पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for February 19th, 2014

लासीना शिवारात बिबट्याचा मृतदेह

February 19, 2014 in मुख्य पान

दिड लाखाने गंडविले

नेर  : शहरातील सावला नगरमध्ये राहणाºया एका महिलेला सोन्याचे पॉलिस लावुन देण्याची बतावणी करून दिड लाखाचे दागिने लांबविल्याची घटना आज सकाळी घडली. विद्या देविदास मात्रे रा. सावला नगर ह्या महिलेच्या घरी दोन अज्ञात इसम आले. त्यांनी सोन्याच्या पाटल्याला पॉलिश लावुन देतो अशी बतावणी केली. यावेळी महिलेकडून दिड लाखाच्या  पाटल्या घेऊन भांड्यात टाकून हातचलाखीने काढून त्यामध्ये नकली पाटल्या ठेऊन तेथून पोबारा केला. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

February 19, 2014 in महाराष्ट्र

दारुसह दोन अटकेत

यवतमाळ : अवैधपने दुचाकीवरून दारुची वाहतुक करणाºया एका हॉटेल मालकास आर्थीक गुन्हे शाखा पथकाने अटक केली. तर विशेष पथकाने धाड टाकून दारु विक्री करणाºया एका विक्रेत्यास अटक केली.
मनिष दिवाकर वाघमारे रा. अंबिका नगर याने दत्त चौकातील जे के  वाईन बारमधून विदेशी दारू विकत घेतली. सदर दारुच्या बाटल्या पिशवीत भरून  एम.एच. २९ / डब्ल्यू ४१४ क्रमांकाच्या दुचाकीने हॉटेल व्हेरीटेजमध्ये घेवून जात होता. अशातच शारदा चौकात स्थानिक गुन्हे शाखा अधिनिस्थ आर्थीक गुन्हे शाखेच्या पथकाने   दुचाकीसह विदेशी दारु असे एकुण २७ हजार ८१० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी वाघमारे याच्याविरूद्घ गुन्हा दाखल करून अटक केली. ही कार्यवाही पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक के.एम. मसराम, जमा. प्रेमदास आडे, रावसाहेब शेंडे, किरण श्रीरामे, विजय पवार, राजू झाडे यांनी केली. तसेच अंबानगर रेल्वेस्टेशन परिसरात घरीच दारु विक्री करणाºया जाजूसिंग संतोषसिंग बावरी (२१) यास अटक करून १ हजार ४८८ रुपयाची दारु जप्त केली. जिल्हा विशेष शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजू वटाणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

February 19, 2014 in मुख्य पान

एमईसीबी कर्मचाºयास मारहाण

यवतमाळ : विद्युत पुरवठा खंडीत करण्याचे काम करणाºया एमईसीबी कर्मचाºयास मारहाण केल्याची घटना घोडखिंडी येथे मंगळवारी रात्री घडली. विवेक देवराव चौधरी (३६) रा. यवतमाळ हे येथील एमईसीबी मध्ये हेल्पर या पदावर कार्यरत आहे. काल सायंकाळी ते घोडखिंडी येथे विद्युत पुरवठा तोडण्यासाठी गेले होते. अशातच प्रभाकर फकीरा मडावी (२९) याने शिवीगाळ करून मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.

