पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for February 8th, 2014

भोपालच्या युवकाची यवतमाळात आत्महत्या ; पिस्तूलमधून झाडली गोळी

1212 1213
यवतमाळ – भोपाल येथील एका युवकाने देशी बनावटी पिस्टलमधून  स्वत:च्या डोक्यात  गोळी झाडून आत्महत्या केली.  आज शनिवारी सकाळी ११. ३० वाजता दत्त चौकातील हॉटेल रामायनमध्ये ही घटना घडली. या घटनेने खळबळ उडाली असून आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.
धर्मेंद्र हरी उजवणे (३३) रा. कोटरा सुलतानाबाद भोपाल असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. ७ फेबु्रवारी रोजी सकाळी ९.३० वाजता त्याने दत्त चौकातील हॉटेल रामायनमध्ये चौथ्या माळयावरील ४०६ क्रमांकाची रुम बुक केली होती. दरम्यान आज सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास नोकर दिगांबर बावनकर हा रुम साफ करण्यासाठी गेला होता. यावेळी नोकराने रुमच्या तीनवेळा बेल वाजविल्या मात्र आतमधून कुठलाही प्रतिसाद  मिळत नव्हता. त्यामुळे बावनकर याने रुमचे दार ढकलले असता, धर्मेंद्र रक्ताच्या थारोळ््यात खाली पडून दिसला. यावेळी  भयभित झालेल्या नोकराने हा प्रकार व्यवस्थापकाला सांगितला. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, वडगाव रोडचे ठाणेदार विपीन हसबनिस, सहाय्यक  पोलीस निरीक्षक विजय राठोड, पोलीस उपनिरीक्षक नरेश रणधिर, जमा. विष्णू मेश्राम, प्रेमसिंग चव्हाण, नेरेंद्र लावरे, नितीन गावंडे, नितीन सलाम यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. यावेळी रक्ताच्या थारोळ्यात युवकाचा मृतदेह आढळला असून त्याच्या हातात देशी बनावटी पिस्टल (७.६५ एमएम) होती. या पिस्टलमध्ये दोन काडतुस होते त्यातील एका गोळी झाडून आत्महत्या केली. हा युवक शहरात कशासाठी आला व त्याने आत्महत्या का केली हे प्रश्न अजुनही अनुत्तरीत आहे. हॉटेल व्यवस्थापक प्रफुल कृष्णराव काळे रा. छत्रपती सोसायटी याने दिलेल्या तक्रारीवरून वडगाव रोड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.मृतक धर्मेद्र उजवणे याचे पाच वर्षापासून शहरातील एका युवतीसोबत प्रेमसबंध होते. मात्र त्याच्या प्रेमसबंधाला युवतीच्या कुटुुंबीयाचा विरोध होता. सुड भावनेतून युवतीच्या वडील व भावानेच पिस्तूलमधून गोळ््या झाडून धर्मेद्रचा खून केल्याचा आरोप मृतकचा भाऊ प्रशांत उजवने यांनी केला.

भारताला विजयासाठी हव्या ३२० धावा

ऑकलंड – गोलंदाजांच्या भन्नाट कामगिरीमुळे भारताला न्यूझीलंड विरुध्द सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात विजयाची संधी निर्माण झाली आहे. न्यूझीलंडच्या ४०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, तिस-या दिवसअखेर भारताच्या एक बाद ८७ धावा झाल्या आहेत.
भारताला विजयासाठी अजून ३२० धावांची आवश्यकता असून, भारताचे नऊ फलंदाज शिल्लक आहेत. शिखर धवन (४९) आणि चेतेश्वर पूजारा (२२) धावांवर खेळत आहे. मुरली विजयला (१३) धावांवर साऊथीने वॅटलिंगकडे झेल द्यायला भाग पाडले.तत्पूर्वी भारताच्या वेगवान गोलंदाजांनी दुस-या डावात न्यूझीलंडची दैना उडवून दिली. झहीर, इशांत आमि मोहोम्मद शामीच्या भेदक मा-यासमोर न्यूझीलंडचा डाव फक्त १०५ धावात आटोपला.पहिल्या डावातील ३०१ धावांच्या आघाडीच्या जोरावर न्यूझीलंडने भारतासमोर विजयासाठी ४०७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दुस-या डावात मोहोम्मद शामी, इशांत शर्मा आणि झहीर खानच्या भेदक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. शामी आणि इशांतने प्रत्येकी तीन तर झहीरने दोन गडी बाद केले.दुस-या डावात रॉस टेलरचा अपवाद वगळता सर्व फलंदाज अपयशी ठरले. रॉस टेलरने सर्वाधिक ४१ धावा केल्या. तत्पूर्वी शनिवारच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर भारताचा पहिला डाव २०२ धावांवर आटोपला. कालच्या धावसंख्येत भारताच्या उर्वरित सहा फलंदाजांनी फक्त ७२ धावांची भर घातली.शुक्रवारी भारताचा डाव सावरुन आशा निर्माण करणारी रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेची जोडी झटपट तंबूत परतली. रोहित (७२) आणि अजिंक्य (२६) धावांवर बाद झाले. हे दोघे बाद झाल्यानंतर कर्णधार ढोणीसह अन्य फलंदाजांनी निराशा केली. रविंद्र जाडेजा (३०) धावांवर नाबाद राहिला.न्यूझीलंडकडून वागनेरने सर्वाधिक चार, साऊथी आणि बाउल्टने प्रत्येकी दोन गडी बाद केले. कसोटीचे अजून दोन दिवस शिल्लक असून, गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावल्यानंतर भारताच्या विजयाची सर्व मदार आता फलंदाजांवर अवलंबून आहे.

