
यवतमाळ, दि. ११ – नेताजी भवन व व्यवसायीकांची दुकाने पालकमंत्री संजय राठोड यांच्या इशाºयावर प्रशासनाने हटविल्याचा आरोप विदर्भवीर जाबूवंतराव धोटे यांनी आज रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला. ही कारवाई लोकशाहीचा खून करणारी असून, जशास तसे उत्तर देणार असल्याचे धोटे यांनी सांगितले.
शहरात ३ जानेवारीपासून नगर पालिका, महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण हटाव मोहिम राबविली. रहदारी व वाहतुकीच्या दृष्टीने रस्ते मोकळे असणे आवश्यक आहे. मात्र अतिक्रमणधारकांचे पुर्नवसन करण्याच्यादृष्टीने प्रशासनाने आधी उपाययोजना करून दुकानांवर बुलडोजर चालवायला हवा होता. जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांचेसह इतर अधिकाºयांनी अतिक्रमण हटविण्यात येणार नाही असे बैठकीत सांगितले होते. मात्र दुसºया दिवशी सकाळी ७ वाजताच बुलडोजर लावून दुकाने पाडण्यात आली. त्यामुळे ही कारवाई पालकमंत्री संजय राठोड यांच्या सांगण्यावरून झाली आहे. ७५० व्यवसायीकांचा रोजगार हिरावणाºया पालकमंत्र्यानी केवळ नेताजी भवन हटविण्याच्या हेतूने केलेला हा प्रकार असल्याचे जांबुवंतराव धोटे यांनी सांगितले. अतिक्रमण हटवितेवेळी नेताजी भवनातील महापुरूषांच्या प्रतिमांची विटंबना झाली असल्याचा आरोप करीत संजय राठोड यांचे मंत्रीपद काढून घेण्यात यावे अशी मागणी धोटे यांनी केली. या प्रकाराचे उत्तर आपण देणार असून, त्यासाठी १३ जानेवारीला जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले असून, त्या सभेतच आपण भुमिका स्पष्ट करणार असल्याचे जांबुवंतराव धोटे यांनी सांगितले. यावेळी विजया धोटे, क्रांती धोटे, लालजी राऊत, प्रभाकर काळे व व्यवसायीक उपस्थित होते.
Archive for January 11th, 2015
0
पालकमंत्र्याच्या इशाºयावर अतिक्रमण हटविले, जाबुवंतराव धोटे यांचा आरोप
0
बिबट्याचा संशयास्पद मृत्यू

यवतमाळ , दि. ११ – दारव्हा तालुक्यातील ब्रम्हनाथ शिवारामध्ये बिबट्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी ११ जानेवारीला उघडकीस आली. या बिबट्याचा एक पंजा कापून नेला असून मृत्यू संशयास्पद झाला आहे.
दारव्हा तालुक्यातील ब्रम्हनाथ येथील जंगलात अरज बिबट्याचा मृतदेह आढळला. या बाबतची माहिती मिळताच दारव्ह्याचे क्षेत्र सहाय्यक धोत्रे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळ दिग्रस वनपरिक्षेत्रात येत असल्याने त्यांनी दिग्रस वनविभागाला माहिती दिली. मात्र सहा तास कर्मचारी उशिरा आल्याने वन्यप्रेमींनी संताप व्यक्त केला. बिबट्याची दुर्गंधी सुटल्याने हा मृत्यू बºयाच दिवसापासून झाल्याचा अंदाज वनअधिकाºयांनी व्यक्त केला. या बिबट्याचा एक पंजा कापला आहे. गुप्तधन शोधण्याकरिता सुद्धा वाघाची नखे कामी पडत असून मृत्यू बाबत संशय व्यक्त होत आहे.
संयुक्त प्रयत्नाने देशाचा विकास शक्य – अरुणकुमार
यवतमाळ ,दि. ११ – देश आज विपरित परिस्थितीतून जात आहे. इतक्या वर्षानंतरही आपला देश परिपूर्ण होऊ शकलेला नाही. भ्रष्टाचाराने देशाला पोखरून सोडले आहे. देशाच्या वर्तमान स्थितीवर विचारमंथन करून संयुक्त प्रयत्नानेच देशाचा विकास होऊ शकतो असे प्रतिपादन राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे अखील भारतीय सहसंपर्कप्रमुख अरुणकुमारजी यांनी केले. स्थानिक पोस्टल मैदानावर आयोजित रा.स्व.संघाच्या एकदिवसीय साधना सम्मेलनात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की संघाच कार्य देशवासियांना एकसंघ करने आहे. कार्यकर्त्यांच्या शक्तिवर समाजाला संघटित करणारी शक्ति निर्माण करायची आहे. एका महान व्यक्तिमुळे देश महान होत नसतो, देशाला महान बनविण्यासाठी सपूर्ण समाजाला महान बनने आवश्यक आहे. देशातील अंतर्गत मदभेद दूर होने गरजेचे आहे असेही ते म्हणाले. यावेळी व्यावपिठावर राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी उपस्थीत होते.
0
आरक्षणाला धक्का लावू नये, अन्यथा रस्तयावर उतरु – वसंतराव पुरके

