पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for February 6th, 2014

व्यापाºयास दोन महिने शिक्षा

उमरखेड –  मालमत्ता विक्रीच्या सौदयात दिलेला धनादेश अनादर झाल्याने सराफा व्यावसायीकाला दोन महिने शिक्षा सुनावली. येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी शेंडे यांनी आज हा निकाल दिला.
श्याम विठ्ठल उदावंत असे सराफा व्यावसायीकाचे नाव आहे. येथील प्रतिष्ठीत पुरुषोत्तम भंडारी यानी आरोपी श्याम उदावंत यांची मालमत्ता विकत घेण्याचा तोंडी सौदा केला होता. सौद्यापोटी त्यानी पाच लाख रुपये अनातमत रक्कम घेतली. त्यानंतर अडचण संपल्याचे कारण सांगून सौदा रद्द करून भंडारी याना पाच लाखाचा धनादेश दिला. तो धनादेश अनादर झाल्याचे व्यापाºयाविरूद्घ फौजदारी प्रकरण दाखल केले. ह्या प्रकरणाची सुनावणी येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी शेंडे यांच्या न्यायालयात पार पडली. यामध्ये फिर्यादी, आरोपी, नागपूर येथील हस्ताक्षर तज्ञ अ‍ॅड. उल्हास आटले यांच्यासह अन्य साक्ष पुरावे तपासले. यामध्ये फिर्यादी भंडारी यांची साक्ष ग्राह्य धरून व्यापारी उदावंत यास दोन महिने साधी कैदेची  शिक्षा ठोठावली.

February 06, 2014 in रोजगार

अंगाºयात गुंगचे औषधी देऊन महिलेचे दागिने उडवले

अंगाºयात गुंगचे औषधी देऊन महिलेचे दागिने उडवले
उमरखेड –  भविष्य पाहण्यासाठी आलेल्या तीन महाराजांनी अंगाºयात गुंगीची औषधी देऊन महिला बेशुद्घ पाडून तीच्या गळ्यातील दोन तोळे सोण्याचे गठण चोरून नेले. ढाणकी येथे आज गुरुवारी दुपारी ही घटना घडली असून गावात खळबळ उडाली आहे.
विमलबाई येरावार ही महिला वार्ड क्र. चार ढाणकी येथे  राहत असून किराणा दुकान आहे. नेहमीप्रमाणे त्या दुकानात बसून असताना दुपारी तीन वाजताच्या सुमारास अनोळखी तीन व्यक्ती तेथे आले. त्यानी महाराज असल्याची बतावणी करून आम्हाला तुमचे भविष्य पाहण्यासाठी देवानेच पाठविले असून पुरण पोळीचे जेवण करुन भविष्य सांगू असे सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन सदर महिलेसह सुनेने पुरण पोळीचा स्वयंपाक केला. यावेळी तीन्ही भामड्यांनी जेवनावर ताव मारून भविष्य पाहण्यासाठी अंगारा खाण्यास दिला. अंगारा खाताच विमलबाई व  सुन बेशुद्घ पडताच भामड्यानी या महिलेच्या गळ््यातील दोन तोेळे सोन्याचे गठण किंमत ६० हजार रुपये घेऊन फरार झाले. काही वेळानंतर त्या शुद्घीवर आल्याने हा प्रकार उजेडात आला. यावेळी महिलेने आडओरड केल्याने शेजारी राहणाºया लोकांनी तेथे धाव घेतली, मात्र तो पर्यंत बराच उशिर झाला होता. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.

February 06, 2014 in रोजगार

लॉटरी सेंटरवर धाड, दोघास अटक

यवतमाळ  – येथील तीवारी चौकातील लॉटरी सेंटरवर धाड टाकून विशेष पथकाने दोन जणांना अटक केली. स्थानिक तीवारी चौकात महालक्ष्मी लॉटरी सेंटर असून तेथे अवैधपने मोबाईलवरून  मटका व्यवसाय सुरु असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली होती. त्यावरून पथकाने धाड टाकून संजय सावरकर, प्रशांत कदम या दोघांना अटक केली. त्याच्याकडून १५ हजार ५३० रुपये रोख व मोबाईल असा एकुण १६ हजार ३३० रुपयाचा माल जप्त केला. याप्रकरणी वडगाव रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच मटका चालक  निलेश भोंगाडे याच्या विरूद्घही गुन्हा दाखल केला.  ही कार्यवाही विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राजू वटाणे, जमादार विजय डबले, ऋषी ठाकुर, विशाल भगत, रितूराज मेंढवे,प्रविण गौरखेडे यांनी केली.

