पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for February 1st, 2014

wanted

wanted

wanted

February 01, 2014 in रोजगार

शिक्षकानेच केला पत्नीचा खून

शिक्षकानेच केला पत्नीचा खून
यवतमाळ – पाटणबोरी येथील शर्मा नगरातील महिलेचा रक्ताच्या थारोळ््यात मृतदेह काल आढळला होता. आज पांढरकवडा पोलिसांनी संशयीत म्हणून शिक्षक असलेल्या पतीस चौकशीसाठी ताब्यात घेतले असता खूनाची कबुली दिली.
सुभाष खुशाल गांगुलवार (३५) रा. शर्मा नगर पाटणबोरी असे आरोपीचे नाव असून तो राजीव विद्यालय कारेगाव पारंबा येथे शिक्षक आहे. ११ वर्षापूर्वी आतेबहिण वाणी हीच्यासोबत विवाह झाला होता. शुक्रवारी ३१ जानेवारी रोजी सकाळी वाणी गांजुलवार (३०) रा. शर्मा नगर हीचा रक्ताच्या थारोळ््यात मृतदेह आढळल्याने गावात खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पांढरकवडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. डोक्यावर जबर मार लागल्याने तीचा मृत्यू झाल्याचे दिसून येत असल्याने पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्घ खुनाचा गुन्हा दाखल केला. रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात सदर महिलेवर अत्यसंस्कार करण्यात आले. पांढरकवडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार अनिरुद्घ अढाव , बलराम शुक्ला यांनी तपासाची चक्रे फिरवून चौकशी सुरु केली. यामध्ये पती सुभाषवर पोलिसांचा संशय बळावल्याने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. अगोदर त्याने उडवाउडविचे उत्तरे दिली, त्यानंतर पोलिसी खाक्या दाखविताच आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पत्नीने आपल्या गालावर थापड मारल्याने संतातून तीच्या डोक्यावर हातोडा मारल्याने तीचा मृत्यू झाल्याची कबुली दिली.