यवतमाळ, दि. ११ – आदिवासींना घटनात्मक मिळालेल्या आरक्षणाला धक्का लावू नये, घटनेने ७.५ टक्के आरक्षण आदिवासींना दिले असून कोणत्याही राजकारणकत्र्यांनी मतांसाठी लहरीपणाने वागून आदिवासीच्या आरक्षणात फेरबदल करु नये, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, असा इशारा आज विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी दिला.
१ लाख ४५ हजार लोकांनी बोगस जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे आदिवासी बनवून आदिवासींच्या नोकºयावर डल्ला मारला आहे. २००१ मध्ये कायदा बनला होता की, बोगस आदिवासीचे जातीचे प्रमाणपत्र देणे किंवा घेणे यात दोन वर्षाची शिक्षा झाली पाहिजे, असा कायदा करण्यात आला होता. पण या कायद्याचा दुरुपयोग करण्यात आला. यास शासनाने काढलेला जी.आर. कारणीभुत ठरला आहे. तो निघालेला जी.आर. रद्द करण्याची मागणी आहे. पुर्वी आदिवासी कॅटीगिरीमध्ये ४७ जातींचा समावेश होता. पण त्यापैकी दोन जाती काढून टाकण्यात आल्या. १५ वर्षे सत्तेत असूनसुध्दा हा बोगस जी.आर. आम्हाला रद्द करता आला नाही, त्याचे मोठे कारण म्हणजे पदावर बसलेले राजकर्ते आणि अधिकारी यास यांचा विरोध होता. कोणला कीतीही आरक्षण द्या, पण आमच्या आदिवासींच्या ७.५ टक्के आरक्षणाला हात लावू नये, असे वसंतराव पुरके यांनी विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
कृषी साहित्याच्या दुकानाला आग, ५० लाखांचे नुकसान
यवतमाळ , दि. ११ – येथील दवाबाजारनजीक असलेल्या जलाराम ट्रेडर्सला आज रविवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली. या आगीत ५० लाख रुपयांचे शेती साहित्य जळून खाक झाले असून, दोन बंब पाण्याचा मारा केल्यानंतर आग आटोक्यात आली.
शहरातील दबाबाजारनजीक अमित गडेचा रा. अवधुतवाडी यांचे जलाराम ट्रेडर्स आहे. आज त्यांची दुकान बंद होती. दरम्यान दुपारच्या सुमारास दुकानातून परीसरातील लोकांना धुर निघताना दिसला. दुकानाला आग लागली असावी असा अंदाज नागरीकांनी बांधून गडेचा यांना फोनवर माहिती दिली. यावेळी अग्नीशामन दलाला पाचारण करण्यात आले. दोन बंब पाण्याचा मारा करण्यात आल्यानंतर आग आटोक्यात आली. मात्र तो पर्यंत शेतीउपयोगी औषध व खत आदी ५० लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले होते. याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली असून, पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
0
रिलायन्स गुजरातमध्ये १ लाख कोटींची गुंतवणूक करणार

गांधीनगर, दि. ११ – मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया या मोहीमेमुळे देशभरात एक नवीन उत्साह आल्याचे सांगत रिलायन उद्योग समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी गुजरातमध्ये १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. तर आदित्य बिर्ला समुह, सुझूकी या ख्यातनाम उद्योग समुहांनीही गुजरातमध्ये गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे उद्योजकांची पावले आता मोदींच्या गुजरातकडे वळत असल्याच दिसत आहे.
गुजरातमध्ये उद्योजकांसाठी व्हायब्रंट गुजरात या परिषदेचे आयोजन करण्यात आले असून रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेचे उद्घाटन केले. या परिषदेमध्ये जगभरातील उद्योजक सहभागी झाले असून अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी, संयुक्त राष्ट्राचे महासचिव बान की मून आदी मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. भारताची अर्थव्यवस्था वेगाने विकासाच्या वाटेवर जाईल अशी आशा मुकेश अंबानी यांनी व्यक्त केली. आदित्य बिर्ला समुहाचे कुमारमंगलम बिर्ला यांनीदेखील गुजरातमध्ये सिमेंट आणि अन्य उद्योगांच्या विस्तारासाठी २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली. सुझूक आणि अन्य उद्योजकांनीही गुजरातमध्ये गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे मेक इन इंडिया या मोहिमेला चालना देण्यासाठी व्हायब्रंट गुजरात ही परिषद मोदींच्या मदतीला धावून आल्याचे दिसते.
0
बसची तेल टँकरला धडक, ५७ ठार

