पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for February 7th, 2014

माजी सैनिकाकडून लाच घेताना मंडळ अधिकारी जाळ््यात

यवतमाळ – अवैध वीटभट्टी चालविल्याप्रकरणी कारवाई टाळण्यासाठी माजी सैनिकाकडून १७ हजार रुपये लाच स्वीकारताना सावळी सदोबा येथील मंडळ अधिकाºयास रंगेहात अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता सावळी सदोबा येथील नायब तहसील कार्यालयात ही कारवाई केली.
रमेश रामभाऊ मादेशवार (४८) असे लाचखोर मंडळ अधिकाºयाचे नाव असून ते सावळी सदोबा येथील नायब तहसील कार्यालयात कार्यरत आहे. सुभेदार सैयद अब्दुला शाहा (४७) रा. चिखलवर्धा ता. घाटंजी हे माजी सैनिक असून त्यांनी वीटभट्टीचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायाला परवाना नसून तुमच्यावर कायदेशीर कारवाई करतो, अशी धमकी मंडळ अधिकारी मादेशवार यांनी माजी सैनिकाला दिली होती. कारवाई टाळावयाची असेल तर ५० हजार रुपये लाचेची मागणी केली. यावर तोडगा काढून २० हजार रुपये देण्याचे ठरले. त्याचवेळी तीन हजार रुपये घेतले व उर्वरित रक्कम १७ हजार रुपये ७ फेबु्रवारी रोजी कार्यालयात घेण्याचे ठरले होते. याबाबतची तक्रार सुभेदार सैयद यांनी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यावरून सदर विभागाच्या अधिकाºयांनी पडताळणी केली असता, मंडळ अधिकाºयाने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज सापळा रचून मंडळ अधिकाºयाला १७ हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले. या कारवाईने तहसील कार्यालयात खळबळ उडाली असून लाचखोर कर्मचाºयांचे धाबे दणाणले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अमरावती येथील पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक सतीश देशमुख, अरुण गिरी, सुशील झोडगेकर, प्रकाश शेंडे, सुधाकर कोकेवार, अमोल महल्ले, शैलेश ढोणे, अमित जोशी, नीलेश पखाले, सुधाकर मेश्राम, अनिल राजकुमार यांनी केली.

February 07, 2014 in रोजगार

ट्रेलरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

नेर- यवतमाळवरून अमरावतीकडे जाणाºया ट्रेलरने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी रात्री ११ वाजता येथून दोन किमी अंतरावर घडली. शेख सिकदर (३५) रा. मालखेड बु. असे मृतकाचे नाव आहे. यवतमाळवरून अमरावतीकडे जाणाºया ट्रेलरने (एम.एच. ३४ / ४८४ ) समोरुन येणाºया दुचाकीला (एम.एच. २९ / ५४९५) जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकी रोडच्या खाली जावून झाडावर आदळल्याने सिकंदर हा जागीच ठार झाला. याप्रकरणी नेर पोलिसांनी वाहन चालकाविरूद्घ गुन्हा दाखल केला.

February 07, 2014 in रोजगार

तीन शिक्षकांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार

यवतमाळ – राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि विशेष शिक्षक तसेच आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना राज्य शिक्षक पुरस्कार सन २०१३-१४ जाहिर झाले. यामध्ये जिल्ह्यातील तीन शिक्षकांचा समावेश आहे.
यामध्ये प्राथमिक शिक्षक गटातून सिमा मधुकर मुनगिनवार (सहाय्यक शिक्षीका,जि.प. प्राथमिक माठी शाळा दिघी, ता. बाभुळगाव )तर माध्यमिक शिक्षकातून साहेबराव धोंडबा हटवार ( सहा. शिक्षक, मोहनाबाई कन्या विद्यालय दिग्रस) तर आदिवासी विभाग प्राथमिक शिक्षक विभागातून प्रमोद विनायक पंचभाई (प्रभारी मुख्याध्यापक, जि.प. प्राथमिक शाळा मजरा , ता. झरी ) यांचा समावेश आहे. समसजाची नि:स्वार्थ भावाने आणि निष्ठेने सेवा करणाºया व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाºया शिक्षकांना त्यांच्या अंगिकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यशोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने शिक्षक पुरस्कार दरवर्षी जाहिर करण्यात येते. यावर्षीचे पुरस्काराची यादी आज जाहिर केली असून यामध्ये जिल्ह्यातील तीन शिक्षकांचा समावेश आहे. ५ सप्टेंबर रोजी एका समारंभात पुरस्कार प्रदान करणार आहे.

