पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for January 3rd, 2015

फुले आणि कांशीराम यांना भारतरत्न देण्याची मागणी 0

फुले आणि कांशीराम यांना भारतरत्न देण्याची मागणी

pic
लखनऊ – जर केंद्र सरकार मालवीय यांना मरणोत्तर भारतरत्न देऊ शकते तर महात्मा जोतिबा फुले आणि कांशीराम यांनाही मरणोत्तर भारतरत्न देऊन गौरविण्यात यावे अशी मागणी बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी लखनऊ येथे पत्रकार परिषदेत केली.
भाजप हा जातीयवादी पक्ष आहे. केंद्रातल्या भाजपच्या सरकारने एकाच जातीच्या दोन व्यक्तींना भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर केला आहे. मात्र दलित किंवा अन्य मागासवर्गीयांचा या पुरस्कारासाठी विचार केलेला नाही, असे मायावती म्हणाल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर दलितांच्या उद्धारासाठी कांशीराम भरपूर काम केले. त्यामुळे हे योगदान लक्षात घेऊन कांशीराम यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी मायावती यांनी केली. दलित, मागासवर्गीय आणि महिलांच्या शिक्षण तसेच समानतेसाठी अखेरच्या श्वासापर्यंत अविरत काम करणा-या महात्मा जोतिबा फुले यांचाही मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरव करण्याची मागणी मायावती यांनी केली.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पंडित मदनमोहन मालवीय यांना २५ डिसेंबर २०१४ रोजी भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रजासत्ताक दिनी हा भारतरत्न प्रदान केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर बसपच्या अध्यक्षा मायावती यांनी केंद्रातल्या मोदी सरकारच्या भारतरत्न संदर्भातल्या निर्णयावर टीका केली.

January 03, 2015 in मुख्य पान
‘गुंड आणून तुझे हातपाय तोडतो’, आयुक्ताकडून गटनेत्याला धमकी 0

‘गुंड आणून तुझे हातपाय तोडतो’, आयुक्ताकडून गटनेत्याला धमकी

commissioner
औरंगाबाद – ‘माझ्या धुळ्यातील सर्व गुंड आणून तुला ठोकून, हातपाय तोडून फेकून द्यायला लावतो. यापुढे तू कसा जगतो आणि तुला कोण जगवतो ते मी पाहतो,’ अशा शब्दांत पालिकेचे आयुक्त प्रकाश महाजन यांनी भारतीय जनता पक्षाचे महापालिकेतील गटनेते संजय केनेकर यांना धमकावले. या प्रकारामुळे केनेकर यांनी सिटी चौक पोलिस ठाण्यात तक्रार देऊन पोलिस संरक्षण मागितले आहे.
सिटी चौक पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकांच्या नावे दिलेल्या निवेदनात केनेकर यांनी म्हटले आहे की, ‘२ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता पालिका आयुक्त प्रकाश महाजन यांच्या दालनात जात असताना दोन सुरक्षा रक्षकांनी मला रोखले. आयुक्तांच्या दालनात आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी आणि आयुक्त आहेत. कोणालाही आत सोडू नका, असे आयुक्तांचे आदेश आहेत, असे रक्षकांनी सांगितल्यामुळे परत फिरून मी दुसऱ्यांदा आयुक्तांना भेटण्यासाठी गेलो. रक्षकांनी मला पुन्हा परत पाठवले.’
‘तिसऱ्यांदा गेलो तेव्हा पालिकेचे कर्मचारी डीएच्या मागणीसाठी तेथे आले होते. मी आपणाशी बोलू शकतो का, असे आयुक्तांना विचारले. लवकर बोला मला वेळ नाही, असे ते म्हणाले. डीएची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबर वृत्तपत्रांचे छायाचित्रकारही आयुक्तांच्या दालनात आले. त्यावेळी आयुक्तांनी सर्व कर्मचाऱ्यांना खालच्या भाषेत शिवीगाळ केली. ‘या सर्वांना बाहेर काढा,’ असे त्यांनी सुरक्षारक्षकांना फर्मावले. अशा भाषेत बोलू नका, अशी विनंती मी केली. तेव्हा ‘तुम्ही या सर्वांचे वकिलपत्र घेऊन आलात का,’ असा प्रश्न त्यांनी केला. ‘माझ्या कर्मचाऱ्यांशी कसे बोलायचे हे तुम्ही मला शिकवू नका,’ असे म्हणत ‘अरे यालापण बाहेर काढा,’ असे आदेश आयुक्तांनी सुरक्षारक्षकांना दिले. तुम्ही मला अशा भाषेत बोलू शकत नाहीत, असे मी आयुक्तांना म्हणालो. तेव्हा त्यांनी आर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. ‘माझ्या धुळ्यातील सर्व गुंड आणून तुला ठोकून हातपाय तोडून फेकून द्यायला लावतो. यापुढे तू कसा जगतो आणि तुला कोण जगवतो ते पाहतो,’ अशी धमकी दिली. धमकी देणाऱ्या अशा या विक्षिप्त माणसाकडून मला भीती वाटत आहे. माझ्या जीवाला धोका असल्यामुळे आयुक्तांच्या विरोधातली माझी तक्रार नोंदवून घ्यावी व मला पोलिस संरक्षण द्यावे,’ असेही या निवेदनात म्हटले आहे.
सिटी चौक पोलिसांनी संजय केनेकर यांच्या तक्रार अर्जाची नोंद घेतली आहे. या संदर्भात आयुक्त महाजन यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

