सायतखर्डा येथील घटना, मृतक वर्धा जिल्ह्यातील
यवतमाळ – पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मुलीला फाशी देऊन पित्याने आत्महत्या केली. ही दुदैवी घटना आज मंगळवारी दुपारी १२ वाजता घाटंजी तालुक्यातील सायतखर्डा येथे घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे.
अजय तुकाराम ढवळे (३५), अनुष्का अजय ढवळे (वय ५, रा. नाचनगाव ता. पुलगाव जि. वर्धा ) असे मृतांचे नाव आहे. अजयची पत्नी घाटंजी तालुक्यातील सायतखर्डा आरोग्य उपकेंद्रात परिचारीका म्हणून कार्यरत असून तेथेच शासकीय निवासस्थानी राहत होती. गावातील रुग्ण तिच्याकडे औषधोपचारासाठी येत होते. मृतक हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्याशी नेहमीच वाद करीत होता. गत दोन दिवसापूर्वी नाचणगाव येथून अजय सायतखर्डा येथे आल्यानंतर पत्नीसोबत वाद केला. आज सकाळी त्याची पत्नी गावात हत्तीरोगाच्या गोळ््याचे वाटप करण्याठी गेली असता, घरी कुणी नसल्याचे पाहून रागाच्या भरात अजयने मुलीचा दोरीने गळा आवळून जागीच ठार मारले. त्यानंतर स्वत:ही गळफास घेऊन आपले जीवन संपविले.पत्नी दुपारी घरी परत आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पांढरकवड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन, पारव्याचे ठाणेदार पंजाब वंजारी, जमादार दिगांबर अलोने, रमेश एळमे, गणेश भोसे, रमेश डोंगरे, गजानन खांदवे यांनी घटनास्थळ गाठले. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत असून खळबळ उडाली आहे. यावेळी मृतकाने लिहुन ठेवलेली चिठ्ठीही पोलिसांच्या हाती लागली. त्यामध्ये मी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्यामुळे जगू शकत नाही म्हणून आत्महत्या करीत आहो, असे नमूद असल्याची माहिती पोलीस सू्त्रांनी दिली. मुलीला फाशी देऊन पित्याची आत्महत्या
सायतखर्डा येथील घटना, मृतक वर्धा जिल्ह्यातील
यवतमाळ
दि. १० (स्थानिक प्रतिनिधी)
…………………………
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मुलीला फाशी देऊन पित्याने आत्महत्या केली. ही दुदैवी घटना आज मंगळवारी दुपारी १२ वाजता घाटंजी तालुक्यातील सायतखर्डा येथे घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे.
अजय तुकाराम ढवळे (३५), अनुष्का अजय ढवळे (वय ५, रा. नाचनगाव ता. पुलगाव जि. वर्धा ) असे मृतांचे नाव आहे. अजयची पत्नी घाटंजी तालुक्यातील सायतखर्डा आरोग्य उपकेंद्रात परिचारीका म्हणून कार्यरत असून तेथेच शासकीय निवासस्थानी राहत होती. गावातील रुग्ण तिच्याकडे औषधोपचारासाठी येत होते. मृतक हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्याशी नेहमीच वाद करीत होता. गत दोन दिवसापूर्वी नाचणगाव येथून अजय सायतखर्डा येथे आल्यानंतर पत्नीसोबत वाद केला. आज सकाळी त्याची पत्नी गावात हत्तीरोगाच्या गोळ््याचे वाटप करण्याठी गेली असता, घरी कुणी नसल्याचे पाहून रागाच्या भरात अजयने मुलीचा दोरीने गळा आवळून जागीच ठार मारले. त्यानंतर स्वत:ही गळफास घेऊन आपले जीवन संपविले.पत्नी दुपारी घरी परत आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पांढरकवड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन, पारव्याचे ठाणेदार पंजाब वंजारी, जमादार दिगांबर अलोने, रमेश एळमे, गणेश भोसे, रमेश डोंगरे, गजानन खांदवे यांनी घटनास्थळ गाठले. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत असून खळबळ उडाली आहे. यावेळी मृतकाने लिहुन ठेवलेली चिठ्ठीही पोलिसांच्या हाती लागली. त्यामध्ये मी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्यामुळे जगू शकत नाही म्हणून आत्महत्या करीत आहो, असे नमूद असल्याची माहिती पोलीस सू्त्रांनी दिली.