February 07, 2014 in रोजगार

राज्यातील 11 हजार ग्रामपंचायतींमध्ये ई-बँकींग

PHC GHARFAL

ग्रामविकास मंत्र्यांच्याहस्ते पंचायत समिती व आरोग्य केंद्राचे उद्घाटन
यवतमाळ दि.७: सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या गावातच विविध प्रकारच्या सोई सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे, असे शासनाचे धोरण आहे. त्यामुळेच ग्रामपंचायतींमधून सध्या 19 प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यास सुरुवात झाली आहे. आगामी काळात ग्रामपंचायतींचे स्वरुप बदलणार असून ग्रामपंचायतीतच बँक सुविधा उपलब्ध होणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यात 11 हजार ग्रामपंचायती ई-बँकींग सुविधेने जोडणार असल्याचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. श्री.पाटील यांच्याहस्ते बाभुळगाव येथील पंचायत समिती तसेच तालुक्यातील घारफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व राळेगाव येथील पंचायत समितीच्या इमारतीचे उद्घाटन झाले. त्याप्रसंगी बाभुळगाव येथील कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी विधानसभा उपाध्यक्ष प्रा.वसंत पुरके होते. प्रमुख पाहूणे म्हणून खा.भावना गवळी, आ.संदीप बाजोरीया, जि.प.अध्यक्ष प्रविण देशमुख, उपाध्यक्ष ययाती नाईक, सभापती सुभाष ठोकळ, मनमोहनसिंह चव्हाण, प्रभाकर उईके, प्राजक्ता मानकर, पंचायत समिती सभापती प्रतिभा कडू, उपसभापती रमेश लोखंडे, जि.प.सदस्य अमन गावंडे, योगिता कोडापे, अर्चना कोडापे, माजी जि.प.अध्यक्ष अशोक घारफडकर, माजी सभापती हिम्मत पांडे, भिमसिंग सोळंकी, कापूस पणन महासंघाचे संचालक सुरेश चिंचोळकर, जि.प.चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुळकर्णी आदी उपस्थित होते. सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी विविध उपक्रम गेल्या काही वर्षात राज्य शासनाने सुरु केले आहे. त्यापैकीच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुविधा देण्याचा अभिनव प्रयोग शासनाने सुरु केला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. भविष्यात गावकऱ्यांना आपल्या कामासाठी अन्यगावी जावे लागू नये यासाठीच ग्रामपंचायतीचे स्वरुप बदलवून याठिकाणी ई-सुविधांवर भर देण्यात येणार असल्याचे श्री.पाटील म्हणाले. यवतमाळ जिल्ह्यात अनेक गावांमध्ये बँकांची सुविधा नाही. त्यामुळे नाईलाजाने गावकऱ्यांना सावकाराकडे कर्ज मागावे लागते. आता ग्रामपंचायतीतच बँकेची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्याचा राज्यस्तरीय शुभारंभ यवतमाळ जिल्ह्यातून होत असल्याचे त्यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात 11 हजार ग्रामपंचायती ई-बँकींगने जोडण्यात येत असून पुढील टप्प्यात उर्वरीत सर्व ग्रामपंचायती जोडण्यात येत असल्याचे ते म्हणाले. राज्यात ठिकठिकाणी पंचायत समितींच्या अद्ययावत इमारती उभ्या राहत आहे. केवळ इमारती उभ्या राहून उपयोगाचे नाही. याठिकाणी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना सुविधाही चांगल्या प्रकारे मिळाल्या पाहिजे. शासन कर्मचाऱ्यांना
सुखसुविधा पुरविते त्या तुलनेत कर्मचाऱ्यांनीही चांगले काम करणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. कर्मचाऱ्यांनी जागरुकतेने काम केल्यास अनेक समस्या सोडविण्याचे श्रेय त्यांना मिळेल. राज्यात शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शाळांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात ज्या शाळांची प्रतवारी सुधरविणे आवश्यक आहे.
यावेळी विधानसभा उपाध्यक्ष प्रा.वसंत पुरके यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त वेळ गावाला दिला पाहिजे, असे सांगून मुलांना सक्तीचे आणि दर्जेदार शिक्षण मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. खा.भावना गवळी, आ.संदीप बाजोरीया, जि.प.अध्यक्ष प्रविण देशमुख यांचीही यावेळी भाषणे झाली. बाभुळगाव व राळेगाव येथील पंचायत समिती व घारफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामविकास मंत्र्यांच्याहस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. घारफळ येथे आरोग्य सभापती मनमोहनसिंग चव्हाण तर बाभुळगाव येथे पंचायत समिती सभापती प्रतिभा कडू यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमांना स्थानिक नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते.

