पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for January 4th, 2015

राजकीय पक्षांना मालमत्ता जाहीर करण्याचे आदेश 0

राजकीय पक्षांना मालमत्ता जाहीर करण्याचे आदेश

prashna-tatvancha-jpg
नवी दिल्ली- देशातील लोकशाही बळ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणा-या राजकीय पक्षांनी आपल्या जमिनी व बंगले संदर्भातील सर्व कागदपत्रे जाहीर करावीत, तसेच ही माहिती वेबसाइटवर टाकावी, असे आदेश केंद्रीय माहिती आयोगाने केंद्रीय नगरविकास खात्याला दिले आहेत.
राजकीय पक्षांच्या नावावरील जमीन व बंगले असल्यास त्यांनी त्याची माहिती वेबसाइटवर टाकणे बंधनकारक केले आहे. केंद्रीय माहिती आयोगाने केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिका-याला सर्व नोंदणीकृत राजकीय पक्षांशी संबंधित सर्व कागदपत्रे, पत्रव्यवहार, मार्गदर्शक तत्वे आणि अधिसूचना आदींची माहिती चार आठवडयात सादर करण्याचे आदेश दिले. तसेच नगरविकास खात्याकडून सर्व पक्षांची माहिती जाहीर करण्यास सांगितले आहेत.
सामाजिक कार्यकर्ते सुभाष अग्रवाल यांनी राष्ट्रीय जनता दलाच्या मुख्यालयाचे नामकरण ‘राबडी भवन’ केल्याप्रकरणी केंद्रीय माहिती आयोगाकडून माहिती मागवली होती. त्याला पक्षाचे नेते नवलकिशोर राय यांनी हरकत घेतली होती. त्यामुळे अग्रवाल यांना माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी नगरविकास खात्याकडे धाव घेतली. तेथेही त्यांची निराशा झाली. बिहार सरकारने राजद पक्षाला पाटणा किंवा अन्य राज्यांमध्ये भूखंड दिला आहे का याची माहिती अग्रवाल यांना हवी होती. नगरविकास खात्याने दिलेल्या माहितीनुसार, नवी दिल्लीत राजदला कोणताही भूखंड दिलेला नाही, अशी माहिती मिळाली.

January 04, 2015 in मुख्य पान
संशयातून पत्नीचा खून 0

संशयातून पत्नीचा खून

download (5)
पुणे – मृतावस्थेत सापडलेल्या दाम्पत्याचे मृत्यूचे कारण स्पष्ट झाले असून चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्यानंतर पतीने स्वत: आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. कोथरूडमधील किष्किंधानगर येथे गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. दीपक हरी जाधव (वय ३१) आणि त्याची पत्नी तेजश्री (२०, रा. किष्किंधानगर, कोथरूड) हे दोघे मृतावस्थेत सापडले होते. दीपकने तेजश्री हिच्यावर चारित्र्याचा संशय घेऊन गळा दाबून तसेच डोक्यावर मारहाण करून तिचा खून केला. त्यानंतर स्कार्फच्या सहाय्याने स्वत: गळफास घेतला, अशी माहिती कोथरूड पोलिसांनी दिली.
बुधवारी ३१ डिसेंबर रात्रीपासून हे दोघे शेजाऱ्यांना दिसले नव्हते. त्यानंतर शुक्रवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. तेजश्री हिच्या दोन्ही हातांना आणि गळ्याजवळ रक्ताचे डाग होते. त्यामुळे दीपकने आपल्या हाताच्या शिरा कापून घेतल्यानंतर तिचा गळा दाबला असावा, त्यानंतर तिला डोक्यावर मारहाण करून खून केल्यानंतर गळफास घेतला असावा, असे पोलिसांनी सांगितले. तेजश्री ही दीपकची दुसरी पत्नी असून सुमारे एक वर्षापूर्वी या दोघांनी प्रेमविवाह केला आहे. त्याची पहिली पत्नी विभक्त झाली आहे. दीपक आणि त्याच्या पहिल्या पत्नीची दोन मुलेही आहेत.

January 04, 2015 in मुख्य पान
निलेश राणे पोलिसांच्या ताब्यात 0

निलेश राणे पोलिसांच्या ताब्यात

M_Id_237652_Nilesh_Rane
रत्नागिरी – रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवू पाहणारे काँग्रेस नेते निलेश राणे आणि त्यांच्या ५० कार्यकर्त्यांना रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चौकशी करून त्यांना सोडण्यात येईल माहिती मिळते आहे.
रत्नागिरी येथे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचा जाहीर सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी सुरेश प्रभू रत्नागिरी शहरात सकाळी दाखल होणार हे लक्षात घेऊन निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली ५० काँग्रेस कार्यकर्त्यांनी सकाळपासून आंदोलन केले. कोकण रेल्वेच्या प्रश्नांकडे सुरेश प्रभू दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. सकाळी दहाच्या सुमारे निलेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मार्ग रोखून धरण्याचा प्रयत्न केला. यावेळी रत्नागिरी पोलिसांनी कारवाई करत निलेश राणे यांच्यासह ५० जणांना ताब्यात घेतले.

