पुसद – महागाव तालुक्यातील घोन्सरा येथील अपंग युवतीवर अतीप्रसंग करणाºया नराधमास सातवर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोेठावली. येथील जिल्हा न्यायाधिश वर्ग १ तथा अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायाधिश अनिल सुब्रमण्यम् यांनी मंगळवारी हा निकाल दिला.
सखाराम सुभाष झोलांडे (२०) रा. घोन्सरा असे शिक्षा ठोेठावलेल्या नराधमाचे नाव आहे. २६ एप्रिल २०१२ रोजी घोन्सरा येथील अपंग युवतीचे आई-वडील लग्नाला गेले होते. त्यामुळे ती घरी एकटीच असल्याने अंगणात बाहेर खाटेवर झोपली होती. अशातच दुपारी एक वाजताच्या सुमारास सखारामने तेथे येऊन तु घरामागे चाल असे म्हटले. यावेळी नकार दिल्यानंतर नराधमाने तीला उचलुन मागे नेऊन कोठ्यात अतीप्रसंग केला. पिडीत युवतीने ही बाब आपल्या कुटुंबीयाना सांगितली. त्यावरून पुसद ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरूद्घ भादंवी कलम ३७६, ३६३,३६६,४५२अंतर्गत गुन्हा दाखल केला. तत्कालीन ठाणेदार पि.आर. चव्हाण यांनी तपास करून आरोपी सखाराम यास अटक करून दोषारोपपत्र दाखल केले. येथील जिल्हा न्यायाधिश वर्ग १ तथा अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायाधिश अनिल सुब्रमण्यम् यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यावेळी सरकारी पक्षाच्या वतीने एकुण १० साक्षदार तपासण्यात आले. यामध्ये दोष सिद्घ झाल्याने आरोपी सखाराम झोलांडे यास भादंवि कलम ३६६ मध्ये पाच वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, भादंवि ४५२ अंतर्गत तीन वर्ष सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंड, भादंवी ३७६ अंतर्गत सात वर्ष सक्तमजुरी व सात हजार दंडाची शिक्षा सुनावली. सदर शिक्षा एकत्र भोगावयाच्या असून शासनातर्फे अतिरीक्त शासकीय अभियोक्ता सुधाकर राठोड यांनी काम पाहिले.
Archive for February 25th, 2014
अपंग युवतीवर अतीप्रसंग; नराधमास सात वर्ष सक्तमजुरी
उजोणा येथे युवकाचा खून
यवतमाळ – शेतीच्या हिस्सेवाटणीवरून तीन जणांनी कुºहाडीने वार करून एका युवकाचा खून केल्याची घटना आज मंगळवारी सकाळी उजोणा येथे उघडकीस आली. लाडखेड पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपी अटक केली असून एका विधी संषर्घग्रस्त बालकास ताब्यात घेतले.
रमेश गणेश पाटील (३०) रा. उजोणा असे मृतकाचे नाव आहे. बंडू चंपत पारिसे (३५), गोलु शंकर आमझरे (१८) रा. उजोणा अशी आरोपींची नावे आहे. काल सायंकाळी तो घरून निघून गेला होता. रात्री बराचवेळ होऊनही तो घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्याची शोधमोहीम सुरु केली होती. मात्र त्याचा थागपत्ता न लागल्याने पत्नीने रमेशच्या मोबाईलवर संपर्क साधला. यावेळी बंडूच्या कुटुंबातील सदस्याने मोबाईन उचलला होता. अशातच आज सकाळी गावालगत नाल्यात रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. ही वार्ता गावात पसरताच नागरिकांनी तेथे मोठी गर्दी केली होती. या घटनेची माहिती मिळताच लाडखेडचे ठाणेदार सतीश पाटील, पोलीस उपनिरीक्षक मनवर यानी घटनास्थळ गाठून पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले. ठाणेदार पाटील यानी तपासचक्रे वेगाने फिरवून दोन आरोपी व एका विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले. त्याची कसुन चौकशी केली असता शेतीच्या वादातून कुºहाडीने हल्ला चढवून रमेशचा खून केल्याची कबुली त्यांनी दिली. याप्रकरणी गणेश चंपत पारीसे (६०) रा. उजोणा यांनी दिलेल्या तक्रारीवरून लाडखेड पोलिसांनी आरोपीविरूद्घ भादंवि कलम ३०२, २०१ (ब), ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.
प्रेमविवाह करून पत्नीचा छळ ,वकीलासह चौघांना अटक
यवतमाळ – शहरातील एका युवकाने नाशिकच्या युवतीसोबत प्रेमविवाह करून तीचा छळ करणाºया वकीलासह चार जणांना नाशिक पोलिसांनी अटक केली.
