पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for February 28th, 2014

औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 11 जागा 0

औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 11 जागा

11


औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उपकुलसचिव (3 जागा), सहायक कुलसचिव (2 जागा), इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअर (1 जागा), नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर (1 जागा), कक्ष अधिकारी (1 जागा), डिजिटल इंजिनिअर (१ जागा), सुरक्षा अधिकारी (१ जागा), कार्यक्रम संयोजक (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 20 मार्च 2014 आहे. यासंबंधीची अधिक माहितीhttp://www.bamu.net/advt/advt_1_2014_class12.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

February 28, 2014 in रोजगार
महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षेद्वारे 282 जागांसाठी भरती 0

महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षेद्वारे 282 जागांसाठी भरती

7
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वन सेवा (पूर्व) परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. याद्वारे सहायक वन संरक्षक (10 जागा), वनक्षेत्रपाल (272 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 मार्च 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात www.mahaonline.gov.in वwww.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

February 28, 2014 in रोजगार
महिला व बालविकास विभाग प्रकल्पात सेविका व मदतनीसाच्या 34 जागा 0

महिला व बालविकास विभाग प्रकल्पात सेविका व मदतनीसाच्या 34 जागा

6
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाअंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी-नागरी अंधेरी, मुंबई उपनगर या प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रात मदतनीस (29 जागा), सेविका (५ जागा) ही पदे मानधन तत्वावर भरण्यात येणार आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसाच्या आत करावे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 25 फेब्रुवारी 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

February 28, 2014 in रोजगार

गडचिरोली वनवृत्तामध्ये वनरक्षकाच्या 37 जागा

महाराष्ट्र शासनाच्या वन विभागातील गडचिरोली वनवृत्तामध्ये वनरक्षक (37 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 मार्च 2014 आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://oasis.mkcl.org/forestgad/StaticPages/HomePage.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

February 28, 2014 in रोजगार

टपाल खात्यात पोस्टल सहायकाच्या 1098 जागा

 

केंद्र शासनाच्या टपाल खात्याच्या महाराष्ट्र सर्कलमध्ये पोस्टल सहायक (790 जागा), सॉर्टिंग असिस्टंट (170 जागा), पोस्टल सहायक-सेव्हिंग बँक कंट्रोल ऑर्गनायझेशन (70 जागा), पोस्टल असिस्टंट इन सर्कल/विभागीय कार्यालये (38 जागा), पोस्टल असिस्टंट इन रिटर्नड लेटर ऑफिस (2 जागा), पोस्टल असिस्टंट इन मेल मोटार सर्व्हिस (16 जागा), पोस्टल असिस्टंट इन विदेशी टपाल संस्था (12 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनाच्या दि. 25 फेब्रुवारी 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहितीhttp://www.pasadrexam2014.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

February 28, 2014 in रोजगार

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 61 जागा


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालये आणि उपनगरीय रुग्णालयातील विविध विषयातील सहाय्यक प्राध्यापक (61 जागा) ही पदे भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 मार्च 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्ताच्या दि. 26 फेब्रुवारी 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली

February 28, 2014 in रोजगार

महिला व बालविकास आयुक्तालयाच्या आस्थापनेवर 195 जागा


महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या महिला व बालविकास आयुक्तालयाच्या आस्थापनेवर परिविक्षाधीन अधिकारी (23 जागा), लघुलेखक-निम्नश्रेणी (1 जागा), सांख्यिकी सहायक/वरिष्ठ लिपिक (36 जागा), कृषि सहायक (3 जागा), कनिष्ठ लिपिक/कनिष्ठ सहायक/लेखा लिपिक (32 जागा), डाटा एन्ट्री ऑपरेटर (37 जागा), शिक्षक (16 जागा), स्वयंपाकी (16 जागा), कनिष्ठ काळजी वाहक (21 जागा), पहारेकरी (2 जागा), वॉर्डबॉय/परिचर/कक्षसेवक (8 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 मार्च 2014 आहे. अधिक माहिती http://wcdexam.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

