
यवतमाळ – आपल्या कर्तव्यातून प्रत्येकाच्या मनात वेगळा ठसा निर्माण करणारे फार थोडे अधिकारी पोलीस दलात आढळून येतात. केलेला निर्धार न बदलता त्यानुसार काम करणे पोलीस दलात मोठे जिकरीचे काम, पण हे अवघड काम वडगाव रोडचे ठाणेदार विपीन हसबनिस यांनी पार पाडले. त्यामुळे आश या कर्तव्यदक्ष, निर्भीड पोलीस अधिकार्याला निरोप देतांना अधिकारी व कर्मचाºयांनी मने हेलावली होती. यावेळी अधिकारी व कर्मचाºयांनी रथात बसवून वाहन दोरखंडाने ओढून परिसरातून मिरवणूक काढून निरोप दिला.येथील वडगाव रोडचे ठाणेदार विपीन हसबनिस यांची सोलापूर ग्रामीण येथे बदली झाली. त्यानिमित्य अधिकारी व कर्मचाºयांच्या वतीने सत्कार व निरोप समारंभाचे आयोजन आज सायंकाळी केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधीकारी राहुल मदणे तर प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार पठाण, नगरसेवक दत्ता कुळकर्णी, सहा. पोलीस निरीक्षक विजय राठोड, संजय शिरभाते उपस्थित होते. यावेळी ठाणेदार विपीन हसबनीस यांचे जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचाचे अध्यक्ष तथा दै. पुण्य नगरीचे संपादकीय विभाग प्रमुख नितीन पखाले यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी स्वागत गेले. हसबनीस यांनी १७ फेबु्रवारी २०१३ रोजी वडगाव रोड ठाण्याचा पदभार घेतला असून एक वर्ष पूर्ण झाले. हसबनीस यांच्यासारखे अधिकारी अजून काळ राहाला पाहिजे होते. त्याच्यासोबत काम करण्याची स्फुर्ती मिळते. भाऊ – बहिण समजून त्यांनी प्रत्येकाची अडचण समजून घेत, सोडविली. शहरातील सर्वात जास्त गुन्हेगारी टोळ््या असून क्राईमरेटही मोठ्या प्रमाणात आहे. तरीही त्यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू न देता कम्युनिटी पोलिसींगचे कार्य करून जनसामान्यात वेगळी छाप निर्माण केल्याचे मनोगत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. यावेळी फुलांनी सजविलेल्या पोलीस वाहनामधून हसबनीस यांची परिसरातून मिरवणूक काढून दोरखंडाने वाहन ओढून नेत निरोप दिला. या कार्यक्रमाचे संचालन पोलीस उपनिरीक्षक नरेश पिंपळकर यांनी केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक नरेश रणधिर, पोलीस उपनिरीक्षक मंगला वाकोडे, पोलीस उपनिरीक्षक भारती गुरनुले यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Archive for February 16th, 2014
कर्तव्यदक्ष ठाणेदार हसबनीस यांना निरोप
चिमुकलीवर अत्याचार, दोघींचा विनयभंग
यवतमाळ – जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली असून पाच वर्षीय चिमुकलीवर अतीप्रसंग केल्याची घटना खापरी येथे घडली. तर अन्य दोन ठिकाणी विनयभंगाच्या घटना घडल्या. खापरी येथील १४ वर्षीय मुलाने गावातील एका पाच वर्षीय मुलीला घरी नेऊन तीच्यावर जबरीने अतिप्रसंग केला. हा प्रकाराने भयभित झालेली चिमुकलीने आरडाओरड केल्याने हा प्रकार निदर्शनास आला. याप्रकरणी घाटंजी पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरूद्घ गुन्हा दाखल केला. तर लाखडी येथील गजानन चिंदुजी मांडवकर (३५) याने गावातीलच एका महिलेचा विनयभंग केला. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी वडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच जोडमोहा येथेही शंकर केशव राठोड याने एका युवतीच्या घरात घूसून विनयभंग केला. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
२५ पोलीस अधिकाºयांच्या बदल्या
यवतमाळ – जिल्हा पोलीस दलातील १४ पोलीस निरीक्षक,११ पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्याची यादी आज गृहविभागाने जाहिर केली. यामध्ये १८ ठाणेदारांचा समावेश असून कमाईचे ठाणे मिळविण्यासाठी पोलिस अधिकाºयाने धडपड सुरु केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकीची आचार सहिता जाहिर होण्यापूर्वी १५ फेबु्रवारी पर्यंत पोलीस अधिकाºयांच्या बदल्या करण्याचे आदेश दिल्याने ह्या बदल्या करण्यात आल्या.
