
वणी (यवतमाळ), दि़ ९ – वणी येथील दिपक टॉकिज परिसरातील प्रेमनगर नावाने परिचित असलेल्या वारांगणा वस्तीत ८ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत पाच घरे भस्मसात झाली. यामध्ये ५० वर्षीय महिलेसोबतच ५ वर्षीय बालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून लाखो रुपयाच्या रोख रकमेसह साहित्य जळून खाक झाले़
येथील वारांगणा वस्तीमध्ये ४० कच्या स्वरुपाचे घरे आहेत़ मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये देहविक्रिचा व्यवसाय केल्या जातो़ परप्रांतातून येथे मुलींना आणून मालक अथवा मालकीन त्यांच्याकडून व्यवसाय करवून घेतात़ मध्यरात्रीनंतर होणाºया त्रासामुळे त्यांना आत कोंडून दाराला बाहेरुन कुलूप लावण्यात येते़ ८ फेब्रुवारीच्या मध्यरात्री अचानक त्या घराला आग लागली़ यामुळे चंदा लोणारे हिने घरातूनच आरडाओरड केला़ आगीने रौद्ररुप धारण केले तीच्या किंचाळीने बाजूच्या घरात राहणाºया वारांगणांनी दार तोडून पळ काढला़ परंतू चंदा लोणारेच्या घराला बाहेरुन कूलूप लावून असल्याने तीला बाहेर पडता आले नाही़ यावेळी तीने दत्तक घेतलेला ५ वर्षीय अजय पेंन्दोर हा मुलगा होता या दोघांचा घटनास्थळीच जळून मृत्यू झाला़
लागलेल्या आगीने रौद्ररुप धारण करत त्या घराला लागून असलेल्या ५ ते ६ घरांना विळखा घातला़ त्यातच लगत असणाºया घरातील सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे आग पुन्हा भडकली़ आगीच्या तांडवामध्ये तेथे वास्तव्यास असलेल्या वारांगणांचे रुपये, सोने, मौल्यवान वस्तू, घरातील पंखे, फ्रिज व महत्वपूर्ण साहित्य जळून खाक झाले़ यावेळी प्रत्यक्षदर्शीना विचारणा केली असता लाखो रुपयाचे साहित्य जळाल्याचे त्यांनी सांगीतले़ लागलेल्या आगीची सुचना स्थानिक पोलीस प्रशासनाला देण्यात आली़ घटनास्थळावर ठाणेदारासह पोलीस कर्मचारी पोहचले़ अग्नीशामक दलाला पाचारण करण्यात आले़ रात्री उशीरा पर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले़ परंतू या आगीमध्ये १० ते १५ लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे़ वारांगणा वस्तीतील लागलेल्या आगीची बातमी समजताच आ़संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी घटनास्थळी धाव घेतली़ मात्र महसुल प्रशासनाच्या अधिकाºयांना आगीबाबतची माहिती आमदारांना सांगावी लागली़ त्यानंतर तहसिलदार आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचले़ महसुल विभागाने घटनास्थळाचा पंचनामा केला परंतू या आगीमध्ये सर्वस्व हीरावल्याने आता जगायचे कसे असा प्रश्न वारंगणापुढे उभा ठाकला आहे़
Archive for February 9th, 2015
0
वारंगणा वस्तीत आग, महिलेसह बालकाचा मृत्यू
0
लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ््यात

यवतमाळ, दि. ९ – विहिर नसल्याचा दाखला देण्यासाठी शेतकºयाला साडेतीन हजार रुपयांची लाच मागणारा तलाठी आज सोमवारी एसीबीच्या जाळ््यात अडकला. हि घटना केळापूर तहसील कार्यालयात घडली असून, संतोष सुखदेव मराठे (४०) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे.