February 28, 2014 in रोजगार

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात 78 जागा


नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात वैद्यकीय अधिक्षक (2 जागा), स्त्री रोग तज्ञ (3 जागा), बालरोग तज्ञ (3 जागा), क्ष किरण तज्ञ (2 जागा), रक्त संक्रमण अधिकारी (2 जागा), विकृतीशास्त्र तज्ञ (2 जागा), त्वचारोग तज्ञ (2 जागा), शल्यचिकित्सक (4 जागा), अस्थिव्यंग तज्ञ (4 जागा), नेत्र शल्यचिकित्सक (2 जागा), नाक कान घता तज्ञ (2 जागा), बधिरीकरण तज्ञ (5 जागा), ड्युटी मेडिकल ऑफिसर (6 जागा), वैद्यकशास्त्र अधिकारी (4 जागा), वैद्यकीय अधिकारी (11 जागा), अपघात वैद्यकीय अधिकारी (8 जागा), वैद्यकीय अधिकारी-उरेरोग व क्षयरोग तज्ञ (2 जागा), मानसोपचार तज्ञ (2 जागा), मेडिकल रेकॉर्ड किपर अधिकारी (2 जागा), इंटेन्सिव्हिस्ट (4 जागा), दंतशल्य चिकित्सक (6 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 मार्च 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्ताच्या 28 फेब्रुवारी 2014च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

February 28, 2014 in रोजगार

मुंबईतील शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयात 40 जागा


मुंबईतील शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयात मजदूर (23 जागा), पहारेकरी (11 जागा), शिपाई (4 जागा), माळी (1 जागा), वखार भाई (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहे. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 10 मार्च 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 27 फेब्रुवारी 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

February 28, 2014 in रोजगार
महामानवामुळे महिलाना मिळाले महत्वाचे स्थान - खा. भावना गवळी 0

महामानवामुळे महिलाना मिळाले महत्वाचे स्थान – खा. भावना गवळी

36
यवतमाळ – बुध्दांच्या काळात आणि आजही सामाजिक समतेच्या प्रस्थापनेसाठी तथागत बुध्दांच्या धम्म अत्यंत उपयुक्त ठरत आहे. यातून सामाजिक लोकशाहीची बीजे बुध्दाच्या करुणा व मैत्री असलेल्या धम्मातून जगात आकाराला आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे मी आज खासदार होऊ शकले. या महामानवामुळे आज महिलांना मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. असे विचार खा. भावना गवळी यांनी व्यक्त केले. त्या दारव्हा येथील लाख खिंड येथे मंगळवारी आयोजित बैध्द धम्म परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.
दि. बुध्दीस्ट सोसायटी आॅफ इंडीयाच्या वतीन २५ व २६ फेब्रुवारी या दोन दिवसासाठी बौध्द धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सुखदेव बोरकर, जयकृष्ण बोरकर, सुखदेव जाधव हे होते. तर प्रमुख उपस्थित म्हणून भावना गवळी, सरपंच सविता वानखडे, पंडीत राठोड, वसंत रामटेके, श्रीरंग वानखेडे, नामदेव वासनीक, कमल बोडखे, नाना सावळे, भगवान मुंधाने, देवराव पाटील, धनपाल मेश्राम, देवीदास वानखडे उपस्थित होते. यावेळी भद्ंत विपसी थेरो भिक्खूंनी बुध्दकन्या धम्मपाल माने, अमर दिपकार, आदिनीं मार्गदर्शन केले. प्रास्ताविक बाळा गडलींग यांनी केले. संचालन भिमराव वानखडे आणि आभार अमोल तायडे यांनी मानले.

तलावात बुडून विद्यार्थ्यांचा मृत्यू

यवतमाळ – महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी उजेडात आली.
आशिष शेषराव मनवर (१३) रा. विट्टभट्टी चौक अंबीका नगर असे मृतकाचे नाव असून तो आठव्या वर्गात शिक्षण घेत होता. तो आपल्या मित्रासोबत काल दुपारी १.३० वाजता महाशिवरात्री निमित्त पाचधरा येथे दर्शनासाठी गेला होता. दरम्यान ते पोहण्यासाठी डोर्ली क्र. दोन येथील तलावात उतरले. यावेळी आशिष हा पाण्यात बुडाला. सायंकाळ होऊनही तो बाहेर न आल्याने मित्राने शहरात धुम ठोकुन ही माहिती नातेवाईक व पोलिसांना दिली. त्यावरून पोलिस व नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला मात्र रात्र होऊनही त्याचा शोध लागला नव्हता. अशातच आज शुक्रवारी सकाळी आशिषचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह वसंतराव नाईक रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. या प्रकरणी मृतकचे वडील शेषराव मनवर यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

