पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for February 13th, 2015

केजरीवालांचे मंत्रिमंडळ 0

केजरीवालांचे मंत्रिमंडळ

download (1)
नवी दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवणा-या आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल शनिवारी ऐतिहासिक रामलीला मैदानावर दुस-यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
जनलोकपाल विधेयकाच्या मुद्यावरुन अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर बरोबर वर्षभराने केजरीवाल पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. अरविंद केजरीवाल यांच्याबरोबर आणखी सहा जण मंत्रीपदाची शपथ घेतील.
वित्त, ऊर्जा ही महत्वाची खाती केजरीवाल आपल्याकडे ठेवतील अशी शक्यता आहे. केजरीवाल यांचे विश्वासू मनीष सिसोदीया उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. सार्वजनिक बांधकाम खाते, शहर विकास आणि शिक्षण ही महत्वाची खाती सिसोदीयांकडे येण्याची शक्यता आहे.
जितेंद्र सिंह तोमर – कायदा
संदीप कुमार – महिला आणि बाल कल्याण
मनीष सिसोदीया – सार्वजनिक बांधकाम खाते, शहर विकास आणि शिक्षण
सत्येंद्र जैन – आरोग्य आणि उद्योग
असीम अहमद खान – अन्न
गोपाळ राय – वाहतूक आणि कामगार

February 13, 2015 in मुख्य पान
पेशावरमध्ये दहशतवादी हल्ला, १९ जण ठार 0

पेशावरमध्ये दहशतवादी हल्ला, १९ जण ठार

terrorist
इस्लामाबाद – लष्करी शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी ताज्या असतानाच पेशावर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने हादरले आहे. पेशावरमधील शिया मशिदीवर शुक्रवारी काही अज्ञात दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात आतापर्यंत १९ जण ठार तर ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत.
पेशावरमधील हयातबाद येथील शिया मशिदीमध्ये नमज पठण सुरु असताना हा हल्ला कऱण्यात आला. यावेळी तीन साखळी स्फोट घडवून आणले तसेच गोळीबारही कऱण्यात आला. यामध्ये १० भाविक ठार झाले तर ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, मशिदीमध्ये अद्याप काही दहशतवादी असून सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु असल्याचे वृत्त आहे.
याआधी गेल्या वर्षी १६ डिसेंबर रोजी पेशावरमधील लष्करी शाळेत दहशवातवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सुमारे १५० जण ठार झाले होते. यामध्ये १३६ विद्यार्थ्यांचा समावेश होता.

 

आसाराम बलात्कारप्रकरणातील साक्षीदारावर कोर्टाबाहेर हल्ला 0

आसाराम बलात्कारप्रकरणातील साक्षीदारावर कोर्टाबाहेर हल्ला

asaram--rape-victim
जोधपूर, दि. १३ – एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या आसाराम बापूच्या एका भक्ताने साक्षीदारावर चाकूने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी जोधपूरमध्ये घडली. या हल्यात साक्षीदार जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
बलात्कार प्रकरणाचा तपास सध्या जोधपूर कोर्टात सुरू आहे. शुक्रवारी सुनावणीनंतर राहुल के सच्चान हा साक्षीदार कोर्टाच्या बाहेर पडताच सत्यनरीन या तरुणाने हातातील चाकूने सच्चान याच्यावर हल्ला चढवला. सच्चान यांच्या पाठीत दोनदा चाकूने वार केल्याने सच्चान जखमी झाला. पोलिसांनी तात्काळ सच्चानला सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची माहिती पोलीस उपआयुक्त (कायदा आणि व्यवस्था )कैलाश संधू यांनी दिली. आपल्यावर हल्ला करणारा हा आसाराम यांच्या आश्रमातील मदतनीस असल्याचे राहुल सच्चान यांनी सांगितले. हल्ला करणा-या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करण्यात येत असल्याचे संधू यांनी सांगितले. दरम्यान, अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरुन आसाराम यांना सप्टेंबर २०१३ साली अटक करण्यात आली असून त्यानंतर जोधपूरच्या सेंट्रल जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.