केळापूर तहसील कार्यालयाअंतर्गत येणाºया किन्हाळा येथे संतोष मराठे तलाठी म्हणून कार्यरत होता. शेतकरी महिलेने शेतात विहिर नसल्याचा दाखला व सातबारा मिळण्याबाबत तलाठ्याकडे अर्ज केला होता. महिलेला दाखला व सातबारा देण्याची गरज असताना, तलाठी महिलेला त्रास देत होता. दरम्यान त्याने दाखला व सातबारा देण्यासाठी महिलेकडे ३ हजार ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकरी महिलेने तालाठ्याला धडा शिकविण्यासाठी लाच देण्यास होकार देऊन लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे कायालय गाठले व तलाठी लाच मागत असल्याबाबतची तक्रार केली. ठरल्यानुसार लाचेची रक्कम देण्यासाठी आज सोमवारी महिला केळापूर येथे आली. तलाठी लाच स्विकारत असताना, सापळा रचून बसलेल्या एसीबीने त्याला रंगेहात पकडले. हि कारवाई पोलीस उपअधिक्षक सतिष देशमूख, पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, नंदकुमार जामकर, गजानन राठोड, अनिल राजकुमार, शैलेश ढोणे, अमोल महल्ले, निलेश पखाले, प्रकाश शेंडे, नरेंद्र इंगोले, भारत चिरडे, किरण खेडकर, अरूण गिरी आदींनी केली.
0
एकतर्फी प्रेमातून महिला तहसीलदार अपहरण

दापोली : एकतर्फी प्रेमातून तहसील कार्यालयात घुसून तहसीलदार कल्पना गोडे यांना शिवीगाळ आणि मारहाण करीत त्यांचे अपहरण केल्याप्रकरणी प्रफुल्ल युवराज वीर (२७) याला पोलिसांनी रविवारी अटक केली. शनिवारी घडलेल्या या प्रकरणाबाबत तहसीलदार गोडे यांनीच फिर्याद दिली आहे.
शनिवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास तहसील कार्यालयात प्रफुल्ल युवराज वीर (मुळचा पुण्याचा) हा तहसील कार्यालयात आला आणि त्याने थेट तहसीलदार गोडे यांचे दालन गाठले. त्या ठिकाणी गोडे व प्रफुल्ल यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर आक्रमक होऊन प्रफुल्लने गोडे यांच्या टेबलावरील साहित्याची फेकाफेक करीत त्यांना शिवीगाळ व मारहाणही केली. त्यानंतर त्यांना जबरदस्तीने आपल्या गाडीत बसवून तो घेऊन गेला.
तहसील कार्यालयातील कर्मचार्यांनी तत्काळ ही घटना पोलिसांना कळविली. महिला तहसीलदाराचे अपहरण झाल्याचे समजताच नाकाबंदी करण्यात आली. ही गाडी पोलिसांनी वाटेतच अडविली. मात्र, त्यावेळी गोडे यांनीच आपला हा खासगी प्रश्न असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी अधिक चौकशी न करता गाडी सोडून दिली. नंतर गोडे यांनी रविवारी कोथरूड (जि. पुणे) पोलीस ठाण्यात या घटनेबाबत फिर्याद दाखल केली. त्यानंतर हा गुन्हा दापोली पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
0
मुख्यालयी न राहणाऱ्या डॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांवर कार्यवाही

वैद्यकीय महाविद्यालय व उपजिल्हा रुग्णालयांना सीसीटीव्ही, आरोग्य सेवेच्या प्रश्नांवर 12 फेब्रुवारीला मुंबईत बैठक
यवतमाळ, दि.9 : आरोग्य सुविधा सर्वसामान्यांशी निगडीत अशी बाब आहे. परंतु अनेक ठिकाणी वैद्यकीय अधिकारी तथा आरोग्य कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचा रुग्णांच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहणे आवश्यक आहे. मुख्यालयी उपस्थितीबाबत ग्रामपंचायतींचे अभिप्राय मागितले जातील. अभिप्रायात अनुपस्थिती दर्शविण्यात आली असल्यास संबंधितांवर कार्यवाही करण्यात येईल,असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील गार्डन हॉल येथे जिल्ह्यातील आरोग्य सुविधा, कृषी तसेच पशु, मत्स्य व दुग्ध व्यवसाय विभागाचा स्वतंत्र आणि सविस्तर आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांच्यासह आरोग्य, कृषी संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित डॉक्टर्स रुग्णालयांमध्ये उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांची मुख्यालयातील उपस्थिती तपासण्याचे काम तालुका आरोग्य अधिकाऱ्यांवर सोपविण्यात यावे. यासोबतच ग्रामपंचायतीकडून अभिप्राय मागविल्या जातील, असे पालकमंत्री म्हणाले. पीएचसी व ग्रामीण रुग्णालयात प्रसुतीच्या सुविधा उपलब्ध असतांना सरसकट वैद्यकीय महाविद्यालयात असे पेशंट रेफर केले जातात. त्यामुळे महाविद्यालयातील रुग्णांची संख्या अचानक वाढल्याने जिल्हा रुग्णालयावर ताण येत आहे. वास्तविक पाहता स्थानिक स्तरावरच प्रसुती होणे अपेक्षीत असतांना व आवश्यकता नसतांना पेशंट रेफर करणाऱ्या डॉक्टरांवर कार्यवाही करण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी केल्या. जिल्हा रुग्णालयात अशाप्रकारे रेफर करण्यात आलेल्या रुग्णांची स्वतंत्र नोंदणी करण्याबाबतही त्यांनी सुचविले.