अतीप्रसंग व खुनातील आरोपीस जन्मठेप 0

अतीप्रसंग व खुनातील आरोपीस जन्मठेप

images.jpeg00.
दारव्हा – प्रेयसीवर अतिप्रसंग करून खून करणाºया आर्णी तालुक्यातील महाळूंगी येथील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. दारव्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधिश संजय देशमुख यांनी आज शुक्रवारी हा निकाल दिला.
अविनाश मधुकर राठोड (२१) रा. महाळूंगी ता. आर्णी असे शिक्षा ठोेठावलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचे गावातीलच एका युवतीसोबत प्रेमसबंध होते. त्याने प्रेयसीच्या आई-वडीलांकडे लग्नाची मागणी केली होती. परंतू तीच्या कुटुंबीयाने लग्नाला विरोध केल्याने आरोपीने पाहुण घेण्याची धमकी दिली होती. महाशिवरात्रीच्या दिवशी २ मार्च २०११ रोजी महाळूंगी येथील रामटेकडीवर प्रेयसीला बोलावून तीचेवर जबरीने अत्याचार केला. त्यानंतर तीच्या डोक्यात दगड घालुन खून केला. याप्रकरणाची तक्रार मृतक युवतीच्या वडीलांनी आर्णी पोलिस ठाण्यात दिली होती. त्यावरून तत्कालीन ठाणेदार गिरीष बोबडे यांनी आरोपीविरूद्घ भादंवि कलम ३७६, ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. तपास अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक लवंगे यांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. दारव्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधिश संजय देशमुख यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुणावनी पार पडली. यामध्ये साक्ष पुरावे तपासून दोषी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील अमोल राठोड यांनी काम पाहीले.

दारव्हा व दिग्रस येथे गारपिठ 0

दारव्हा व दिग्रस येथे गारपिठ

1
यवतमाळ – जिल्ह्यात चौथ्या दिवशीही अवकाळी पावसाचा तडाखा बसला असून आज दुपारी दारव्हा व दिग्रस तालुक्यात जोरदार गारपिठ झाली. यामध्ये शेतातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहे.
दिग्रस तालुक्यात आज दुपारी अचानक वादळी वाºयासह गारपिठ झाली. यामध्ये विटाळा, वसंतनगर, विठोली (मा.), चिचपातर, तुपटाकळी, डेहणीसह परिसरातील गावांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.तसेच दारव्हा तालुक्यातही गारपिठ झाली. त्यामुळे शेतातील गहु, हरबरा, संत्रा, पालेभाज्याचे मोेठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे.

शिवसेनेचे १५ लोकसभा उमेदवार जाहीर! 0

शिवसेनेचे १५ लोकसभा उमेदवार जाहीर!

4
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपपाठोपाठ शिवसेनेने आज (शुक्रवारी) लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या १५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. गजानन कीर्तिकर वगळता मुंबई, ठाण्यातून सगळेच्या सगळे नवे चेहरे देण्यात आले आहेत. दक्षिण मध्य मुंबईच्या जागेसाठी आग्रही असलेले ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना अखेर सक्तीची निवृत्ती देण्यात आली असून त्यांच्या जागी मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष व तरुण नगरसेवक राहुल शेवाळे यांना संधी देण्यात आली आहे. तर दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. पंधरा जणांच्या या यादीत सहा नवे चेहरे असून जास्तीत जास्त तरुणांचा भरणा आहे. विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे, अनंत गीते, भावना गवळी, सुभाष वानखेडे, प्रतापराव जाधव, आनंदराव अडसूळ यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर गेल्या वेळी उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसच्या गुरुदास कामत यांच्याकडून पराभूत झालेले शिवसेना नेते गजानन कीर्तिकर तसेच रामटेकमधून थोड्याशा फरकाने जागा गमावलेले कृपाल तुमाणे यांच्यावर पक्षाने पुन्हा विश्वास दाखवला आहे. दक्षिण मुंबई – अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे, उत्तर मध्य मुंबई – गजानन कीर्तिकर, ठाणे – राजन विचारे, कल्याण- डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे, औरंगाबाद – चंद्रकांत खैरे, हिंगोली- सुभाष वानखेडे , परभणी – संजय जाधव , अमरावती – आनंदराव अडसूळ, बुलढाणा – प्रतापराव जाधव, यवतमाळ – भावना गवळी, रामटेक – कृपाल तुमाणे, शिरूर- शिवाजीराव-आढळराव पाटील , रायगड- अनंत गीते, रत्नागिरी-सिंधुदुर्ग – विनायक राऊत तर हातकणंगले मतदारसंघ राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडण्यात आले. तर सातारा मतदारसंघ रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षासाठी सोडण्यात आल्याचे उद्धव यांनी यावेळी सांगितले.

