पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for February 5th, 2014

डोर्ली येथे इसमाचा खून

यवतमाळ – शहरालगत डोर्ली येथील एका इसमाचा चोरीच्या संशयावरून खून केल्याचे घटना घडली. शहर पोलिसांनी दोन आरोपी विरूद्घ गुन्हा दाखल केला असून एकास अटक केली.
संतोष रामाजी उगलमुगले (२८) रा. डोर्ली असे मृतकाचे नाव आहे. २ फेबु्रवारी रोजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास संडासला जात असल्याचे कुटुंबीयाला सांगुन गेला होता. दरम्यान ३ फेबु्रवारी रोजी डोर्ली शिवारातील गोलु नागरगोजे याच्या शेतात संतोषचा मृतदेह आढळल्चाची माहिती पोलीस पाटलाने शहर पोलिसात दिली होती. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात पाठविला. ४ फेबु्रवारी रोजी दुपारी व्हिडीओ चित्रीकरणामध्ये शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकाºयांनी प्राथमिक अहवालामध्ये संतोषचा मृत्यू मारहाण केल्याने झाल्याचे स्पष्ट केले. त्यावरून पोलिसांनी तपासचक्रे फिरवून मृतकची पत्नी व भावाची चौकशी केली असता, मृतक संतोषचे गावातील गोलु नागरगोजे याच्यासोबत दुचाकी चोरीवरुन वाद सुरु होता असे सांगितले. तसेच मृतकला दारुचे वेसन असून घटनेच्या दिवशी तो गावातीलच पानठेल्याजवळ उभा होता. तेवढ्यात दुचाकीने शिवा खेडकर व त्याचा मित्र तेथे आले व त्याला सोबत घेऊन गेले. अशातच गोलु नागरगोजे व त्याच्या एका मित्राने तेथून संतोषला गाडीवर बसवून नेले. दरम्यान सोमवारी गणेश मिसाळ याने संतोषचा मृतदेह नागरगोजेच्या शेतात असल्याची माहिती कुटुंबीयाला दिल्याचे त्यांनी बयानात सांगितले. त्यावरून शहर पोलिसांनी आरोपी नागरगोजे व त्याच्या एका साथीदाराविरूद्घ भादंवि कलम ३०२, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. मंगळवारी रात्री आरोपी गोलु याला अटक करुन पोलीस कोठडी मिळविली. अधिक तपास शहरचे ठाणेदार पंजाब डोंगरदिवे, सहा. पोलीस निरीक्षक अमोल माळवे, जमा. सुनिल विसपुते करीत आहे.

February 05, 2014 in रोजगार

अपघात, सहा ठार

3 4 1 217
परभणी येथील घटना, उमरखेड मध्ये शोककळा
उमरखेड – लग्न सोहळा आटोपून परभणीवरून उमरखेड कडे परत येत असताना विरुद्घ दिशेने येणाºया वाहनाची समोरासमोर धडक झाली. ४ फेबु्रवारी रोजी रात्री १२. ३० वाजता परभणी येथून १५ किमी अंतरावर झिरो फाट्याजवळ झालेल्या अपघातामध्ये सहा जण जागीच ठार झाले. यामध्ये बंग कुटुंबातील दोन, दुकानातील मुनीम, अकोला येथील पाहुणा व अन्य दोन जणांचा समावेश असून शहरात शोककळा पसरली आहे.
शहरातील कापड व्यावसायीक भगवान बंग यांच्या मुलांचा विवाह परभणी जवळील सेलु ह्या ठिकाणी ४ फेबु्रवारी रोजी होता. लग्न सोहळा आटोपल्यानंतर काही वºहाडी एम.एच. २९ आर ६२३८ क्रमांकाच्या कु्रझरने उमरखेडकडे निघाले होते. यावेळी चालक यादव गायकवाड हा वाहन चालवित असताना विरुद्घ दिनेशने येणाºया एम.एच. २६ / एडी ०९८८ क्रमांकाच्या ट्रकने जोरदार धडक दिली. यामध्ये क्रुझर संपूर्णपणे क्षतीग्रस्त झाल्याने वाहनात बसून असलेले हरिष बंग (६०), जगदिश बंग (५८), दामोधर सारडा (५८), रामचंद्र भराडे (६५) रा. उमरखेड, रामकिशोर लोहीया (५०) रा. अकोला, रामदास सुरोशे (४२) रा. नागेशवाडी हे सहा जण जागीच ठार झाले. तर दिनेश तेला,यादव गाकवाड हे जखमी झाले असून काही जण किरकोळ जखमी झाले असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. घटनेतील एक जण नागेशवाडी येथील असल्याने तेथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तर शहरातील चार जणावर हिंन्दु स्मशानभूमित अत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहरातील व्यापाºयांनी आपली प्रतिष्ठाणे संपूर्णपणे बंद ठेऊन शोक व्यक्त केला. या दुदैवी घटनेने शहरात शोकाकुल वातावरण पसरले होते

