यवतमाळ – येथील गांधी चौकात अशोक नगरातील युवकावर चाकुने भोसकुन प्राणघातक हल्ला केल्याची घटना आज सोमवारी रात्री ७.३० वाजता घडली. रितेश विलास बाविस्कर (२४) रा. अशोक नगर असे जखमी युवकाचे नाव आहे. आज रात्री तो गांधी चौकात उभा असताना आशिष मुन रा. अंबिका नगर, सुमित वाघमारे रा. अशोक नगर या दोघाने चाकुने सपासप रितेशच्या पोटात, छातीवर वार करुन प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर हल्लेखोरांनी काळ््या रंगाच्या एम.एच. २९ / १४ क्रमांक असलेल्या दुचाकीने तेथून पळ काढला. ही बाब तेथे उभ्या असलेल्या युवकांच्या निदर्शनास येताच जखमीला वसंतराव नाईक रुग्णालयात दाखल केले. शहरचे प्रभारी ठाणेदार अमोल माळवे,डी.बी. पथकाचे सहा. पोलीस उपनिरीक्षक गुलाब पंधरे यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट दिली. तसेच रुग्णालयात जाऊन जखमींची पाहणी केली. वृत्त लिहेपर्यंत पोलीस कार्यवाही सुरु होती.
Archive for February 24th, 2014
दिवसाढवळ््या एक लाखाची घरफोडी
उमरखेड – शहरातील सराफा लाईनमध्ये राहणाºया व्यक्तीचे घर फोडून एक लाखाचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना आज सोमवारी दुपारी घडली. गोविंद कमलनाथ अग्रवाल यांच्या घराचे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे ते कामात मग्न असल्याचा डाव साधून दुपारी १२ वाजता चोरट्याने त्याच्या घरात प्रवेश केला. त्यामधून नगदी ५५ हजार रुपये व ७ ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकुण ७६ हजार रुपययाचा मुद्देमाल चोरुन नेला. ही बाब निदर्शनास येताच त्यांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरुन पोलिसांनी चोरट्याविरुद्घ गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे. दिवसाढवळ््या ही घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली असून भितीचे वातावर निर्माण झाले आहे.
0
ट्रॅक्टर अपघातात एक ठार

उमरखेड – भरधाव ट्रॅक्टर उलटल्याने एक इसम ठार तर एक महिला जखमी झाल्याची घटना येथून १६ किमी अंतरावर साखरा येथे घडली. यामध्ये दोन मुले सुखरुप बचावले. साखरा शिवारातून माल घेऊन ट्रॅक्टर गावाकडे येत होता. अशातच चालकाने नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर रोडच्याखाली उतरून पलटी झाला. यामध्ये दबुन केशव नारायण बर्वे (३८) रा. साखरा, शशिकलाबाई रंगराव गोरे (५५) जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच उमरखेड पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक मानकर, जमादार नोळे यांनी घटनास्थळ गाठून मदतकार्य करून जखमींना नांदेड येथे उपचारासाठी हलविले. मात्र वाटेतच केशव बर्वे याचा मृत्यू झाला तर दोन मुले सुखरुप बचावले. या प्रकरणी चालकाविरूद्घ गुन्हा दाखल केला.
आॅटोसह दारु जप्त, दोघास अटक
यवतमाळ- शहरातून अवैधपने दारुची वाहतुक करणारा आॅटो पोलिसांनी जप्त करून दोन जणांना अटक केली. जिल्हा विशेष पथकाने रविवारी रात्री अप्सरा टॉकीज परिसरात ही कार्यवाही केली.
सचिन शामलाल पाली,शेख शहिरा बानो जाकीर शेख, मंगेश सोपान मुरार, अंकुश वाईनबारचा चालक हे एका आॅटोतून अवैधपने देशी दारु नेत असल्याची माहिती जिल्हा विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुगत पुंडगे यांना मिळाली होती. त्यावरून पथकाने सापळा रचून अप्सरा टॉकीज परिसरात आॅटो अडवून तपासणी केली असता त्यामध्ये सहा देशी दारुच्या पेटया आढळून आल्या. यावेळी पोलिसांनी दारु व आॅटो जप्त करून सचिन पाली, शेख शहिराबानो यास अटक केली तर दोन जण पसार झाले. या प्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.