February 08, 2014 in विदर्भ

दोन मुलींवर सामूहिक बलात्कार

मुंबई- दोन मुलींना रिक्षातून पळवून नेऊन त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना जोगेश्‍वरीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून एक जण अद्याप फरार आहे.
अल्ताफ याकूब पटेल (२६) व अरमान नफीज खान (२२) अशी या आरोपींची नावे आहेत. फरार असलेला तिसरा आरोपी रिक्षाचालक आहे.या तिघांनी पीडित मुलींना शुक्रवारी ओशिवरा परिसरातील बेहराम बाग येथील गांधी शाळेजवळून जबरदस्तीने रिक्षात डांबून नेले. रिक्षातून ते या पीडित मुलींना तेथील मैदानात घेऊन गेले. तेथे त्या नराधमांनी त्यांच्यावर अमानुष अत्याचार केला. त्यानंतर ते तिघेही फरार झाले.पीडित मुलींकडे चौकशी केली असता हा संपूर्ण धक्कादायक प्रकार उघडकीस आला.  अटक करण्यात आलेले खान आणि पटेल हे सराईत गुन्हेगार असून पटेलविरुद्ध ११ घरफोडीचे गुन्हे नोंद आहेत. तो तडीपार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

February 08, 2014 in रोजगार

अतिरिक्त कर्मचारी कमी करा – पृथ्वीराज चव्हाण

मुंबई – मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असणा-या सुरक्षा व्यवस्थेबद्दल काही महत्वाचे चांगले निर्णय घेतले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र पोलिसांना वर्षा बंगल्यावरील आणि सुरक्षा ताफ्यातील अतिरिक्त कर्मचारी वर्ग कमी करण्याचे निर्देश दिले आहेत.मुख्यमंत्र्यांना झेड प्लस सुरक्षा कायम रहाणार आहे. मात्र बंगल्यातील आणि सुरक्षेवरील अतिरिक्त कर्मचारी वर्ग कमी करण्यात येणार आहे.तसेच मुख्यमंत्र्यांनी यापुढे प्रतिष्ठेचा समजला जाणारा लाल दिवा न वापरण्याचा निर्णय घेतला आहे तसे त्यांनी अधिका-यांना निर्देश दिले आहेत.

February 08, 2014 in रोजगार

६० बँक खात्यांवर ऑनलाइन डल्ला

मुंबई – एका राष्ट्रीयकृत बँकेच्या ६० खातेदारांच्या खात्यांतून १३ लाख २५ हजार रुपयांची ऑनलाइन शॉपिंग केल्याप्रकरणी नुकताच कफ परेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासानुसार, हा स्किमिंगचा प्रकार असल्याचा पोलिसांना संशय आहे.
बँकेच्या नेव्ही नगर शाखेतील ६० खातेदारांच्या डेबिट कार्डचा डेटा चोरून ऑनलाइन शॉपिंग करण्यात आली आहे. त्यानंतर खातेदारांना मोबाइलवर संदेश आल्याने त्यांनी संबंधित बँकेशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली. १६ ते २७ नोव्हेंबरच्या दरम्यान हा प्रकार घडल्याचे बँक अधिका-यांच्या लक्षात आल्यानंतर नुकतीच या प्रकरणी कफ परेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.त्यानुसार फसवणूक व माहिती तंत्रज्ञानाचा गैरवापर प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामागे स्थानिक टोळीचा हात असल्याचा पोलिसांना संशय असून, आयपी अ‍ॅड्रेस शोधण्याचे काम सुरू असल्याचे एका पोलिस अधिका-याने सांगितले.डेटा चोरी करण्यासाठी आरोपींनी स्कििमगचा वापर केल्याचा संशय आहे.एटीएम सेंटरमधील सीसीटीव्हीचे फुटेज मिळवण्याचे काम पोलिस करत आहेत. गेल्यावर्षी अशाच प्रकारे कुलाबा येथील एटीएम सेंटरमधून खातेदारांचा डेटा चोरी करून त्यांना ऑनलाइन गंडा घालण्यात आला होता. पण, पोलिसांच्या मते ही दोन्ही प्रकरणे वेगळी असून, कफ परेडमध्ये डेबिट कार्डच्या सहाय्याने ऑनलाइन खरेदी करण्यात आली आहे. त्यात आरोपींनी डीश केबल कनेक्शनचे पैसेही भरले आहेत. त्यामुळे या प्रकरणात स्थानिक टोळीचा हात असल्याचा पोलिसांना संशय आहे.

February 08, 2014 in रोजगार