
यवतमाळ, दि. ६ – जिल्ह्यात अनेक व्यावसायिक, सराफा व्यावसायिक, बिल्डराकडून आयकर वाचविण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आयकर विभागाच्या पथकाकडून सर्च मोहीम राबविण्यात येते. गुरुवार पासून पुसद येथे आयकर विभागाच्या पथकाने सर्च मोहीम सुरू केली असून कापड व्यावसायीकांसह सराफा व्यापाºयामध्ये खळबळ उडाली आहे.
कापड, सराफा, फर्निचर यासह विविध व्यावसायिकांद्वारे दैनंदिन व्यवसाय कमी दाखवून आयकर वाचविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यावर आयकर विभागाची करडी नजर असते. मात्र व्यावसायिक स्पर्धेतूनही बरेचदा तक्रारी केल्या जातात. बाजारपेठेत गर्दी असल्याची नेमकी संधी साधून आयकर विभागानेही कारवायांचा सपाटा लावला आहे. नागपूर येथील आयकर विभागाचे उपायुक्ताच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार आणि शुक्रवारी पुसद शहरातील अनेक दुकानामध्ये सर्च मोहीम राबविली. पुसद येथील सुभाष चौक आणि डॉ. आंबेडकर चौकातील दुकानामध्ये सर्च करून बिले, कागदपत्राची तपासणी केली. या सर्च मोहीमेमुळे शहरातील कापड , सराफासह इतर व्यापाºयांचे धाबे दणाणले आहे.
Archive for February 6th, 2015
0
आयकर विभागाचा पुसदमध्ये सर्च
0
ग्रंथोत्सवात विक्रमी 8 लाखांच्या पुस्तकांची विक्री

अमरावती विभागातील विक्रीचा उच्चांक ,ग्रंथागाराच्या पुस्तकांवर वाचकांच्या उड्या
यवतमाळ, दि ६ : येथील नगर भवन येथे आयोजित तीन दिवसीय ग्रंथोत्सवाने पुस्तक विक्रीचा आतापर्यंतचा सर्व खप मागे टाकत संपुर्ण अमरावती विभागात विक्रीचा नवीन उच्चांक गाठला आहे. यावर्षी या तीन दिवसात तब्बल 8 लाखांच्या पुस्तकांची विक्री झाली आहे. शासकीय ग्रंथागाराच्यावतीने उपलब्ध्ा करून देण्यात आलेल्या पुस्तक विक्रीनेही यावर्षी संपुर्ण विदर्भात सर्वाधीक पुस्तके विक्रीचा जिल्हा माहिती कार्यालय, माध्यमिक शिक्षण विभाग व जिल्हा ग्रंथालयाच्यावतीने या ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पुस्तक प्रदर्शन व विक्रीसह ग्रंथोत्सवादरम्यान तिनही दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने दिवसभर वाचक व रसिकांची ग्रंथोत्सवात रेलचेल होती. वाचकांना दर्जेदार पुस्तके उपलब्ध व्हावी म्हणून ग्रंथाली, राजहंस, संस्कृती, मनोविकास ही पुणे येथील पुस्तक प्रकाशकांचे दालणे तसेच लोकवाड्मय गृह मुंबई, संदर्भ प्रकाशन औरंगाबाद, हेमा लॉ बुक धुळे, पॉप्युलर बुक सेंटर अमरावती, यासह नागपुर, चंद्रपुर, वाशिम व स्थानिक पुस्तक विक्रेत्यांची दालणे ठेवण्यात आली होती. ग्रंथोत्सवात पहिल्याच दिवसापासून वाचकांचा चांगला प्रतिसाद लाभल्याने संपुर्ण तीन दिवसात 8 लाख रुपयांचा पुस्तकांची विक्री झाली. गेंल्यावर्षी झालेल्या यवतमाळ ग्रंथोत्सवात ही विक्री 6 लाख इतकी होती. विक्री झालेल्या पुस्तकांमध्ये ग्रंथाली, राजहंस व पॉप्युलरची एकूण विक्री 1 लाख 43 हजार, संस्कृती प्रकाशन, पुणे 1 लाख 45 हजार तसचे मनोविकास प्रकाशन, मुंबई 50 हजार, मध्यम बुक सेंटर, चंद्रपुर 18 हजार, मंगेश प्रकाशन, नागपुर 25 हजार, गुरुप्रसाद, चंद्रपुर 18 हजार, संदर्भ प्रकाशन, औरंगाबाद 26 हजार, महेंद्र बुक, यवतमाळ 10 हजार, नवनीत प्रकाशन 15 हजार, सुधीर वर्धा 15 हजार, युवा बुक यवतमाळ 30 हजार, विद्याधन चंद्रपुर 30 हजार, लोकवाड्मय मुंबई 25 हजार, माय मराठी चंद्रपुर 38 हजार, गजानन बुक एजेंन्सी वाशिम 13 हजार, साईबाबा बुक सेलर चंद्रपुर 25 हजार, हेमा लॉ बुक धुळे 40 हजार, जेबी पुस्तक चंद्रपुर 15 हजार, शासकीय ग्रंथागार नागपुर 92 हजार व अन्य दोन विक्रेत्यांची प्रत्येकी 14 हजार याप्रमाणे 28 हजार अशी पुस्तकांची विक्री झाली.
