पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for February 22nd, 2014

व्हॉट्स अ‍ॅपवर ‘लास्ट सीन’ चा पर्याय लपवता येणार

मुंबई – व्हॉट्स अ‍ॅपवरील युझर्सने व्हाट्स अ‍ॅप शेवटचे कधी पाहिले हे दाखवणारा ‘लास्ट सीन’ हा पर्याय आता युझर्सला इतरांपासून लपवता येणार आहे. फेसबुकने व्हाट्स अ‍ॅपला विकत घेतल्यानंतर व्हाट्स अँपच्या प्रायव्हसीला प्राधान्य देत दोन नवे पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.गेल्या कित्येक दिवसांपासून युझर्सकडून या पर्यायांची मागणी केली जात होती. यामागणींची दखल घेतल फेसबुकने व्हॉट्स अ‍ॅपमध्ये हे पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत.‘लास्ट सीन’ या पर्यायासोबतच आता युझर्स त्यांचे प्रोफाईल फोटो आणि स्टेटसही इतरांपासून हाईड करु शकता. आधी हा पर्याय ओएसवर उपलब्ध होते मात्र आता अँड्रॉईडवरही उपलब्ध करण्यात आले आहेत. सध्या गुगल प्ले स्टोरमध्ये ही सुविधा उपलब्ध नसल्याने युझर्सना व्हाट्स अ‍ॅपच्या वेबसाईटवर जाऊन नव्याने अँप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल.http://www.whatsapp.com/android/ / यावेबसाईटद्वारे तुम्ही हे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करु शकता. तसेच अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी तुमच्या फोनमधील अँड्रॉईडचे व्हर्जन हे २.१ च्या पुढील असावयास हवे.दोन दिवसांपूर्वीच फेसबुकने सोशल मिडीयामधील आपले वर्चस्व अबाधित राखण्यासाठी तब्बल १९ अब्ज डॉलर्स मोजून व्हॉट्स अ‍ॅपला विकत घेतले.

February 22, 2014 in मुख्य पान

ज्युनियर विश्वचषक- भारताचे आव्हान संपुष्ठात

दुबई- ज्युनियर(१९ वर्षाखालील) क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत भारताचे आव्हान संपुष्ठात आले. शनिवारी झालेल्या सामन्यात इंग्लंडने भारतावर तीन गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजीकरत भारताने आठ बाद २२१ धावा केल्या होत्या. इंग्लंडने हे लक्ष्य अखेरच्या षटकात तीन गडी आणि पाच चेंडू राखून पूर्ण केले.स्पर्धेतील साखळी फेरीतील तिन्ही सामने भारतीय संघाने जिंकले होते. त्यामुळे उपांत्य फेरीसाठीची भारतीय संघाची दावेदारी प्रबळ मानली जात होती. मात्र इंग्लंडविरुद्धच्या पराभवामुळे भारताचे आव्हान संपुष्ठात आले आहे.

February 22, 2014 in विदर्भ

राष्ट्रवादीचा ‘आप’वर हल्ला

मुंबई– राष्ट्रवादी काँग्रेस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणा-या आम आदमी पक्षाच्या कार्यालयाची शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली.गेल्या काही दिवासांपासून ‘आप’ने राज्यातील वीज खात्यातील भ्रष्टाचारावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांना लक्ष्य करत आहेत. यावरून अंधेरी येथील चकाला परिसरात असणा-या ‘आप’च्या कार्यालयावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला बोल केला. या हल्ल्यात ‘आप’च्या कार्यालयातील सामानाची तोडफोड करण्यात आली. तसेच कार्यालयातील पक्षाचे नेते आणि दिल्लीचा माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे छायाचित्र फाडण्यात आली आहेत.दुपारी अडीचच्या सुमारास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ‘आप’च्या कार्यालयावर हल्ला केला. यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल करणार असून पुरावा म्हणून सीसीटीव्हीचे फुटेज देणार असल्याचे आपचे नेते परितोष यांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना अटक केली आहे.या हल्ल्यानंतर ‘आप’चे नेते मयांक गांधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाकडे आंदोलनासाठी जाताना त्यांना पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त आहे. ‘आप’च्या राज्यातील प्रभारी अंजली दमानिया यांनी महावितरण आणि महाजनकोमध्ये २२ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केले होते.