संदिप लिलाधर जोशी, दिपक लिलाधर जोशी, उषा उपाध्याय, बाला त्रिवेदी सर्व रा. विदर्भ हाऊसिंग सोसायटी अशी आरोपींची नावे आहे. मुळ नाशिक येथील रुपाली ही २००९ मध्ये एका कामानिमित्त यवतमाळ येथे आली होती. त्यावेळी तिची ओळख वकील असलेल्या संदीप जोशी या युवकासोबत झाली होती. या ओळखीचे रुपांत प्रेमात झाल्यानंतर २० एप्रिल २००९ रोजी त्या दोघांनी अकोला येथे आंतरजातीय प्रेमविवाह केला. वर्षभर संसार सुरळीत असताना संदिपच्या वागण्यात बदल होऊन त्याने शारीरीक व मानसिक त्रास देणे सुरु केले. त्याचे अन्य मुलीबरोबर प्रेमप्रकरण सुरू असल्याचेही रुपालीच्या लक्षात आले. याबाबत जाब विचारला असता तीला मारझोड सुरू केली. अशातच २०१३ मध्ये तीला गर्भधारणा झाली. ही बाब संदीपच्या लक्षात येताच त्याने तिला औषध देवून गर्भपात केला. तसेच माहेरच्यांनी दिलेले ९० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने बळजबरीने काढून घेतले होते. सतत सुरु असलेल्या या त्रासातून रुपालीने कशीबशी सुटका करून आई-वडीलांकडे नाशिक येथे निघून गेली. काही दिवसानंतर तीने यवतमाळ येथे परत आली असता संदीप शहर सोडून गेल्याचे सांगण्यात आले. यावेळी रुपालीने त्याच्या मोबाईलवर संपर्क केला असता तू तुझे बघुन घे असे सांगण्यात आले. त्यामुळे रूपालीने वडगाव रोड ठाण्यात तक्रार दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करून नाशिक येथील अंबाड पोलिस ठाण्यात वर्ग केला होता. दरम्यान दोन दिवसापासून तो यवतमाळात लोकेशन असल्याने अंबाड पोलिस ठाण्याच्या सहा. पोलीस निरीक्षक धनश्री पाटील आज शहरात दाखल झाल्या. त्यांनी वडगाव रोडचे सहा. पोलीस निरीक्षक दिपक मसराम, पोलीस उपनिरीक्षक मंगला वाकोडे यांच्या मदतीने विदर्भ हाऊसिंगमध्ये धाड टाकून आरोपी संदिप,जोशी, उपाध्याय, त्रिवेदी याला अटक केली.
युवकाचा मृतदेह आढळला , घातपाताची शक्यता
यवतमाळ – बाभुळगाव तालुक्यातील मादणी बोरगाव येथील एका युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. उकंडा जंगल शिवारात ही घटना घडली असून अनैतिक सबंधातून त्याचा खून केल्याची चर्चा आहे.
दशरथ मारोती मदने (२३) रा. मादणी (बोरगाव) असे मृतकाचे नाव आहे. दशरथ हा अॅपे चालवून आपली उपजिवीका भागवित होता. अॅपे घेऊन तो दररोज यवतमाळ येथे येत होता. नेहमीप्रमाणे सोमवारी तो अॅपे घेऊन यवतमाळात आला होता. रात्री त्याने मद्यप्राशन केल्याने त्याच्या मित्राने अॅपे घरी नेऊन दिला. अशातच गावात रात्री २ वाजता कापूस गाडी भरत असलेल्या नागरिकांना तो गावात दिसला होता. अशातच आज सकाळी उकंडा शिवारात रोडवर त्याला मृतदेह आढळला. या घटनेची माहिती मिळताच शहरचे प्रभारी ठाणेदार अमोल माळवे यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी घटनास्थळावर विषारी औषधीची बॉटल व शिखात महिलेसोबत शारीरीक सबंध करतांना सुरक्षेचा उपाय म्हणून वापरण्यात येणारे साहित्य आढळून आले. मृतकाच्या दंडावर जखमा व गळा आवळल्याच्या खुना दिसून आल्या. त्यामुळे या युवकाचा अनैतिक सबंधातून त्याचा काटा काढण्याच्या उद्देशाने विषारी औषधी पाजून खून केल्याचे बोलल्या जात आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून विविध चर्चेला उधान आले आहे. संतोष कोकरे रा. नेताजी नगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरु आहे.