February 05, 2014 in रोजगार

आप’ आणि केजरीवाल यांना नोटीस

नवी दिल्ली- परदेशातून मिळणा-या निधीबद्दल माहीती देण्यास टाळाटाळ करणा-या आम आदमी पक्षाला दिल्ली उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. ‘आप’ने पक्षाला मिळणा-या निधीबद्दल कोणतीच माहिती दिली नसल्याने पक्षाच्या संस्थापक सदस्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने ही नोटीस बजावली आहे.
न्यायालयाने पक्षाच्या संस्थापक सदस्यांसह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही नोटीस बजावली आहे. यावर २८ फेब्रुवारपर्यंत उत्तर द्यावे असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
केंद्रीय गृहमंत्रालयाने चार नोव्हेंबर रोजी आपला पत्र पाठवून पक्षाला मिळणा-या निधीबद्दल आणि बँक खात्यांचे तपशील जमा करण्यास सांगितले होते. मात्र त्याला कोणतेच उत्तर दिले नसल्याचे अतिरिक्त सॉलिसीटर जनरल राजीव मेहरा यांनी दिली होती. ‘आप’ आपल्या बँक खात्यांचा तपशील देत नसल्याचे मेहरा यांनी बुधवारी झालेल्या सुनावणीत सांगितले.
परदेशातून निधी स्वीकारुन, कायद्याचा भंग करत असल्याने आपच्या संस्थापक सदस्यासह केजरीवाल यांच्याविरोधात गुन्हेगारी तक्रार दाखल करावी या मागणीसाठी वकिल एम.एल.शर्मा यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

February 05, 2014 in रोजगार

कोल्हापुरात टोलविरोधी आंदोलन पुन्हा पेटले

Khalapur-Toll
कोल्हापूर- शहरातील टोल विरोधी आंदोलनाने बुधवारी पुन्हा एकदा पेट घेतला. शिरोली येथील टोलनाक्यावर टोलवसुली सुरु झाल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन सुरु केले. त्यातच नगरसेवक आणि पोलिस यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी पोलिस आणि नगरसेवक यांच्यात धक्काबुक्की झाली. त्यात महापौर सुनीता राऊत या किरकोळ जखमी झाल्या आहेत. पोलिसांनी आंदोलन करणा-या सर्व नगरसेवकांना अटक केली असून त्यानंतर पुन्हा टोलवसुली सुरु झाली आहे.
याआधी टोलविरोधात १२ जानेवारी रोजी झालेल्या हिंसक आंदोलनात कोल्हापूरमधील नागरिकांनी टोल नाके पेटवून दिले होते. दरम्यान सर्वपक्षीय नगरसेवकांनी आयआरबी आणि पोलिसांच्याविरोधात कोल्हापूर बंदची हाक दिली आहे.
कोल्हापूर शहरात खासगीकरणाच्या माध्यमातून ५२ किलोमीटरचे रस्ते आयडियल रोड बिल्डर (आयआरबी) कंपनीने बांधले आहेत. यासाठी २२० कोटी रुपये खर्च आला. हा खर्च ३० वर्षे टोल लावून वसूल केला जाणार होता. या विरोधात कोल्हापूरच्या नागरिकांनी सातत्याने जोरदार आंदोलन सुरु केले आहे.