February 06, 2014 in रोजगार

तिघांना सहा महिने सश्रम कारावास

यवतमाळ –  बाभूळगाव तालुक्यातील पाचखेड येथील एका इसमास मारहाण करणाºया तीन आरोपींना सहा महिने सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी व्ही. एम. मानखैरे यांनी हा निकाल दिला.
तुकाराम लक्ष्मण बावणे (४२), पाडूरंग तुकाराम बावणे (२१), निवृत्ती तुकाराम बावणे (१८) तिघेही रा. पाचखेड  अशी आरोपींची नावे आहे. पाचखेड येथे १५ मे २०१२ रोजी लाऊडस्पिकर वाजवण्याच्या कारणावरून आरोपींनी मनोहर परतपुरे यांना मारहाण करून जखमी केले होते. याप्रकरणी मनोहरची  पत्नी शोभा परतपुरे याच्या तक्रारीवरून बाभूळगाव पोलिसांनी आरोपीविरूद्घ भादंवि कलम ३२६ अंतर्गत गुन्हा  दाखल केला होता. तत्कालीन जमादार राजाभाप बंकेवार यांनी  तपासाअंती प्रकरण न्यायप्रविष्ठ केले होते. या प्रकरणाची सुनावणी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी व्ही. एम. मानखैरे यांच्या न्यायालयात सुरू होती. या प्रकरणात सात साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आले होते. दरम्यान, न्यायालयाने या प्ररकणात तिन्ही आरोपींना दोषी धरून सहा महिन्याची शिक्षा आणि प्रत्येकी एक हजार रुपये दंड ठोठावला. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील अँड. अमोल गणविर यांनी काम पाहिले

February 06, 2014 in रोजगार

१३२ दलित वस्त्याच्या विकासासाठी ९.८९ कोटी

यवतमाळ – दलित वस्त्यामध्ये मुलभूत सोयीसुविधा पुरवून त्याचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाकडून अनेक योजना राबविण्यात येते. सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाने जिल्ह्यातील १३२ गावातील दलित वस्तीतील कामांसाठी ९ कोटी ८९ लाख निधीला मंजुरी दिली आहे. या निधीतून सिमेंट रस्ते, पाण्याची टाकी, सिमेंट नालीचे बांधकाम करण्यात येणार आहे.
अनुसूचित जातीच्या समजाचे लोक समुहाने गावाच्या परिसमेत वास्तव्य करीत राहतात. बºयाचदा अनुसूचित जातींपैकी उपजाती व जातीनिहाय घरे वेगवेगळ््या समुहाने एकत्रित वास्तव्य करून राहतात. अशा प्रकारे वास्तव्य करून असलेल्या सर्व जाती, उपजातीच्या वस्तीस दलित वस्ती असे संबोधण्यात येते. या  वस्त्यामध्ये मुलभूत सोयीसुविधा पुरवून तेथील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी १९७४ पासून दलित वस्ती सुधार योजनेची अंमलबजावणी करण्यात येते. या अंतर्गत दलित वस्त्यांमधील रस्ते, नाली बांधणे, पाणीपुरवठ ा, पाण्याचा हौद, समाजमंदिर रस्त्यावरील विद्युत पुरवठा, शौचालये इत्यादी गरजा विचारात घेऊन सदर नागरी सुविधांच्या विकास कामांना प्रशासकीय मंजूरी दिली जाते. अनुसूचित जाती व नवबौद्घ घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेसाठी सन २०१३-१४ या  आर्थीक वर्षात जिल्ह्यासाठी ९कोटी ८९ लाखाचा निधी मंजूर केला. जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील १९, यवतमाळ १४, उमरखेड २२, महागाव १४, मारेगाव १, वणी ४, झरी ५, राळेगाव १५, कळंब ११, बाभुळगाव ९, पांढरकवडा ३, पुसद १५ ग्रामपंचायतमधील रस्ते व समाज मंदिराचे बांधकाम करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निधी मंजुर केल्याने ग्रामीण भागातील दलित वस्त्याची कायापालट होणार आहे.