February 19, 2014 in महाराष्ट्र

चाकुच्या धाकावर दाम्पत्याला लुटले

यवतमाळ :  येथून वर्धेकडे जाणाºया दाम्पत्याची दुचाकी अडवून चाकुच्या धाकावर एक लाख २५ हजाराचे दागिन्यासह रोख रक्कम लुटल्याची घटना आज जवाहर नगरजवळ घडली. अमोल मोहन पांडे (३२) रा. सेवाग्राम वर्धा हे पत्नी व मुलीला घेऊन बलवंत मंगल कार्यालयात लग्नसमारंभासाठी आले होते. लग्न समारंभ आटोपून ते दुचाकीने वर्धेकडे जात होते. अशातच जवाहर नगरजवळ तोंडाला कापड बांधून आलेल्या तीन जणांनी पांडे यांना हात दाखवून दुचाकी थांबविली. त्यानंतर चाकुचा धाक दाखवून पांडेच्या पत्नीच्या गळ््यातील सोन्याचे दागिने अंगठी असे ४५ ग्रॅम सोने व १ हजार २०० रुपये रोख असा एकुण एक लाख २५ हजाराचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. पांडे यांनी शहर पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार नोंदविली. याप्रकरणी पोलिसांनी तीन्ही चोरट्याविरूद्घ भादंवि कलम ३९२, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.

February 19, 2014 in महाराष्ट्र

दोन अपघातात तीन ठार, एक जखमी

यवतमाळ :  आर्णीवरून लोणबेहळ येथे जाणाºया दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने डॉक्टरसह एक जण ठार तर एक जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री ९.३० वाजता लोणबेहळ येथे घडली. डॉ. दिपक गोपाल डुकरे (४५) रा. लक्ष्मीनगर पुसद, राजू देवराव खापरकर (३०) रा. आर्णी असे मृतकाचे नाव आहे. तर गजानन देवसिंग आडे (३२) रा. लोणबेहळ हा जखमी झाला असून त्याच्यावर यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. डुकरे कार्यरत होते. मंगळवारी रात्री आर्णीवरून लोहणबेहळ येथे एम.एच. २९ / एए २२३० क्रमांकाच्या दुचाकीने जात होते. अशातच गावापासून काही अंतरावरच अज्ञात वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातामध्ये डॉ. डुकरे, खापरकर हे ठार तर आडे हा जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच गावकºयांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदतकार्य केले. शांतीलाल जयस्वाल यांनी अपघाताची माहिती आर्णी पोलिसांना दिली. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक शेळके यांनी कर्मचाºयांसह घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. अज्ञात वाहन चालकाविरूद्घ गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.
तसेच भरधाव ट्रॅक्टरने ढिगाºयाला धडक दिल्याने चालक खाली पडून चक्क्यात दबुन ठार झाल्याची घटना काल रात्री झाडगाव येथे घडली. भास्कर दत्तु तराडे (३०) रा. खडकी सुकळी असे मृतकाचे नाव आहे. तराडे हा  ट्रॅक्टर घेऊन आपटी फाट्याकडून झाडगावकडे जात होता. अशातच स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टरची रेती ढिगाºयाला ठोस मारली. यावेळी चालक ट्रॅक्टरवरून खाली पडून मागील चाकात आल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच राळेगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. रोशन चित्तरंजन कोल्हे (३२) रा. झाडगाव याच्या तक्रारीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

February 19, 2014 in महाराष्ट्र

पाटणबोरी येथे इसमाचा मृतदेह आढळला

पांढरकवडा (यवतमाळ) : पाटणबोरी येथील बसस्थानकावर आज पहाटे पिंपरी बोरी येथील एका इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. विश्वनाथ शामराव कदम (४५, रा. पिंपरी बोरी ) असे मृतकाचे नाव आहे. मुळ नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील तो रहिवासी असून पोटाची खळगी भरण्यासाठी चार वर्षापासून पिंपरी येथे आला होता. अशातच काही वर्षापूर्वी त्याने बाजीराव बाबाची दिक्षा घेतली व सत्संगामध्ये सहभाग घेत असल्याचे गावकºयांनी सांगितले. १८ फेबु्रवारी रोजी नंदिग्राम एक्सप्रेसने हिमायत नगरवरून पिंपरी येथे जाण्याकरीता पाटणबोरी बसस्थानकावर थांबला होता. दरम्यानान आज बुधवारी पहाटे त्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. हृदयविकाराचा झटका, थंडीने कुडकुडून, आत्महत्या किंवा घातपाताने त्याचा मृत्यू झाला या दिशेने पोलिस तपास करीत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. मृतकाच्या मागे पत्नी, मुलगा दशरथ, मुलगी वर्षा व बराच मोठा आप्त परिवार आहे.