जिल्हयात २९ पोलीस ठाणे असून १४ पोलिस निरीक्षक व ११ पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्याची यादी आज जाहिर झाली. त्यामध्ये १८ ठाणेदारांचा समोवश असून कंसात बदलीचे ठिकाण नमुद केले आहे. राळेगावचे ठाणेदार पोलीस निरीक्षक मलिकार्जुन इंगळे (चंद्रपूर), कळंबचे बाळु गायगोले (नागपूर ग्रामीण), वडगाव रोडचे बिपीन हसबनीस (सोलापूर ग्रामीण), नेरचे ज्ञानेश्वर कडू (अमरावती शहर), बाभुळगावचे प्रमोद डोंगरे (नागपूर शहर), घाटंजीचे ओमप्रकाश अंबाडकर (बुलढाणा), पुसद ग्रामीणचे वैजनाथ लटपटे (अमरावती शहर), पुसद शहरचे सुरेंद्र गंदम (बिड), मारेगावचे दत्तात्रय नाळे (सातारा), मुकुटबनचे अनिल किनगे (अमरावती शहर), यवतमाळ ग्रामीणचे दिनकर ठोसरे (एसीबी), पांढरकवड्याचे अनिरुद्घ अढाव (अकोला), डिएसबीचे सुधाकर अंभोरे (चंद्रपुर), दिग्रसचे वाघु खिल्लारे (अकोला), वडगाव जंगलचे दिनेशचंद्र शुक्ला, लाडखेडचे ज्ञानेश्वर घुगे, बिटरगावचे सारंग नवलकर, पारवाचे पंजाब वंजारी (अमरावती परिक्षेत्रांतर्गत) यांचा बदलीमध्ये समावेश आहे. तसेच एटीएस पथकाचे प्रमुख दिलीप वडगाव यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक सतीश उपाध्याय, प्रकाश लवंगे, प्रेमप्रकाश माकोडे, सुनील वानखडे, शैलेश शेळके, प्रकाश डांबरे यांच्याही अमरावती परिक्षेत्रांतर्गत बदली झाली. राज्य निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकीची आचार सहिता जाहिर होण्यापूर्वी १५ फेबु्रवारी पर्यंत पोलीस अधिकाºयांच्या बदल्या करण्याचे आदेश दिल्याने गृह विभागाने जिल्ह्यात एकाच ठिकाणी तीन वर्ष कार्यकाळ पूर्ण झालेल्या पोलिस अधिकाºयांच्या बदल्या केल्या. जिल्हयातील बहुतांश पोलीस ठाण्यातील ठाणेदारांच्या बदल्या झाल्या असून ठाणेदार म्हणून नवीन चेहºयांना संधी मिळण्याची संधी आहे. तर दुसरीकडे काही पोलीस अधिकारी कमाईचे पोलीस ठाणे मिळविण्यासाठी राजकीय पक्षाच्या पुढाºयांच्या माध्यमातून प्रयत्न करीत असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरु आहे.