Archive for February 11th, 2014
मुलीला फाशी देऊन पित्याची आत्महत्या
देविच्या कोपाने पतीच्या मृत्यूची भिती
महिलेने दागिने विकुण दिले होमहवणासाठी पैसे
यवतमाळ -देवीचा कोप होऊन घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू होऊ शकतो अशी भिती एका महिलेला ठगबाज युवकाने दाखविली. त्यामुळे पतीवर येणारे संकट टाळण्यासाठी महिलेने चक्क सोन्याचे दागिने विकुण होमहवण करण्यासाठी ५० हजार रुपये दिल्याचा धक्का दायक प्रकार सोमवारी शहरातील अंबिकानगरात उघडकीस आला. डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या हत्तेनंतर राज्यात अंधश्रद्घा निर्मुलन विधेयक मंजूर झाले. तरीही पुरोगामी महाराष्टÑात अंधश्रध्देवर विश्वास ठेवून अशा प्रकाराला अनेकजण बळी पडतांना दिसत आहे.
प्रणय सुधाकर दुपारे (२३) रा. शिवाजी नगर भद्रावती जि. चंद्रपूर हा आई-वडीलासह शहरातील अंबिका नगर परिसरात भाड्याने राहत होता. रोजमजुरी करून त्यांचे कुटुंबीय उदनिर्वाह करीत होते. अशातच काही महिन्या अगोदर त्याचे आई-वडील भद्रावती येथील मुळ गावी परत गेले. शहरात मित्र मंडळी असल्याने व मन रमल्याने प्रणय हा येथून परत गेला नाही. तेंव्हापासून तो अंबिका नगरातील मानलेल्या मावशीच्या (जोत्सना बाबाराव रामटेके) घरी भाड्याने राहत होता. कधी कधी त्यांच्याकडील कामे करून त्याने रामटेके कुटुंबियाचा विश्वास संपादन केला. दरम्यान काही दिवसापूर्वी त्याने देवीचा कोप होणार असून घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू होणार अशी भिती महिलेला दाखविली. सतत तो हीच भिती दाखवून घराची शांती करण्यासाठी होमहवन करावे लागते असे सांगत होता. त्यामुळे महिलेने पतीवर येणारे संकट टळावे म्हणून १५ ग्रॅम सोन्याचे दागिने विकुन या युवकाला ५० हजार रुपये दिले. कुठलेही होमहवन न करता सदर रक्कम घेऊन युवकाने पोबारा केला. तर काही दिवसापासून भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून शिवीगाळ करून धमकी दिली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी प्रणय दुपारे याच्याविरूद्घ भादंवि कलम ४२०, ५०६ व ६६(अ) माहिती तंत्रज्ञान कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला. अधिक तपास शहरचे ठाणेदार पंजाब डोंगरदिवे करीत आहे. अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोळकर अंधश्रध्दा निर्मुलन विधेयकासाठी झटले. शेवटी दाभोळकरांच्या हत्येनंतर राज्य शासनाने सदर विधेयक मंजुर केले असून अंमलबजावणी सुरु केली. तरीही पुरोगामी महाराष्टÑात अंधश्रद्घेला अनेक जण बळी पडत असून नागरिकांमध्ये जनजागृतीच करण्याची गरज निर्माण झाली आहे.
राज्यातील १५ हजार शाळा बंद, १५ ला शिक्षकाचे धरणे
यवतमाळ -राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या १५ हजार शाळा बंद करण्याचा निर्णय शासणाने घेतला असुन या निर्णयाविरोधात पंजाबराव देशमुख राष्टÑीय शिक्षक परीषद राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १५ फेब्रूवारीला धरणे आंदोलन करणार आहे.
शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने डिसेंबर २०१३ ला शाळेतील पटसंख्येवर आधारीत शिक्षक पदे निर्धारीत करण्याचा निर्णय घेवून २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचे आदेश दिले आहे.या निर्णयामुळे जिल्ह्यातील ४०० ते ५०० शाळा बंद होणार आहे.याचा परीणाम म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातील ८०० ते १००० शिक्षक अतिरीक्त ठरणार आहे.या शिक्षंकाचे समायोजन राज्यात करता येणे शक्य नसल्यामुळे शिक्षक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शासनाने हा निर्णय घेतला असला तरी सर्वोच्च न्यायालयाने शाळा बंद करा असे म्हटले नाही.शासनाने हा निर्णय रद्द करावा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यासाठी १५ ला धरणे देणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष पप्पू पाटील यानी सांगीतले आहे.
अट्टल चोरट्यास अटक
यवतमाळ – शहरात घरफोडून चोरी करणाºया चोरट्यास शहर पोलीसांनी काल रात्री अटक केली. सचिन तुळशिराम भांडेकर (३०) रा. देवीनगर लोहारा ह.मु. वंजारी फैल असे आरोपीचे नाव आहे. कविता देवराव नेहारे (२७) रा. वंजारी फैल या महिलेच्या घराचे टिनपत्रे वाकवून चोरट्याने आत प्रवेश केला. त्यामधून मनिडोरले व २ हजार ५०० रुपये असा एकुण १० हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल चोरुन नेला होता. शहर ठाण्याचे पथकाने गस्ती दरम्यान दारव्हा रोडवर सचिनला अटक करून मनिडोरले जप्त केले. जिल्हा न्यायालयात हजर करून १२ फेबु्रवारी पर्यंत त्याची पोलीस कोठडी मिळविली. कोठडी दरम्यान चार ठिकाणी चोरी केल्याची कबुली सदर आरोपीने दिली. ही कारवाई शहरचे ठाणेदार पंजाब डोंगरदिवे याच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरुण शुंकर, संजय जाधव यांनी केली.
राष्ट्रीय युवा कॉरप्स् योजनेत
युवकांना सहभागी होण्याचे आवाहन
यवतमाळ दि. 11 : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयाच्यावतीने अविद्यार्थी युवकांसाठी राष्ट्रीय युवा कॉरप्स् योजना राबविण्यात येते. ग्रामीण भागातील युवकांना समाज सेवा करण्याची संधी नेहरु युवा केंद्रामार्फत या योजनेव्दारे दिली जाते. यासाठी युवकांनी 3 मार्च 2014 पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा युवा समन्वयक, ज्योती मोहिते यांनी केले.
या योजनेत सहभागी होवू इच्छिणाऱ्या युवा उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्ष या दरम्यान असावे. 1 एप्रिल 2014 रोजी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 वर्षाच्या आत असावे. म्हणजेच त्याचा जन्म 1 एप्रिल 1989 ते 1 एप्रिल 1996 या कालावधीतील असावा. जिल्ह्यातील 16 तालुक्यांकरीता 32 राष्ट्रीय युवा कॉरप्स् स्वयंसेवकाची निवड करावयाची आहे. त्यामुळे तालुक्यात कार्य करण्याकरीता त्याच तालुक्यातील रहिवाशी असलेल्या उमेदवारांची निवड करण्यात येईल. सर्व जाती-जमातीच्या पुरुष व महिला उमेदवाराची शैक्षणिक पात्रता किमान 10 वी पास असावी. पदवीधर उमेदवारांना प्राधान्य राहील. निवड झालेल्या उमेदवारांना सेवा कार्यासाठी मानधन व प्रवासभत्ता असे एकूण रुपये 2500 दर महा दिले जातील.