February 28, 2014 in महाराष्ट्र
छत्तीसगड:नक्षली हल्ला,६ शहीद 0

छत्तीसगड:नक्षली हल्ला,६ शहीद

1
दंतेवाडा – छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी गस्ती पथकाला लक्ष्य करुन भूसुरुंग स्फोट केला. या स्फोटात उपपोलिस निरीक्षक विवेक शुक्ला यांच्यासह सहा जवान शहीद आणि दोघे जखमी झाले. नक्षलवाद्यांनी पोलिसांची शस्त्रे घेऊन पळ काढला.
याच महिन्याच्या (फेब्रुवारी २०१४) सुरुवातीला दंतेवाडामध्ये पोलिसांनी पाच नक्षलवाद्यांना अटक केली होती. याआधी २०१० मध्ये दंतेवाडात नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांना घेराव घालून मोठा हल्ला केला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे ७६ जवान शहीद झाले होते. छत्तीसगड हे नक्षलवादप्रभावी राज्य आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलवादी छत्तीसगडमध्ये हिंसक कारवाया करण्याची शक्यता गुप्तचरांनी आधीच व्यक्त केली आहे. त्यामुळे आजच्या घटनेची सुरक्षा दलांनी गंभीर दखल घेतली आहे.

February 28, 2014 in मुख्य पान

महागाई भत्त्यात १०० टक्के वाढ

नवी दिल्ली- केंद्रीय कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात १०० टक्के वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने शुक्रवारी घेतला. सरकारच्या या निर्णयाचा ५० लाख कर्मचारी आणि ३० लाख निवृत्ती वेतनधारकांना लाभ होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शुक्रवारच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.गेल्यावर्षी जुलै २०१३ मध्ये महागाई भत्ता दहा टक्क्याने वाढवून ९० टक्के करण्यात आला होता. त्यानंतर शुक्रवारी या भत्त्यामध्ये आणखी १० टक्क्यांनी वाढ करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. या महागाई भत्त्यामधील ही वाढ एक जानेवारी २०१४ पासून लागू होणार असल्याचेही सरकारने सांगितले.

February 28, 2014 in महाराष्ट्र

आंध्रात राष्ट्रपती राजवटीची मंत्रिमंडळाची शिफारस

नवी दिल्ली – आंध्रप्रदेश विधानसभा निलंबित ठेऊन तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने शुक्रवारी घेतला. आंध्रप्रदेशचे विभाजन करुन स्वतंत्र तेलंगण राज्याची निर्मिती करण्याच्या निर्णया विरोधात एन.किरणकुमार रेड्डी यांनी आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.
राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्याची सर्व सूत्रे राज्यपाल ई.एस.एल नरसिम्हा यांच्याकडे असतील. आंध्रप्रदेशच्या विधानसभेची मुदत दोन जून २०१४ रोजी संपत आहे. निवडणूक आयोग पुढील आठवडयापर्यंत लोकसभा निवडणूकांबरोबर आंध्रप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे.किरणकुमार रेड्डी यांनी मुख्यमंत्रीपदाबरोबर काँग्रेसच्या आमदारकी, सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. संसदेने हिवाळी अधिवेशनात आंध्रप्रदेशचे विभाजन करुन स्वतंत्र तेलंगण राज्याच्या निर्मितीचे विधेयक मंजूर केले. तेलंगण देशातील २९ वे राज्य आहे.