February 01, 2014 in रोजगार

‘मार्शल’चा संघर्षमय ‘विजय’पथ

vijay

‘मार्शल’चा संघर्षमय ‘विजय’पथ
कहाणी एका युवा उद्योजकाची
यवतमाळ – ‘अशक्य’ हा शब्द ज्यांच्याजवळ नसतो तेच विजेते होतात…उराशी बाळगलेले मोठे स्वप्न साकार करण्यासाठी जिद्द आणि चिकाटीने ते धावत असतात… अडचणी…संकट त्यांना रोखत नाही. ते धावतात एका ध्यासाने ध्येयाकडे..आणि एक दिवस तो विजयाचा आनंद त्यांच्या कवेत येतो. अशाच एका मार्शल तरुणाची ही कहाणी…यवतमाळ येथील विजय तुळशिराम वासनिक या तरुणाने बारावीत असताना आपण दुसºयाची गुलामी करण्यापेक्षा एखादा उद्योग सुरू करण्याचे स्वप्न पाहिले. जिद्द, चिकाटी कष्ट करण्याची तयारी, योग्य नियोजन केले. त्याने यवतमाळात सन २००३ मध्ये आपल्या उद्योगाची सुरूवात केली. आज तो ‘टोडल डिवाईन पॉवर प्रोडक्ट’ या मॅनुफॅक्टरींग कंपनीचा मालक असून प्रॉडक्टला विदर्भ व मराठवाड्यात मागणी आहे. उद्योग सुरू होवून दहा वर्षाचा कालावधी लोटत आहे. अनेक संकट आली, मंदीचा फटका सहन करावा लागला. मात्र प्रॉडक्टला दिलेल्या ‘टोडल’ नावाप्रमाणे हळूवार पण मजबूत दिशेने प्रवास सुरू आहे.
उद्योजक होण्याचे स्वप्न पाहत असताना त्याने आपल्या आर्थिक परिस्थितीचा विचार केला नाही. वडील सरकारी नोकरीत, आई गृहीणी, उद्योगक्षेत्रात कुणीही नाही. मार्गदर्शन कुणाचे घ्यावे, या बाबत माहिती नाही, तरीही विजय उद्योजक होण्याचे स्वप्न पाहत होता. सुरूवातीपासूनच अभ्यासात अतिशय हुशार असल्यामुळे आपल्या मुलाने उच्च शिक्षण डॉक्टर, इंजिनिअर बनावे, अशी आई, वडीलांची इच्छा होती. दहावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर सायंन्सला अ‍ॅडमिशन घेतली. मात्र त्याचे मन अभ्यासऐवजी वेगळयाच विश्वास रमत होते. शेवटी व्हायचे तेच झाले…बारावी नापासचा शिक्का बसल्यावर त्याने पुन्हा आय.टी.आय ला प्रवेश घेतला. कसाबसा आयटीआयचा ट्रेड पूर्ण केला. पोरगं वाया गेलं म्हणून नातेवाईक, शेजारी, आईवडील सर्वांची त्याच्याकडे बघण्याची नजर बदलून गेली. काही तरी व्यवसाय केला पाहिजे म्हणून सुरूवातीला सागवान कटाईचा व्यवसाय सुरू केला. अनुभव कमी पडला आणि धंद्यात घाटा करून घेतला. दुसºया वर्षी कापूस खरेदीचा व्यवसाय सुरू केला. येथेही पहिल्याच वर्षी घाटा आला. तिथेही जम बसला नाही. वडीलांचे पैसे असेच खर्च झाले. त्यामुळे आईवडीलांचा विजयवरील विश्वास डळमळीत होणे सहाजिकच होते. आता घरून पैसे मिळणार नाही याची जाणिव व्हायला वेळ लागला नाही. आपला उद्योग असावा असे वाटत होते. पण त्यासाठी मशिनरी, भांडवल लागते आणि त्यासाठी आपल्याजवळ पैसा नाही. याची जाणीवही त्याला होत होती. तरी देखील उद्योजक होण्याची स्वप्न पाहत होता. ती साकार करण्यासाठी तो नियोजनही करीत होता पण पैश्याचे सोंग घेता येत नाही, हे विसरत नव्हता. एक दिवस घरची पंक्चर सायकल उचलली, खिशात दोन-चारशे रुपये जमा करून ठेवले होते. सरळ अगरबत्तीच्या दुकानात गेला. ठोक भावात माल खरेदी केला. सायकलवर टांगून दुकानात जावून माल विक्री सुरू केली. व्यवसायातून काही पैसे आल्यावर अगरबत्ती सोबत परफ्युम, मोमबत्ती व इतर सामान विक्री करीत होता. पंक्चर