९६ टक्के यवतमाळकरांनी दिला वेगळ्या विदर्भालाच कौल
यवतमाळ – ‘वेगळा विदर्भ असावा की नसावा’ यासाठी यवतमाळमध्ये घेण्यात आलेल्या जनमत चाचणीत ९६ टक्के यवतमाळकरांनी वेगळ्या विदर्भालाच कौल दिला. केवळ दोन टक्के मतदारांनी ‘वेगळे राज्य नको’ असे मत नोंदविले. या निकालाने विदर्भवाद्यांचा उत्साह दुणावला असून अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि आता यवतमाळकरांनीही आपला कौल विदर्भाच्या बाजूने दिला आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी प्राचार्य रमाकांत कोलते यांच्या नेतृत्वात मत मोजणी प्रक्रिया पार पडली. या मत मोजणी प्रक्रियेत दोन टक्के मते अवैध ठरली. अवैध मतदानामध्ये अनेकांनी दोन्हीवर आपले मत नोंदवून तटस्थ राहण्याचा प्रयत्न केला.
रविवारी सकाळी ९ वाजेपासून येथील टिम्बर भवच्या परिसरात मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीची यंत्रणा समाज कल्याण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सांभाळली होती. जनमताचा कौल ऐकण्यासाठी शेकडो नागरिकांनी यावेळी गर्दी केली होती. वेगळ्या विदर्भाच्या बाजूने ९६ टक्के मतदारांनी कौल दिल्याचे जाहीर होताचा विदर्भ समर्थकांनी एकच जल्लोष केला.
विदर्भाच्या बाजूने मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल जांबुवंतराव धोटे यांनी आनंद व्यक्त केला. आता तरी शासनाने जनतेच्या मागणीचा विचार केला पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले. विदर्भवादी जनतेचा अंत पाहू नये. तेलंगणा राज्याच्या आधिपासून स्वतंत्र विदर्भाची मागणी आहे. आज तेलंगणा स्वतंत्र होत आहे तर दुसरीकडे विदर्भबाबत विचार करण्यास ही राज्यकर्ते तयार नाहीत हे चुकीचे असल्याची खंत धोटे यांनी व्यक्त केली. यावेळी विदर्भ जॉइन्ट अॅक्शन कमिटीचे अध्यक्ष दीपक निलावार म्हणाले की, यवतमाळकरांनी विदर्भाच्याच बाजूने आपले मत नोंदवलेले आहे. यावरून जनतेमध्ये असणारा असंतोष दिसून येत आहे. विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यात ही जनमत चाचणी होणार असून आतापर्यंत नागपूर, अमरावती, चंद्रपूर व आज यवतमाळ या ठिकाणी जनमत चाचणी झाली. या जनमत चाचणीला विदर्भातील सर्वच जिल्ह्यातून प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. या जनमत चाचणीच्या यशस्वितेसाठी राजू पड्गीलवार, विजय निवल, क्रांती धोटे, अॅड. अजय चमेडी व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्न केले.
विमान अपघातात १८
काठमांडू – नेपाळमध्ये एका प्रसिद्ध पर्यटन स्थळावरून पर्यटकांना घेऊन येणारे छोटे विमान जंगलात कोसळल्याने विमानातील सर्वजण मरण पावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यात १५ प्रवासी आणि ३ क्रू मेंबर्सचा समावेश होता. नेपाळी एअरलाइन्सच्या मालकीचे १९ आसनी ट्विन ओट्टर या विमानाने आज दुपारी १२.४० वाजता पोखरा येथील विमानतळाहून उड्डाण केले होते. परंतु उड्डाणानंतर केवळ १५ मिनिटात हे विमान रडारवरून अदृष्य झाले. अर्घाखांची जिल्ह्यातील खिदीमच्या जंगलात हे विमान कोसळल्याचे सांगण्यात येते. या अपघातात विमानातील सर्व प्रवासी मरण पावले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. विमानत १४ नेपाळी नागरिक व एक डॅनिश नागरिकाचा समावेश होता.जंगलातील अपघात स्थळाचा शोध लागला असून बचावकार्य सुरु करण्यात आल्याचे सांगण्यात येते. ढिसाळ सुरक्षा व्यवस्थेच्या कारणावरून गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात युरोपियन युनियनने नेपाळमधील सर्व विमान कंपन्यांना काळ्या यादीत टाकले होते.