‘नक्षल्यांसोबतची ‘ती’ चकमक बनावट’
वृत्तसंस्था, गडचिरोली – पोलिस आणि माओवाद्यांमध्ये १८ फेब्रुवारी रोजी गोंदिया-गडचिरोली जिल्ह्यांच्या सीमेवरील जंगलात उडालेली चकमक बनावट होती, असा आरोप आंध्र प्रदेश सिव्हिल लिबर्टीज कमिटीने (एपीसीएलसी) केला आहे. या चकमकीत सहभागी पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करून खटला चालविण्याची मागणीही समितीने केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात कोरची तालुक्यातील बितकाठीच्या जंगलात झालेल्या या चकमकीत दोन महिला माओवाद्यांसह सात माओवादी ठार झाले होते. हे सर्व जण लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी मोठा घातपात घडविण्याच्या तयारीत होते, असा दावा पोलिसांनी केला होता. या चकमकीत माओवाद विरोधी मोहिमेवरील सी-६० कमांडो आणि स्थानिक पोलिसांच्या सहभाग होता. पोलिसांकडून गोळीबाराचे ८० ते ९० राऊंड तर माओवाद्यांच्या बाजूने ४० ते ५० राऊंड फायर करण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले होते. या घटनेनंतर मानवाधिकारांसंदर्भात काम करणाऱ्या आंध्र प्रदेश सिव्हिल लिबर्टीज कमिटी आणि पीपल्स लॉयरच्या सत्यशोधन समितीच्या सदस्यांनी घटनास्थळी भेट दिली. तेथे दोन्ही बाजूंनी गोळीबार झाल्याच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत. पोलिसांनी चकमकीच्या घटनेची योग्य चौकशीही केलेली नाही. या घटनेबाबत स्थानिक प्रसार माध्यमांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती. मृतदेह थेट गडचिरोली या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणीच आणण्यात आले होते, असा दावा ‘एपीसीएलसी’चे महासचिव सी. एच. चंद्रशेखर यांनी रविवारी सायंकाळी येथे केला. पोलिसांनी दोन महिलांसह सात माओवाद्यांना कारमधून घटनास्थळी नेले आणि त्यांच्यावर अतिशय जवळून गोळ्या झाडल्या, असा आरोपही चंद्रशेखर यांनी केला.
या माओवाद्यांनी गुन्हेगारी कृत्य केले तर त्यांना न्यायालयात हजर करणे गरजेचे होते. त्यांच्यावर कायद्यानुसार खटला चालवायला हवा होता. परंतु पोलिसांनी थेट बनावट चकमक घडवून आणली. ही चकमक नसून थंड डोक्याने केलेली हत्याच होय. त्यात सहभागी पोलिसांचे राजीनामे घ्यावेत. त्यांच्यावर हत्येचा खटला चालवावा व या चकमकीची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही चंद्रशेखर यांनी केली आहे. आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव झाली की, या चकमकीत सहभागी पोलिसांविरुद्ध न्यायालयात दाद मागण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. तूर्त गडचिरोली जिल्ह्यातून माओवादविरोधी मोहिमेवरील सर्व पोलिस माघारी घेण्याची मागणीही चंद्रशेखर यांनी केली आहे.
पगार दिला नाही म्हणून सिक्युरिटी गार्डने केले मुलाचे अपहरण
पुणे – गेल्या १० महिन्यांपासून पगार दिला नाही म्हणून संतापलेल्या सिक्युरिटी गार्डने एका व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी घडला. सिंहगड रोडवरील सनसीटीजवळ एका हायप्रोफाइल सोसायटीत ही घटना घडल्यानंतर काही तासांच्या आतच त्या सिक्युरिटी गार्डला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
सिंहगड रोडवरील सनसीटीजवळ एका हायप्रोफाइल सोसायटीत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम पाहणारा प्रविण लिंगप्पा याने त्याच सोसायटीमधील एका व्यापाऱ्याच्या मुलाचे संध्याकाळच्या वेळात अपहरण केले. या मुलाच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर तत्काळ पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. आरोपी साताऱ्याकडे गेल्याची माहिती मिळताच पुण्याचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांनी साताऱ्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अमोल तांबे-पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी पोलिसांची पथके नेमली आणि साताऱ्यात महत्वाच्या ठिकाणी शोध घेतला असता सातारा एसटी स्टँडवर आरोपीला अटक करण्यात आणि मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली.