February 07, 2014 in रोजगार

देशात बलात्काराच्या २४ हजार याचिका प्रलंबित

नवी दिल्ली – देशभरातील उच्च न्यायालयांमध्ये सुमारे २४ हजार बलात्काराच्या याचिका सुनावणीच्या प्रतीक्षेत आहेत. तर गेल्या तीन वर्षात आठ हजार याचिकांवर सुनावणी करण्यात आल्याची माहिती गुरुवारी केंद्र सरकारने राज्यसभेत दिली.
३१ डिसेंबर २०१३ पर्यंत लैंगिक छळ, अपहरण यांच्या ३०९ याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. तर २०११ ते १३ दरम्यान यांसारख्या ६८७ याचिकेवर सुनावणी देण्यात आलेली आहे. केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी ही आकडेवारी शुक्रवारी राज्यसभेत मांडली. ३० सप्टेंबर २०१३ पर्यंत २१ उच्च न्यायालयात २३ हजार ७९२ याचिका न्यायाची प्रतीक्षा करत आहेत. यातील सर्वात जास्त आठ हजार २१५ याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. तर २००९ ते १२ दरम्यान या न्यायालयाकडून फक्त ३९ बलात्कारांच्या याचिकेवर सुनावणी देण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयात सप्टेंबर २०१२ पर्यंत ९४२ बलात्काराच्या याचिका प्रलंबित आहेत. तसेच कर्नाटक उच्च न्यायालयात २४३ याचिका न्यायाची प्रतीक्षा करत असल्याची माहिती सिब्बल यांनी दिली.