राज्याचा हंगामी अर्थसंकल्प सादर
मुंबई – आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत अंतरिम अर्थसंकल्प मांडला. निवडणूकीपूर्वीचा हा अंतरिम अर्थसंकल्प असला तरी कोणत्याही वाजवी घोषणा न करता जनतेला महागाईपासून दिलासा आणि आहे त्या सवलती, योजना पुढे चालू ठेवल्या आहेत. सर्वांसाठी वीज दरात २० टक्के सवलत दिली आहे. काही महत्त्वाच्या २५ मोठ्या प्रकल्पांसाठी नऊ हजार ७२५ कोटींची तरतूद केली आहे. जलस्वराज योजना देशात पहिल्यांदाच महाराष्ट्रात लागू करण्यात येत असून त्यासाठी एक हजार ८८४ कोटींची तरतूद करण्यात आलीा आहे. अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्टये राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प २०१४ विधानसभेत सादर, चार महिन्यांसाठी लेखानुदानास मंजूरी, अन्न सुरक्ष योजनेचा राज्यातील सात कोटी जनतेला फायदा, सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध होणार , रोजगार हमीसाठी २५० कोटींची तरतूद, १० वर्षात दरडोई ऊत्पन्नात वाढ, भाडवली कर्जासाठी दोन हजार २५३ कोटी, घरकूल योजनेसाठी ६७५ कोटींची तरतूद, ११ लाख ८३ हजार ९५३ घरकूल बांधली, ग्रामिण, शहरी भागासाठी रमाई घरकूल योजना, जलस्वराज योजना देशात पहिल्यांदाच महाराष्ट्रात लागू , जलस्वराज योजनेसाठी एक हजार ८८४ कोटींची तरतूद , शेततळ्यांसाठी २५६ कोटींची तरतूद
, वीजदर सवलतीसाठी नऊ हजार कोटींची तरतूद , स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्यात सुकन्या योजना राबवणार , लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी १५ कोटी १० लाख रुपयांची तरतूद , अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ , अंगणवाडी सेविकांना सेवानिवृत्तीनंतर एक लाख देण्याची तरतूद , आदिवासी विकासासाठी चार हजार ९९२ कोटींची तरतूद , नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी आठ हजार ६८० कोटी रूपये , २५ मोठ्या प्रकल्पांसाठी नऊ हजार ७२५ कोटींची तरतूद , जीवनावश्यक वस्तूंवरील व्हॅटवरील सवलत कायम ,सर्वांसाठी वीज दरात २० टक्क्यांनी कपात , जलसंवर्धनासाठी आठ हजार २१५ कोटी रुपये खर्च करणार, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी दोन हदार ३७८ कोटींची तरतूद , सोलापूर चादर आणि मनूका स्वस्त होणार, मौलाना आझाद मोफत शिक्षण योजना ,शेततळ्यांना २५ हजार रुपये अनुदान देणार , स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्यात सुकन्या योजना राबवणार , लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी १५ कोटी १० लाख रुपयांची तरतूद , अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ , अंगणवाडी सेविकांना सेवानिवृत्तीनंतर एक लाख देण्याची तरतूद ,व्याघ्र, पक्षी संवर्धनासाठी ३५ कोटींची तरतूद , मराठी भाषा विकासासाठी १५ कोटी ६० लाख रुपयांची तरतूद , मीटर असलेल्या कृषी वीज पंप धारकांना सूट , राज्यात एक हजार ४५० जवाहर विहिरींची कामे पूर्ण
» शिष्यवृत्तीचा फायदा पाच लाख विद्यार्थ्यांना , घरकुल योजनेसाठी ३३३ कोटींची तरतूद , दीड लाखांपेक्षा जास्त रुग्णांना जीवनदायी योजनेचा लाभ , ग्रामीण विकासासाठी १२५ कोटी रुपयांची तरतूद , अनुसूचित जातीजमातींना शौचालय बांधण्यासाठी ६० कोटी देणार , मदरशातील शिक्षक, विद्यार्थ्यांना अनुदान देणार , ग्रामीण भागातील अल्पसंख्याकांना ४० कोटी रुपयांची तरतूद
» अल्पसंख्याकांना शिष्यवृत्तीसाठी ८१ कोटी रुपये देणार , अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रासाठी १३० कोटी , सुकन्या योजनेसाठी १०५ समुपदेशन केंद्र , महिला बालसुरक्षेसाठी १०५ समुपदेशन केंद्र , मनोधैर्य योजनेसाठी १५ कोटींची तरतूद , महिला, बालअत्याचार रोखण्यासाठी योजना, नऊ हजार कोटी रुपये वीज सवलतीसाठी तरतूद, क-हाड, अमरावती, सोलापूर, जळगाव येथे नवीन विमानतळ, पिंपरी-स्वारगेट मेट्रोसाठी दोन हजार ६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित, तंत्रशिक्षणासाठी १३० कोटी रुपयांची तरतूद, १२ मागास जिल्ह्यांसाठी ३९५ कोटींची तरतूद , माजी सैनिक महामंडळासाठी १० कोटी , पोलिसांची ६१ हजार ४९४ नवीन पदे भरती करणार आहे.
