
कल्याण,महाराष्ट्र न्यूज नेटवर्क,(सतिष राठोड) – कल्याण पश्चिमच्या वायले नगर,खडकपाडा परिसरात माधव सृष्टी संकुलात घरकाम करणार्या १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर अाली अाहे.
गेल्या २२ दिवसांपूर्वी अारोपी सुनिल जगदाणी (३०), व अारोपी सोनिया जगदाणी (२६), या दाम्पत्यांनी दिल्लीहून अापल्या घरात काम करण्यासाठी तसेच लहान बाळ सांभाळण्यासाठी १५ वर्षाच्या मुलीला अाणले होतं. अारोपी दांपत्य रात्री दारुच्या नशेत धुंद असतांना त्या घरमालकाने,अापल्या पत्नीची मदत घेऊन १५ वर्षाच्या घरकाम करणार्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला,सकाळी या घटनेची माहिती मुलीने अापल्या नातेवाईकांना देण्याचा प्रयत्न केला. सुनिल अाणि सोनिया यांनी तिला बेदाम मारहाण केले व जिवे मारण्याची धमकी दिली.पिडित मुलीने कशी तरी सुटका करत,अापल्या घरी जाण्यासाठी हरिद्वार एक्सप्रेस कल्याण स्टेशनहून पकडली.पुढे इगतपुरी स्टेशनवर तिला टीसीने पकडले व रेल्वे पोलीसांना सोपविण्यात अाले,तिथे हा सगळा घडलेला प्रकार उघड झाल्यावर अारपीएफ ने महात्मा फुले पोलीस स्टेशनला कळवले. सोनिया जगदाणीला पकडण्यात अाला अाहे.अद्याप बलात्कार करणारा अारोपी सुनिल जगदाणी हा फरार असुन पुढचा तपास महात्मा फुले पोलीस स्टेशन करत अाहेत.
Archive for February 19th, 2015
0
अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पत्नीनं केली मदत
0
घेडछाडीला विरोध करणा-या तरुणीची गोळी घालून हत्या

इलाहबाद, दि. १९ – छेडछाडीला विरोध करणा-या तरुणीची गोळी घालून हत्या करण्यात आली असून, आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एटा तालुक्यातील नगला गोपाल गावात संध्याकाळी एक तरुणी वहिनी सोबत नैसर्गिक विधी करता जात असताना भुवनेश व राजू या गाव गुंडांनी तिचा रस्ता अडवत अश्लील चाळे करण्यास सुरवात केली. या दोघांना विरोध करत ही तरुणी घरी पळून जाण्यात यशस्वी झाली. परंतू, राजू व भुवनेश यांनी इतर चौघांना सोबत घेऊन तरुणीच्या घरी जात तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला असता तिच्या वडिलांनी या गावगुंडांना विरोध केला. या झटापटी दरम्यान भुवनेशने गावठी पिस्तुलामधून झाडलेली गोळी पिडित तरुणीच्या मानेला लागली असता त्या तरुणीला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिथल्या डॉक्टरांनी आग्रा येथील रुग्णालयात त्वरीत हलवण्यास सांगितले. आग्रा येथे रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच या पीडित तरुणीने प्राण सोडला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच राजू व त्याच्या अन्य सहका-यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.
0
राज्यात स्वाईन फ्लूचा हाहाकार, ८३ जणांचा मृत्यू

मुंबई- राज्यात स्वाईन फ्लूच्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गुरूवारी एका दिवसात १०९ नवे रूग्ण आढळून आले असून एकूण रूग्णांची संख्या ६७८ वर पोहचली आहे. मृतांची संख्या ८३ झाली आहे. गुरूवारी ४ रूग्णांचा मृत्यू झाला असून त्यापैकी दोन हे नागपूरचे तर पुणे आणि लातूरमध्ये प्रत्येक एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत स्वाईन फ्लूची लागण झालेल्या रूग्णांची संख्या २४४ झाली आहे. गुरूवारी १९ नवे रूग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. मुंबईत मृतांची एकूण संख्या १० वर गेली आहे. स्वाईन फ्लूचा सर्वात जास्त फटका नागपूरला बसला आहे.
बुधवारी राज्यात स्वाईन फ्लूच्या रूग्णांची संख्याी ५६९ येवढी होती. एका दिवसात ती जवळपास शंभरने वाढून ती ६७८ वर गेली आहे. सध्या राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात स्वाईन फ्लूची लागण झालेले जवळपास ४० रूग्ण हे व्हेंटीलेटरवर आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
रूग्णांची संख्या वाढत असली तरी स्वाईन फ्लूसाठी आवश्यक असलेल्या टॅमी फ्लूच्या गोळ्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. शिवाय सर्वच सरकारी रूग्णालयांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. स्वाईन फ्लू बाबत जनजागृतीची मोठी मोहीमही सरकार तर्फे हातात घेण्यात आली आहे.
0
यवतमाळात लवकरच शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा – पालकमंत्री राठोड