February 19, 2014 in महाराष्ट्र

चुकून गोळी लागली; जवानाचा मृत्यू

नागपूर : नागपूरमध्ये अजनी येथील लोहमार्ग मुख्यालयात चुकून गोळी लागल्याने हेडकॉन्सटेबल राजेश बांगडीकर (वय ५० वर्ष) यांचा मृत्यू झाला. तर शस्त्रात्र विभागातील एकनाथ लिहीतकर हे जखमी झाले आहेत. हा अपघात झाल्याने काही वेळ मुख्यालयात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
लोहमार्ग मुख्यालयात कार्यरत असणारे राजेश बांगडीकर हे आज (बुधवार) नक्षलवादी भागातून गस्त घालून दुपारी बाराच्या दरम्यान मुख्यालयात बंदूक जमा करण्यासाठी आले होते. त्याचवेळी शस्त्रात्र निरिक्षक एकनाथ लिहीतकर यांना बंदूक रिकामी आहे असे वाटल्याने बंदूक हातावर घेतली. मात्र त्याचवेळी बंदुकीतून चुकून गोळी झाडली गेली. गोळी एकनाथ लिहीतकरांच्या हातातून आरपार जात राजेश यांच्या पोटात लागली. जवानांना तात्काळ जवळच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र राजेश बांगडीकर यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. पुढील तपासणीसाठी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक चौकशी सुरु आहे.

February 19, 2014 in मुख्य पान

भारत-पाकिस्तानमध्ये २ मार्चला घमासान

मिरपूर : तुम्ही जर क्रिकेटप्रेमी असाल, तर २ मार्च या तारखेवर आत्ताच फुल्ली मारून ठेवा… कारण, या दिवशी आशिया कप स्पर्धेत भारत – पाकिस्तान यांच्यात घमासान युद्ध रंगणार आहे. मिरपूरच्या मैदानावर हा महासंग्राम होणार आहे.
भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांचा सामना म्हणजे क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणीच असते. परंतु, तणावपूर्ण राजकीय संबंधांमुळे या दोन संघांमधील तुंबळ युद्ध हल्ली फारसं बघायला मिळत नाही. त्यामुळे जेव्हा-जेव्हा ही संधी येते, तेव्हा तिचं सोनं करण्याचा प्रत्येक क्रिकेटप्रेमी कसोशीनं प्रयत्न करतो. आता, येत्या २ मार्चला हा योग जुळून येणार आहे. गेल्या वर्षी डिसेंबर-जानेवारी महिन्यात भारत-पाकिस्तानमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका झाली होती. त्यात पाकिस्ताननं टीम इंडियाला २-१ नं पराभूत केलं होतं. त्यानंतर, वर्षभराच्या प्रतीक्षेनं आता हे दोन तुल्यबळ संघ आमने-सामने उभे ठाकणार आहेत. आशिया कप स्पर्धेत २ मार्चला टीम इंडियाचे वीर आणि पाकचं सैन्य विजयासाठी शर्थ करेल.
आशिया कपचं वेळापत्रक
२५ फेब्रुवारी – पाकिस्तान वि. श्रीलंका – फतुल्लाह , २६ फेब्रुवारी – बांगलादेश वि. भारत – फतुल्लाह , २७ फेब्रुवारी – अफगाणिस्तान वि. पाकिस्तान – फतुल्लाह , २८ फेब्रुवारी – भारत वि. श्रीलंका – फतुल्लाह , १ मार्च – बांगलादेश वि. अफगाणिस्तान – फतुल्लाह , २ मार्च – भारत वि. पाकिस्तान – मिरपूर , ३ मार्च – अफगाणिस्तान वि. श्रीलंका – मिरपूर , ४ मार्च – बांगलादेश वि. पाकिस्तान – मिरपूर , ५ मार्च – अफगाणिस्तान वि. भारत – मिरपूर , ६ मार्च – बांगलादेश वि. श्रीलंका – मिरपूर , ८ मार्च – अंतिम सामना – मिरपूर
(सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी दीड वाजता सुरू होतील.)