February 06, 2014 in रोजगार

महसुल राज्यमंत्री सुरेश धस यांचा दौरा

यवतमाळ दि. 06 : राज्याचे महसुल, पुनर्वसन व मदतकार्य, भूकंप पुनर्वसन, सहकार,पणन व वस्त्रोद्योग राज्यमंत्री सुरेश धस जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
शुक्रवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी हिंगोली येथून सकाळी 9.55 वाजता विश्रामगृह उमरखेड येथे आगमन. सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह उमरखेड येथे स्थानिक कार्यकर्त्यासमवेत बैठक. दुपारी 12.30 ते 1 पर्यंतची वेळ राखीव. दुपारी 1 वाजून 5 मिनीटानी उमरखेड येथून किनवट (जि. नांदेड) कडे प्रयाण.

February 06, 2014 in रोजगार

सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांचा दौरा

यवतमाळ दि. 06 : राज्याचे सामाजिक न्याय, विमुक्त भटक्या जमाती, इतर मागासवर्गीयचे कल्याण, व व्यसनमुक्ती कार्यमंत्री शिवाजीराव मोघे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार 7 फेब्रुवारी रोजी यवतमाळ येथून सकाळी 9 वाजता आर्णीकडे प्रयाण. सकाळी 9.30 वाजता आर्णी येथे कंम्बलपोश दर्गा येथे भेट. सकाळी 10.30 वाजता सायतखर्डा रामपूर रस्त्याचे भुमीपूजन, सायतखर्डा येथे दलीत वस्तीमधील सिमेंट रस्त्याचे बांधकाम, स्मशान भुमीचे बांधकाम, उद्घाटन. सकाळी 11 वाजता दत्तापूर येथे सामाजिक सभागृहाचे बांधकाम तसेच ठक्करबापा योजनेतंर्गत रस्ता भुमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती.
दुपारी 12 वाजता शरद येथे सिमेंट रस्ता बांधकामाचे भुमीपूजन दुपारी 12.30 वाजता वगारा येथे तांडा वस्ती सुधार योजनेतंर्गत रस्त्याचे भुमीपूजन, पंतप्रधान ग्रामसडक योजनेतंर्गत पुलाच्या बांधकामाचे उद्घाटन सर्वशिक्षा अभियानातंर्गत शाळा खोलीचे बांधकामाचे उद्घाटन. दुपारी 1 वाजता सावरगाव (मंगी) येथे कब्रस्थानच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामाचे उद्घाटन. दुपारी 2 वाजता सगदा येथे रस्त्याचे बांधकामाचे उद्घाटन. दुपारी 2.30 वाजता ठाणेगाव येथे सामाजिक सभागृहाच्या बांधकामाचे उद्घाटन. दुपारी 3 वाजता राजापेठ येथे तांडा वंस्ती सुधार योजनेतंर्गत रस्ता बांधकामाचे उद्घाटन. दुपारी 3.30 वाजता पारवा येथे दलीत वस्तीसुधार योजनेंतंर्गत रस्ता बंधकाम, कब्रस्थानच्या संरक्षण भिंतीचे उद्घाटन. सायंकाळी 4 वाजता वाढोणा येथे कब्रस्थानच्या संरक्षण भिंतीचे उद्घाटन. सायंकाळी 4.30 वाजता घटाळा येथे नाली बांधकामाचे उद्घाटन. सायंकाळी 5 वाजता मेजदा येथे ठक्करबापा योजनेतर्गत रस्त्याचे भुमीपूजन. सायंकाळी 5.30 वाजता राहटी येथे ठक्करबापा योजनेतर्गत रस्त्याचे भुमीपूजन. आदी कार्यक्रमास उपस्थित राहून सोईनुसार यवतमाळकडे प्रयाण. यवतमाळ येथे आगमन व मुक्काम.
शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी यवतमाळ येथुन नागपूरकडे प्रयाण. रविवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी नागपूर येथील कार्यक्रम आटोपून यवतमाळ कडे प्रयाण आगमन व मुक्काम.
सोमवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी यवतमाळ येथुन चंद्रपुर कडे प्रयाण. चंद्रपुर जिल्हयातील कार्यक्रम आटोपून सोईनुसार यवतमाळकडे प्रयाण आगमन व मुक्काम.
मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी यवतमाळ येथे राखीव. मतदार संघातील विविध कार्यक्रमांना उपस्थिती. सोईनुसार यवतमाळ येथुन धामणगांव कडे प्रयाण. व तेथुन सायंकाळी 7 वाजता विदर्भ एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.

