांच्या डॉक्टरेट्स अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं होतं.

January 02, 2015 in महाराष्ट्र
पाकिस्तानी बोटीचा स्फोट- दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला 0

पाकिस्तानी बोटीचा स्फोट- दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला

Fishing boat intercepted by coast guard
नवी दिल्ली- भारताच्या सागरी हद्दीत घुसखोरी करत असताना तटरक्षक दलाच्या जवानांनी अडवलेल्या पाकिस्तानी बोटीतील चार जणांनी गुजरातमधील पोरबंदरजवळ स्वतःला उडवून घेत स्फोट घडवून आणला. नौदलाच्या सतर्कतेमुळे दहशतवादी हल्ल्याचा कट उधळल्याचे धक्कादायक वृत्त आहे. विशेष म्हणजे मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याला सहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर महिन्याभरातच ही बातमी समोर आली आहे.
गुजरातच्या समुद्र हद्दीत एका संशयित पाकिस्तानी जहाजातून मोठ्या प्रमाणावर विस्फोटके वाहून नेत असल्याची माहिती नौदलाला मिळाली होती. ३१ डिसेंबरला याबाबतची माहिती गुप्तचर यंत्रणेने दिली होती. त्यानुसार एक जानेवारीला पहाटे या पाकिस्तानी मच्छिमारी बोटीच्या संशयित हालचाली लक्षात आल्यानंतर भारतीय नौदलाने चौकशीसाठी या बोटीला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र जहाजाने आपला वेग वाढवत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र नौदलाने पोरबंदरपासून ३६५ किलोमीटर अंतरावर असताना या बोटीला चारही बाजूंनी घेरले. आपण घेरलो गेल्याचे निदर्शनास येताच बोटीवर असलेल्यांनी स्वतःला उडवून घेत स्फोट घडवून आणला. त्यात चार जण मृत्यूमुखी पडल्याचे वृत्त आहे.
Fishing boat intercepted by coast guardडोर्नियर एयरक्राफ्टच्या मदतीने हे ऑपरेशन करण्यात आले. डोर्निअर विमानाने शोध घेत दिवे न लावता लपत लपत जाणारी ती संशयित बोट शोधून काढली. त्यानंतर तटरक्षक दलाच्या गस्त घालणा-या नौकेला वर्दी देण्यात आली. कराची येथील केती बंदरातील ही मच्छिमार बोट होती. संशयित हालचाली लक्षात येताच त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता ते पळू लागल्याने संशय आणखी बळावला, असे नौदल्या अधिका-यांनी शुक्रवारी बोलताना सांगितले.

January 02, 2015 in मुख्य पान
‘रेझींग डे’: विद्यार्थ्यांनी जाणून घेतली शस्त्राची माहिती 0

‘रेझींग डे’: विद्यार्थ्यांनी जाणून घेतली शस्त्राची माहिती

666

यवतमाळ – जिल्हा पोलीस दलाच्या वतीने रेझींग डे निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शस्त्राची माहिती जाणून घेतली. त्यानंतर निघालेल्या रॅलीने यवतमाळकरांचे लक्ष वेधून घेतले.
पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते रेझींग डे सप्ताहाचे आज सकाळी उद्घाटन करण्यता आले. या कार्यक्रमात शिवाजी विद्यालय, विवेकानंद विद्यालय, अभ्यंकर महिला विद्यालय, लोकनायक बापूजी अणे आदी विद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थीनी, शिक्षक, शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी पोलीस दलात वापरण्यात येणाºया शस्त्राबाबत माहिती दिली. महिलांवर होणारे अत्याचार, कौटुंबिक व्यभिचारासह हेल्पलाईन क्रमांक १०९१ बाबत मार्गदर्शन करून महाविद्यालयात तक्रार पेटी सुरू करण्याबाबत प्राचार्यांना सूचना करण्यात आल्या. पोलीस अधीक्षकांच्या हस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक जे.बी. डाखोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पुजलवार, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक वांदीले वडगाव, शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांच्यासह पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