 

February 13, 2015 in देश-विदेश
देहविक्रय अड्ड्यावर एलसीबीची धाड, दोन मुलीसह एक अटकेत 0

देहविक्रय अड्ड्यावर एलसीबीची धाड, दोन मुलीसह एक अटकेत

repd
आर्णी, दि. १३ – शहरात सुरू असलेल्या देहविक्रय अड्ड्यावर धाड टाकून दोन मुलींसह एका जणाला अटक केली. ही कारवाई यवतमाळ येथील एलसीबीच्या पथकाने आज दुपारी ३.३० वाजता दरम्यान बसस्थानक परिसरात केली.
नगर परिषदेच्या मागील परिसरात मागील काही वर्षापासून देहविक्रय अड्डा सुरू आहे. याबद्दल स्थानिक पोलिसांकडे तक्रार करून देखील कोणतीही कारवाई करण्यात येत नव्हती. अल्पवयीन मुलींना या देहविक्रय अड्ड्यावर आणून त्यांच्याकडून व्यवसाय करून घेतल्या जातो. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली. यावेळी दोन मुलींसह मालक सुनिल वामनराव गायकवाड रा. गांधीनगर याला अटक करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे देहविक्रय अड्डा चालविणारा व्यक्ती दुसराच असून कारवाईची गंभीरता कमी करण्यासाठी दुसºयाच व्यक्तीला मालक म्हणून समोर करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेने याप्रकरणाची सखोल चौकशी केल्यास मुख्यसूत्रधार हाती लागू शकले, अशी चर्चा आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजय पुज्जलवार, चंद्रशेखर कडू, गजानन अजमिरे, रुषी ठाकूर, आशीष भुसारी, किरण पडघण, अमोल चौधरी, अर्चना मेश्राम आदींनी केली.
प्रेमनगरात रात्री उशीरापर्यंत देहविक्रय व्यवसाय सुरू असल्याने १८ महिलांना मध्यरात्री अटक करण्यात आली होती. न्यायालयासमोर हजर केले असता जामिन मंजूर करण्यात आला. या कारवाईमुळे देहविक्रय अड्डा चालविणाºया मालकांचे धाबे दणाणले आहे.

 

February 13, 2015 in विदर्भ
जमादार एसीबीच्या जाळयात 0

जमादार एसीबीच्या जाळयात

images (6)
अटक टाळण्यासाठी मागीतली लाच
महागांव, दि. १३ – विवाहीतेचा छळ करणाºया सहा आरोपींची अटक टाळण्यासाठी लाच ९ हजार रुपये लाच स्विकारणाºया जमादाराला आज रंगेहात पकडले. यवतमाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज ही कारवाई केली.
जमादार विष्णू सखाराम कोरडे (४५), वसंता रामजी घोडेकर (५८) अशी लाचखोरांची नावे आहे. गजानन उत्तम राठोड रा. पिपरी इजारा याच्या भावाचे लग्न टाकळी येथील एका मुली सोबत एक वर्षापुर्वी झाले होते. काही दिवस संसार सुखात सुरू होता. दरम्यान शुल्लक कारणावरूण पती-पत्नीमध्ये भांडण होत होते. त्यानंतर सासरच्या सहा जणांनी शारीरीक व मानसिक छळही सुरु केला होता. याप्रकरणी महागाव पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. याप्रकरणी गजानन राठोड यांचे आई-वडील, भाऊ, पत्नी यांना गुन्हयामध्ये लॉकअप मध्ये टाकत नाही, हातकडी लावुन न्यायालयात नेत नाही, जमानत करूण देतो या कामासाठी मुडाणा बिटचे जमादार विष्णू कोरडे यांनी तक्रारदार गजानन राठोड यांच्याकडे ९ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. ठरल्याप्रमाणे आज शुक्रवारी जनता हाऊस जवळील रोहीदास टी सेंटर येथे वसंता घोडेकर यांच्या मार्फत रक्कम स्विकारली. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचुन जमादारसह पैसे स्विकारणाºया इसमास रंगेहात अटक केली. ही कारवाई उपअधीक्षक सतिश देशमुख व पथकाने केली.