सिक्युरिटी गार्ड पुरवणाऱ्या बोगस कंपन्यांमुळे शहरात सिक्युरिटी गार्डकडून होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे, अशी माहिती आरोपीच्या चौकशीत समोर आली आहे. प्रविण लिंगप्पा हा मुळचा कर्नाटकचा. नोकरीच्या शोधासाठी वर्षभरापूर्वीच पुण्यात आला होता. त्याला एका सिक्युरिटी गार्ड पुरवणाऱ्या कंपनीने चांगला पगार देतो असे सांगत एका सोसायटीत सिक्युरिटी गार्डची नोकरी देतो, असे सांगून या सोसायटी पाठवले. गेले आठ-नऊ महिने प्रविण तेथेच काम करत होता. कंपनीचे अधिकारी आल्यानंतर ते त्याला केवळ १००-२०० रुपये हातावर टेकवून म्हणायचे, दोनवेळचं जेवण मिळतना मग शांत राहा. नाहीतर चांगलाच चोप देऊ. अखेर प्रविणकडे पर्याय उरला नाही म्हणून त्याने संतापून व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण केसे. तसेच सोसायटीच्या जीन्यामध्ये एक चिठ्ठी लिहून ठेवल्याचे सांगितले. पगार मिळाला तर मुलाला लगेच सोडून देईन, असे या चिठ्ठीत लिहले होते, असे आरोपीने पोलीस चौकशीच्या वेळी सांगितले. कोणत्याही प्रकारचा तपास न करता, नियम न पाळता शहरात अनेक सिक्युरिटी गार्ड पुरवणाऱ्या कंपन्या वाढल्या आहेत. या कंपन्या सिक्युरिटी गार्डला पैसे देत नाही पण काम मात्र करून घेतात. अशामुळे शहरात गुन्हे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत, असे सांगितले जात आहे.
शिवसेना खासदार वाकचौरे ग्रेसमध्ये
मुंबई – शिर्डी मतदार संघातील शिवसेनेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आज, सोमवारी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. वाकचौरे यांच्या कॉंग्रेस प्रवेशामुळे शिर्डीतील शिवसैनिक संपप्त झाले आहेत. वाकचौरे यांच्या पक्षप्रवेशावेळी शिवसैनिकांनी गोंधळ करू नये म्हणून कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. द्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कॉंग्रेसचे राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत वाकचौरे यांनी कॉंग्रेसमध्ये केला आहे.
मोदींच्या सभेतील बॉम्बस्फोट प्रकरणी दोघांना अटक
नवी दिल्ली- गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या पाटणा येथे झालेल्या प्रचार सभे दरम्यान बॉम्बस्फोटप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने सोमवारी दोघांना अटक केली. या दोघांना उत्तर प्रदेशमधून अटक केल्याचे ‘एनआयए’ने म्हटले आहे. ऑक्टोबर २०१३मध्ये मोदींच्या पाटणा येथील हुंकार रॉली दरम्यान सात स्फोट झाले होते. यात सहा जण ठार तर ८०हून अधिक जण जखमी झाले होते.
विरोधकांची भूमिका लोकशाहीसाठी धोकादायक – मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
मुंबई- विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्दयावर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. मात्र ज्या पद्धतीने विरोधक धमकीची भाषा वापरत आहेत, ती संसदीय लोकशाहीला धोकादायक असल्याची टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. टीका करणे हे विरोधकांचे काम आहे. मात्र त्यांच्या टीकेला उत्तर हवे असेल तर त्यांनी चर्चा करणे गरजेचे आहे. मात्र केवळ टीका करायची आणि चर्चेपासून पळ काढायचा हीच विरोधकांची भूमिका आहे, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.
अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या चहापानावर बहिष्कार टाकण्याची परंपरा विरोधकांनी कायम ठेवली. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या घरी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. टोलचा मुद्दा, आदर्श घोटळा आणि एलबीटी या मुद्दय़ांवर राज्यपालांच्या अभिभाषणातून ठोस आश्वासन न मिळाल्यास त्यांचे अभिभाषण होऊ देणार नाही, असा इशारा खडसे यांनी दिला.अधिवेशन सुरळीत चालावे या दृष्टीने सकारात्मक चर्चा करण्यासाठी विरोधकांनी येणे अपेक्षित होते. राज्याच्या राजकारणातील ही प्रथा विरोधक वेगळ्या दिशेने नेत असल्याबद्दल चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. विरोधकांकडे सध्या कोणतेही नवीन मुद्दे नाहीत.डोळ्यांसमोर ठेवून ते केवळ राजकारण करत आहेत. मात्र सरकार जनतेच्या हिताच्या दृष्टीने या अधिवेशनात निर्णय घेईल. राज्यपालांचे अभिभाषण हे महत्त्वाचे आहे. ते होऊ न देण्याची विरोधकांनी दिलेली धमकी दुर्दैवी असल्याचेही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होऊ शकते, ही शक्यता लक्षात घेऊनच अधिवेशनाचा कालावधी चार दिवसांचा ठेवला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अधिवेशन सुरु, विरोधकांचा गोंधळ
मुंबई- महाराष्ट्र विधिमंडळाच्या अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारी सकाळी ११ वाजता सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी सरकारला धारेवर धरण्यासाठी सर्व विरोधक एकत्र आले आहेत.भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी विधानभवनाच्या पाय-यांवर सरकारविरोधात निदर्शने केली. टोल बंद करा, आदर्श अहवालातील दोषी आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांवर कारवाई करण्याच्या घोषणा विरोधकांनी दिल्या. राज्यपालांचे अभिभाषण सुरु असतानाही विरोधकांनी गोंधळ घातला.