आरोग्य व्यवस्थेवर देखरेख ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे अतिशय चांगले माध्यम आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील तीन उपजिल्हा रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालयास जिल्हा वार्षीक
योजनेतून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी तसेच महाविद्यालयाच्या व्याख्यान कक्षेसाठी 44 लाख रुपये लवकरच उपलब्ध करून देवू, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांच्या नियमित उपस्थितीसह जिल्ह्यातील एकूणच आरोग्य व्यवस्थेचा चेहरा-मोहरा एका महिन्यात बदलविण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या. वैद्यकीय महाविद्यालयातील 150 प्रवेश क्षमतेप्रमाणे बांधकामासाठी 112 कोटी, पंतप्रधान स्वास्थ सुरक्षा योजनेअंतर्गत 150 कोटींचा आराखडा, ब्लड कॉम्पोनंट युनिट, रुग्णालयांचे विस्तारीकरण, महिला व शिशु रूग्णालयाचे बांधकाम, ब्लड सेफ्टी व ट्रामा केअर युनिट याबाबी तातडीने मार्गी लावण्यासाठी 12 फेब्रुवारी रोजी मुंबई येथे आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विशेष बैठक घेवून निर्णय घेतले जातील, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. वैद्यकीय महाविद्यालयातील परिसरातील मैदानाचा विकास करण्यासोबतच रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी चांगली सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी परिसरात असलेली धर्मशाळा चांगल्या संस्थेला चालवायला देण्याबाबत त्यांनी सांगितले. दारव्हा येथील रुग्णालय 100 खाटांचे करण्यासोबतच दिग्रसच्या रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याबाबतही चर्चा झाली. यावेळी कृषी विभागाच्यावतीने येत्या 5 वर्षात राबविण्यात येणारा आराखडा तसेच उत्पादकता वाढविण्यासंदर्भात पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. पशु, दुग्ध व मत्स्य व्यवसाय विभागाचा आढावा घेतला असून याबाबत पुन्हा स्वतंत्र आढावा बैठक घेण्याबाबत त्यांनी सुचविले.
0
गणगांव येथे मतिमंद मुलीवर बलात्कार

आर्णी दि,9- तालुक्यातील गणगांव येथे सोमवारच्या दुपारी 4:30 वाजता दरम्यान स्वच्छविधीला गेलेल्या 35 वर्षीय अविवाहीत मतिमंद मुलीवर गांवातीलच आरोपीने बलात्कार केल्याची घटना घडली.संजय अंनदराव खैरे वय 45 वर्ष रा,गणगांव असे बलात्कार करणार्या आरोपीचे नांव असुन गांवातीलच मतिमंद असलेल्या अविवाहित मुलीवर याने गावा बाहेर स्वच्छविधीला गेल्याचा फायदा घेवुन बलात्कार केला.पिडीत मुलगी ही मतिमंद असल्याने ति अविवाहित आहे.सोमवार ला दुपारी 4:30 वाजता दरम्यान एकटी गावाच्या बाहेर स्वच्छविधी ला गेली होती.त्याचा फायदा घेत आरोपी नामे संजय खैरे यांनी तिच्यावर बलात्कार केला असे पिडीतची आईने आर्णी पोलीसात फिर्यादीत नमुद केले असुन आरोपी विरोधात कलम 376 नुसार गुन्हा दाखल केला आहे.यातील आरोपीला पोलीसांनी अटक सुध्दा केली आहे.