 

February 13, 2015 in विदर्भ
स्वाईन फ्ल्यू : भितीपेक्षा सतर्कता बरी 0

स्वाईन फ्ल्यू : भितीपेक्षा सतर्कता बरी

images
यवतमाळ दि.13 : एच 1, एन 1 या विषाणू पासून पसरणाऱ्या स्वाईन फ्ल्यू या संसर्गजन्य आजाराचे रुग्न गेल्यावर्षी प्रमाणे या वर्षीही राज्यात पुणे, औरंगाबाद, नागपूरसह अन्य काही भागात कमी अधिक प्रमाणात आढळून आले आहे. या आजाराची भिती न बाळगता सतर्क राहण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
स्वाईन फ्ल्यू हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे संसर्गापासून दुर राहण्यासाठी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. ताप, घसा दुखणे, खोकला, नाक गळणे, अंग दुखी, डोके दुखी ही या आजाराची लक्षणे आहेत. लक्षणानुसार अशा रुग्नांची तिन प्रकारे वर्गवारी करण्यात आली आहे. पहिल्या वर्गवारीत 38 डिग्री सेल्सीयसपेक्षा कमी म्हणजे सौम्य ताप, खोकला, घशाला खवखव, अंगदुखी, डोके दुखी, जुलाब, उलट्या या लक्षणांचा समावेश होतो. दुसऱ्या वर्गात वरील लक्षणाशिवाय तिव्र घसा दुखी, घशाला सुज व 38 डिग्री सेल्सीयसपेक्षा जास्त ताप तर तिसऱ्या लक्षणात वरील लक्षणाशिवाय धाप लागणे, छातीत दुखणे, खोकल्यावाटे रक्त पडणे, रक्तदाब कमी होणे, मुलांमध्ये चिडचीड, झोपाळूपणा, नखे निळसर काळी होणे या लक्षणांचा समावेश आहे. अशी लक्षणे आढळून आल्यास जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेशी संपर्क साधने आवश्यक आहे. स्वाईन फ्ल्यू हा आजार होवू नये म्हणून वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धूने, शिंकतांना व खोकतांना नाका तोंडावर रुमाल धरणे, पौष्टीक आहार, लिंबु, आवळा, मोसंबी, संत्री, पालेभाज्या यासारख्या पदार्थांचा आहारात वापर आवश्यक आहे. याशिवाय धुम्रपान टाळून पुरेशी झोप आणि विश्रांती, भरपूर पाणी पिणे फायदेशिर आहे. शक्यतोवर हस्तांदोलन करु नये. सार्वजनिक ठिकाणी थूंकू नये तसेच वापरलेले मास्क इतरत्र फेकने टाळावे. डॉक्टरांच्या सल्याशिवाय औषधी घेवू नये. फ्ल्यूची लक्षणे आढळल्यास गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. हा आजार होवू नये म्हणून 5 वर्षा खालील मुले, 65 वर्षा वरील नागरीक, गरोदर माता, उच्च रक्तदाब किंवा हृदयरोग, मधुमेह, फुफुस, यकृत याने आजारी असणाऱ्या व्यक्ती प्रतिकार शक्ती कमी झालेल्या व्यक्ती, दिर्घकाळ स्टिरॉईड घेणाऱ्या व्यक्ती यांनी स्वाईन फ्ल्यू पासून विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. या आजारासाठी शासकीय रुग्नालयात औषधी उपलब्ध असून रुग्नांनी आजार झाल्यास घाबूरन न जाता त्यावरील प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करावा, असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कळविले आहे.