January 04, 2015 in मुख्य पान
पत्रकादिनानिमित्य व्याख्यान, कवी संमलन 0

पत्रकादिनानिमित्य व्याख्यान, कवी संमलन

IMG-20140829-WA0005
आर्णी, दि.४ – आद्य पत्रकार, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व पत्रकादिनाचे औचित्य साधून आर्णी प्रेस क्लबच्या वतीने व्याख्यान व कवी संमेलनाचे आयोजन ६ जानेवारी रोजी माहेर मंगल कार्यालयात केले आहे.
सकाळच्या सत्रात ‘सायबर क्राईम समस्या आणि आव्हान’ या विषयावर न्या उमेशचंद्र मोरे यांचे व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून न्या. काळपगार, तहसीलदार , ठाणेदार हनुमंत गायकवाड, गटविकास अधिकारी प्रकाश नाटकर उपस्थितीत होते. इंटरनेचा वाढता वापर त्यातून चुकीच्या संदेशामुळे निर्माण होणारी स्थिती आदी बाबींवर हे व्याख्यान महत्वपूर्ण ठरणार आहे. सायंकाळी ६ वाजता मराठी कविता गझलची बहारदार काव्य मैफल होणार आहे. सुप्रसिध्द वºहाडी कवी शंकर बडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. कलीम खान, बबन सराडकर, नितीन देशमुख, तुळशीदास खराटे, मसुद पटेल, आबेद शेख, विजय ढाले यांचा सहभाग असेल. कार्यक्रमाचे संचालन गझलकार प्रा. रवी चापके हे करतील. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन आर्णी प्रेसचे अध्यक्ष संदीप ढोले, उपाध्यक्ष नौशाद अली, सचिव संजय राठोड, संस्थापक प्रमोद कुदळे, हरिओम बघेल, विवक दहिफळे, सचिन शिंदे, बबलू जाधव, संजय जोशी, विनोद सोयाम आदीनी केले आहे.

January 04, 2015 in विदर्भ
स्टेट बॅकेत चोरीचा प्रयत्न 0

स्टेट बॅकेत चोरीचा प्रयत्न

images
बाभुळगाव, दि. ४ – येथील स्टेट बँक आॅफ इंडियाचे अज्ञात चोरट्यांनी दोन कुलपे तोडून चोरीचा प्रयत्न केल्याची घटन काल मध्यरात्री घडली.
३ जानेवारीच्या मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी येथील स्टेट बँक शाखेच्या मागील लोखंडी ग्रील व दाराचे कुलुप तोडून बँकेच्या आत प्रवेश केला. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. आज सकाळी संदेश वाहक राजगडकर यांच्या निदर्शनात हा प्रकार आला. त्यांनी त्वरीत शाखा व्यवस्थापक विश्वकांत निमजे यांना फोनद्वारे माहिती दिली. विश्वकांत निमजे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम ४५७, ३८०, ५११ अन्वये चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला. घटनास्थळी ठाणेदार महिपालसिंग चांदा यांनी भेट दिली. विषेश म्हणजे या बँकत रात्रीच्या वेळी कुठलाही चौकीदार ठेवण्यात आला नाही. एक चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळता कुठलाही कर्मचारी, अधिकारी मुख्यालयी राहत नाही. सर्वजण बाहेर गावाहुनच अप-डाऊन करतात. त्यामुळे सदर बँक रामभरोसे सोडली असल्याची चर्चा आज दिवसभर परिसरात होती.

January 04, 2015 in विदर्भ
बाभुळगावचे ठाणेदार महिपालसिंग चांदा 0

बाभुळगावचे ठाणेदार महिपालसिंग चांदा

2014-07-04~police_logo_ns
बाभुळगाव, दि. ४ – तब्बल दिड महिन्यांपासुन रिक्त असलेल्या बाभुळगाव पोलिस स्टेशनच्या ठाणेदारपदी महिपालसिंग चांदा रूजु झाले आहेत. त्याच प्रमाणे मुंबई येथुन बदलुन आलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक हुलगे हे ही रूजु झाले आहेत. तर प्रभारी ठाणेदार समाधान धंदरे यांना यवतमाळ ग्रामिणची जबाबदारी देण्यात आली आहे.
दोन अधिकाºयांची नियुक्ती झाली असली तरी अद्याप पोलिस उपनिरिक्षकाची जागा रिक्त असुन बदलीवर गेलेल्या अनेक पोलिस कर्मचाºयांच्या जागी नवीन कर्मचारी आलेले नाहीत. त्यामुळे तोडक्या कर्मचाºयाच्या भरोशावर तालुक्यातील ९४ गावांचा कारभार चालत आहे.