कराची – पाकिस्तानातील सिंध प्रांतात रविवारी एका प्रवासी बसची समोरुन येणा-या तेल टँकरला धडक बसल्याने झालेल्या अपघातात सुमारे ५७ जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाले आहेत.
कराचीहून शिकारपूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणा-या आणि प्रवाशांनी खच्चून भरलेल्या बसला महामार्गावर ऑईल टँकरची जोरदार ध़डक बसली यामुळे बसने पेट घेतला. यामध्ये ५७ जण ठार झाले तर चार जण जखमी झाले. जखमींना जिन्नाह रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघात घडला त्यावेळी बसमध्ये सुमारे ६० ते ७० प्रवासी प्रवास करत होते. अपघात पिडीत व्यक्तीने जिओ न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, बस प्रवाशांनी खच्चून भरलेली होती आणि भरधाव वेगात होती. यावेळी चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि हा अपघात घडला. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही असाच भीषण अपघात घडला होता. प्रवाशांनी भरलेली बस एका ट्रकवर आदळल्याने सुमारे ५७ जण ठार झाले होते. तर मार्चमध्ये ऑईल टँकर आणि ट्रेलर ट्रक्टरमध्ये झालेल्या अपघातात ४३ जण ठार झाले होते.
0
राज्यात थंडीचा कडाका वाढणार

पुणेः राज्याचा काही भागात असलेल्या थंडीच्या लाटेचा प्रभाव राज्यभर जाणवत आहे. संपूर्ण राज्यात किमान तापमानात मोठी घट झाली असून पुण्यातील पारा ७.४ अंशांपर्यंत खाली आला आहे. पुढील दोन दिवसांत थंडीची तीव्रता आणखी वाढणार असून पुण्यात पारा सहा अंशांपर्यंत घसरेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
विदर्भाच्या काही भागात तीव्र थंडीची लाट आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात थंडीची लाट आहे. शनिवारी राज्यातील सर्वात नीचांकी तापमान नागपूर येथे (५.३ अंश सेल्सियस) नोंदले गेले. विदर्भाबरोबरच मध्य प्रदेशाच्या काही भागात आणि तेलंगणाच्या काही भागातही थंडीची लाट कायम आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा पाच ते सात अंशांनी कमी आहे. मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा दोन ते चार अंशांनी कमी आहे. त्यामुळे राज्यातील थंडीचा कडाका वाढला आहे.
0
चीनमध्ये बुरख्यावर बंदी

बीजिंग – आयसिस, तालिबान, अल् कायदासारख्या दहशतवादी संघटनांनी इस्लामच्या नावावर जगभरात हिंसाचार चालवला असतानाच चीन सरकारने त्यांच्या देशातील मुस्लिमबहुल उरुम्की शहरात सार्वजनिक ठिकाणी बुरखा बंदी लागू केली आहे. चीनचा हा प्रांत मुस्लिम फुटिरतावाद्यांचा बालेकिल्ला असल्याने या निर्णयाला जोरदार विरोध होण्याची शक्यता आहे.
चीनमध्ये शिनझियांग हा मुस्लिमबहुल प्रांत आहे. हिंसाचाराने खदखदणाऱ्या या प्रांताची राजधानी उरुम्की येथे चीनने बुरखाबंदी केली आहे. ही घोषणा करताना सरकारने फ्रान्स व बेल्जियममधील बुरखाबंदीचा हवाला दिला आहे. बुरखाबंदीच्या निर्णयाच्या एक दिवस आधीच कडव्या धार्मिक विचारांचा प्रसार करणाऱ्या वेबसाइट्सवरही बंदी घालण्यात आली आहे. शिनझियांग उईगुर या स्वायत्त प्रांताच्या विधानसभेने या निर्णयाला मान्यता दिली. बुरखा हा उईगुर समाजाच्या महिलांचा पारंपरिक वेष नसल्याचे विधानसभेने म्हटले आहे.