सायकलवर माल ठेवून शहरात झपाटल्यासारखा फिरत होता. प्रत्येक दुकानात जावून माल विक्री करीत होता. जेंव्हा-केंव्हा वेळ मिळेल तेंव्हा जिल्हा उद्योग केंद्रातील अधिकाºयांशी संपर्क साधून उद्योगाबाबत माहिती जाणून घेत होता. सुरूवातीला एकाही अधिकाºयाने त्याला प्रतिसाद दिला नाही. यामुळे कधी-कधी तो निराश व्हायचा पण लगेच आपल्याला कुणाची गुलामगिरी करायची नाही. उद्योजक व्हायचे आहे, अशी स्वत:ला आठवण करून द्यायचा. त्याची व्यवसायात काही करण्याची जिद्द बघून अनेकांनी मदत केली. काहींनी खिल्ली उडवून कार्यालयाबाहेर हाकलून दिले. तरी त्याने हार मानली नाही. कसेबसे भांडवल उभे करून सरळ मुंबई गाठली. कुणीही ओळखीचे नसताना आठवडाभर सतत पायदळ भटकंती केली. अखेर ‘गोदरेज केमिकल’ कंपनीचा पत्ता मिळाला. या कंपनीतील अधिकारी आपल्याला प्रतिसाद देतील की नाही, या प्रश्नाने भांडावून सोडले होते. कशीबशी व्यवस्थापकांच्या कॅबीनमध्ये ‘एंन्ट्री’ मिळाली. आपला परिचय देवून उत्पादन सुरू करण्याबाबत माहिती विचारून रॉ मटेरीयलची मागणी नोंदविली. सुरूवातीला थोडा अनुत्साह दाखविणाºया अधिकाºयांनी व्यवसाय करण्याची जिद्द पाहून यथायोग्य मार्गदर्शन केले. हा प्रसंग विजयसाठी एखाद्या विजयापेक्षा कमी नव्हता. आपणच एखाद्याला माहिती व मार्गदर्शन करण्याबाबत का-कू करतो. मात्र मोठी माणस मदतीसाठी नेहमी तत्पर असतात. नवीन व्यवसाय करणाºया व्यक्तीला प्रोत्साहीत करण्याचे काम करीत असल्याचा अनुभव सांगितला. सन २००३ मध्ये ‘टोडल डिवाईन पॉवर प्रॉडक्ट’ या नावाने मॅन्यूफॅक्चरींग सुरू केले आणि ग्लिसरीन, गुलाबजल, मुलतानी मिट्टी, फरर्निचर पॉलीश या उत्पादनाला विदर्भ- मराठवाड्यात चांगली बाजारपेठ मिळाली आहे. उद्योगात भरभराटी होत असताना मंदीमुळे त्याला निळ, व्हॅसलीन, परफ्यूम या प्रॉडक्टचे उत्पादन बंद करावे लागले. यामुळे मधल्या काळात व्यवसायाला उतळती कळा लागली होती. मात्र पुन्हा ‘फिनिक्स’प्रमाणे ‘मार्शल’ भरारी घेत नव्या उमेदीने उद्योग सुरू केला. आज टोडलचा हळूवार पण मजबूत प्रवास सुरू झाला आहे. विजय वासनिक या युवा उद्योजकाला व्यवसाय उभारणीसाठी प्रचंड संघर्ष करावा लागला, याची जाणिव आहे, म्हणूनच आपला व्यवसाय सांभाळून नवीन व्यवसाय करणाºया युवकांना मार्गदर्शन करण्याचे कामही करतो आहे. त्याच्या मदतीने यवतमाळातीलच नव्हे; तर नागपूरातील काही युवकांनी उद्योग क्षेत्रात पाऊल टाकले असून त्यांचाही प्रवाशी यशस्वीतेच्या दिशेने सुरू आहे. संघर्षातून व्यवसायात जम बसत असल्याचे समाधान आता त्याच्या चेहºयावर आहे.
उद्योजकतेला हवी चिकाटीची जोड
आपण व्यवसायात यशस्वी होऊ की नाही, हा नंतरचा प्रश्न आहे. उंच भरारी घेण्याआधी पहिले पाऊल टाकणे महत्वाचे आहे. व्यवसाय म्हटले की मराठी माणूस नफ्याचा विचार करण्याऐवजी तोटा झाला तर काहीच उरणार नाही, हा विचार करतो. हा विचार सोडून जिद्द आणि चिकाटीने व्यवसायात झोकून दिले तर यशापासून कुणीही रोखू शकणार नाही. मराठी पाऊल व्यवसायाच्या दिशेने पडत आहे, हे आशादायी चित्र असल्याची प्रतिक्रीया विजय वासनिक या युवा उद्योजकाने दिली.
(साभार- दै. पुण्य नगरी )