 

January 03, 2015 in मुख्य पान

आरक्षण विधेयक मंजूर करा!, मुस्लीम बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

यवतमाळ – मुस्लीम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी निर्गमित केलेल्या आरक्षणाचे विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडण्यात आले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या मुस्लीम बांधवानी आज शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आरक्षणाचे विधेयक मंजूर करण्यात यावे, अशी मागणी राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे निवेदनातून केली.
मुस्लीम व मराठा आरक्षणाबाबत अधिसुचना निर्गमित केल्यानंतर अधिसुचनेचे विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडले जाईल अशी अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र सरकारने केवळ मराठा आरक्षण विधेयक पारीत करून मुस्लीम समाजावर अन्याय केला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. न्या. राजेंद्र सच्चर समिती, रंगनाथन मिश्र आयोग, व न्या. रहेमान समितीच्या अहवालानुसार मुस्लिम समाजाची स्थिती अत्यंत विदारक आहे. त्यावरूनच शासनाने एसबीसी (ए) ची अधिसुचना निर्गमित केली होती. मात्र सरकारने विधेयक अधिवेशनात न मांडल्यामुळे समाजावर अन्याय झाला आहे. सरकारने विधेयक मंजूर करण्यासाठी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून मुस्लिम समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फ त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली. यावेळी आ. ख्वाजा बेग, आरीफ काझी, मुबारक तंवर, आरीज बेग, सैय्यद फारूख, तारीक लोखंडवाला, बाबूसेठ इसानी, इनायतउल्ला जनाब, ऐजाज जोश, सय्यद निसार, सलीम सोळंकी यांच्यासह मुस्लीम समाज बांधव उपस्थित होते.