वसतीगृहातून १७ मुली फरार

नाशिक : नाशिकमधील सावकरनगर परिसरातील वात्सल या शासकीय वसतीगृहातून १७ मुली आज (बुधवार) पहाटे फरार झाल्याचे समोर आले आहे. यामुळे वसतीगृह प्रशासनाचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. १७ मुलींपैंकी ८ मुली सापडल्या असून ९ मुली अद्यापही बेपत्ता असल्याचे समजते आहे.
महिलांच्या या शासकीय वसतीगृहातील असुविधांना कंटाळून १७ मुलींनीं आज अखेर येथून पळ काढला. पहाटेच्या वेळेस वसतीगृहाच्या गेटवरून उड्या मारुन या मुली पसार झाल्या. सकाळी ही गोष्ट उघड झाल्यानंतर मुलींचा शोध सुरु झाला. त्यानंतर ८ मुली सापडल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. गेले अनेक दिवस वसतीगृहात असुविधा असल्याच्या तक्रारी वारंवार येथील मुलींकडून करण्यात येत होत्या. मात्र तरीही येथील प्रशासनाने या तक्ररांरीकडे कानाडोळा केल्यामुळे अखेर मुलींनी हा मार्ग पत्करला असल्याची चर्चा सुरु आहे.

पत्नी पळाल्याने पतीची आत्महत्या

ठाणे : पत्नीचे शेजारील तरुणासोबत असणारे अनैतिक संबंध तसेच त्याच्यासोबत पळून गेल्याने नालासोपारा येथे राहणाऱ्या श्रीधर शेट्टी याने आपल्या दोन मुलींची हत्या करुन स्वत: आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पत्नीच्या बाहेरख्यालीपणाला वैतागून पतीने हे धक्कादायक कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे.
‘मेरी औरत साथ देती तो मैं ऐसा कदम नहीं उठाता.’ आत्महत्येपूर्वी श्रीधरने घरामधील भिंतीवर असे लिहल्याचे तपासात आढळून आले आहे. श्रीधरची पत्नी त्याला काही दिवसांपूर्वीच सोडून दुसऱ्या युवकासोबत पळून गेल्याने मानसिक तणावाखाली येऊन मुलींची हत्या करुन त्याने आपले स्वत:चे देखील आयुष्य संपवले.श्रीधर शेट्टी (वय, ४२) याची पत्नी सोनाली हि शेजारी राहणाऱ्या तेजस अनूप दोशी याच्यासोबत पळून गेली. मात्र १६ फेब्रुवारीला ती घरी परत आली. त्यानंतर पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झालं. ‘माझं तेजसवर प्रेम आहे आणि मी त्याच्यासोबत राहणार आहे.’ असा हट्टच सोनालीने धरला. या भांडणानंतर श्रीधरने आपल्या मुलींना सोडून घरात निघून जाण्यास सोनालीला सांगितलं. त्यानंतर सोनाली तेजससोबत राहू लागली. मात्र या दरम्यान श्रीधर पूर्णपणे खचून गेला. पोलिसांच्या मते, मंगळवारी १८ फेब्रुवारीला सोनाली आणि तेजस पुन्हा कुठेतरी बाहेर निघून गेले. याने श्रीधर जास्तच अस्वस्थ झाला. त्यानंतर रात्री ८ ते ९ च्या दरम्यान त्याने आपल्या दोन्ही मुली श्रद्धा (वय, ९) साहिध्या (वय, ५) यांची उशीने दाबून हत्या केली त्यानंतर त्याने आत्महत्या केली.