February 01, 2014 in रोजगार

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे जागा वाटप दोन दिवसांत

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे जागा वाटप दोन दिवसांत
मुंबई – काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे जागा वाटप दोन दिवसांत पूर्ण होईल. त्यासाठी राष्ट्रवादीने सहकार्य करावे. लवकरात लवकर चर्चा पूर्ण करावी, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी चार दिवसांत जागावाटपाच्या निर्णयाची अपेक्षा केली होती. त्यावर बोलताना ठाकरे यांनी दोन दिवसांतच चर्चा पूर्ण करू, असे स्पष्ट केले. टिळक भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक शुक्रवारी ‘रामटेक’वर झाली. आघाडीचे जागा वाटप लवकर व्हावे, अशी अपेक्षा या वेळी सर्वच नेत्यांनी व्यक्त केली. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी जागावाटप पुढील चार दिवसांत झाले पाहिजे, असे सांगितले. मात्र काँग्रेसने दोन दिवसांतच त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले आहे.जागावाटपाबाबत चर्चा करण्याचे अधिकार अँटोनी समितीने दिले असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. आता ही चर्चा कधी संपवायची, हे राष्ट्रवादीने ठरवावे, दोन दिवसांत चर्चा पूर्ण करण्यावर काँग्रेसचा भर असेल, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीने त्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले. आघाडीत प्रकाश आंबेडकर आणि अन्य पक्षांनाही सामावून घेतले जाईल, असेही ते म्हणाले.दरम्यान, जागावाटपाबाबत काँग्रेसला राष्ट्रवादीने कोणताही ‘अल्टीमेटम’ राष्ट्रवादीने दिला नसल्याचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी सांगितले. ते राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.मात्र जागावाटप लवकर व्हावे, अशी अपेक्षा त्यांनीही व्यक्त केली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक तयारीला लागले आहेत. त्यात आघाडीचे अजूनही जागावाटप झाले नाही. तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.लोकसभा निवडणुकीला समोरे जाण्यासाठी काँग्रेस सज्ज असल्याचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले. निवडणुकीसाठी आवश्यक तयारी पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले. जागावाटप झाल्यानंतर पक्षाच्या परंपरेनुसार लवकरच उमेदवारांची यादीही जाहीर केली जाईल, असेही ते म्हणाले.

manikrao_3

February 01, 2014 in रोजगार

दिल्लीत दहा तास भारनियमन

दिल्लीत दहा तास भारनियमन
नवी दिल्ली- वीज खरेदीसाठी पैसे नसल्याने दिल्लीतील वीज कंपन्यांनी शनिवारपासून शहरात १० तास भारनियमन करण्याची घोषणा केली. वीज कंपन्यांनी आगळीक केल्यास त्यांचा परवाना रद्द करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली.
बीएसइएस यमुना पॉवर लिमिटेड कंपनीने मध्य व पूर्व दिल्लीत शनिवारपासून १० तासांचे भारनियमन करण्यात येईल असे दिल्ली सरकारला कळवले आहे. एनटीपीसी आणि एनएचपीसी कंपनीकडून वीज खरेदी करण्यासाठी कंपनीकडे पैसे नाहीत. गेल्या काही वर्षापासून वीज उत्पादनाचा खर्च वाढला असून महसूली उत्पन्न कमी झाले आहे. उत्पन्न व खर्चातील महसूली तूट ६२०० कोटी रुपयांवर गेली आहे. बँकांनी नव्याने निधी देणे थांबवले आहे. त्यामुळे सरकारने कंपनीला तातडीने अर्थसहाय्य करावे, अशी मागणी बीएसइएस यमुना पॉवर लिमिटेडने दिल्लीचे ऊर्जा सचिव पुनीत गोयल यांच्याकडे केली.दिल्लीत टाटा, अंबानी यांच्या कंपन्या वीज वितरण करतात. मात्र देशात केवळ याच कंपन्या नाहीत. सरकार या क्षेत्रात नवीन कंपन्यांना आमंत्रण देऊ शकते, असा इशारा केजरीवाल यांनी दिला.टाटा आणि अंबानी यांच्या कंपन्यांच्या कारभाराविरोधात प्रश्नचिन्ह निर्माण करणारे अनेक पुरावे आहेत. या वीज कंपन्यांनी भारनियमन केल्यास त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली जाईल. आम्ही दिल्लीत वीज वितरणासाठी अन्य कंपन्यांना आमंत्रण देऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.