0
माहिती संचालकपदी देवेंद्र भुजबळ यांची नियुक्ती

यवतमाळ, दि ६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक, माहिती व प्रशासन या पदाचा पदभार देवेंद्र भुजबळ यांनी स्वीकारला. यापूर्वी ते नाशिक विभागाचे माहिती भुजबळ यांनी कोकण विभागाचे उपसंचालक, मंत्रालयात उपसंचालक (वृत्त), रायगडचे जिल्हा माहिती अधिकारी या पदांवर काम केले आहे. महासंचालनालयात येण्यापूर्वी त्यांनी मुंबई दूरदर्शन केंद्रात 6 वर्षे कार्यक्रम निर्मितीचे कामकाज पाहिले आहे. तत्पूर्वी 4 वर्षे ते पत्रकारितेतही होते. पुणे विद्यापीठ पत्रकारितेचा अभ्यासक्रम व पत्रकारिता पदवी अभ्यासक्रमामध्ये त्यांना ‘प्रोफेसर एल.एम.गोखले फेलोशिप’ मिळाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीत मिळाली. त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. ‘भावलेली व्यक्तिमत्व’ हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले असून त्यांनी विविध विषयावरही लेखन केले आहे.
0
पत्रकारांसाठी पेन्शन योजना सुरू करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – मुख्यमंत्री
ई माध्यमांनाही पुढे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराचे वितरण
यवतमाळ, दि ६ : विविध प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या पत्रकारांची सामाजिक सुरक्षा महत्वाची आहे. त्यादृष्टीकोनातून राज्य शासनाने पावले उचलली असून पत्रकारांसाठी पेन्शन योजना सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. त्याचबरोबर पुढील वर्षासाठीच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांमध्ये ई-माध्यमांसाठी स्वतंत्र पुरस्कार दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात राज्य शासनाच्या लोकमान्य टिळक जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार तसेच उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी संसदीय कार्य मंत्री गिरीष बापट, माहिती व जनसंपर्क सचिव मनिषा म्हैसकर, महासंचालक चंद्रशेखर ओक, लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार विजेते लक्ष्मण जोशी, विजय कुवळेकर, दिनकर रायकर, माहिती व जनसंपर्क विभागाचे वृत्त संचालक शिवाजी मानकर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आपल्याला ज्यांच्या नावाचा पुरस्कार दिला जातो त्यामुळे त्या पुरस्काराची आणि पुरस्कारार्थीची उंची वाढत असते. लोकशाहीला सुदृढ करण्याचे काम माध्यमं करीत असल्याने लोकशाहीमध्ये माध्यमांचे महत्व अधोरेखीत होते. त्यामुळे जबाबदारीतही वाढ होते. हल्लीचा काळ हा बातमी मुल्याचा आहे. मात्र ते करीत असतांना पत्रकारीतेतील शाश्वत मुल्यांची जपणूक करणे महत्वाचे आहे. पत्रकार हा कधीच पुरस्कारासाठी काम करीत नसतो. आपल्याला मिळणारे पुरस्कार हे स्वमुल्यमापनासाठी असतात. आपण ज्या मार्गाने वाटचाल करीत आहोत तो मार्ग योग्य आहे हे मिळालेल्या पुरस्काराने शिक्कामोर्तब होते, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पत्रकारितेचे व्रत जोपासताना पत्रकारांच्या सामाजिक सुरक्षेची जबाबदारी महत्वाची आहे. त्यासाठी राज्य शासनाने पत्रकारांना पेन्शन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबत ज्येष्ठ पत्रकारांच्या सुचना विचारात घेऊन एक समग्र योजना तयार करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. प्रगत तंत्रज्ञानाच्या काळात माध्यमांचे स्वरूप बदलले असून आता सोशल मिडीया आणि ई- माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. या नविन माध्यमांनी लोकांपर्यंत पोहच वाढविली आहे. त्यामुळे पुढील वर्षाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांमध्ये ब्लॉग, वेबसाईट तसेच अन्य ई माध्यमांसाठी एक स्वतंत्र पुरस्कार देण्यात येईल. 2014 या वर्षाचे पुरस्कार आम्ही याच वर्षी प्रदान करू आणि पुढील वर्षापासून पत्रकारिता पुरस्कारासाठी नामनिर्देशनाची सोय देखील करण्यात येईल. याद्वारे एखादा पत्रकार किंवा व्यक्ती अन्य दुसऱ्या पत्रकाराचे पुरस्कारासाठी नामनिर्देशन करु शकेल, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. यावेळी लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार विजेते लक्ष्मण जोशी, विजय कुवळेकर, दिनकर रायकर, सचिव मनिषा म्हैसकर यांचीही भाषणे झाली.प्रास्ताविक महासंचालक ओक यांनी केले. दीपप्रज्वलन आणि बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पुजनाने समारंभास सुरूवात झाली. सोहळ्यास आमदार सुरेश खाडे, संचालक (प्रशासन) देवेंद्र भुजबळ, पुरस्कार निवड समितीचे सदस्य, माध्यम प्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी तसेच पुरस्कारार्थी पत्रकारांचे कुटुंबिय उपस्थित होते. संचालक शिवाजी मानकर यांनी आभार मानले.