महत्त्वाची १२ विधेयके होणार सादर
या अधिवेशनात महत्त्वाची १२ विधेयके सादर केली जाणार आहेत. त्यात महाराष्ट्र सावकारी विधेयक, ग्रामपंचायत सुधारणा विधेयक, पोलिस बदल्या, अस्थापने मंडळे याबाबत तरतूद करणारे सुधारणा विधेयक, पुरवणी विनियोजन विधेयक (२०१४), विनियोजन लेखानुदान विधेयक सादर केली जाणार आहेत.
आरजेडी’च्या १३ आमदारांचे राजीनामे
नवी दिल्ली- राष्ट्रीय जनता दलाच्या बिहारमधील १३ आमदारांनी सोमवारी राजीनामे दिल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या आमदारांचा राजीनामा पक्षाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
पक्षातील या १३ आमदारांनी सोमवारी विधानसभेचे अध्यक्षांकडे राजीमाने सोपवले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे आमदार ‘जेडीयू’मध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र या राजीनामा नाट्यावर अद्याप कोणाही अधिकृत माहिती दिलेली नाही.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील १३ आमदारांनी राजीनामे दिले आहेत. हे सर्वजण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ‘जेडीयू’मध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. बिहार विधानसभेच्या २४३ सदस्यांमध्ये आरजेडीचे २२ आमदार आहेत. त्यामुळे १३ जणांनी राजीनामे दिल्यामुळे पक्षाकडे केवळ नऊच आमदार शिल्लक राहिले आहेत.
0
नाशिक अपर आयुक्त कार्यालयात 570 जागा
आदिवासी विकास विभागातील नाशिक अपर आयुक्त कार्यालयात 570 जागा
महाराष्ट्र शासनाच्या अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक या कार्यालयाच्या आस्थापनेवर प्राथमिक शिक्षण सेवक –मराठी माध्यम (207 जागा), माध्यमिक शिक्षण सेवक (36 जागा), उच्च माध्यमिक शिक्षण सेवक (26 जागा), अधिक्षक –पुरुष (24 जागा), अधीक्षक- स्त्री (66 जागा), गृहपाल-पुरुष (10 जागा), गृहपाल-स्त्री (17 जागा), उपलेखापाल (7 जागा), वरिष्ठ लिपिक (13 जागा), कनिष्ठ लिपिक (140 जागा), वाहन चालक (4 जागा), आदिवासी विकास निरीक्षक (7 जागा), लघु टंकलेखक (2 जागा), प्राथमिक शिक्षण सेवक-इंग्रजी माध्यम (3 जागा), ग्रंथपाल (7 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 मार्च 2014 आहे. अधिक माहिती www.mahatribal.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
आदिवासी विकास विभागातील ठाणे अपर आयुक्त कार्यालयात 248 जागा
महाराष्ट्र शासनाच्या अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे या कार्यालयाच्या आस्थापनेवर संशोधन सहायक (3 जागा), उपलेखापाल (16 जागा), आदिवासी विकास निरीक्षक (1 जागा), वरिष्ठ लिपिक (15 जागा), लिपिक टंकलेखक (94 जागा), उच्च माध्यमिक शिक्षण सेवक (3 जागा), माध्यमिक शिक्षण सेवक (18 जागा), प्राथमिक शिक्षण सेवक –मराठी माध्यम (46 जागा), प्राथमिक शिक्षण सेवक-इंग्रजी माध्यम (8 जागा), अधिक्षक –पुरुष (4 जागा), अधीक्षक- स्त्री (4 जागा), गृहपाल-पुरुष (1 जागा), गृहपाल-स्त्री (8 जागा), वाहन चालक (4 जागा), ग्रंथपाल (15 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (8 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 मार्च 2014 आहे. अधिक माहिती www.mahatribal.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
आदिवासी विकास विभागातील अमरावती अपर आयुक्त कार्यालयात 216 जागा
महाराष्ट्र शासनाच्या अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती या कार्यालयाच्या आस्थापनेवर संशोधन सहायक (3 जागा), उपलेखापाल (12 जागा), आदिवासी विकास निरीक्षक (5 जागा), वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहायक (27 जागा), कनिष्ठ लिपिक (100 जागा), अधिक्षक –पुरुष (3 जागा), अधीक्षक- स्त्री (3 जागा),लघुटंकलेखक (3 जागा), वाहन चालक (8 जागा), गृहपाल-पुरुष (3 जागा), गृहपाल-स्त्री (3 जागा), प्राथमिक शिक्षण सेवक –मराठी माध्यम (20 जागा), प्राथमिक शिक्षण सेवक-इंग्रजी माध्यम (7 जागा),कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण सेवक (5 जागा), माध्यमिक शिक्षण सेवक (14 जागा), ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 मार्च 2014 आहे. अधिक माहिती www.mahatribal.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे सहायक आयुक्त-औषधे या पदाच्या 4 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागातील सहायक आयुक्त (औषधे), अन्न व औषध प्रशासन (4 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 मार्च 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात www.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