February 06, 2014 in रोजगार

परसोडी ग्रामपंचायतीत ई-बँकिंग सेवेचे उद्घाटन ; ग्रामपंचायतींमध्ये ई-बँकींग राबविणारे महाराष्ट्र पहिले राज्य

1
यवतमाळ दि. ६: राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये ई-बँकींगची सेवा उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले असून दि. १० फेब्रुवारी रोजी कळंब तालुक्यातील परसोडी ग्रामपंचायतीत सकाळी १० वाजता या सेवेचे राज्यस्तरीय उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होत आहे. याच दिवशी जिल्ह्यात २००  ग्रामपंचायतींमध्ये या सेवेचा शुभारंभ होत आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास मंत्री जयंत पाटील राहणार आहेत. तसेच अन्य मंत्री व स्थानिक लोकप्रतिनिधीही उपस्थित राहणार आहे. ग्रामविकास विभागाने महाऑनलाईन केंद्र शासन मान्यताप्राप्त सी.एस.सी- एस.पी.व्ही या कंपनीशी त्रिपक्षीय करार केला आहे. या कंपनीने देशातील राष्ट्रीयकृत बँकांबरोबर करार केला असून आता टप्प्याटप्प्याने बँक शाखा नसलेल्या राज्यातील सर्व ऑनलाईन ग्रामपंचायतींमध्ये ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे नागरिकांना बँक व्यवहारांसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही तर बँकच ग्रामपंचायतीत येणार आहे.
ई-पंचायत कार्यक्रमात महाराष्ट्र देशात पहिले असून ई-बँकिंग सुविधेद्वारे बँकेत खाते उघडणे, पैसे भरणे, पैसे काढणे, ड्राफ्ट बनवणे, पैसे हस्तांतरित करणे, कर्ज प्रस्ताव करणे, लाभार्थ्यांना थेट अनुदान वितरित करणे इ. प्रकारच्या सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत. संग्राम कक्षामार्फत वीज, फोन, मोबाईलचे देयक भरणे, रेल्वे-बस आरक्षण करणे, मोबाईल रिचार्ज करणे यासारख्या बहुविध सुविधा देखील ई-बँकिंग सुविधेद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ग्रामपंचायतींमध्ये यापुर्व सुरू करण्यात आलेल्या विविध सेवांमुळे २१ हजार रोजगारसंधीं निर्माण झाल्या आहेत. एकसमान माहिती तंत्रज्ञान सेवा देण्यात राज्याचा ग्रामविकास विभाग देशात पहिला आहे. ग्रामविकास विभागामार्फत विविध प्रकारच्या २० संगणकीय आज्ञावल्या उपयोगात आणल्या जात असून याद्वारे गावपातळीवरची मुलभूत माहिती संकलित होत आहे. यातून एकप्रकारे ग्रामीण महाराष्ट्राचा माहितीकोशच आकाराला येत असून गाव विकासाचे अचूक आणि परिपूर्ण नियोजन करण्याच्यादृष्टीने माहितीचे हे संकलन अतिशय उपयुक्त ठरणार आहे.
ग्रामपंचायतींमध्ये ई-बँकिंगची सोय उपलब्ध करून दिल्याने ग्रामपंचायतींनाही काही रक्कम सेवाशुल्क स्वरूपात मिळणार आहे. तसेच १ एप्रिल २०१३ पासून शासनाने ग्रामपंचायतींमार्फत देण्यात येणारे १९ प्रकारचे दाखले संगणकीकृत स्वरूपात देण्याचे बंधनकारक केले आहे. यातूनही ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढले आहे. यवतमाळ जिल्ह्यात ही सेवा उपलब्ध झाल्याने सर्वसामान्य नागरीकांना बँकींग सुविधा सहजपणे गावातच उपलब्ध होणार आहे. परसोडी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शुभारंभाची तयारी प्रशासनाच्यावतीने जोरात सुरू आहे.

February 06, 2014 in रोजगार