‘व्हॅलेंटाईन डे’ला प्रेयसीच्या घरी घेतले विष
यवतमाळ – सर्वत्र ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा होत असताना येथील शहर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपायाने प्रेयसीच्या घरी जाऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. राळेगाव तालुक्यातील झिल्ला येथे आज दुपारी दोन वाजता ही घटना घडली. राहुल वामन खरतडे (४५) रा. सुवर्णनगर वाघापूर असे आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायाचे नाव असून तो शहर ठाण्यात कार्यरत होता. तीन दिवस तो रजेवर गेला होता. आज ‘व्हॅलेंटाईन डे’ असल्याने आपल्या दुचाकीने राळेगाव तालुक्यातील झील्ला येथे गेला. तेथील एका युवतीच्या घरी जाऊन त्याने विषारी औषधी प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. या घटनेची माहिती मिळताच वडकीचे ठाणेदार एम.एस. राजपूत यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. यावेळी त्याच्या शिखात किटकनाशक खरेदी केल्याचे बिल आढळले असून ते राळेगाव येथील कृषी केंद्रातून खरेदी केले. खरतडे हा विवाहीत असून त्याचे यवतमाळ येथील एका महाविद्यालयात बी.ए. भाग दोनला असलेल्या युवतीवर प्रेम करीत होता.आज ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त प्रेयसीला भेटण्याठी तिच्या गावी गेला. अशातच त्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Archive for February 14th, 2014
प्रेमप्रकरणातून पोलीस शिपायाची आत्महत्या
दिवटे हल्ला प्रकरणी दोन अटकेत
यवतमाळ- माजी नगरसेवक प्रविण दिवटे याच्यावर प्राणघातक हल्ला करणाºया दोन आरोपीला टोळी विरोधी पथकाने आज दुपारी अटक केली. बबई उर्फ सुशिल गणेशप्रसाद दुबे रा. शारदा चौक, नितीन निगोट रा. विसावा सोसायटी पिंपळगाव अशी आरोपींची नावे आहे. तीन महिन्यापूर्वी मिलींद सोसायटीमध्ये गोळीबार करून प्रवीण दिवटे याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणी वडगाव रोड पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. तेव्हापासून या प्रकरणातील आरोपी फरार होते. या घटनेला तीन महिने होऊन ही आरोपी फरार असून त्याना त्वरीत अटक करा अशी मागणी दिवटेच्या पत्नीने पोलीस अधिक्षकांकडे केली होती. त्यावरून पोलीस अधीक्षकांनी आरोपींना अटक करण्याची सुचना पथकाला दिली होती. दरम्यान आज टोळी विरोधी पथकाने शारदा चौक परिसरात बबई आणि नितीन या दोन आरोपीला अटक केली. उर्वरीत पाच आरोपी अजुनही फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. ही कारवाई टोळी विरोधी पथकाचे निलेश ब्राम्हणे, सहा. पोलीस उपनिरीक्षक वसंत मडावी, सैय्यद साजीद , विकास खडसे, सुनील खंडागडे, शेखर वांढरे, बबलु चव्हाण, बबलु चंदन यांनी केली.
शाळेतून विद्यार्थी बेपत्ता
यवतमाळ-दारव्हा तालुक्यातील चाणी कामठवाडा येथील विद्यार्थी चार दिवसापासून बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. गणेश मधुकर रामकर (१३) रा. चाणी कामठवाडा हा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत सहाव्या वर्गात शिक्षण घेत होता. १० फेबु्रवारी रोजी तो सकाळी शाळेत गेला मात्र सायकाळ होऊनही घरी परत आला नाही. या प्रकरणाची तक्रार लाडखेड पोलिसात दिली. पोलीस व नातेवाईकांनी गणेशची शोधमोहीम सुरू केली असून अजुनही थागपत्ता लागला नाही. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार
यवतमाळ -अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री जोडमोहा येथे घडली. दिनेश रमेश मानकर (३०) रा. नांझा असे मृतकाचे नाव आहे. तर राजू वालदे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. मृतक व जखमी दोघे एकाच दुचाकीने जोडमोहा येथे जात होते. अशातच सायंकाळी ६. ३० वाजता जोडमोहा येथे अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये दिनेश हा ठार तर राजू हा जखमी झाला. याप्रकरणी रमेश बापूराव मानकर (६०) रा. नांझा यांनी दिलेल्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी वाहन चालकाविरूद्घ गुन्हा दाखल केला.