February 28, 2014 in मुख्य पान
अमेरिका करणार सैन्यकपात 0

अमेरिका करणार सैन्यकपात

3
अमेरिका ही जगाची महासत्ता आहे. संरक्षण सामर्थ्यांमुळे अमेरिकेला हे स्थान निर्माण झाले आहे. लष्कर, हवाई, नौदल यांच्यासह अंतराळातील लष्करी उपग्रहांची मालिका, विविध क्षेपणास्त्रे, क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा आदींमुळे अमेरिका बलाढय बनली आहे. तसेच जगातील विविध बेटांवर अमेरिकेचे तळ आहेत. त्याचबरोबरच अमेरिकेच्या विमानवाहू अजस्र् युद्धनौका व पाणबुडया सर्व महासागरात गस्त घालत असतात. त्यामुळे जगाच्या पाठीवर कोणतीही लष्करी कारवाई करायची झाल्यास अमेरिकेचे सैन्यदल तेथे पोहोचलेले असते. याच बलाढय लष्कराचे संख्याबळ कमी करण्याचे अमेरिकेने ठरवले आहे. दुस-या महायुद्धापूर्वी लष्कराचे जे संख्याबळ होते. तेच संख्याबळ ठेवण्याचा निर्णय अमेरिकी सरकारने घेतला आहे. तसेच ‘ए-१०’ ही लढाऊ विमाने हवाई दलातून बाद करण्याचे ठरवले आहे. पश्चिम युरोपातील रशियन रणगाडे उद्ध्वस्त करण्यासाठी ही विमाने अमेरिकेने तयार केली होती.
अमेरिकी सरकारने सध्या काटकसरीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे संरक्षणावरील भरमसाट खर्चाला कात्री लावण्यात येणार आहे. संरक्षणमंत्री चक हेगेल यांच्या सैन्य कपातीच्या प्रस्तावाला पेंटागॉनचे अधिकारी अंतिम रूप देण्याचा प्रयत्न करत आहेत.सैन्यकपातीमुळे अमेरिकेचे लष्कर कोणत्याही शत्रूचा पराभव करण्यास सक्षम असले तरी एकाच वेळी दोन मोठ्या लष्करी मोहिमा राबवायची वेळ आल्यास किंवा दीर्घकालीन परकीय विळख्यातून मुक्ततेसाठी प्रयत्न करताना अमेरिकेला अडचणी निर्माण होऊ शकतात. तसेच या युद्धमोहिमांमध्ये यश मिळवण्यास विलंब लागल्यामुळे अमेरिकेचे मोठे नुकसान होण्याचा धोका असल्याचा इशाराही, पेंटागॉनच्या अहवालात दिला आहे. संरक्षणमंत्री चक हेगेल यांच्या प्रस्तावाबाबत माहिती देताना अमेरिकी अधिका-यांनी सांगितले की, अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करण्याची क्षमता सैन्य दलामध्ये असायला हवी. या सैन्य दलाने अमेरिकेच्या भूमीचे आणि परदेशातील मोहिमांदरम्यान अमेरिकेचे हितसंबंध जपायला हवेत. सध्या आमच्याकडे लष्कराचे आकारमान मोठे आहे. मात्र हे सैन्य युद्धकुशल, सामर्थ्यवान, अत्याधुनिक आणि उच्च प्रशिक्षीत असायला हवे. त्यामुळे केवळ आकारमानाने नव्हे तर विविध अंगांनी हे सैन्य परिपूर्ण असायला हवे, हे लक्षात घेऊन अशा प्रकारची योजना तयार केली जात आहे. ९/११च्या हल्ल्याच्या वेळी अमेरिकेची सैनिक संख्या ५,७०,००० होती. त्यामध्ये कपात करून ती ४,९०,०००पर्यंत आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. आता येत्या काही वर्षात लष्करातील सैनिकांची संख्या ४,४०,०००पर्यंत घटवण्याचे नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती पेंटागॉनच्या सूत्रांनी दिली. शीतयुद्धाच्या काळात युरोप व आशियात एकाच वेळी लढण्यासाठी पेंटागॉनने सैनिकांची संख्या वाढवण्यावर भर दिला होता. सध्याच्या काळात मोठे संख्याबळ असलेल्या लष्कराची गरज उरलेली नाही.