विधानसभेच्या गैरव्यवहाराची लोकायुक्त चौकशी करणार
नवी दिल्ली – राज्य विधानसभेशी निगडीत सभागृहाबाहेर झालेल्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला असेल तर, लोकायुक्त त्याची चौकशी करु शकतो असा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला.
मध्यप्रदेश विधानसभेशी निगडीत एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने यावेळी मध्यप्रदेश विधानसभा अध्यक्षांनी लोकायुक्ताला बजावलेली विशेषाधिकार उल्लंघनाची नोटीसही रद्द केली.लोकायुक्ताने सभागृहाबाहेर झालेल्या कामाशी संबंधित काही फाईल्स मागितल्या म्हणून विधानसभा अध्यक्षांनी लोकायुक्ताला विशेषाधिकार उल्लंघनाची नोटीस बजावली होती.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन हत्या
कुडुस – तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन हत्या केल्याची घटना सोमवारी घडली. या घटनेने संपूर्ण वाडा परिसरात खळबळ उडाली आहे.
‘सेहनाज सहा’ असे या मुलीचे नाव आहे. सेहनाज सहा आणि आरोपी अतुल लोते याची सहा महिन्यांपूर्वी ओळख झाली होती. सोमवारी रात्री अतुलने सेहनाजला त्याच्या पोल्ट्रीफ़ॉर्मवर आणले आणि तेथून दीड किमीवर असलेल्या जंगलात नेले. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि तिची हत्या करुन जंगलात फेकून दिले.बराच वेळ झाला तरी मुलगी घरी आली नाही म्हणून सेहनाजच्या घरच्यांनी शोधाशोध केली. त्यावेळी अतुलने तिला नेल्याचे सेहनाजच्या भावाकडून कळले. सेहनाजच्या घरच्यांनी तात्काळ पोलिसांकडे तक्रार केली. तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान आपणच बलात्कार करुन खून केल्याची कबुली अतुलने दिली. आरोपीवर ३६४, ३६६, ३७६, ३०२ अन्वये गुन्हा दाखल झाला असून या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक संजय हजारे करीत आहेत.
नक्षलग्रस्त भागात पहिल्या टप्प्यातच मतदान घ्या
नवी दिल्ली- देशातील ३३ नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान घेण्याची विनंती केंद्रीय गृहमंत्रालयाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा काही दिवसांमध्ये केली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर देशातील नक्षलग्रस्त भागात पहिल्या टप्प्यात मतदाना घेतल्यास अधिक सुरक्षा देता येईल तसेच हिंसाचाराच्या घटना टाळता येतील असे गृहमंत्रालयाचे मत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान हिंसाचार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळेच हिंसक घटना टाळण्यासाठी गृहमंत्रालयाने ही सूचना केली आहे. यासंदर्भात गृहमंत्रालयाने झारखंड, छत्तीसगड, बिहार, ओदिशा, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशमधील ३३ जिल्ह्यातील निवडणुकीच्या काळातील हिंसाचाराच्या घटनांची आकडेवारी निवडणूक आयोगाला सादर केली आहे. गृहमंत्रालयाने लोकसभा निवडणूक २००४, २००९ आणि विधानसभा निवडणूक २००८, २००९, २०१० आणि २०१३ या वर्षातील आकडेवारी सादर केली आहे.याशिवाय २०१३मध्ये झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी ३८३ हल्ले केले आहेत. त्यात १५० नागरीक आणि सुरक्षा जवान ठार झाले आहेत. अशाच प्रकारच्या ३५३ घटना छत्तीसगडमध्ये झाल्या असून त्यात ११० जणांचा मृत्यू झाला आहे.बिहारमध्ये नक्षलवाद्यांकडून हिंसाचाराच्या १७६ घटनांमध्ये ६९, ओदिशामधील १०१ घटनांमध्ये ३५ जणांचा मृत्यू झाल्याचे गृहमंत्रालयाने म्हटले आहे. गृहमंत्रालयाने झारखंडमधील १३, छत्तीसगडमधील आठ, बिहार आणि ओदिशामधील प्रत्येकी चार जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात मतदान घेण्याची सूचना केली आहे.तर महाराष्ट्रातील गडचिरोली आणि मध्य प्रदेशमधील दोन जिल्ह्यांचा यात समावेश आहे. एप्रिल-मे महिन्यात होणा-या लोकसभा निवडणुकीसाठी तब्बल एक कोटी २० लाख सुरक्षा जवान तैनात करण्यात येणार आहेत.