लोकसभेसाठी आपचे २० उमेदवार जाहीर
नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने रविवारी देशातील २० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना उमेदवारी दिली आहे. मेधा पाटकर या ईशान्य मुंबईतून खासदार संजय पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचे पक्षातर्फे जाहीर करण्यात आले आहे.तसेच वायव्य मुंबईत गुरुदास कामत यांच्या विरोधात मयंक गांधी आणि दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा यांच्या विरोधात मीरा सन्याल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
नागपूरमधून नितीन गडकरी यांच्या विरोधात अंजली दमानिया, नाशिकमध्ये समीर भुजबळ यांच्या विरोधात विजय पांढरे आणि पुण्यात सुभाष वारे निवडणूक लढवणार आहेत. अमेठीत राहुल गांधी यांच्याविरोधात कुमार विश्वास, दिल्लीतील चांदनी चौकात कपिल सिब्बल यांच्या विरोधात आशुतोष, गुडगावमधून योगेंद्र यादव, पश्चिम दिल्लीमधून महाबल मिश्रा च्याविरोधात जरनेलसिंग, मैनपुरी येथून मुलायमसिंह यांच्या विरोधात बाबा हरदेव, मुरादाबाद येथून अजहरुद्दीन विरोधात खालिद परवेज, अजित सिंह यांच्या विरोधात सोमेंद्र ढाका, लालगंज येथून जिया लाल, सहारनपुर येथून योगेश दहिया, खंडवा येथे आलोक अग्रवाल, फरुखाबाद येथून पत्रकार मुकुल त्रिपाठी आणि मनीष तिवारी यांच्या विरोधात लुधियाना येथून एच. एस. फुल्का यांना पक्षाने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे
लष्कराच्या कारवाईत हिजबुलचा दहशतवादी ठार
सोपोर – जम्मू-काश्मीरमधील सोपोरमध्ये रविवारी सकाळी सुरक्षापथके आणि दहशतवाद्यामध्ये चकमक झाली. सुरक्षापथकांनी या दहशतवाद्याला कंठस्नान घातले.
हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेचा हा दहशतवादी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शफी शेख असे या दहशतवाद्याचे नाव असून, तो या भागातील एका घरात लपून बसला होता. ठार झालेला दहशतवादी हिजबुलच्या प्रमुख दहशतवाद्यांपैकी एक होता असे पोलिसांनी सांगितले.पोलिस आणि लष्कराच्या जवानांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. सोपोरमधल्या एका गावात हा दहशतवादी आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. या गावात अजूनही एक दहशतवादी असावा असा सुरक्षापथकांचा कयास आहे. या दहशतवाद्याला शोधण्यासाठी शोधमोहिम सुरु आहे.
प्लॅस्टिक पिशव्यांपासून मिळणार डिझेल
दिल्ली – प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा कचरा आणि त्यामुळे होणारी पर्यावरणाची हानी ही एक गंभीर समस्या आहे. प्लॅस्टिकच्या पिशव्यांचे केवळ कच-यामध्येच ढिगारे तयार होत नाहीत तर समुद्रातही प्लॅस्टिकचा कचरा तरंगत असतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होत असते. तरंगणा-या प्लॅस्टिकचे तुकडे खाल्ल्यामुळे अनेक जलचर मृत्युमुखी पडत असतात. मात्र, भारतीय वंशाच्या एका शास्त्रज्ञाने केलेल्या संशोधनामुळे प्लॅस्टिकचा हा घातक कचरा उपयुक्त होणार आहे. या टाकाऊ प्लॅस्टिकपासून डिझेल, नैसर्गिक वायू आणि इतर उपयुक्त पेट्रोलियम उत्पादने तयार करण्याचे तंत्रज्ञान एका भारतीय वंशाच्या संशोधकाने अमेरिकेत विकसित केले आहे.