0
शेतकरी आत्महत्या

फुलसावंगी, दि ६ – पाच एकरशेतात केवळ सहा क्विंटल कापसाचे उत्पादन झाल्याने कर्जाच्या डोंगराखाली दबलेल्या चिंताग्रस्त शेतकºयाने गळफास घेवून जीवनयात्रा संपविली. ही घटना महागाव तालुक्यातील शिरमाळ येथे काल सायंकाळी ७ वाजता दरम्यान घडली. ग्यानबा तुकाराम मोरे असे मृत शेतकºयाचे नाव आहे.
भांब येथील आनंद पंडागळे या शेतकºयाने जाळून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडत नाही तोच दुसरी घटना उघडकीस आल्याने हळहळ व्यक्त होत आहे. ग्यानबा मोरे या शेतकºयाने पाच एकर कोरडवाहू शेतात कपाशीची लागवड केली होती. मात्र कमी पावसामुळे कपाशीने दगा दिला. बँक आणि खासगी सावकाराचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. सदर शेतकºयावर सेंट्रल बँक शाखा फुलसावंगीचे ४८ हजार २०० आणि खासगी सावकाराचे २५ हजार असे कर्ज होते. दराटी पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांना घटनास्थळी पोहोचायला सूर्यच उगवला. त्यामुळे शेतकरी आत्महत्येविषयी पोलीस प्रशासन कीती संवेदनशील आहे, हे दिसून येते. पोलिसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृत शेतकºयाच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे. महागाव तालुक्यातील शेतकरी आत्महत्येची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
0
जिनिंगला आग; ८० लाखाचे नुकसान

राळेगाव, ६ – येथील महाराष्टÑ जिनिंगला लागलेल्या आगीत ८० लाखाचा कापूस जळून खाक झाला. ही घटना आज दुपारी २.३० वाजता दरम्यान घडली.
मेटीखेडा रोडवर महाराष्टÑ जिनिंग व प्रेसिंग फॅक्टरी आहे. आज दुपारी अचानक आग लागल्याची घटना उघडकीस येताच परिसरातील जनतेने घटनास्थळी धाव घेतली. मात्र आग विझविण्यासाठी पुरेशा सुविधा नसल्याने यवतमाळ, वणी, देवळी येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. बघता-बघता आगिने रौद्ररुप धारण केले. यवतमाळच्या अग्निशमन दलाला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून आगिवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाण्याचा मारा केला. मात्र आग आटोक्यात आणण्यात यश आले नव्हते. वणी येथील अग्निशमन दलाचे पथक पोहोचल्यानंतर त्यांच्याकडूनही आग विझविण्याचा प्रयत्न सुरू होता. या आगीत १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून सीसीआयचे ८० लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. राळेगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सोळंकी, पोलीस काँन्स्टेबल कुमरे, राजू करपते यांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून वाहने बाहेर काढली. घटनास्थळी तहसीलदार सुरेश कव्हळे, प्रफुल्ल मानकर यांनी भेट दिली. या आगीचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही.
0
केएम प्रकल्पाचे गोडाऊन फोडले ,२७ क्विंटल सोयाबीन जप्त

नेर, दि. ६ – यवतमाळ रोडवरील केएम प्रकल्पाचे सोयाबीन असलेले गोडाऊन सब्बलीच्या सहाय्याने फोडून १ लाख ४८ हजार ४०० रुपयाचे सोयाबीन लंपास केले. ही घटना काल रात्री घडली होती. या प्रकरणाचा छडा अवघ्या तीन तासात लावण्यात पोलिसांना यश आले.