January 02, 2015 in विदर्भ
मारहाणप्रकरणी आरोपीस सहा महिन्याची शिक्षा 0

मारहाणप्रकरणी आरोपीस सहा महिन्याची शिक्षा

download
पांढरकवडा (यवतमाळ)-पूर्ववैमनस्यातून मारहाण करून तरुणीला जखमी करणाºया आरोपीला सहा महिन्याची शिक्षा व दहा हजाराचा दंड ठोठावण्यात आला. ही शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सुनावली. विलास संभाजी पाटील (४४) रा. धारण असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
विलास पाटील व गौतम जगताप यांच्यात वाद होता. २७ जानेवारी २०१२ रोजी त्यांची मुलगी व पत्नी रात्री ८ वाजता दरम्यान बोलत होत्या. दरम्यान विलास याने पूर्ववैमनस्यातून वाद घालण्यास सुरूवात केली. यावेळी राग अनावर झाल्याने आरोपीने दगड भिरकावला. हा दगड गौतम जगताप यांच्या मुलीला लागून ती जखमी झाली. या घटनेची तक्रार पांढरकवडा पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी चौकशी करून प्रकरण न्यायप्रविस्ट केले. सरकारी वकीलांनी पाच जणांच्या साक्षी तपासण्यात आल्या. आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी हितेंद्र वाणी यांनी आरोपीला सहा महिन्याची शिक्षा व दहा हजाराचा दंड सुनावला. दंडापैकी पाच हजाराची रक्कम फिर्यादी तरुणीला देण्याचे आदेश दिले. सरकारी पक्षाच्यावतीने राजकुमार गुप्ता यांनी काम बघितले.

January 02, 2015 in विदर्भ
शिवीगाळ करणाºया आरोपीला शिक्षा 0

शिवीगाळ करणाºया आरोपीला शिक्षा

images (1)
यवतमाळ – अश्लिल शिवीगाळ देऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका आरोपीस न्यायालयाने शिक्षा ठोठावली. प्रथम श्रेणी न्यायदंडा धिकारी (पाचवे) एन.के. पाटील यांनी हा निकाल दिला.
अरविंद चंद्रकात भरणे (३९) असे आरोपीचे नाव आहे. पारस अपार्टमेंट कोल्हे ले आऊट यवतमाळ येथे भरणे चौकीदार म्हणून काम करीत होता. २७ सप्टेंबर २०१३ रोजी विकास विक्रम ढबाले (३९) रा. पारस अपार्टमेंट कोल्हे ले आऊट याच्यासोबत वाद करून अश्लिल शिवीगाळ केली. तसेच आरोपीने तेथील नळाची तोडफोड केली होती. या प्रकरणी वडगाव रोड पोलिसांनी आरोपीविरूद्घ गुन्हा दाखल केला होता. तपास अधिकारी जमादार किशोर वाटकर यानी करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले होते. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (पाचवे) एन.के. पाटील याच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यामध्ये एकुण पाच साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये ५०४, ४२७ कलमान्वये कोर्ट सुटेपर्यंत उभे राहणे व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास १५ दिवस सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील सि.व्ही. उके यांनी काम पाहीले.

January 02, 2015 in विदर्भ
शेतकºयाची आत्महत्या 0

शेतकºयाची आत्महत्या

images
यवतमाळ – नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकºयाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी रुंझा येथे घडली. मधुकर भीमराव पेंदोर (४१) रा. रुंझा असे मृतक शेतकºयाचे नाव आहे. त्याच्याकडे ९ एकर शेती असून ग्रामविविध कार्यकारी सोसायटी सायखेडा (धरण) चे १ लाख ८८ हजार रुपये कर्ज होते. यावर्षीही अतिवृष्टी व नापिकी झाल्याने कर्ज कसे फेडावे या विवंचनेत राहत होता. दरम्यान आज सकाळी स्वत:च्या शेतातच विष घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच रुंझा आऊट पोस्टचे जमादार गोपाल उठाणे, होमदेव कन्नाके यानी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेत शवविच्छेदनासाठी पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू आहे.