या पिशव्यांपासून नैसर्गिक वायू, नॅप्था, पेट्रोल, मेण, वंगणे व हायड्रोलिक तेल मिळू शकते. पायरोलिसिस म्हणून ओळखल्या जाणा-या प्रक्रियेअंतर्गत या प्लॅस्टिकच्या पिशव्यांना ऑक्सिजनविरहित चेंबरमध्ये तापवल्यास यातून अनेक फायदेशीर घटक मिळू शकतात, असे इलिनॉइस सस्टेनेबल टेक्नॉलॉजी सेंटरमधील वरिष्ठ शास्त्रज्ञ ब्रजेंद्र कुमार शर्मा यांनी सांगितले.
कच्च्या तेलाचे शुद्धीकरण केल्यास त्यापासून ५० ते ५५ टक्के इंधन मिळते. मात्र, हे प्लॅस्टिक पेट्रोलियमपासून तयार केलेले असल्यामुळे या प्लॅस्टिकपासून ८० टक्के इंधन मिळते, असे त्यांनी स्पष्ट केले. जगात प्लॅस्टिकने थैमान घातले असून त्यातून वन्यजीव आणि सागरी जीवांना धोका निर्माण झाला आहे. उत्तर व दक्षिण ध्रुवावरही प्लॅस्टिकच्या पिशव्या आढळल्या आहेत. मासे, पक्ष्यांच्या पोटात प्लॅस्टिकचे तुकडे आढळले, असे संशोधकांनी सांगितले. शर्मा यांच्या पथकाने कच्च्या खनिज तेलाचे रूपांतर विविध पेट्रोलियम पदार्थामध्ये करण्याचा प्रयोग केला. यातून निर्माण झालेले डिझेल हे अमेरिकेतील इंधन निकषावर उतरणारे आहे. तसेच प्लॅस्टिकपासून निर्माण झालेले ३० टक्के डिझेल हे नैसर्गिक डिझेलमध्ये मिसळले जाऊ शकते. या इंधनामुळे कोणतेही अन्य दुष्परिणाम जाणवत नाहीत. हे संशोधन ‘फ्यूएल प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी’ जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे.
राज्यातील ८६ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या , राकेश मारिया मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी
मुंबई: राज्य पोलिस दलातील अपर पोलिस महासंचालक, विशेष पोलिस महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक, पोलिस अधीक्षक-उपायुक्त दर्जाच्या ८६ वरिष्ठ अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या. दहशतवादविरोधी पथकाचे अपर पोलिस महासंचालक राकेश मारिया यांची मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर ठाण्याच्या पोलिस आयुक्तपदी अपर पोलिस महासंचालक (वाहतूक) विजय कांबळे यांची तर नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी के. एल. प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली. मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंजुरीनंतर या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले.
दरम्यान ,अहमद जावेद यांची पदोन्नतीने महासंचालक गृहरक्षक दल आणि संचालक नागरी संरक्षण या पदावर नियुक्तके.पी. रघुवंशी यांची पदोन्नतीने महासंचालक आणि व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई या रिक्त पदावर नियुक्ती करण्यात आली.