ग्रामीण भागात समाजसेवा करण्याची आवड असणाऱ्या इच्छूक युवकांना छापील अर्ज नेहरु युवा केंद्र, चंदन नगर, प्रजापतीनगर जवळ, वडगाव रोड, यवतमाळ येथे उपलब्ध आहे. अर्जासोबत गुण पत्रिका, जात प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, राहिवाशी असल्याबाबत रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र किंवा वाहन चालविण्याचा परवाना त्यांच्या झेरॉक्स प्रती जोडणे आवश्यक आहे. उमेदवारा एन.एस.एस., एन.सी.सी. स्काऊड-गाईड, युवा मंडळाचा कार्यकर्ता असल्यास तसा उल्लेख करावा व प्रमाणपत्र जोडावे. अर्ज सादर करण्याची अंतीम मुदत 3 मार्च 2014 आहे. याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
ई-शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास मुदतवाढ
अंतिम मुदत 28 फेब्रुवार , संकेतस्थळ सुरु
यवतमाळ दि. 11 : समाजकल्याण विभागाच्या वतीने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 2013-14 साठी शिष्यवृत्ती व फ्रीशिप अर्ज सादर करण्यास 28 फेब्रुवारी 2014 पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. सध्या संकेतस्थळ सुरु आहे. यानंतर मुदतवाढ मिळणार नसल्याने संबंधित विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयांनी ई-शिष्यवृत्ती, फ्रीशिपचे फॉर्म मुदतीत भरुन घेवून सादर करावे असे आवाहन नितीन ढगे सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांनी केले आहे.
ज्या विद्यार्थ्यांचे, महाविद्यालयाचे खाते क्रमांक आय.एफ.एस. कोड क्रमांक चुकलेले आहेत त्यांच्या रकमा बँकेकडून परत येत आहेत. तरी या चुकांची दुरुस्ती करुन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्याची कार्यवाही तातडीने करावी. तसेच उपयोगिता प्रमाणपत्र प्रवर्ग निहाय सादर करावे. ज्या महाविद्यालयाच्या पी.एल.ए. खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम शिल्लक असल्यास त्याचा कोषागार कार्यालय व महालेखापाल कार्यालयाच्या शिल्लक रकमेशी ताळमेळ करुन शिल्लक रक्कम चलानद्वारे भरावी. सन 2013-14 चे शिष्यवृत्ती/फ्रीशिपचे अर्ज ऑनलाईन भरुन सादर करावे.
राजपत्रित अधिकारी महासंघाचा संपात सहभाग
जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन
यवतमाळ : राज्य सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 13 फेब्रुवारी पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. या संपात जिल्ह्यातील सर्व अधिकारी सहभागी होणार आहे. राजपत्रित अधिकारी महासंघाची आज बैठक झाली. त्यावेळी संप शंभर टक्के यशस्वी करण्याचे आवाहन महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी केले.
बैठकीला जिल्हाध्यक्ष राजेंद्र देशमुख यांच्यासह जिल्हा सरचिटनीस तथा जिल्हा कोषागार अधिकारी शा.व.देव, कर्मचारी नेते रविंद्र देशमुख, निवडणूक उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, महसूल उपजिल्हाधिकारी एस.व्ही.सिरसुध्दे, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक सिडाम, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, जिल्हा हिवताप निर्मुलन अधिकारी सुरेश तरोडेकर, नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक प्रमोद गावंडे, विक्रीकर अधिकारी आ.बा.पाटेकर, शासकीय तंत्रनिकेतनचे अधिव्याख्याता राजेंद्र चौधरी, वरीष्ठ लेखाधिकारी ज्योती भोंडे, सह जिल्हा निबंधक एस.डी.बराटे, रेशीम विकास अधिकारी आर.वाय.म्हात्रे यांच्यासह अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सेवानिवृत्तीचे वय 60 करावे, पाच दिवसांचा आठवडा, रिक्त पदे भरावी, आगाऊ वेतनवाढी, पेन्शन योजना पूर्वी प्रमाणे सुरु करावी आदी मागण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे. या संपात विविध शासकीय, निमशासकीय संघटना सहभागी होत आहे. संपाच्या निमित्ताने जिल्ह्यातील सर्व राजपत्रित अधिकाऱ्यांनी आपली एकसंघता दाखवून द्यावी व मोठ्या संख्येने संपात सहभागी व्हावे, असे आवाहन महासंघाच्या जिल्हाध्यक्षांनी बैठकीत केले. संपामागची भूमिका महासंघाचे सरचिटणीस तथा जिल्हा कोषागार अधिकारी शा.व.देव यांनी सांगितली.