 

February 13, 2015 in विदर्भ
जिल्ह्यात 2 लाख 24 हजार शेतकऱ्यांना दुष्काळी मदतीचे वाटप 0

जिल्ह्यात 2 लाख 24 हजार शेतकऱ्यांना दुष्काळी मदतीचे वाटप

images (1)
यवतमाळ दि.13 : गेल्या खरीप हंगामात चांगले पर्जन्यमान न झाल्याने जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट ओढवले. जिल्ह्याची उत्पादन क्षमता घसरली. पर्यायाने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणवर नुकसान सोसावे लागले. शासनाने दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे जिल्ह्यातील 2 लाख 24 हजार शेतकऱ्यांना या मदतीचे वितरण करण्यात आले आहे. जिल्ह्याला पहिल्या टप्यात दि. 8 जानेवारी रोजी मदत वितरीत करण्यासाठी 122 कोटी 80 लक्ष रुपये प्राप्त झाले होते. गेल्या काही दिवसांपासून सदर निधींचे वाटप मोठ्या प्रमाणवर सुरु आहे. दुसऱ्या टप्यात जिल्ह्याला नुकतेच 121 कोटी 61 लाख रुपये प्राप्त झाले आहे. दोन्ही टप्पे मिळून जिल्ह्यास एकूण 244 कोटी 41 लाख रुपये प्राप्त झाले असून आतापर्यंत यातील 120 कोटी रुपये 2 लाख 24 हजार शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले आहे.
जिल्ह्यात एकूण 4 लाख 47 हजार इतके शेतकरी दुष्काळी मदतीस पात्र असून त्यांना मदत वितरीत करण्यासाठी 625 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यापैकी बहुतांश निधी प्राप्त झाला असून त्याचे वाटप शेतकऱ्यांचा बँक खात्यात रक्कम जमा करुन सुरु आहे. आतापर्यंत यवतमाळ तालुक्यातील 14052 शेतकऱ्यांना 8 कोटी, कळंब 12178 शेतकऱ्यांना 6 कोटी 75 लाख, बाभुळगाव 10932 शेतकऱ्यांना 5 कोटी 91 लाख, आर्णी 12974 शेतकऱ्यांना 7 केाटी 80 लाख, दारव्हा 15278 शेतकऱ्यांना 9 कोटी 6 लाख, नेर 13552 शेतकऱ्यांना 7 कोटी 60 लाख, दिग्रस 10972 शेतकऱ्यांना 5 कोटी 98 लाख, पुसद 18443 शेतकऱ्यांना 9 कोटी 51 लाख रुपयांची मदत वितरीत करण्यात आली आहे. उमरखेड तालुक्यतील 15363 शेतकऱ्यांना 7 कोटी 17 लाख, महागाव 13658 शेतकऱ्यांना 6 कोटी 98 लाख, राळेगाव 15265 शेतकऱ्यांना 8 कोटी 34 लाख, घाटंजी 16042 शेतकऱ्यांना 8 कोटी 43 लाख, केळापूर 162777 शेतकऱ्यांना 6 कोटी 82 लाख, झरीजामणी 9280 शेतकऱ्यांना 5 कोटी 84 लाख, वणी 17720 शेतकऱ्यांना 9 कोटी 27 लाख तर मारेगाव तालुक्यातील 12234 शेतकऱ्यांना 6 कोटी 10 लाख याप्रमाणे 2 लाख 24 हजार शेतकऱ्यांना 120 कोटी रुपयांच्या मदतीचे वितरण करण्यात आले आहे.

 

 

February 13, 2015 in विदर्भ
५ फेब्रुवारीला ‘प्रयास’ संस्थेतर्फे सेवा संवाद सोहळा 0