February 28, 2014 in मुख्य पान
'गे’ पित्याच्या मित्राकडूनच बालीकेचे लैंगिक शोषण  0

‘गे’ पित्याच्या मित्राकडूनच बालीकेचे लैंगिक शोषण

images.jpeg00.
एकवर्षापासून अत्याचार, नराधमास अटक
यवतमाळ  – समलैंगिक सबंधाचा मुद्दा सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालामुळे  देशात सर्वत्र चर्चेचा विषय ठरला असतानाच  पित्याचे ‘गे’ (समलैंगिक) सबंध असणाºया पुरुषाकडून  पंधरा वर्षीय बालीकेचे  तब्बल एक वर्षापासून लैंगिक शोषण झाल्याची खळबळ जनक घटना आज येथे उघडकीस आली.  विभक्त राहणाºया या मुलीच्या आईनेच सदर प्रकाराची पोलिसात तक्रार केल्याने अत्याचार करणाºया नराधमास अटक करण्यात आली आहे.
समलैंगिक सबंध हा गुन्हाच आहे यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब करून काही महिने सुद्घा उलटायचे आहेत. या पार्श्वभूमिवर शहरातील एका उच्च मध्यमवर्गीयांच्या सोसायटीत हा प्रकार गत वर्षभरापासून सुरु होता. या नगरात एक मध्यमवर्गीय कुटुंब असून कुटुंबप्रमुख समलैंगिक सबंध ठेवणारा असल्याचे या घटनेतून उघडकीस आले आहे. या प्रकरणी मिळालेल्या माहिती नुसार या कुटुंबाच्या घरी काही वर्षापूर्वी शहरात चहा टपरी चालविणारा एक व्यक्ती भाड्याने राहायला आला. कालांतराने घरातील कुटुंब प्रमुखाने  कॅन्टींग चालकाला विश्वासात घेऊन त्याच्याशी समलैगिंक सबंध प्रस्थापित केले. एकांतात कुटुंबाना भनकही लागु न देता ती दोघे सबंध ठेवायचे. एक दिवस हा किळसवाणा प्रकार त्या कुटुंबप्रमुखाच्या पत्नीस माहित झाला. त्यातून वाद उत्पन्न होऊन ती घर सोडून निघुन गेली. तिच्या या निर्णयामुळे मात्र एक मुलगा व एक मुलगी या दोन्ही अपत्यांना आई-वडीलापासून दुर राहावे लागले. काही दिवसानंतर मुलगा आईसोबत व मुलगी पित्यासोबत राहत होती. ही अल्पवयीन मुलगी आपल्या पित्याच्या समलैंगिक सबंधापासून अनभिज्ञ होती. सबंधित कॅन्टींग चालकाला  तर त्या कुटुंब प्रमुखाची पत्नी निघुन गेल्याने मोकळे रानच मिळाले होते. समलैंगिक सबंध ठेवता-ठेवता त्याची विकृत नजर त्या १४ वर्षीय बालिकेवर गेली. त्यातून या मुलीच्या अगतिकतेचा लाभ उठवित त्याने तीचे जबरदस्तीने लैंगिक शोषण सुरु केले. या प्रकाराची वाच्यताही सबंधित बालीकेला करता न आल्याने तब्बल एक वर्षापर्यंत ती निमुटपने हा अत्याचार सहन करत होती. मात्र अत्याचार करणाºयालाही मर्यादा असतात त्याच प्रमाणे तीच्याही सयमांचा बांध फुटला. नवरा व मुलीला सोडून परठिकाणी राहणारी मुलीची आई सहाव्या वर्गात शिकणाºया आपल्या मुलीला भेटायला म्हणून शाळेत गेली. त्यावेळी या मुलीने घडणारा अत्याचार न सांगता केवळ मी वडीला सोबत राहत नाही मला घेऊन चल एवढे म्हटले. त्यावरून आईने या मुलीला ६ फेबु्रवारीला आपल्या सोबत नेले. मात्र घडलेल्या अत्याचाराने या मुलीच्या चेहºयावर सततचा तणाव आईला दिसून आला. त्यामुळे या मुलीला आईने तु तणावात का राहतेय, म्हणून विचारणा केली. तेव्हा मानसिक दडपणात  असलेल्या मुलीने अत्याचाराला वाचा फोडली. हा प्रकार ऐकुन हादरलेल्या तीच्या आईने शहर पोलीस ठाणे गाठून या घृणास्पद प्रकाराची तक्रार बुधवारी दिली. त्यावरून पोलिसांनी  आरोपी सुनिल रा. बाभुळगाव ह.मु. यवतमाळ याच्याविरूद्घ भादंवि कलम ३७६ (आय) (एन), ५०६ सह कलम ४,६ बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून  अटक केली. अधिक तपास शहरचे ठाणेदार अरुण आगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तेजस्वीणी गिरसावळे करीत आहे.
(साभार , दै. पुण्य नगरी )