February 22, 2014 in मुख्य पान

‘खैरलांजीच्या माथ्यावर’ चित्रपटाला बोर्डने दिलेले प्रमाणपत्र रद्द

नागपूर – खैरलांजी हत्याकांडावर बेतलेल्या ‘खैरलांजीच्या माथ्यावर’ या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डने दिलेले प्रमाणपत्र शुक्रवारी रद्दबादल ठरवीत मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने या चित्रपटावरील बंदी कायम ठेवली आहे. आक्षेपार्ह दृश्य वगळून नव्याने सेन्सॉरचे प्रमाणपत्र घ्यावे असे आदेश दिले आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगनादेश देण्याची विनंती करणारी याचिका भय्यालाल भोतमांगे आणि अखिल भारतीय धम्मसेनेचे संयोजक रवी शेंडे यांनी दाखल केली होती.
भोतमांगे यांनी केलेल्या याचिकेवर न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. झेड. ए. हक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने मान्यता दिलेले प्रमाणपत्र कायम ठेवणे अशक्य आहे, चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये वगळण्यात यावी, चित्रपटाला नव्याने प्रमाणपत्र बहाल करीत असताना भय्यालाल भोतमांगे यांना बाजू मांडण्याची संधी द्यावी, यावर त्यांच्याकडून सत्य परिस्थिती जाणून घ्यावी आणि त्यानंतरच चित्रपटाला सेन्सॉर बोर्डने प्रमाणित करावे, असे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले. भोतमांगे यांना या चित्रपटात ‘दारूडा’ तसेच भेकड चित्रित करण्यात आले आहे. हे व्यक्तिस्वातंत्र्याचे उल्लंघन असल्याचा दावा करीत त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. कोणतीही विचारणा न करता निर्मात्यांनी मुंबईत चित्रपट दाखवला. चित्रपटातून चारित्र्यहनन होत असून, मुलीचीही प्रतिमा मल‌िन होत आहे. काही दृश्ये अवास्तव दाखवण्यात आली आहेत. मुलीवर झालेल्या अन्यायासाठी जणू आम्हीच कारणीभूत असल्याचा भास चित्रपटातून होत आहे. संपूर्ण चित्रपटावर आक्षेप नाही, मात्र काही दृश्ये वगळावी. कारण खैरलांजी हत्याकांड काल्पनिक नसून ते सत्य असल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्याचे वकील जयदेव शामकुवर, अॅड. मिलिंद खोब्रागडे यांनी केला.

February 22, 2014 in मुख्य पान

होळीच्या दिवशी शिष्यवृत्ती परीक्षा, राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा विरोध

नागपूर – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती परीक्षा १६ मार्च रोजी घेण्यात येणार आहे. परंतु याच दिवशी सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजऱ्या होणाऱ्या होळीचा सण असल्याने विद्यार्थ्यांची अडचण होणार आहे. त्यामुळे ‌ही परीक्षा तात्काळ पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्ष‌क समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
‌‌होळीच्या दिवशी परीक्षा झाल्यास विद्यार्थ्यांना या सणाच्या उत्साहाला मुकावे लागेल. शिवाय, काही अनुचित प्रकारही होऊ शकतील. या सणाची धामधूम ही ग्रामीण भागात जास्त असते. एरवीसुद्धा या दिवशी विद्यार्थ्यांच्या दैनंदिन उपस्थितीवर परिणाम होतो. अनेक विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र बाहेरगावी असल्यामुळे होळीचा सण लक्षात घेता बहुसंख्य विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित राहण्याची ‌शक्यता आहे. त्यामुळेच ही परीक्षा पुढे ढकलून दुसऱ्या तारखेला घेण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष सुरेश पाबळे यांनी केली आहे. यासंबंधीचे निवेदन देखील परीक्षा परिषदेला देण्यात आले आहे.

February 22, 2014 in महाराष्ट्र

कार दरीत कोसळून अपघात; तीन ठार

पुणे – नाशिक रस्त्यावर वाकीमध्ये वॅगन आर आज (शनिवार) सकाळी गाडी दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जण ठार झाले. या अपघातात पिंपरी-चिंचवडचे माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे यांचा मुलगा प्रीतम बोऱ्हाडे याच्यादेखील मृतांमध्ये समावेश आहे. प्रीतम बोऱ्हाडेसह त्याच्या दोन मित्रांचा देखील अपघातात मृत्यू झाला असल्याचे समजते. नियंत्रण सुटल्याने कार थेट दरीत कोसळून हा भीषण अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करीत आहेत.

February 22, 2014 in महाराष्ट्र