५ फेब्रुवारीला ‘प्रयास’ संस्थेतर्फे सेवा संवाद सोहळा

download
साधना कुळकर्णी करणार मार्गदर्शन, व्यसनग्रस्तांचे होणार शंकासमाधान
यवतमाळ – एकवीसाव्या शतकात एकीकडे मुक्त व्यसन करणारी बळावलेली पिढी तर दुसरीकडे व्यसनमुक्तीसाठी आखुडते घेणारी पिढी अशी मोठी दरी तयार झाल्याने व्यसनांचे बळी वाढल्याची वस्तुस्थिती आहे. अत्याधुनिकतेच्या नावाखाली नाना व्यसनांना शरण जात असलेल्या युवापिढीला या गर्तेतुन बाहेर काढण्यासाठी लढणारी महिला यवतमाळकरांशी संवाद साधणार आहे. प्रयास सेवांकुर संस्थेच्या माध्यमातुन १५ फेब्रुवारीला सायंकाळी साडेसहाला नंदुरकर विद्यालयातील श्री सत्यसाई क्रिडारंजन सभागृहात
आयोजित आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना या कार्यक्रमात यवतमाळकरांशी पुणे येथील साधनाताई कुळकर्णी संवाद साधणार आहेत. अमरावती येथील डॉ.अविनाश सावजी देखील आपल्या सेवाकार्याच्या अनुभव कथनातुन व्यसनमुक्त चळवळीला बळ देणार
आहेत. युवापिढीला गिळंकृत करीत चाललेल्या व्यसनांच्या विरोधात दिर्घकाळापासुन लढा देत असलेल्या साधनाताईंचा कष्टप्रद जीवन प्रवास त्या स्वत: उलगडणार आहेत. आपल्या प्रतिभासंपन्न कलाकार पतीला जडलेल्या मद्यपानाच्या वाढत्या आजाराशी लढतांना त्यांना संसारात तथा समाजात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. ओढाताण, चिडचीड, त्रागा, नैराश्य, नकारात्मक भावनांनी जीवन व्यापले असतांना त्यांनी अॅल-अॅनॉन या जागतिक संघटनेच्या माध्यमातुन व्यसनमुक्तीवरील कार्यासाठी
केलेल्या प्रयत्नांची पराकाष्ठा त्या यवतमाळरांसमक्ष विषद करणार आहेत. व्यसनमुक्त होण्यासाठी व्यसनाधीन असलेल्यांनी, त्यांचे कुटुंबियांनी तसेच मित्रमंडळींनी काय करावे आणि काय करु नये यावर सर्वकष चर्चा होणार आहे. या निशुल्क संवाद सोहळ्यात व्यसनमुक्तीसाठी कार्य करणाऱ्यांनी, पिडीतांनी तसेच आपल्या नजीकच्या व्यक्तीला व्यसनमुक्त करु इच्छीणाऱ्यांनी उपस्थित राहावयाचे आवाहन प्रयास तर्फे करण्यात आले आहे.
साधनाताईंचा परिचय…
भुसावळ येथे शालेय तसेच पुणे येथे एमई पर्यतचे उच्चशिक्षण घेतलेल्या साधनाताई कुळकर्णी केंद्रीय जल तथा विद्युत संस्थेत ३० वर्षापासुन शास्त्रज्ञ म्हणुन कार्यरत आहेत. १९८५ मध्ये बाबा आमटे यांचेसमवेत भारत जोडो यात्रेत कन्याकुमारी ते काश्मीर सायकलने प्रवास केला असुन युरेका व लोकविज्ञानमध्ये सक्रीय सहभाग असतो. अॅल-अॅनॉन संघटनेच्या माध्यमातुन व्यसनमुक्तीसाठी अविरत कार्य सुरु आहे.

 

February 13, 2015 in विदर्भ
भारतीयाला मारहाण करणा-या अमेरिकेच्या पोलिसाला अटक 0

भारतीयाला मारहाण करणा-या अमेरिकेच्या पोलिसाला अटक

b13
वॉशिंग्टन- अमेरिकेत पोलिसांच्या मारहाणीमध्ये सुरेश पटेल (५७) यांना अर्धांगवायु झाल्याच्या घटनेसंदर्भात पटेल यांना मारहाण करणा-या पोलीस अधिका-याला अटक करण्यात आली आहे. एरिक पार्कर असे या पोलीस अधिका-याचे नाव आहे.
पार्कर याने पटेल यांना मारहाण केल्याचे चित्रीकरण आणि वृत्त मिडीयात प्रसिद्ध झाल्यानंतर भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली. यानंतर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणाची स्थानिक प्रशासनातर्फे चौकशी करण्यात येईल, असे आश्‍वासन अमेरिकेतर्फे देण्यात आले आहे.