ज्या वरिष्ठ पोलिस अधिका-यांच्या बदल्या झाल्या आहेत त्यामध्ये
अपर पोलिस महासंचालक
विजय कांबळे- पोलिस आयुक्त, ठाणे
राकेश मारिया- पोलिस आयुक्त, मुंबई,
के.एल.प्रसाद-पोलिस आयुक्त, नवी मुंबई,
ए.के.शर्मा- नियुक्तीच्या प्रतीक्षेत
के. एल. बिष्णोई- अपर पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था),
संजय बर्वे- अपर पोलिस महासंचालक (प्रशासन) (पदोन्नतीने),
एस.एन.पांडे-अपर पोलिस महासंचालक (वाहतूक) (पदोन्नतीने)
डी.कनकरत्नम- अपर पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी,मुंबई (पद श्रेणी वाढ करुन)
हेमंत नगराळे- अपर पोलिस महासंचालक (नियोजन व समन्वय) (पदोन्नतीने)
टी.ए.चव्हाण- अपर पोलिस महासंचालक,महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित, (पदोन्नतीने)
हिमांशू रॉय- विशेष पोलिस महानिरीक्षक दहशतवाद विरोधी पथक, मुंबई
परमबीरसिंग- विशेष पोलिस महानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल,
श्रीमती रश्मी शुक्ला- आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग (अतिरिक्त कारभार),
विशेष पोलिस महानिरीक्षक
संदीप बिश्नोई- विशेष पोलिस महानिरीक्षक व मुख्य दक्षता अधिकारी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई,
जगन नाथ- विशेष पोलिस महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र,
राजेंद्रसिंग- पोलिस आयुक्त, औरंगाबाद,
संजयकुमार- सह पोलिस आयुक्त, पुणे,
आर.जी.कदम- विशेष पोलिस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र (पदोन्नतीने),
डॉ. के. व्यंकटेशम- विशेष पोलिस महानिरीक्षक (विशेष सुरक्षा व सागरी सुरक्षा),
सदानंद दाते- सह पोलिस आयुक्त (गुन्हे), मुंबई शहर,
ए.एम.कुलकर्णी- विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना),
श्री. विवेक फणसाळकर- सह पोलिस आयुक्त (प्रशासन) मुंबई,
डॉ. बी.के. उपाध्याय- सह पोलिस आयुक्त (वाहतूक) मुंबई,
जयजितसिंग- विशेष पोलिस महानिरीक्षक व्ही.आय.पी.सुरक्षा,
बी.के.सिंग- विशेष पोलिस महानिरीक्षक, कारागृह ,
व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण- सह पोलिस आयुक्त ठाणे शहर,
धनंजय कमलाकर- सह पोलिस आयुक्त (कायदा-सुव्यवस्था) मुंबई
रितेशकुमार- विशेष पोलिस महानिरीक्षक,कोल्हापूर परिक्षेत्र,
संजीवकुमार सिंघल- संचालक, महाराष्ट्र गुप्तवार्ता अकादमी पुणे,
नवल बजाज- संचालक, महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक (पदोन्नतीने),
प्रवीण साळुंखे- विशेष पोलिस महानिरीक्षक,नाशिक परिक्षेत्र
संजय पांडे- विशेष पोलिस महानिरीक्षक राज्य मानवी हक्क आयोग (पदोन्नतीने),
ए.डी.शिंदे- विशेष पोलिस महानिरीक्षक, सीआयडी पुणे (पदोन्नतीने),
बी.एस.शिंदे- नियंत्रक, वैधमापन शास्त्र महाराष्ट्र राज्य मुंबई,
निकेत कौशिक- नियुक्तीच्या प्रतीक्षेत
अमितेश कुमार- विशेष पोलिस महानिरीक्षक औरंगाबाद परिक्षेत्र (पदोन्नतीने),
पोलिस उपमहानिरीक्षक
डॉ. सुरेश मेकला- पोलिस आयुक्त, अमरावती शहर,
अजित पाटील- पोलिस उपमहानिरीक्षक,-सीआयडी पुणे,
प्रकाश मुत्याळ- अपर पोलिस आयुक्त,पुणे शहर,
दीपक पांडे- अपर पोलिस आयुक्त नागपूर शहर (पदोन्नतीने),
व्ही.एन.जाधव- संचालक प्रशासन/पोलीस उपमहानिरीक्षक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, (पदोन्नतीने)
रवींद्र सिंघल- अपर पोलिस आयुक्त(गुन्हे) ठाणे शहर,
एस.आर.शेलार- अपर पोलिस आयुक्त, ठाणे शहर (पदोन्नतीने),
के.आर.शेलार- अपर पोलिस आयुक्त संरक्षण व सुरक्षा,मुंबई (पदोन्नतीने),
मधुकर पांडे- अपर पोलिस आयुक्त मध्य प्रादेशिक विभाग,मुंबई
कैसर खालिद- अपर पोलिस आयुक्त (वाहतूक) मुंबई,
सी.एच.वाकडे- अपर पोलिस आयुक्त (विशेष शाखा)मुंबई,
व्ही.एम.जाधव- पोलिस उपमहानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल (पदोन्नतीने),
विश्वास नांगरे पाटील- पोलिस उपमहानिरीक्षक, एसीबी मुंबई,
मिलिंद भारंबे- अपर पोलिस आयुक्त, पश्चिम विभाग मुंबई,
पी.एस.पाटणकर- अपर पोलिस आयुक्त ठाणे शहर (पदोन्नतीने),
एस.आर.पारसकर- पोलिस उपमहानिरीक्षक नागरी हक्क संरक्षण, मुंबई,
ब्रिजेश सिंग- अपर पोलिस आयुक्त उत्तर प्रादेशिक विभाग, मुंबई,
निरंजन वायंगणकर- उपसंचालक महाराष्ट्र पोलिस अकादमी नाशिक (पदोन्नतीने).