0
काँग्रेसचा रास्तारोको, एक तास वाहतूक ठप्प
यवतमाळ, दि. ९ – शेतकरी दुष्काळाच्या दुष्ट चक्रात होरपळत आहे. त्यांना दिलासा देण्याऐवजी सरकार शेतकरी विरोधी निर्णय घेत असल्याचा आरोप करीत आज सोमवारी जिल्हा काँग्रेस कमेटीच्यावतीने पांढरकवडा बायपासवर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. सरकारविरोधी नारेबाजी करीत काँग्रेसने तब्बल एक तास वाहतूक रोखून धरत संताप व्यक्त केला.
यंदा पावसाने अवकृपा दाखविल्याने खरीप हंगाम हातातून गेला आहे. दुबार, तिबार पेरणीमूळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. पीकाचा उतारा कमी आल्याने कर्ज कसे फेडायचे याची चिंता शेतकºयांना सतावत असून, या विवंचनेत शेतकरी आत्महत्या करीत आहे. अशा स्थितीत शेतकºयांना धीर देण्याची गरज असताना, सत्ताधारी सरकार शेतकºयांना नागविण्याचे काम करीत आहे. शेतकºयांना मदत जाहिर करण्यात आली आहे, मात्र ती तोकडी व शेतकºयांची थट्टा करणारी आहे. दोन हेक्टरची मर्यादा घालून ४० टक्के शेतकºयांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. भू-संपादनाच्या प्रक्रियेत बदल करण्यात आला असून, शेतकºयांच्या जमिनीची दर शासन ठरविणार असल्याने शेतकºयांचे नुकसान होणार आहे. शासन शेतकºयांच्या हिताचे निर्णय घेण्याऐवजी विरोधी निर्णय घेत असल्याचा आरोप करीत आज जिल्हा काँग्रेस कमेटीने पांढरकवडा मार्गावर रास्तारोको केला. यावेळी चारही मार्गाची वाहतूक विस्कळीत झाली होती. सरकारविरोधी नारेबाजी करीत शेतकºयांच्या हिताचे निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी जिल्हाध्यक्ष वामन कासावार, माजी सामाजिक न्यायमंत्री अॅड. शिवाजीराव मोघे, माजी राज्यमंत्री संजय देशमूख, राहुल ठाकरे, अशोक बोबडे, देवानंद पवार, विजया धोटे, तातू देशमूख, अशोक धवड, दिनेश गोगरकर, अनिल गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना स्थानबद्घ केले.
0
अफझलची फाशी चूकच: थरूर
नवी दिल्ली – ‘संसद हल्ल्यातील दोषी अफझल गुरूला फाशी देणे चुकीचे होते, हे प्रकरण तेव्हा चुकीच्या पद्धतीने हाताळण्यात आले’, असे धक्कादायक विधान करत काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी तत्कालीन काँग्रेस सरकारच्या निर्णयाला लक्ष्य केले आहे.
दहशतवादी अफझल गुरूच्या फाशीला आजच दोन वर्षे पूर्ण होत असताना थरूर यांनी आपल्याच सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. थरूर यांनी ट्विटरच्या माध्यमातून मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारला घरचा आहेर दिला आहे. गुरूला फाशी देण्याचा निर्णय यूपीए सरकारने घेतला तेव्हा गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे होते. गुरूच्या फाशीवरून तेव्हा काश्मिरमध्ये तणाव निर्माण झाला होता. आता दोन वर्षांनंतर या फाशीप्रकरणावरील खपले पुन्हा एकदा काढण्यात आली आहेत.
काश्मीरमधील पाच काँग्रेस आमदारांनी अफझल गुरूला दिलेली फाशी ही चूक होती, असे निवेदन जारी केल्यानंतर पाठोपाठच शशी थरूर यांनी या निवदेनाची री ओढून नव्या वादाला फोडणी दिली आहे. ‘माझ्या मते दोन वर्षांपूर्वी अफझलच्या बाबतीत जे घडले ते चुकीचे होते आणि चुकीच्या पद्धतीने त्या प्रकरणाचा निपटारा करण्यात आला. फाशी देण्याआधी त्याच्या कुटुंबाला कल्पना द्यायला हवी होती, शेवटची भेट घेण्याची संधी मिळायला हवी होती आणि त्याचे पार्थिव कुटुंबीयांच्या स्वाधीन व्हायला हवे होते, पण यापैकी काहीच झाले नाही’, असे ट्विट थरूर यांनी केले आहे.