February 07, 2014 in रोजगार

एसटी कर्मचा-यांचे रजा आंदोलन स्थगित

मुंबई- वाढीव महागाई भत्ता आणि प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचा-यांनी येत्या १० फेब्रुवारीला पुकारलेले सामूहिक रजा आंदोलन रद्द केले आहे. कर्मचा-यांचा वाढीव महागाई भत्ता तसेच थकबाकीची रक्कम अधिवेशनपूर्वी देण्याचे आश्वासन परिवहन राज्यमंत्री सचिन अहिर यांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय कर्मचारी संघटनेने जाहीर केला. त्यामुळे आंगणेवाडीच्या जत्रेसाठी कोकणात जाणा-या प्रवाशांना बिनधास्त एसटीचा प्रवास करता येणार आहे.
शुक्रवारी सचिन अहिर यांच्या दालनात झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. या वेळी राज्य परिवहन मंहाडळाचे अध्यक्ष जीवन गोरे, मान्यताप्राप्त संघटनेचे अध्यक्ष शिवाजी चव्हाण, महासचिव हनुमंत ताटे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.वेतन कराराच्या तरतुदीनुसार, जानेवारी २०१३ ते सप्टेबर २०१३ या ९ महिन्यांची आठ टक्के वाढीव महागाई भत्त्याची ७२ कोटी रुपयांची थकबाकी, जुलै २०१३ आणि ऑक्टोबर २०१३ या चार महिन्यांची १० टक्के वाढीव महागाई भत्त्याची ४० कोटी रुपयांची थकबाकी होती.ही थकबाकी अधिवेशनपूर्वी महामंडळाला देण्यात येणार असून, कर्मचा-यांना एकरकमी वाटप करण्यात येणार आहे. कर्मचा-यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्याने १० फेब्रुवारीचे नियोजित सामूहिक रजा आंदोलन रद्द करण्यात आल्याची माहितीही या वेळी चव्हाण यांनी दिली.

February 07, 2014 in रोजगार

हज यात्रेकरुंसाठी नवे ‘हजसलाम’ अ‍ॅप

दुबई – लवकरच मुस्लिम लोंकांची हज यात्रा सुरु होणार आहे.  या पार्श्वभूमीवर दुबई स्थित कंपनीने  हज यात्रेकरुंसाठी ‘हजसलाम’ हे नवे अ‍ॅप तयार केले आहे.
दरवर्षी हजारो मुस्लिम बांधव हज यात्रेला जातात. ही यात्रा अल-हिज्जा ह्‌या महिन्यामध्ये सौदी अरेबिया या देशातील मक्का या पवित्र शहरी भरते. यावेळी हज यात्रेकरुंना एक प्रकारे मार्गदर्शक म्हणून या अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे. इंटरनेटशिवाय हे अ‍ॅप वापरता येऊ शकते. या अ‍ॅपच्या सहाय्याने यात्रेकरु त्यांची प्रार्थना ऐकू अथवा वाचू शकतात. तसेच काबाच्या भोवती किती प्रदक्षिणा घालायच्या आहेत याची संपूर्ण माहिती हे अ‍ॅप पुरवते. तसेच या अ‍ॅपद्वारे आपण कोठे आहोत याचे ठिकाण सांगितले जाते. स्थळापासून ते किती दूर आहेत. तसेच तेथील संपूर्ण रस्ता, जवळील मशीद अथवा रुग्णालय कोठे आहे याची इत्यंभूत माहिती या अ‍ॅपच्या सहाय्याने मिळते. ‘हज यात्रेकरुंना ही यात्रा सुखकारक व्हावी आणि संपूर्ण भक्तिभावाने या यात्रेचा आनंद घेता यावा यासाठी आम्ही हे अ‍ॅप तय़ार केले असल्याचे’, हजनेट चे कार्यकारी प्रमुख अली दाबाजा यांनी सांगितले.

February 07, 2014 in रोजगार

तेलंगण राज्य निर्मिती विधेयक मंजूर

नवी दिल्ली- आंध्र प्रदेशचे विभाजन करून वेगळ्या तेलंगण राज्याची निर्मिती करण्यासंबंधीचे वादग्रस्त विधेयक शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आले. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत तेलंगणा राज्याच्या विधेयकाच्या मसुद्याला एकमताने मंजुरी देण्यात आली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासमोर हे विधेयक सादर केल्यानंतर ते विधेयक १२ फेब्रुवारीला राज्य सभेत मांडण्यात येणार आहे.
तेलंगण आणि सीमांध्र या दोन राज्यांसाठी हैदराबाद ही संयुक्त राजधानी असेल. सीमांध्रमधील नेत्यांनी हैदराबादला केंद्र शासित प्रदेश घोषित करण्याची मागणी केंद्राने फेटाळून लावली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी होणा-या संसदेच्या या शेवटेच्या अधिवेशनात हे विधेयक मंजूर करण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे. मात्र मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी आणि मूळचे तेलंगणचे नसलेले इतर काँग्रेस नेते यांचा तेलंगणच्या निर्मितीला विरोध आहे. दरम्यान, तेलंगण राज्य निर्मितीसंदर्भातील विधेयकाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. तेलंगण राज्य निर्मीतीच्या सध्याच्या टप्प्यावर हस्तक्षेप करायचा नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