जिल्हाधिकारी कार्यालयात शिव जयंती साजरी
यवतमाळ, दि. 19 : छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य प्रत्येकाने प्रेरणा घ्यावे, असे आहे. त्यांच्या कार्याची आठवण सर्वांनाच व्हावी तसेच यवतमाळकर जनतेची असलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी लवकरच महाराजांचा आश्वारूढ पुतळा यवतमाळात साकारणार असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र निफाडकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी श्री.कडू, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी मोहन जोशी, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी राजेश देवते, सहाय्यक जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी श्री.कर्णेवार, सरकारी कामगार अधिकारी राजू गुल्हाणे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवाजी महाराजांचे कार्य फार महान आहे. दैनंदीन पुजनीय असे व्यक्तीमत्व असलेले शिवाजी महाराज प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याची आणि शौर्याची आठवण प्रत्येकास व्हावी म्हणून शासन समुद्रात त्यांचा भव्य असा पुतळा उभारत आहे. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे पालकमंत्री म्हणाले. यवतमाळातही महाराजांचा आश्वारूढ पुतळा असावा, अशी प्रत्येक यवतमाळकरवाशियांची इच्छा आहे. ही इच्छा लवकरच पुर्ण करू आणि महाराजांचा भव्य पुतळा उभारू असे पालकमंत्री यावेळी बोलतांना म्हणाले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांचेही भाषण झाले. त्यांनी महाराजांच्या जीवन कार्यावर यावेळी प्रकाश टाकला. सुरूवातीस पालकमंत्र्यांसह सर्व मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. कार्यक्रमाचे संचलन व आभार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मिनल जगताप यांनी केले.
0
शेतकºयाची आत्महत्या

नेर दि. १९ – तालुक्यातील अकोला मुंकीदपूर येथील शेतकºयाने स्वत:च्या घरीच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज घडली. मारोती भीमराव रंगारी (४५) असे मृतकाचे नाव आहे. रंगारी यांच्याकडे तीन एकर शेती असून यावर्षी नापिकी झाली. त्यामुळे बँक व सावकाराचे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत सदर शेतकरी राहात होता. दरम्यान, आज घरी कोणी नसताना त्यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू आहे.
0
वृद्घाला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वार ठार
माहूर, दि. १९ – वृद्घाला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना आज गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास उपविभागीय कार्यालयासमोर घडली. संजय फकीरा वंजारे (३५) रा. आष्टा असे मृतकाचे नाव आहे. ते एम. एच. २६ एस-४३५२ क्रमांकाच्या दुचाकीने माहूरकडे येत असताना, उपविभागीय कार्यालयानजीक त्यांच्या दुचाकीसमोर देवराव महादू तायडे (६८) रा. मालवाडा हा इसम आला. यावेळी त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकी दुभाजकावर आदळली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या वंजारे यांना ग्रामीण रुग्णालयात भरती केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून, वृद्घ किरकोळ जखमी झाला आहे. याबाबत माहूर पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविण्यात आली असून, अधिक तपास पोलीस करीत आहे.
0
शिवजयंती शोभायात्रेने वेधले नागरिकांचे लक्ष

यवतमाळ , दि. १९ – छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज गुरुवारी मोठ्या दिमाखदारपणे जिल्ह्यात साजरी करण्यात आली. १५ ते २० संघटना मिळून स्थापित झालेल्या छत्रपती महोत्सव समितीने आज काढलेल्या शोभायात्रेने अवघे शहर शिवमय झाले होते. माँजिजाऊ छत्रपती शिवराय व मावळ््यांची वेशभूषा परिधान केलेल्या बाल कलाकारांनी नगरवासीयांचे लक्ष वेधून घेतले होते. ‘मी मावळा शिवरायांचा’असे स्फूरणच प्रत्येक शिवप्रेमींच्या चेहºयावर चढल्याचे दृश्य या शोभायात्रेत उमटले होते.
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेप्रमाणे होणारी जयंती आज गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, सर्व शाखेय कुणबी समाज संघटना, शिवाजी विद्यालय, वेदधारिणी महाविद्यालय आदी संघटनांनी शिवजयंती उत्सवाची तयारी गेल्या महिन्याभरापासूनच प्रारंभ केली होती. १६ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात शिवचरित्रावर व्याख्यानमाला, शिव मॅरेथॉन स्पर्धा, कराटे स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आदी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. आज दुपारी शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या आझाद मैदानातून भव्य शोभायात्रेचा प्रारंभ झाला. वेदधारणी विद्यालय, अण्णासाहेब पारवेकर विद्यालय, डॉ. पंजाबराव देशमुख विद्यापीठ अकोला व वसंतराव नाईक विद्यालय, राष्टÑमाता जिजाऊ संस्था लोहारा, मधुबन नगरी, शिवाजी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रम महाविद्यालयांनी झांकी सादर केल्या. माँ जिजाऊ, छत्रपती शिवराय व मावळ््यांच्या रूबाबदार वेशात असलेल्या बाल कलाकारांनी नगरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत ‘जय जिजाऊ जय शिवराय’ अशा घोषणांनी शहर दुमदुमून गेले होते. शहरातील विविध मार्गाने मार्गक्रमण करीत या शोभायात्रेचा समारोप हनुमान व्यायाम शाळेजवळ झाला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, राहुल ठाकरे, डॉ. दिलीप महाले आदी मोठ्या संख्येत शिवप्रेमी शोभायात्रेत सहभागी झाले होते.