0
फुटबॉल सामन्यावेळी संघर्षात ३० जण ठार

कैरो – फुटबॉलसाठी टोकाचे वेड असलेल्या इजिप्तमध्ये इजिप्शियन प्रीमिअर लीगमधील एका फुटबॉल सामन्यावेळी पोलिस आणि फुटबॉलप्रेमींमध्ये झालेल्या संघर्षात ३० जण मृ्त्युमुखी पडले तर, अनेक जण जखमी झाले. स्टेडिअममध्ये घुसू पाहणाऱ्या प्रेक्षकांना पोलिसांनी अटकाव केल्याने हा संघर्ष झाला.
कैरोतील एअर डिफेन्स स्टेडिअममध्ये ‘झामालेक’ आणि ‘ईएनपीपीआय’ या क्लबमध्ये सामना होता. ‘सामना सुरू होण्यास काही वेळ बाकी असताना ‘झामालेक’चे समर्थक असलेल्या ‘अल्ट्राज व्हाइट नाइट्स’ या ग्रुपचे सुमारे १० हजार कार्यकर्ते विनातिकीट स्टेडियममध्ये घुसण्याचा प्रयत्न करीत होते. पोलिसांनी त्यांना अटकाव केल्यानंतर फुटबॉलप्रेमी आणि पोलिसांत संघर्ष झाला. फुटबॉलप्रेमींनी रस्ता रोखला; तसेच पोलिसांचे एक वाहन पेटवून दिले. त्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या’ असे इजिप्तच्या गृह मंत्रालयाने म्हटले आहे. अश्रुधुरामुळे गुदमरल्याने अनेकांचा मृत्यू झाला, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
या सामन्यानंतर स्पर्धा तातडीने अनिश्चित काळासाठी थांबविण्यात आली आहे. ही स्पर्धा या पुढे होण्याची शक्यता अंधुकच आहे. दंगलीप्रकरणी १७ जणांना अटक करण्यात आली आहे.
0
… तर केजरीवालांना गोळी घालू – स्वामी ओम

नवी दिल्ली, दि. ९ – अरविंद केजरीवाल यांनी देशविरोधी काम करणे थांबविले नाही तर त्यांना आम्ही गोळया घालू असे वादग्रस्त वक्तव्य हिंदु महासभेचे नेते स्वामी ओम यांनी केले आहे. विशेष म्हणजे स्वामी ओम यांनी केजरीवाल यांच्याविरुध्द दिल्लीत निवडणूक लढविली असून या निवडणुकीचा निकाल उद्या लागणार आहे.
स्वत:ला हिंदु महासभेचे नेते म्हणवून घेणा-या स्वामी ओम यांची मुलाखत असलेला एक व्हिडिओ यूट्युबवर व्हायरल झाला आहे. या मुलाखतीत त्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. महात्मा गांधी यांच्यावर गोळ्या झाडल्या, हिंदू महासभा आमची पार्टी असून नथूराम गोडसे हे आमच्याच पार्टीतील होते. महात्मा गांधी यांनी देशाचे तुकडे पाडण्याचे काम केले त्यामुळे त्यांच्यावर गोळया झाडल्या. आगामी काळात जो कोणी देशविरोधी कारवाया करेल त्यांना आधी प्रेमाने समजवण्यात येईल नंतर मात्र त्यांना गोळया घालू असे स्वामी म्हणाले. केजरीवाल यांना याआधी प्रेमाने समजावून सांगितले आहे आता जर त्यांनी ऐकले नाही तर त्यांना थेट गोळी घालू. विधानसभा निवडणुकीत आपण उभे राहिलो याचे कारण सांगताना स्वामी म्हणाले की, अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस यांच्या मतांची विभागणी होवून भाजपाची उमेदवार नूपुर शर्मा यांना त्याचा थेट फायदा व्हावा हा उद्देश होता. आपल्यासोबत आसाराम बापू आणि हिंदू महासभेचे कार्यकर्ते यांच्यासह १८ लाख लोकांचे समर्थन असल्याचा दावा करतानाच भाजपा ही आपलीच पार्टी असून २००४ ते २०१४ या काळात आपण नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनविण्यासाठी काम केल्याचा दावा स्वामी यांनी केला आहे. (साभार- दै. लोकमत आॅनलाईन आवृत्ती)











