पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for February 11th, 2015

अाॅटोरिक्षा व टैक्सी ला जीपीएस बंधनकारक

 

मुंबई, (सतिष राठोड)

अाॅटोरिक्षा व टैक्सीच्या माध्यमातून दिवसेंदिवस घडणार्या महिलांवरील गुन्ह्ा थांबवण्यासाठी,परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एक महत्वाचे निर्णय सोमवारी घेतले असुन,प्रवाशांच्या सोयीसाठी अाटोरिक्षा व टैक्सीमध्ये ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम (जीपीएस) लावणे बंधनकारक राहील.जीपीएसमुळे कोणते वाहन कुठे अाहे हे समजण्यास महत्वाचे ठरेल.अाणि विधान भवन समोरील स्टैडवर जाउन रावते यांनी
सांगातले कि, शेयर टैक्सीच्या वाहन चालकाच्या बाजूची सीट महिलांसाठी राखीव ठेवण्याची योजना सुरु केली.या निर्णयाचे प्रवासी संघटनांनी स्वागत केले अाहे.

केडीएमसीच्या महापौर कल्याणी पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

कल्याण,ठाणे (प्रतिनिधी,सतिष राठोड)
कल्याण डोंबिवलीच्या महापौर कल्याणी पाटील यांच्यावर बाजार पेठपो.स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात अालेला अाहे. राष्ट्रवादी काग्रेसचे माजीपदाधिकारी रमेश हनुमंते यांना धमकावल्या प्रकरणी हे गुन्हा नोंदवण्यात अालाअसुन,हनुमंते यांना जीवे मारण्याची धमकी दिली असे नोंदवण्यात अालेले अाहे.
कल्याणी पाटील यांनी हे अारोप खोटे असल्याचे स्पष्टीकरणदिले अाहे,व रमेश हनुमंते यांनी बालवाडी मध्ये काम करणार्या काहीशिक्षिकांपासून पगारश्रेणी लागू करण्यासाठी पैसे घेतले असुन,रमेश हनुमंतेयांच्या विरुध्द काही शिक्षिकांनी
तक्रार केली होती,त्यांनी रमेश हनुमंते यांना शिक्षिकांच्या बाबतीत बोलले वघेतलेले पैसे परत करा असे सांगितले.त्यामुळे माझ्यावर लावलेला अारोप खोटेअाहे.

February 11, 2015 in महाराष्ट्र

नेर येथे २२० केव्हीच्या वीज उपकेंद्रास मंजुरी

 

दारव्हा-नेर २८ किमीचा थेट वीज मार्ग, पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्नांना यश

यवतमाळ – नेर शहरातील वीजेच्या समस्येचा प्रश्न लवकरच निकाली निघणार असून नेर शहराला उच्च दाबाचा वीज पुरवठा करण्यासाठी तब्बल २२० केव्हीच्या नवीन वीज उपकेंद्राच्या प्रस्तावास राज्य मंत्रीमंडळाने मंगळवारी मान्यता दिली. गेल्या अनेक वर्षांपासून नेरवासीयांना ३३ केव्हीच्या उपकेंद्राद्वारे वीज पुरवठा सुरू आहे. मात्र या वीजकेंद्रावर अतिरिक्त भार येत असल्याने शहराचा वीज पुरवठा वारंवार खंडीत होतो. पालकमंत्री संजय राठोड हे आमदार असल्यापासून नेर येथील २२० केव्हीच्या उपकेंद्रासाठी पाठपुरावा करीत होते. आघाडीचे सरकार असताना त्यांनी यासंदर्भात विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करून कपात सूचनाही मांडली होती.

युती सरकारमध्ये महसूल राज्यमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर ना. संजय राठोड यांनी नेर येथील नवीन वीज उपकेंद्राचा प्रस्ताव मंजूर होण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. १० फेब्रुवारी रोजी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा मुद्दा मांडून २२० केव्हीच्या या नवीन वीज उपकेंद्रास मान्यता मिळविली. लवकरच तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून वीज उपकेंद्राच्या प्रत्यक्ष कामास प्रारंभ होणार असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

३३ केव्ही आणि २८ किमीच्या नेर-दारव्हा थेट वीज मार्गास मंजुरी

नेर शहराला सध्या ३३ केव्हीच्या उपकेंद्राद्वारे वीज पुरवठा करण्यात येत आहे. मात्र शहरात वीजेची मागणी लक्षणीय वाढल्याने या केंद्रावर दाब येत आहे. नेर येथे २२० केव्हीच्या नवीन वीजउपकेंद्रास मान्यता मिळाली असतानाच दारव्हा येथून नेरपर्यंत थेट वीज पुरवठा करण्यासाठी नवीन वीजमार्ग टाकण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. ४ कोटी ३३ लाख रूपये खर्चून दारव्हा ते नेर हा थेट २८ किलोमीटरचा, ३३ केव्हीचा नवीन वीज मार्ग टाकण्यात येणार आहे. सध्या अस्तित्वात असलेला मार्ग हा दारव्हा व्हाया लाडखेड असा फिरून येत असल्याने नेर येथे वीज पोहचेपर्यंत ती अनेक ठिकाणी वितरित होते. त्यामुळे दारव्हा येथून थेट नेर शहराला अखंडित वीज पुरवठा झाल्या विद्युत पुरवठा वारंवार खंडित होण्यासंदर्भात असलेल्या तक्रारी यापुढे राहणार नाहीत. तत्काळ प्रभावाने येत्या महिन्याभरात दारव्हा-नेर या विशेष वीजवाहक मार्गाचे काम सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

 

February 11, 2015 in विदर्भ