January 03, 2015 in विदर्भ

अतिक्रमणावर बुलडोजर, तीनशे दुकाने हटवले

यवतमाळ – अतिक्रमणाने वेढलेल्या शहराचा चेहरा मोहरा बदलविण्यासाठी प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहिमेस प्रारंभ केला आहे. आज शनिवारी आर्णी मार्गावरील तब्बल अडीचशे दुकानांनवर बुलडोजर चालविण्यात आला. यावेळी व्यवसायिकांनी उपासमारीचा प्रश्न उपस्थित करीत अतिक्रमण हटविण्यास विरोध केल्याने तणाव निर्माण झाला होता. मात्र अधिकाºयांनी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली.
शहारातील चौका – चौकात व्यवसायिकांनी दुकाने थाटल्याने रहदारीचा व वाहतुकीचा प्रश्न गंभिर झाला आहे. गेल्या दोन वर्षात नगर पालिके ने अतिक्रमण हटविण्यासंदर्भात ठोस कारवाई न केल्याने या कालावधीत शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले. नगर पालिका, महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेसह रस्त्यावर व्यवसायीकांनी व्यवसाय मांडल्याने नागरीकांना जीव मुठीत धरूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. अतिक्रमणामुळे शहराचा चेहरा देखील विद्रुप झाला आहे. गेल्या दोन वर्षापासून अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्याची मागणी जनतेमधून होत होती. दरम्यान नवीन वर्षात अतिक्रमण हटविण्याचा मुहूर्त नगर पालिकेला सापडला. आज शनिवारी आर्णी मार्गावरील पानटपºया, चहाकॅटीनसह किरकोळ व्यवसायिकांची दुकाने हटविण्यात आली. अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू असताना, व्यवसायीकांनी याला विरोध दर्शविल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात अधिकाºयांना अतिक्रमण हटविण्याची कारवाई करावी लागली. आज पासून प्रारंभ झालेली अतिक्रमण हटाव मोहिम १५ जानेवारीपर्यंत राबविण्यात येणार आहे. पहिल्यादिवशी वडगाव ग्रामपंचायत हद्दीपासून अतिक्रमण हटविण्यास सुरुवात झाली. सायंकाळपर्यंत आर्णी नाक्यावरील पोलीस चौकीपर्यंत अतिक्रमण हटविण्यात आले होते. या मोहिमेत नगर पालिकेचे मुख्याधिकारी, दीपककुमार मिना, रविंद्र पांढरे, उपविभागिय अधिकारी नरेंद्र टापरे, तहसीलदार अनूप खांडे, पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांच्यासह बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कुठलिही अनुचित घटना घडू नये म्हणून मुख्य मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 

January 03, 2015 in विदर्भ
पत्रकार दिनानिमित्त स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन व वादविवाद स्पर्धा 0

पत्रकार दिनानिमित्त स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन व वादविवाद स्पर्धा

download

नेर – येथे  राष्ट्रीय महाराष्ट्र पत्रकार संघाचे वतीने ६ जानेवारी रोजी मंगळवारला पत्रकार दिनाचे औचित्य साधुन स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबिर व वादविवाद स्पर्धेचे आयोजन स्वागत मंगल कार्यालय येथे केले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष पवन जयस्वाल हे राहणार आहे. उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी राहूल रंजन महिवाल हे राहणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लोकमतचे कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, राष्टÑीय मराठी पत्रकार संघाचे विदर्भाध्यक्ष तथा परिवर्तन समाचारचे आवृत्ती संपादक संदीप खडेकर, नेहरू शिक्षण संस्थेच अध्यक्ष परमानंद अग्रवाल उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमाला मार्गदर्शन महणून प्रा. संजय नाथे, अचलपूरचे उपविभागीय अधिकारी श्यामकांत म्हस्के, उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना मराडे, उपजिल्हाधिकारी संदीप कुमार अपार, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे, ठाणेदार गणेश भावसार, पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिता पवार, पोलिस उपनिरीक्षक डॉ. रंगनाथ जगताप इत्यादी मान्यवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे.
कार्यक्रमाचे दुसºया सत्रात वादविवाद स्पर्धेचे आयोजन केले आहे. ‘वाढत्या भ्रष्टाचाराला जनता तारक की मारक’ हा वादविवाद स्पर्धेचा विषय आहे. स्पर्धेतील विजयी स्पर्धकाला प्रथम बक्षीस ३,००१ रुपये, द्वितीय बक्षीस २,००१ रुपये तर तृतीय बक्षीस १,००१ रुपये ठेवण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संदीप खडेकर तर उद्घाटक म्हणून दैनिक हिंदुस्थानचे आवृत्ती संपादक नागेश गोरख हे उपस्थित राहणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून राजेंद्र माहूरे, श्रमीक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नितीन पखाले, झी २४ तासचे जिल्हा प्रतिनिधी श्रीकांत राऊत, गटविकास अधिकारी गौतम भगत, दै. पुण्य नगरीचे उपसंपादक तथा महाराष्टÑ न्युज नेटवर्कचे संपादक राहुल वासनिक, भाजपाचे तालुकाध्यक्ष पुरूषोत्तम लाहोटी, नगरसेवक भाऊराव ढवळे, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष गजानन काळे, अविनाश बन्सोड, मिना सावळकर, जेष्ठ पत्रकार नारायण वंजारी, दै. दिव्य मराठीचे जिल्हा प्रतिनिधी नितीन भागवत, नगरसेवक संजय दारव्हटकर, अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे बंडू बोरकर, नगर परिषदचे बांधकाम सभापती शालीक गुल्हाणे, नगरसेविका अ‍ॅड. रश्मी पेटकर, भाजपाचे जिल्हा सचिव राजेंद्र देऊळकर, वैष्णवी गुल्हाणे, पंचायत समिती सभापती भरत मसराम, वसंत महल्ले, प्रा. शांतरक्षीत गावंडे इत्यादी उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन काळे, कार्याध्यक्ष अरूण राऊत, सचिव किशोर वंजारी, उपाध्यक्ष अशोक इसाळकर, कोषाध्यक्ष संजय राऊत, संघटक प्रवीण पाटमासे, संघटक विनोद कापसे, मार्गदर्शक प्रा. सदाशिव जरोटे, पांडूरंग भोयर, रमेश दिक्षीत, नदिम खान, निलेश वंजारी, वसीम शेख, बिस्मिला पठाण, अमीन पठाण, राहुल सोहर यानी केले आहे.

