पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for February 26th, 2014

टाक्यात पडून मुलाचा मृत्यू

दिग्रस – तालुक्यातील सावंगा (खू.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील पाण्याच्या टाक्यात बुडून  बालकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री ९.३० वाजता उघडकीस आली.  ऋतीक नामदेव राऊत (७) रा. सावंगा (खू.) असे मृतकाचे नाव आहे. जिल्हा परिषद शाळेत पहिल्या वर्गात तो शिक्षण घेत होता. २५ फेबु्रवारी रोजी  शाळेत गेला मात्र सायंकाळ होऊनही तो घरी परत आला नाही. म्हणून नातेवाईकांनी त्याची शोधमोहीम सुरु केली. अशातच रात्री ९.३० वाजताच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केद्रातील पाण्याच्या टाक्यात त्याचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती पोलीस पाटील अर्चना अरूण कोरडे यांनी दिग्रस पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला असून अकस्मात मृत्यूची नोंद केली. आरोग्य केंद्राचे बांधकाम सुरु असून ठेकेदाराने पाण्याच्या टाकीवर झाकण बसविले नाही. त्यामुळे या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप नामदेव राऊत यांनी केला आहे.

February 26, 2014 in महाराष्ट्र
पाणी, दुष्काळावर नासा-इस्त्रोचा एकत्रित अभ्यास 0

पाणी, दुष्काळावर नासा-इस्त्रोचा एकत्रित अभ्यास

3
वॉशिंग्टन – पाणी आणि दुष्काळाचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकन अवकाश संशोधन संस्था नासा आणि भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रो एकत्रितपणे उपग्रहांची मालिका प्रक्षेपित करणार आहे. नासाने ही माहिती दिली आहे.
पृथ्वीवरील पाणी आणि दुष्काळाचा अभ्यास करण्यासाठी पुढल्या सात वर्षात वेगवेगळे उपग्रह अवकाशात पाठविण्याची नासा आणि इस्त्रोची योजना आहे. पृथ्वीवर होणा-या महत्वाच्या बदलांवर नासाचे जमीन, हवा आणि अवकाशातून लक्ष असते. पृथ्वीवरील वातावरणात होणा-या बदलांचा अभ्यास करण्यासाठी नासाने काही नवीन पध्दती विकसित केल्या आहेत.वेगवेगळया प्रयोगातून उपग्रहांकडून जमा होणारी महत्वपूर्ण माहिती नासा नेहमीच जागतिक समुदाय तसेच विविध संस्थांना देत असते. जेणेकरुन पृथ्वीच्या सुरक्षिततेविषयी जागृती होईल आणि विविध उपायोजना करता येतील. पृथ्वी विज्ञान मोहिमेतंर्गत यावर्षी तीन उपग्रह प्रक्षेपित करण्याची नासाची योजना आहे. या उपग्रहांव्दारे पृथ्वीवरील पाण्याचा अभ्यास करण्यात येणार आहे.