February 05, 2014 in रोजगार

बिन्नी यांनी काढला ‘आप’चा पाठिंबा

नवी दिल्ली- आम आदमी पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले आमदार विनोद कुमार बिन्नी यांनी अरविंद केजरीवाल सरकारचा पाठींबा काढून घेत असल्याचे मंगळवारी जाहीर केले. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल हे भ्रष्ट व्यक्तीपेक्षा धोकादायक असल्याचा आरोप बिन्नी यांनी यावेळी केला.
दिल्लीतील ‘आप’ सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याचे पक्ष नायब राज्यपाल नजीब जंग यांना लिहणार असल्याचे बिन्नी यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून केजरीवाल यांच्यावर टीका करणा-या बिन्नी यांनी बुधवारी पुन्हा एकदा त्याच्यावर तोफ डागली. केजरीवाल केवळ दिल्लीतील नव्हे तर संपूर्ण देशातील जनतेशी खोटे बोलत आहेत.
सरकारचा पाठिंबा काढून घेतला असलातरी जनलोकपाल विधेयकाला पाठिंबा देणार असल्याचे बिन्नी यांनी सांगितले. जर अण्णा हजारे यांना अपेक्षीत असलेले जनलोकपाल विधेयक सरकारने सादर केले तर आपण त्याला पाठींबा देऊ असे ते म्हणाले.दिल्ली सरकारने ४८ तासात स्वस्त वीज आणि पाणी, महिलांची सुरक्षा आणि राष्ट्रकुल घोटाळ्याच्या चौकशीकरावी अन्यथा पाठिंबा काढून घेऊ असा इशारा बिन्नी यांनी रविवारी दिला होता.

February 05, 2014 in रोजगार

लोकसभा दिवसभरासाठी तहकुब

loksbha
नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीपूर्वी होणा-या संसदेच्या अधिवेशनाला बुधवारपासून सुरुवात झाली. मात्र तेलंगण आणि अन्य मुद्यावर सदस्यांनी गदारोळ केल्याने लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकुब करण्यात आले. तर राज्यसभेतही याच मुद्दयावरून सदस्यांनी गदारोळ केला.
त्याआधी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी सभागृहाचे कामकाज सुरळीत चालेल अशी आशा व्यक्त केली. १५व्या लोकसभेचे हे अखेरचे अधिवेशन आहे. त्यामुळे विरोधी पक्षांकडून उपस्थित केल्या जाणा-या सर्व मुद्यांवर चर्चाकरण्यासाठी सरकारची तयारी असल्याचे डॉ.सिंग यांनी सांगितले.हे अधिवेशन २१ फेब्रुवारीपर्यंत चालणार असून यात भ्रष्टाचारविरोधी सहा विधेयके सादर केली जाण्याची शक्यता आहे. तसेच जातीय हिंसाचारविरोधी विधेयक, तेलंगण विधेयक, व्हिसलब्लोअर संरक्षण विधेयक आणि महिला आरक्षण अशा महत्त्वाच्या विधेयकांचा समावेश आहे

February 05, 2014 in रोजगार

सीबीआय भरणार ७११ जागा

नवी दिल्ली- देशातील सर्वोच्च तपास संस्था सीबीआयमध्ये तातडीने ७११ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. तर अन्य दोन हजार ६३ रिक्त जागा टप्प्याटप्प्यानुसार भरणार असल्याचे निवृत्तीवेतन आणि कार्मिम विभागाचे संसदीय व्यवहारमंत्री व्ही. नारायणसामी यांनी लोकसभेत सांगितले. सीबीआयमध्ये ७११ जागा भरण्यासाठी कार्यालयीन तयारी पूर्ण झाली आहे. तर अन्य जागा भरण्यासाठी तयारी सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सीबीआयमधील विविध विभागात ८७८ पदे रिक्त असल्याचे नारायणसामी यांनी यावेळी सांगितले. यातील ५२७ सीबीआय अधिकारी, कायदे विभागात ६९ अधिकारी, तांत्रिक विभागात ५४ पदे, सचिवालयात २०६ आणि कँटीनमध्ये २२ पदे रिक्त आहेत.सीबीआयमध्ये सहा हजार ६७४ कर्मचारी वर्ग अपेक्षित असून केवळ पाच हजार ७९६ कर्मचारीच काम करीत आहेत. असे असतानाही सीबीआयने २००३ प्रकरणांमधील ८५५ प्रकरणांचा छडा लावण्यात यश मिळवले आहे.सीबीआयकडे २०१३ मध्ये एक हजार १३१, सन २०१२ मध्ये १०४८ आणि सम २०११ मध्ये १००३ प्रकरणांची नोंद झाली. यातील ७० टक्के प्रकरणांमधील प्रगती समाधानकारक असल्याचे नारायणसामी यांनी लोकसभेत सांगितले.सीबीआयने टूजी, राष्ट्रकूल यासारख्या अनेक बड्या घोटाळ्यांची चौकशी केली. त्यांना मनुष्यबळ कमी पडत असल्याचे नारायणसामी यांनी सांगितले.

February 05, 2014 in रोजगार