January 03, 2015 in महाराष्ट्र
१ रुपयांच्या नोटेची पुन्हा छपाई सुरू 0

१ रुपयांच्या नोटेची पुन्हा छपाई सुरू

one-rupee
औरंगाबाद – चलनातून गायब झालेल्या एक रुपयांच्या नोटा अवघ्या दोन महिन्यांत शहरातील बाजारपेठेत दिसतील. १ जानेवारीपासून या नोटांची छपाई केंद्र सरकारच्या वतीने सुरू करण्यात आली.
१, २ आणि ५ रुपयांची नाणी चलनात आल्यानंतर सुमारे २० वर्षांपूर्वी या रुपयांच्या नोटांवर बंदी आणली. एक रुपयांच्या नोटांची छपाई नोव्हेंबर १९९४ मध्ये, दोन रुपयांच्या नोटा फेब्रुवारी १९९५ मध्ये, तर पाच रुपयांच्या नोटांची छपाई नोव्हेंबर १९९५ मध्ये बंद करण्यात आली. दरम्यान, ५ रुपयांच्या नोटांची छपाई सरकारने पुन्हा सुरू ठेवली होती. आता केंद्र सरकारने पुन्हा एक रुपयांच्या नोटांची छपाई करण्याचा निर्णय घेतला असून, अर्थ मंत्रालयाने याबाबतची अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध केली आहे.औरंगाबादमध्ये एक रुपयांची नोट यायला निदान २ महिने तरी लागतील. औरंगाबादमध्ये या नोटा आरबीआयकडून एसबीआय, महाराष्ट्र बँक आणि एसबीएचच्या मुख्य कार्यालयाच्या मागणीनुसार याच बँकांना दिल्या जातील. छपाईनंतर आधी मुंबई-पुण्यात आल्यानंतर त्या व्यवहारात येण्यास सुरुवात होईल.

January 03, 2015 in मुख्य पान
३५० विद्यार्थ्यांना विषबाधा 0

३५० विद्यार्थ्यांना विषबाधा

21142523
सोलापूर – जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात कोर्टी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये सुमारे ३५० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे वृत्त आहे. या विद्यार्थ्यांपैकी २० ते २२ मुलांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या सगळ्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती मिळते आहे.
श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये आज सकाळी साडे नऊच्या सुमारास विद्यार्थ्यांना मध्यान्न भोजन योजने अंतर्गत पुरण्यात येणारी खिचडी देण्यात आली. त्यानंतर अनेकांना मळमळ, तसेच अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर एकापाठोपाठ एक असे सगळेच विद्यार्थी पोट दु:खी आणि मळमळ झाल्याची तक्रार करू लागले. या विद्यार्थ्यांना प्रथम स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. ज्या २० ते २० मुलांची प्रकृती खालावली त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील उपचारानंतर मुलांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. या सर्व प्रकाराची चौकशी सुरू असून अन्न पदार्थांचे नमूने प्रशासनाकडून गोळा करण्यात आले आहेत. तपाणी अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे कळते.

January 03, 2015 in मुख्य पान