February 26, 2014 in मुख्य पान

तर जगभरात वापरता येणार मोफत, अमर्याद इंटरनेट

अमेरिकी एनजीओचा ‘सॅटेलाइट’ उपक्रम
वृत्तसंस्था, वॉशिंग्टन – जगभरातील प्रत्येकाला ‘वायफाय’ सेवेचा मोफत लाभ घेता यावा, यासाठी एक अमेरिकन कंपनी घनाकृती कृत्रिम उपग्रहांच्या माध्यमातून इंटरनेट डेटा प्रक्षेपित करण्याचे नियोजन करीत आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास खंडांच्या, देशांच्या सीमा आड न येता प्रत्येकाला मोफत इंटरनेट वापराची संधी प्राप्त होणार आहे.
या प्रकल्पाअंतर्गत जगभरातील नागरिकांना त्यांचे भौगोलिक स्थान लक्षात घेऊन कोणत्याही सेन्सॉरशिपविना मोफत आणि अमर्याद इंटरनेट अॅक्सेस मिळविता येणार आहे, असा दावा न्यूयॉर्कमधील ‘मीडिया डेव्हलपमेंट इन्व्हेस्टमेंट फंड’ (एमडीआयएफ) या स्वयंसेवी संस्थेने केला आहे. त्यासाठी ही संस्था घनाकृती कृत्रिम उपग्रहांच्या माध्यमातून ‘आउटरनेट’ नामक विस्तृत जाळे विणणार आहे. त्याअंतर्गत इंटरनेट डेटा जगभर प्रक्षेपित करण्यात येईल. जेणेकरून कुणालाही स्मार्टफोन, टॅब्लेट अथवा कम्प्युटरच्या माध्यमातूनही मोफत इंटरनेट सेवा वापरण्याची संधी उपलब्ध होईल. ‘आउटरनेट’च्या माध्यमातून प्रक्षेपित होणारे डेटा सिग्नल ‘कॅच’ करण्यासाठी जगभरात शंभर ठिकाणी ग्राउंड स्टेशनची उभारणी करण्यात येईल. ‘एमडीआयएफ’च्या अहवालानुसार आजही जगभरातील चाळीस टक्के नागरिकांना इंटरनेटच्या सुविधेपासून वंचित आहेत. ‘आउटरनेट’च्या माध्यमातून सायबेरियापासून अमेरिकेच्या पश्चिमेकडील भाग, तसेच निर्मनुष्य बेटांपासून आफ्रिका खंडातील अतिदुर्गम भागांपर्यंत इंटरनेटचे विस्तृत जाळे विणणे सहज शक्य होणार आहे.
‘आउटरनेट’ची कार्यपद्धती काय?
‘आउटरनेट’च्या माध्यमातून एकाच दिशेने (वन वे) फीडर्सद्वारा कृत्रिम उपग्रहांकडे इंटरनेट डेटा सोडण्यात येईल. हे उपग्रह मिळालेला डेटा स्वीकारून जगभर उभारण्यात आलेल्या ग्राउंड स्टेशनकडे प्रक्षेपित करतील. जेथे पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध होईल, तेथे अशा प्रकारची स्टेशन उभारण्यात येणार आहेत.जगभर मोफत ‘वायफाय सेवा’ देण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या नेटवर्कसाठी मोठा खर्च अपेक्षित आहे. अवकाशात सोडलेल्या कृत्रिम उपग्रहांच्या चलनवलनासाठी एक लाख ते तीन लाख डॉलरचा खर्च अपेक्षित आहे

February 26, 2014 in एनजीओ

नौदल प्रमुखांचा राजीनामा

2
नवी दिल्ली – मुंबई किनाऱ्यावर भारतीय नौदलाच्या ‘सिंधुरत्न’ या पाणबुडीला झालेल्या अपघातानंतर नौदल प्रमुख अॅडमिरल डी. के. जोशी यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. संरक्षण मंत्रालयाने त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. सध्या नौदलाचे व्हाइस अॅडमिरल रॉबिन धवन यांच्याकडे प्रभारी कार्यभार सोपविण्यात आला आहे. संरक्षण मंत्री ए. के. अँटनी हे सुद्धा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
‘सिंधुरक्षक’ या नौदलाच्या पाणबुडीला झालेल्या अपघाताच्या आठवणी ताज्या असतानाच, पुन्हा एकदा मुंबईजवळ भारतीय नौदलाच्या ‘सिंधुरत्न’ या पाणबुडीला अपघात झाला आहे. या पाणबुडीवर एकूण ९४ जण होते. यातील ७ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ६० जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. दोन नौदलच्या अधिका-यांचा अद्याप थांगपत्ता लागत नसल्याचे कळते. परंतु बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर याबद्दल ठोस माहिती मिळेल.सिंधुरत्न ही भारताची ३५ वर्ष जुनी पाणबुडी आहे. डागडुजी झाल्यानंतर तपासणीसाठी पाणबुडी समुद्रात नेली असतानाच हा अपघात झाला. याआधी रशियातून आधुनिकीरण करुन आणलेल्या सिंधुरक्षक पाणबुडीला अपघात झाला होता. तसेच आयएनएस बेतवा युद्धनौकेलाही अपघात झाला होता.फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच ऐरावत या युद्धनौकेला किरकोळ अपघात झाला होता. या घटनेनंतर ऐरावतच्या कमांडिंग ऑफिसरची बदली करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांतच सिंधुरत्न पाणबुडीला अपघात झाल्यामुळे संरक्षण मंत्रालयाने या अपघातांची गंभीर दखल घेतल्याने या घडामोडी घडल्या असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