January 02, 2015 in विदर्भ
अर्धा एकरात 60 हजाराचे भेंडीचे उत्पादन 0

अर्धा एकरात 60 हजाराचे भेंडीचे उत्पादन

Chaparda-Atma
चापर्डातील शेतकऱ्याची भाजीपाल्यातून प्रगती
यवतमाळ – कळंबपासून 10 किमी अंतरावर असलेल्या चापर्डा या गावात बहुतांश शेतकरी कापूस, सोयाबिन, तुर यासारखी पारंपारिक पीके घेतात. ओलीताची साधणे नसल्याने शेतकऱ्यांना जेमतेमच उत्पन्न मिळते. मात्र गावातीलच स्वप्निल नागपूरे या शेतकऱ्याने पारंपारिक शेतीसोबतच भाजीपाला उत्पादनाचा प्रयोग आत्माच्या सहकार्याने राबविल्याने केवळ अर्धा एकर क्षेत्रात 60 हजार रुपयाचे भेंडीचे उत्पन्न मिळविले आहे.
पारंपारिक पीकांना खर्च अधिक व तुलनेत उत्पन्न कमी अशी स्थिती आहे. त्यामुळे कमी खर्चाच्या भाजीपाला उत्पादनाकडे शेतकऱ्यांनी वळावे म्हणून आत्माच्यावतीने प्रयत्न केले जात आहे. अनेक शेतकरी आत्मविश्वासाने भाजीपाला उत्पादनातुन स्वयंपुर्ण झाले आहे. चापर्डा येथे स्वप्निल नागपूरे हे सुध्दा पारंपारिकच शेती करायचे. आत्मा योजनेमुळे त्यांना भाजीपाला पिकांची माहिती झाली. त्यानंतर त्यांनी आपल्या अर्धा एकर शेतात भेंडी हे पीक घेण्याचे ठरविले. 15 जूलै 2014 रोजी त्यांनी भेंडीची लागवड केली. मात्र अपुऱ्या पावसामुळे भेंडीला फटका बसणार असतांनाच त्यांनी शेतात परिश्रमाने भेंडीची पीक उभे केले. आत्मा योजनेच्यावतीने उपलब्ध करून देण्यात आलेले खत, औषधी आणि तुषार सिंचनाच्या प्रभावामुळे शेतात भेंडीचे पीक बहरले. त्यानंतर दर दोन दिवसांनी 50 ते 60 किलो भेंडीचे उत्पादन निघत होते. अद्यापही भेंडीचे पीक घेतले जात आहे. यवतमाळ येथील बाजारपेठेत प्रती किलो 30 ते 40 रुपये भाव मिळाल्याने केवळ अर्धा एकरात 60 हजार रुपयाचे भेंडीचे उत्पादन झाले. खरीब हंगामात पीक प्रात्यक्षिक या बाबीतुन भेंडी पीकाची निवड केल्यानंतर त्यांना बियाणे, रासायनिक खते, जैविक कल्चर, औषधी आदींचा पुरवठा करण्यात आला. अर्धा एकरात 12 हजार रुपये खर्च जाता 48 हजार रुपयाचे निव्वळ उत्पन्न त्यांना शिल्लक राहिले आहे. श्री.नागपूरे यांना भाजीपाला पीकासाठी आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व्हि.के. गायकवाड यांनी प्रोत्साहित केले. त्यानंतर नागपूरे यांनी 8 एकरात भेंडी, पालक, वांगे, चवळी, कारले, कोबी, मिरची, वाल, दोडका, ढेमस, मेथी या भाजीपाला पीकांची लागवड केली आहे. पुर्वी पारंपरीक पिकांना रासायनिक खते व किटकनाशकांचा वापर केल्यानंतरही पदरी निराशाच येत होती. भाजीपाला पिकांना सुरुवात केल्यानंतर विशेषत:हा भेंडी उत्पादनासाठी जाणीवपुर्वक प्रयत्न केल्याने चांगली उत्पन्न हाती येत आहे. शेतात रसायनांचे प्रमाण कमी केल्याने आरोग्यासाठी चांगल्या शेतमालाची निर्मिती माज्या हातुन होत असल्याचे स्वप्निल नागपूरे या शेतकऱ्यांनी सांगितले.

January 02, 2015 in विदर्भ