veej-bharaniyaman1

February 01, 2014 in रोजगार

देवयानी यांना राजनैतिक संरक्षण नव्हते – अमेरिका

देवयानी यांना राजनैतिक संरक्षण नव्हते – अमेरिका
न्यूयॉर्क – भारताच्या राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना अमेरिकेत कायदेशीर कारवाईपासून कोणतेही राजनैतिक संरक्षण मिळणार नाही. त्यांच्या विरोधात व्हिसा फसवणूकी प्रकरणी खटला सुरुच राहिल असे मॅनहॅटनच्या सरकारी वकिलाने न्यायालयात स्पष्ट केले.
अमेरिकेत घरकामासाठी आणलेल्या महिलेला नियमांपेक्षा कमी वेतन आणि व्हिसा फसवणूकी प्रकरणी देवयानी खोब्रागडेना १२ डिसेंबरला अमेरिकेत अटक झाली होती. त्यानंतर तुरुंगात त्यांची अपमानास्पद पध्दतीने अंगझडती घेण्यात आल्याचे समोर आल्यानंतर भारत आणि अमेरिका दोन्ही देशातील संबंध ताणले गेले होते.
खोब्रागडे या अमेरिकेसाठी माजी राजनैतिक अधिकारी असून, त्यांना कायदेशीर कारवाईपासून संरक्षण मिळू शकत नाही असे मॅनहॅटनचे सरकारी वकिल प्रीत भरारा यांनी न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये म्हटले आहे.
राजनैतिक संरक्षण सरकारी अधिकृत कामांमध्ये मिळू शकते असे अमेरिकेचे म्हणणे आहे. देवयानी खोब्रागडे अमेरिकेत राजनैतिक अधिकारी होत्या. त्यांना अमेरिकेकडून पूर्ण राजनैतिक संरक्षण होते त्यामुळे त्यांच्यावरील खटला रद्द करावा अशी मागणी देवयानींच्या वकिलाने न्यायालयाकडे केली आहे. त्यावर अमेरिकन सरकारने आपली बाजू मांडताना खटला मागे घेता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Devyani-Khobragade1-300x201

February 01, 2014 in रोजगार

काश्मीरमध्ये चकमक, दहशतवादी ठार

काश्मीरमध्ये चकमक, दहशतवादी ठार
श्रीनगर – दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षापथकांबरोबर झालेल्या चकमकीत दहशतवादी ठार झाला. पोलिसांनी या दहशतवाद्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून, त्याच्याकडे एके रायफल आणि काही दारुगोळा सापडला आहे.
पुलवामामधील कांगन गावातील एका घरात हा दहशतवादी उतरल्याची माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी सुरक्षापथकांनी या घराला वेढा घातला. लष्कराचे जवान आल्याचे समजताच या दहशतवाद्याने सुरक्षापथकांच्या दिशेने गोळीबार सुरु केला. सुरक्षापथकांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात हा दहशतवादी जखमी झाला होता. रात्री कारवाई थांबवण्यात आली होती. सकाळी पुन्हा कारवाई सुरु केली तेव्हा हा दहशतवादी मृतावस्थेत सापडला. या दहशतवाद्याची ओळख आणि तो कुठल्या दहशतवादी संघटनेशी संबंधित होता याची माहिती गोळा करण्याचे काम सुरु आहे.

army-soldier-300x205

February 01, 2014 in रोजगार

हरीश रावत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री

हरीश रावत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री
डेहराडून- केंद्रीय मंत्री हरीश रावत यांची उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. विजय बहुगुणा यांनी शुक्रवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. जून महिन्यात राज्यात आलेल्या जलप्रलयादरम्यान मदतकार्यासाठी उशीर केल्याचा आरोप बहुगुणा यांच्यावर लावण्यात आला होता. पक्ष नेतृत्वाच्या इच्छेने आपण राजीनामा देत असल्याचे बहुगुणा यांनी म्हटले होते.
Harish-Rawat

February 01, 2014 in रोजगार