February 07, 2014 in रोजगार

खैरलांजीच्या माथ्यावर’ चित्रपट प्रदर्शनाला स्थगिती

नागपूर- खैरलांजी हत्याकांडांवर आधारित ‘खैरलांजीच्या माथ्यावर’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला नागपूरच्या खंडपीठाने गुरुवारी तात्पुरती स्थगिती दिली. हा चित्रपट शुक्रवारी सात डिसेंबरला प्रदर्शित होणार होता.
अखिल भारतीय धम्म सेनेचे रवी शेंडे आणि भय्यालाल भोतमांगे यांनी दाखल केलेल्या या तातडीच्या याचिकेवर न्यायालयाने हा आदेश दिला. याचिकेवर १२ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. २९ सप्टेंबर २००६ मध्ये सामाजिक प्रतिष्ठेला काळिमा फासणारी घटना घडली होती. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्‍यातील खैरलांजी गावात क्रूरतेचा कळस गाठत निर्दयी माणसांनी भोतमांगे कुटुंबीयांतील चार जणांचा बळी घेतला होता.  याच घटनांवर आधारित ‘खैरलांजीच्या माथ्यावर’ हा चित्रपट निर्मित करण्यात आला होता. ‘खैरलांजीच्या माथ्यावर’ या चित्रपटात वास्तव घटनांचे चित्रीकरण करण्यात आले असल्याचे निर्मात्यांचे म्हणणे होते. मात्र चित्रपटात असे कोणतेही चित्रण केले नसल्याचे दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाआधी भय्यालाल भोतमांगे यांची परवानगी घेण्यात आलेली नाही, असे याचिकेत नमूद केलेले आहे. तसेच मृत प्रियंका भोतमांगे हिच्या पात्राबाबतही आक्षेपार्ह वर्णन केले आहे असे या याचिकेत स्पष्ट करण्यात आले आहे. याचिकाकर्त्याचे वकील जयदेव श्‍यामकुवर, अ‍ॅड. भूपेश चव्हाण, अ‍ॅड. मिलिंद खोब्रागडे यांनी बाजू मांडली.

February 07, 2014 in रोजगार

आप’च्या नेत्यांना न्यायालयाची नोटिस

नवी दिल्ली- अब्रू नुकसानीच्या दाव्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह मनीष सिसोदिया, प्रशांत भूषण, शझिया इलमी यांना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नोटिस बजावली. केंद्रीय मंत्री कपिल सिबल यांचे पुत्र अमित यांनी ‘आप’च्या नेत्यांविरोधात याचिका दाखल केली.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एच. एल. दत्तू यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले. १६ जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीत अब्रू नुकसानीच्या दाव्याची याचिका रद्द करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला. मात्र, ही याचिका रद्दबातल करण्याचा निर्णय महानगरदंडाधिका-यांनी घ्यावा असे उच्च न्यायालयाने सूचवले.दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालाला अमित सिबल यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. खासगी तक्रारीवरून महानगरदंडाधिका-यांना हा खटला रद्दबातल करण्याचे अधिकार नसल्याचा दावा सिबल यांनी केला. वडिलांच्या मंत्रिपदाचा फायदा अमित सिबल यांनी घेतल्याचा दावा केजरीवाल व ‘आप’च्या नेत्यांनी केला होता. त्या विरोधात अमित सिबल यांनी याचिका दाखल केली आहे.

February 07, 2014 in रोजगार