आदिवासी विकास विभागातील नागपूर अपर आयुक्त कार्यालयात 401 जागा
महाराष्ट्र शासनाच्या अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर यांच्या कार्यक्षेत्रातील कार्यालयाच्या आस्थापनेवर प्राथमिक शिक्षण सेवक – मराठी माध्यम (77 जागा), प्राथमिक शिक्षण सेवक-गणित व विज्ञान (एकूण 10 जागा), उच्च माध्यमिक शिक्षण सेवक -मराठी/इंग्रजी/रसायन-भौतिक/इतिहास/गणित (एकूण 8 जागा), अधिक्षक – पुरुष (35 जागा), अधीक्षक- स्त्री (23 जागा), गृहपाल-पुरुष (11 जागा), गृहपाल-स्त्री (14 जागा), उपलेखापाल (13 जागा), आदिवासी विकास निरीक्षक (1 जागा), वरिष्ठ लिपिक (27 जागा), कनिष्ठ लिपिक (146 जागा), वाहन चालक (10 जागा), ग्रंथपाल (12 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (10 जागा), लघुटंकलेखक (2 जागा), संशोधन सहायक (23 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 23 फेब्रुवारी 2014 या दिवसीच्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahatribal.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
नांदेडमधील शासकीय आयुर्वेद रुग्णालयात 9 जागा
नांदेडमधील शासकीय आयुर्वेद रुग्णालयात माळी (1 जागा), धोबी (1 जागा), सहस्वयंपाकी (1 जागा), आया (1 जागा), शिपाई (1 जागा), कक्षसेवाक (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2014 आहे. यासंबंधीची अधिक माहिती https://www.maharashtra.gov.inया संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेत 32 जागा
पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेत प्रकल्प संचालक –संशोधन (1 जागा), मुख्य प्रकल्प संचालक (1 जागा), प्रकल्प संचालक-स्पर्धा परीक्षा कोचिंग (1 जागा), प्रकल्प संचालक-जात प्रमाणपत्र पडताळणी समिती (2 जागा), सहायक प्रकल्प संचालक – जात प्रमाणपत्र पडताळणी समिती (3 जागा), मुख्य प्रकल्प संचालक-कौशल्य विकास (1 जागा), मुख्य विधी सल्लागार (1 जागा), वरिष्ठ संशोधन अधिकारी (2 जागा), संशोधन अधिकारी (6 जागा), संशोधन सहायक (6 जागा), प्रकल्प व्यवस्थापक- पडताळणी समिती (8 जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 21 फेब्रुवारी 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेत 75 जागा
पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेत निबंधक (15 जागा), संशोधन अधिकारी (15 जागा), संशोधन सहायक (15 जागा), व्यवस्थापक (15 जागा), रेकॉर्ड किपर (15 जागा) ही पदे मानधन तत्वावर भरण्यात येणार आहेत. या पदासाठी थेट अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 20 फेब्रुवारी 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत 79 जागा
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारितील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या प्रयोगशाळांमध्ये वैज्ञानिक सहायक (23 जागा), वैज्ञानिक सहायक-मानसशास्त्र (2 जागा), वैज्ञानिक सहायक-सायबर गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण (5 जागा), वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक (8 जागा), वरिष्ठ लिपिक -भांडार (1 जागा), कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक (7 जागा), लिपिक टंकलेखक (11 जागा), वाहनचालक (2 जागा), प्रयोगशाळा परिचर (16 जागा), चपराशी (3 जागा), सहआचारी (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २ मार्च 2014 आहे. अधिक माहिती www.formonline.net/fsl व www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.