January 04, 2015 in विदर्भ
११ हजार उमेदवारांनी दिली परिचरपदाची परीक्षा 0

११ हजार उमेदवारांनी दिली परिचरपदाची परीक्षा

2014-11-05exmp_ns
यवतमाळ, दि. ४ – जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या परिचरपदाच्या लेखी परीक्षेचा पेपर ११ हजार उमेदवारांनी सोडविला. जिल्ह्यातील ९० केंद्रावर दुपारी २ ते ३.३० वाजताच्या दरम्यान ही परीक्षा पार पडली. परीक्षेदरम्यान अनुचित घटना घडू नये म्हणून परीक्षा केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यापूर्वी पेपर फुटल्यामुळे आजच्या परीक्षेकडे तब्बल सात हजार उमेदवारांनी पाठ फिरविली. यापूर्वी २२ नोव्हेंबर रोजी परिचरपदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. मात्र विस्तार अधिकाºयाने पेपर फोडल्यामुळे परीक्षा रद्द करण्याची नामुष्की जिल्हा परिषद प्रशासनावर ओढवली होती. रद्द करण्यात आलेली परीक्षा पुन्हा घेण्यात येत असल्याने प्रशासनावर कमालीचा ताण आला होता. या परीक्षेला कुठल्याही प्रकारचे गालबोट लागू नये म्हणून प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली. परिचरपदाच्या ४५ जागांसाठी १८ हजार १५३ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले होते. त्यापैकी ११ हजार २६४ उमेदवारांनी परीक्षा दिली. तब्बल ६ हजार ८८९ उमेदवारांनी परीक्षेकडे पाठ फिरविली. पेपर फुटीमुळे उमेदवारांनी परीक्षेला गैरहजर राहने पसंत केल्याचे सांगण्यात येते. उपस्थित विद्यार्थ्यांची टक्केवारी ४० च्या घरात आहे. बंदुकधारी पोलीस व संपर्क अधिकारी यांच्या सुरक्षेत पेपर परीक्षा केंद्रावर पोहोचवण्यात आले. यवतमाळ शहरात ४३ परीक्षा केंद्र होते. तर कळंब, बाभूळगाव, राळेगाव, घाटंजी, आर्णी, दारव्हा, नेर तालुक्यात ४७ केंद्रावर परीक्षा घेण्यात आली.

January 04, 2015 in रोजगार, विदर्भ
ट्रक चोरट्यांना अटक, एसडीपीओची कारवाई 0

ट्रक चोरट्यांना अटक, एसडीपीओची कारवाई

IMG-20150104-WA0036

यवतमाळ, दि. ४ – ढेपीचा ट्रक चोरून नेणाºया ट्रक चोरट्यांना एसडीपीओच्या पथकाने वरोरा येथे अटक केली असून, शाहरुख बिसमिल्ला खॉ (१९), शहजाद खॉ शम्मी खॉ पठाण (१९) रा. दोघेही इंदीरा नगर असे अटकेतील आरोपींची नावे असून, फरार असलेल्या दोघांचा पोलीस शोध घेत आहे.
शहरातून ३० डिसेंबरला ट्रक चोरी झाल्याची घटना घडली होती. चार चोरट्यांनी संगणमत करून १४ लाख रुपयांची ढेप असलेला ट्रक पळविला होता. याबाबतची पोलीस स्टेशनला तक्रार दाखल झाल्यानंतर याप्रकरणाचा तपास सुरू होता. दरम्यान चोरटे वरोºयात असल्याची माहिती एसडीपीओ राहुल मदने यांच्या पथकाला मिळाली. त्यांनी वरोरा गाठून वरील दोन चोरट्यासह मुद्देमाल जप्त केला आहे. फरार असलेल्या दोन चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, ही कारवाई एसडीपीओ राहुल मदने, एपीआय सारंग मिरासे, इकबाल शेख,   प्रमोद मडावी, संतोष मडावी, बंडू मेश्राम, नीलेश राठोड, सुरेश कांबळे  आदींनी केली.

January 04, 2015 in विदर्भ