पोलीस अधीक्षक, पोलिस उपायुक्त/अपर पोलिस अधीक्षक
एम.एम.रानडे- पोलिस अधीक्षक सोलापूर ग्रामीण,
राजेश प्रधान-पोलिस अधीक्षक, ठाणे ग्रामीण,
पी.व्ही. देशपांडे-पोलिस उपायुक्त, पुणे,
मनोजकुमार शर्मा- पोलिस अधीक्षक, कोल्हापूर,
अभिनाशकुमार- पोलिस उपायुक्त, नागपूर शहर,
एस.व्ही.मोहिते- पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण,
आर.एल.पोकळे- पोलिस उपायुक्त, नागपूर शहर,
कैलास कणसे- पोलिस अधीक्षक, भंडारा,
श्रीमती आरती सिंग- पोलिस अधीक्षक, नागपूर ग्रामीण,
व्ही.पी.पानसरे-पोलिस अधीक्षक, रेल्वे पुणे,
के.एम.एम.प्रसन्ना- पोलिस उपायुक्त, मुंबई शहर,
पी.पी.शेवाळे- पीसीआर,ठाणे
परमजितसिंग दहिया-पोलिस अधीक्षक, नांदेड,
अखिलेश कुमार सिंग- पोलिस अधीक्षक, धुळे,
श्रीमती ज्योतीप्रिया सिंग- पोलिस अधीक्षक, जालना,
एस.बी.पाठारे-समादेशक, राज्य राखीव पोलिस बल गट क्र. ११ नवी मुंबई,
सुधीर हिरेमठ- समादेशक, राज्य राखीव पोलिस बल गट क्र. १ पुणे,
श्री. एम. के. भोसले- समादेशक, राज्य राखीव पोलिस बल गट क्र. ८,
एस.एच.पाटील- उपायुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई,
अभिनव देशमुख- पोलिस अधीक्षक, सातारा,
ए.एस.पारसकर- पोलिस अधीक्षक, वर्धा,
श्रीमती निर्मलादेवी- पोलिस अधीक्षक, वाशिम,
डॉ. संजय शिंदे- पोलिस अधीक्षक, रत्नागिरी,
पी.व्ही.होळकर- पोलिस उपायुक्त, मुंबई शहर,
श्री. एम. रामकुमार- पोलिस अधीक्षक, नंदूरबार,
श्री. संजय अपरांती- नियुक्तीच्या प्रतीक्षेत
प्रवीण पडवळ- पोलिस उपायुक्त, ठाणे शहर,
एन.डी. रेड्डी- पोलिस अधीक्षक, बीड,
डी.वाय. मंडलिक- पोलिस उपायुक्त मुंबई शहर,
श्रीमती मोक्षदा पाटील- सहायक पोलिस अधीक्षक









