यवतमाळ – पांढरकवडा येथून दुचाकीने यवतमाळकडे येणाºया वकीलासोबत वाद करून वाहन ढकलुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी न्यायालयाने दोन पोलीस कर्मचाºयांविरूद्घ गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यावरून दोन पोलीसांवर शहर ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल केले.
अॅड. गाझी इबादुल्ला सनाउल्ला खान (३० ) रा. मंगलपुर्ती ले आऊट पांढरकवडा हे ११ मार्च २०११ रोजी आपल्या गावावरून एम.एच. २९ / एस ४८८६ क्रमांकाच्या दुचाकीने यवतमाळकडे येत होते. अशातच सकाळी ९.३० वाजता पांढरकवडा मार्गावरील चौपाल सागर जवळ वाहतुक पोलीस शिपायी निवृत्ती तुळशीराम कुळसंगे (३८) व त्याचा अन्य एक साथीदाराने सदर वकीलाची दुचाकी अडवून त्याचेशी धक्काबुक्की करून जीवे मारण्याच्या उद्देशाने ढकलून दिले होते. यात तो जखमी झाला होता. याप्रकरणी तक्रार देऊनही पोलिसावर गुन्हा दाखल केला नव्हता. शेवटी खान याने न्यायालयात तक्रार दिली होती. अखेर या प्रकरणात न्यायालयाने गुन्हे दाखल करण्याचे आदेश शहर पोलिसांना दिले. त्यावरून कुळसंगे व त्याच्या साथीदारवर भादंवि ३०७, ५०६, ३४ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे.
Archive for February 12th, 2014
दोन पोलीसांवर गुन्हे दाखल
आता डिझेलवरील आॅटोनाही मिळणार परवानगी
पेट्रोलवरील रिक्षा चालवण्याची अट शिथिल
यवतमाळ – पूर्वी पेट्रोलवरील रिक्षांनाच परवाना मिळत होता, मात्र परिवहन विभागाने ही अट शिथील केली आहे. त्यामुळे आता डिझेलवर धावणाºया आॅटोंनाही परवानगी मिळणार असून चालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र पेट्रोल व डिझेलवरील आॅटोचे भाडे सारखेच राहणार असल्याने प्रवाशांसाठी आॅटोचालकांत वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यवतमाळ जिल्ह्यात १९७० मध्ये आॅटो व्यवसाय सुरु झाला. परिवहन विभागाकडून फक्त पेट्रोलवर धावणाºया आॅटोंनाच परवानगी मिळत होती. आजमितीस जिल्ह्यात हजारो आॅटो असून भाड्याचे दर पेट्रोलच्या किमतीवरून ठरविण्यात आले आहे. नविन रिक्षा परवान्यांवर डिझेल आणि एलपीजी रिक्षाही चालवण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी अनेक आॅटोरिक्षा युनियनने परिवहन आयुक्ताकडे केली होती. या पार्श्वभूमिवर गुरुवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, परिवहन सचिव शैलेश कुमार शर्मा आणि परिवहन सचिवाची बैठक पार पडली. या मध्ये नविन आॅटोरिक्षा परवान्यांवर फक्त पेट्रोलवरील रिक्षा चालवण्याची अट राज्य शासनाने शिथिल केली.त्यामुळे आता डिझेल वरील आॅटोंनाही परवाना मिळणार आहे. त्यामुळे आॅटो चालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मात्र दोन्ही आॅटोच्या भाड्याचे दर हे सारखे राहणार आहे. पेट्रोलवर आॅटो चालविणाºया चालक-मालकाला परवडणार नसून डिझेलवरील आॅटो चालविणाºयाचा फायदा होणार आहे. त्यामुळे प्रवाशी नेण्यावरून चालक-मालकामध्ये वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी प्रतिक्रीया आॅटो युनियनचे उपाध्यक्ष भारमल स्वामी यांनी दिली.
राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालयाची
प्रवेश परीक्षा जून मध्ये
यवतमाळ – राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय डेहराडून (उत्तरांचल) येथे प्रवेश घेवू इच्छिणाºया महाराष्ट्रातील मुलांसाठी १ व २ जून रोजी पुणे येथ प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. या परिक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांनी ३१ मार्च पर्यंत विहित नमुना अर्ज परिपूर्ण भरुन आवश्यक कागदपत्रासह सादर करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे येथील आयुक्त शिवाजी पांढरे यांनी केले.
या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांचे वय १ जानेवारी २०१५ रोजी सोड अकरा वर्षापेक्षा कमी व १३ वर्षापेक्षा अधिक नसावे म्हणजेच त्या विद्यार्थ्यांचा जन्म २ जानेवारी २००२ ते १ जुलै २००३ या कालावधीतील असावा. तसेच तो विद्यार्थी १ जानेवारी २०१५ रोजी कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेत इयत्ता ७ वी त शिकत असावा किंवा ७ वी पास असावा.