February 13, 2015 in देश-विदेश
सेवकाचा सम्राट होताना सर्वांनीच बघितला - उद्धव ठाकरे 0

सेवकाचा सम्राट होताना सर्वांनीच बघितला – उद्धव ठाकरे

2014_9image_10_06_5439280002014_1image_13_26_122182000udhav-ll-ll
मुंबई, दि. १३ – राजकारणात प्रवेश करताना व निवडणूक लढवताना प्रत्येक जण जनतेचा सेवक असतो. पण सेवकाचा पुढे सम्राट कसा होतो हे जनतेने बघितले आहे असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर कटाक्ष टाकला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाल्याने शिवसेनेच्या गोटात काहीसे आनंदाचे वातावरण असून राज्यातील मंत्रिमंडळात शिवसेना व भाजपा नेत्यांमध्ये पुन्हा संघर्ष सुरु झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सामनाच्या अग्रलेखात भाजपावर टीका केली. नरेंद्र मोदी हे स्वतःला प्रधान सेवक म्हणवून घेतात, आता केजरीवाल स्वतःचे काय बारसे करुन घेतात हे बघायला हवे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. राजकारणात येताना व निवडणूक लढवताना प्रत्येक जण ‘सेवक’ असतो पण त्यानंतर तो सम्राट कसा होतो हे जनतेने बघितले आहे. त्यामुळे केजरीवाल दिल्लीत काय काम करतात याकडे लक्ष लागले आहे असा चिमटाही त्यांनी काढला.
ओबामा दिल्लीत आले तेव्हा नरेंद्र मोदींनी ३० – ३५ लाख रुपयांचा कोट घातल्याची चर्चा होती. आता अरविंद केजरीवाल यांचा मफलरही ब्रँडेड होऊ नये असा टोला ठाकरे यांनी लगावला आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंनी पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू, बुद्धदेव भट्टाचार्य आणि विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे साध्या राहणीमानासाठी कौतुक केले आहे. समाज अनुकरणवादी असून प्रत्येक ‘हिरो’ने जपून पाऊल टाकावे, सेवक तर सर्वच जण असून सेवकपणाचा अतिरेक करु नका. जनता हीच जनार्दन असून जनता पाठिशी आहे या अहंकारातून सर्वांनीच बाहेर पडावे असा उपदेशाचा डोसही उद्धव ठाकरेंनी भाजपा नेतृत्वाला पाजला आहे.

February 13, 2015 in मुख्य पान
बंगळुरु एर्नाकुलम एक्सप्रेसला अपघात, १० ठार 0

बंगळुरु एर्नाकुलम एक्सप्रेसला अपघात, १० ठार

2015-02-13~rail_ns
बंगळुरु, दि. १३ – बंगळुरु एर्नाकुलम इंटरसिटी एक्सप्रेसचे नऊ डबे रुळावरुन घसरल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या अपघातात १० प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून ७० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.
शुक्रवारी सकाळी बंगळुरु एर्नाकुलम इंटरसिटी एक्सप्रेस साडे सहाच्या सुमारास बंगळुरुहून एर्नाकुलमच्या दिशेने निघाली होती. सकाळी साडे सातच्या सुमारास कर्नाटक – तामिळनाडू सीमेवरील एनकेल येथे एक्सप्रेसचे इंजिनसह नऊ डबे रेल्वे रुळावरुन घसरले. अपघातात काही डबे एकमेकांवर चढल्याने प्रवाशांना बाहेर पडणेही अशक्य झाले होते. या अपघातात आत्तापर्यंत ३ प्रवाशांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, मदतकार्याला सुरुवात झाली असून १८ रुग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाला आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
‘सकाळी गाडीत बसल्यावर अनेक जण झोपी गेले होते. मात्र तासाभरानंतर आम्हाला जोरदार आवाज आला. आम्ही कसेबसे ट्रेनच्या बाहेर पडलो आणि नेमके काय झाले ते बघितले. डी ८ आणि डी ९ हे डबे एकमेकांवर चढले होते. या दोन डब्यांमध्येच जास्त प्रवासी अडकले असून सर्वाधिक नुकसान या दोन डब्यांचेच झाले आहे अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शीने दिली.

February 13, 2015 in मुख्य पान