February 26, 2014 in मुख्य पान
सिंधुरत्न पाणबुडीला अपघात 0

सिंधुरत्न पाणबुडीला अपघात

1

मुंबई – ‘सिंधुरक्षक’ या नौदलाच्या पाणबुडीला झालेल्या अपघाताच्या आठवणी ताज्या असतानाच, पुन्हा एकदा मुंबईजवळ भारतीय नौदलाच्या ‘सिंधुरत्न’ या पाणबुडीला अपघात झाला आहे. दुरुस्तीनंतरच्या चाचण्यांदरम्यान या पाणबुडीमधून धूर येऊ लागला. बचावकार्य सुरू असून संध्याकाळपर्यंत ही पाणबुडी बाहेर निघेल, असे सांगण्यात येत आहे.
या पाणबुडीवर एकूण ९४ जण होते. यातील ७ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ६० जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. दोन नौदलच्या अधिका-यांचा अद्याप थांगपत्ता लागत नसल्याचे कळते. परंतु बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर याबद्दल ठोस माहिती मिळेल. बंदरापासून ४० ते ५० किमी खोल समुद्रात ही दुर्घटना घडली. अचानक येऊ लागलेल्या धुरामुळे श्वसनास अडथळा येऊन सात नौसैनिक बेशुद्ध झाले. या नौसैनिकांना एअरलिफ्ट करुन नौदलाच्या अश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दुर्घटना झाली त्यावेळी पाणबुडीत शस्त्रे, क्षेपणास्त्रे नव्हती.धूर येण्यामागील कारणे शोधून आवश्यक ती दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या अपघातात कोणाचाही मृत्यू झालेला नाही. अपघाताची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पुरेशी खबरदारी घेण्याचे आदेश नौदलाच्या वरिष्ठ अधिका-यांनी दिले आहेत.याआधी गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सिंधुरक्षक पाणबुडीला मुंबई बंदराजवळ मोठा अपघात झाला होता. मोहीमेवर निघण्याच्या तयारीत असताना झालेल्या स्फोटामुळे सिंधुरक्षक पाणबुडीला जलसमाधी मिळाली. या अपघातात १८ नौसैनिकांचा मृत्यू झाला होता.
अपघातांची मालिका
सिंधुरत्न ही भारताची ३५ वर्ष जुनी पाणबुडी आहे. अलिकडेच डागडुजीसाठी ही पाणबुडी गोदीत दाखल झाली होती. डागडुजी झाल्यानंतर तपासणीसाठी पाणबुडी समुद्रात नेली असतानाच हा अपघात झाला. याआधी रशियातून आधुनिकीरण करुन आणलेल्या सिंधुरक्षक पाणबुडीला अपघात झाला होता. तसेच आयएनएस बेतवा युद्धनौकेलाही अपघात झाला होता.फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच ऐरावत या युद्धनौकेला किरकोळ अपघात झाला होता. या घटनेनंतर ऐरावतच्या कमांडिंग ऑफिसरची बदली करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांतच सिंधुरत्न पाणबुडीला अपघात झाल्यामुळे नौदल मुख्यालयाने अपघातांची गंभीर दखल घेतली आहे. नौदलाच्या पश्चिम तळावर सातत्याने अपघात होण्यामागील कारणे जाणून घेण्यासाठी नौदल मुख्यालयाने पश्चिम विभागाचे प्रमुख व्हाइस अॅडमिरल शेखर सिन्हा यांना बोलावले आहे.

February 26, 2014 in मुख्य पान