सदर परीक्षेसाठी आवेदन पत्र विद्यार्थ्यांना उपलब्ध करण्यात येत आहे. अनुसूचित जाती/जमातीसाठी ४०५ रुपयाचा तर सवर्साधारण संवर्गातील विद्यार्थ्यांनी ४५० रुपयाचा स्टेट बँक आॅफ इंडिया या बँकेचाच ड्राफ्ट कमांडंट, आर.आय.एम.सी.डेहराडून यांचे नांवे काढून ड्राफ्टवर पेअबलट डेहराडून (तेलभवन बँक कोड नं ०१५७६) अशी नोंद करावी. अनुसूचित जाती/जमातीच्या विद्यार्थ्यांनी जातीच्या दाखल्याच्या प्रती सोबत सादर करणे आवश्यक आहे. ड्राफ्ट मिळाल्यानंतर आवेदन पत्र, माहितीपत्र व पाच वर्षाच्या प्रश्न पत्रिकांचा संच, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचेकडून स्पीड पोस्टने पाठविण्यात येईल. किंवा विद्यार्थी राष्ट्रीय इंडियन मिलीटरी कॉलेज डेहराडून, उत्तरांचल २४८००३ यांचेकडून सुध्दा आवेदन पत्र प्राप्त करुन घेऊ शकतात.
विद्यार्थ्यानी वर नमुद केल्याप्रमाणे डिमांड ड्राफ्ट काढून आवेदन पत्र मागवावे व परिपूर्ण भरलेले आवेदन पत्र ३१मार्च पर्यंत आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद १७ डॉ. आंबेडकर मार्ग, पुणे ४११००१ या पत्यावर पाठवावित. मुदतीनंतर प्राप्त होणारी आवेदनपत्र स्वीकारण्यात येणार नाही. आवेदन पत्रासोबत जन्मतारखेचा दाखलची (अनुसूचित जाती/जमातीसाठी) जातीच्या दाखल्याची छांयाकित प्रत व्दिप्रतीत तसेच बोनाफाईड सर्टीफिकेट सादर करणे आवश्यक आहे.
परिक्षेसाठी इंग्रजी, गणित आणि सामान्य ज्ञान या तीन विषयाचे लेखी पेपर आहेत. परिक्षर्थींना गणित व सामान्य ज्ञानाचा पेपर इंग्रजी अथवा हिंदीमध्ये लिहिता येईल. या विषयाच्या प्रश्नपत्रिका इंग्रजी व हिंदीमध्ये उपलब्ध होतील. लेखी परिक्षेत उत्तिर्ण होणºयां विद्यार्थ्यांच्या मुलाखती ९ आॅक्टोंबर रोजी घेण्यात येतील.
उन्हाळी हंगामासाठी अरुणावती प्रकल्पाचे सिंचन नियोजन
यवतमाळ – अरुणावती प्रकल्प विभाग दिग्रस यांच्यावतीने अरुणावती प्रकल्पाच्या उजवा व डावा कालव्याच्या लाभक्षेत्रातील तसेच अडाण प्रकल्प कालव्याच्या १५ कि.मी. क्षेत्रातील लाभार्थी शेतकºयाच्या उन्हाळी हंगामासाठी नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार अरुणावती प्रकल्पातंर्गत दिग्रस, आर्णी, दारव्हा व वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील लाभार्थीसाठी ३ हजार हेक्टर तर अडाण प्रकल्पाअंतर्गत १ हजार हेक्टर क्षेत्रासाठी सिंचनाचे पाणी देण्याचे नियोजन प्रस्तावित करण्यात आले आहे.
उन्हाळी हंगामासाठी प्रामुख्याने भूईमुंग व इतर उन्हाळी पिकांचा समावेश आहे. तरी उपलब्ध पाणी योग्य प्रकारे वापरण्यासाठी शेतकºयांनी पिकांचे नियोजन करावे, असे आवाहन कायर्कारी अभियंता रा.अ.काटपल्लीवार, यांनी केले आहे. ज्या लाभार्थी शेतकºयांकडे मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी थकबाकी शिल्लक आहे. त्यांनी पाणीपट्टी थकबाकीची रक्कम पूर्णपणे भरल्याशिवाय त्यांना उन्हाळी हंगामासाठी पाणी उपलब्ध होणार नाही याची नोंद घ्यावी. लाभक्षेत्रातील शेतकºयांनी पाणी व्यर्थ वाया जाणार नाही यासाठी पाटचाºयांची साफसफाई करुन जलसंपदा विभागास सहकार्य करावे.
उन्हाळी हंगामाचे पाणी वाटपाचे वेळापत्रक तयार करण्याची कायर्वाही सुरु असून पाण्याची पहिली पाळी १ एप्रिल २०१४ रोजी सुरु होईल तर शेवटची पाळी ३० जून अशी राहील. या बाबतचा सविस्तर कार्यक्रम ग्रामपंचायत व पाणी वाटप संस्थांना कळविण्यात येणार आहे, असे कायर्कारी अभियंता, अरुणावती प्रकल्प विभाग दिग्रस यांनी प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.