सोयाबीनचे पोते फाटल्याने चोरट्यांचे बिंग फुटले. यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीत २७ क्विंटल सोयाबीनसह एका महिलेस अटक करण्यात आली. कंपनीनेवारंवार सोयाबीन चोरीची आकडेवारी बदलल्याने सदर कंपनीचे काम संशयाच्या भोवºयात सापडले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केएम प्रकल्पांतर्गत शासनाच्या वतीने सोयाबीन खरेदीचा कंत्राट अेडीएम कंपनी (अकोला) खरेदी करते. सदर कंपनीचे गोडाऊन बुलडाणा अर्बन सोसायटीच्या गोडाऊन जवळ आहे. बुलढाणा बँकेचे व सदर कंपनीची रखवालदारी एकच चौकीदार करते. सदर चौकीदारास कंपनीने दोन दिवसापूर्वी बंद केले. त्यामुळे सदर गोडाऊनमध्ये असलेले हजारो क्विंटल सोयाबीन रामभरोसे ठेवण्यात आले होते. मध्यरात्री संधीचा फायदा घेत चोरट्यांनी दोन मालवाहू वाहनाने येऊन सब्बलीच्या सहाय्याने गोडाऊन फोडले व ५३ क्विंटल सोयाबीन चोरून नेले. सकाळी ही घटना उघडकीस येताच खळबळ उडाली. कंपनीच्या कर्मचाºयांनी सुरुवातीला सोयाबीनची पाहणी केली. यावेळी २० पोते व ५३ कट्टे सोयाबीन चोरी गेल्याची माहिती दिली. सकाळी चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर तब्बल २ वाजता सदर चोरीची माहिती नेर पोलिसांना देण्यात आली. उपनिरीक्षक शाम सोनपराते, जमादार हरिचंद्र कार, राजेश चौधरी, प्रकाश धारगावे यांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळी सांडलेले सोयाबीन व वाहनाच्या टायरच्या मार्कवरून सदर पोलिसांनी छडा लावला. पोलीस यवतमाळ बाजार समितीत पोहोचले. त्यावेळी चोरीचे सोयाबीन येथे आढळून आले. २७ क्विंटल सोयाबीनसह महिला मीरा अशोक पवार (३५) वर्ष रा. अशोकनगर नेर या महिलेस ताब्यात घेतले. वृत्तलिहेस्तोवर याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद झाला नव्हता. वारंवार बदलवलेली सोयाबीन आकडेवारी व पोलिसांनी जप्त केलेला माल यामुळे कंपनीच संशयाच्या भोवºयात सापडली आहे.
0
मारहाण करणाºया आरोपीस सश्रम कारावास

यवतमाळ, दि. ३१ – क्षुल्लक कारणावरून इसमास मारहाण करणाºया आरोपीस तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी वाय. एम. तीवारी यांनी ठोठावली. राजेश उर्फ राजू पांडूरंग धोटे (३८) रा. पिंपरी (बु.) असे आरोपीचे नाव आहे.
अकोला बाजार येथील विजय विठ्ठल ठाकरे हा २३ मार्च २०१३ रोजी प्रविण जयस्वाल यांच्या शेतात चणा काढण्यासाठी गेला होता. अशातच आरोपी राजेश उर्फ राजू पांडूरंग धोटे रा. पिंपरी हा तेथे दारू पिऊन आला. त्यानंतर वाद करून लाथा बुक्क्यांनी मारहाण करून विजयला जखमी केले होते. याप्रकरणी जखमीचा भाऊ गजानन विठ्ठल ठाकरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वडगाव जंगल पोलिसांनी आरोपीविरूद्घ भादंवि कलम ३२५ अंतर्गत गुन्हा दाखल केला. सहा.पोलीस निरीक्षक बाळीराम देऊळवर यांनी आरोपीस अटक करून तपास पूर्ण केल्यानंतर प्रकरण न्यायप्रविष्ट केले. प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी वाय.एम. तीवारी यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यामध्ये गजानन ठाकरे, राजेंद्र जाधव यांची साक्ष महत्वाची ठरली. दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकूण आरोप सिद्घ झाल्याने राजेश धोटे यास तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास अतिरीक्त १५ दिवस शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षाच्या वतीने साहाय्यक सरकारी अभियोक्ता प्रज्ञा हरणे यांनी काम पाहिले.










