आर्णी ,दि ५ – शहरात अरूणावती नदीच्या काठी बाबा कंबलपोष यांचा उर्स सुरू झाला असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. त्या दुष्टीकोणातुन यवतमाळ येथील बॉम्बशोधक व श्वानपथक पथकाचे सात चमु दाखल झाले असून या परिसराची तपासणी केली.
आर्णी डिसेंबर महिण्यात अरूणावती नदीच्या पात्रात एका लोंखडी पेठीत बॉम्ब आणी जिवंत काडतुस सापडल्याची घटना उघडीस आली होती. त्यामुळे शहरासह तालुक्यात विविध चर्चेला उधान आले होते. मात्र काल पासुन आर्णीत बाबा कंबलपोष यांची यात्रा सुरू झाली. या यात्रेत जिल्ह्यातील लाखो भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोणातून बॉम्बशोधक व श्वानपथकच्या चमुने दुपारी दरम्यान बाबा कंबलपोष दर्गा, यात्रेचा परिसर, बस स्थानक, आर्णी शहरातील महत्वाच्या जागी तपासणी केली. या दरम्यान काही आढळुन आले नसल्याचे त्यांच्या कडून सांगण्यात आले. ज्या ठिकाणी लाखो नागरिक एकत्र येत असतात त्या ठिकाणी बॉम्बशोधक व श्वानपथकाचे चमु तपासणी करत असतात. आर्णीत डिसेंबर महिण्यात बॉम्ब व काडतुस सापडले असले तरी त्या घटने सोबत आज झालेल्या तपासणीचे काही संबंध नाही अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक राजकिरण मडावी यांनी दिली.
Archive for February 5th, 2015
0
बॉम्बशोधक व श्वान पथककडून बाब कंम्बलपोष दर्गांची तपासणी
0
ट्रेलरमधील लोखंडी पत्रे अंगावर पडून दोन ठार , कोसदणी घाटातील घटना


आर्णी , दि. ५ – ट्रेलरमधील लोखंडी पत्रे पडून दुचाकीवर दोन जण जागीच ठार झाले. ही घटना आज सायंकाळी ५.३० वाजता कोसदणी घाटात घडली. ही घटना इतकी भयानक आहे की, यामध्ये त्याचे पायही छाटल्या गेले.
बाळा श्रीराम कडू (६०) रा. साखेडा ता. आर्णी, अनिल बालाजी चौधरी (३०) रा. लिंगी असे मृतकाचे नाव आहे. महागाव येथे सोयरीक सबंधासाठी ते आपल्या दुचकीने (एम.एच. २९ / ए.एच. ६११८)आज सकाळी गेले होते. तेथून परत येत असतांना कोसदणी घाटात छत्तीसगड येथून लातुरकडे जाणाºया ट्रेलरमध्ये (सी.जी. ०४/ ए.सी. ९३२५) लोंखडी पत्रे घेऊन जात होते. अशातच कोसदणी घाटातील वळणावर त्या ट्रेलरच्या पत्र्याला बांधून असलेल्या साखळ््या तुटल्या. त्याचवेळी दुचाकीवर लोखंडी पत्रे पडल्याने दोघेही खाली पडले. त्यामध्ये पत्रे अंगावर पडल्याने त्याचे पायही छाटल्या गेले. यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळावरून ट्रेलरचा चालक व किनर पळून गेले. या घटनेची माहिती कळताच नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. हा अपघात इतका भयानक होता की घटनास्थळावर अनेकांचे अश्रु अनावर झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले. याप्रकरणी ट्रेलर चालकाविरूद्घ गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
0
तृणमूल खासदार श्रीन्जॉय बोस यांचा राजीनामा

नवी दिल्ली – तृणमूल काँग्रेसचे खासदार श्रीन्जॉय बोस यांनी गुरुवारी पक्षाचा राजीनामा दिला. शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणात सशर्त जामीन मंजूर झाल्यानंतर दुस-याच दिवशी त्यांनी राजीनामा दिला.
पश्चिम बंगालमधी कोट्यावधींच्या शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी बोस यांना सीबीआयच्या विशेष गुन्हे पथकाने गेल्या वर्षी २१ नोव्हेंबरमध्ये अटक केली होती.
बुधवारीच अलीपोर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने बोस यांची जामीनावर सुटका केली. त्यानंतर दुस-याच दिवशी बोस यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.
0
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावणार

नवी दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आता अवघे काही तास शिल्लक आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून राजधानी दिल्लीत राजकीय वातावरण तापलेले आहे. सगळ्यांच पक्षांकडूनच आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहे. पक्षांमध्ये जोरदार शाब्दिक द्वंद सुरु आहे. गेल्या अनेक दिवसांपासून धडाडणा-या या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहे.
निवडणुकीसाठी प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सर्वच पक्षांतील मोठे नेते जोरदार प्रचार करत आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची जेजे कॉलनी येथे प्रचारसभा होणार आहे तर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल मदनापूर खादर आणि सदार बझार येथे सभा घेणार आहेत. तर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा रोडशोही होणार आहे.
२०१३ मध्ये ४९ दिवसांचे सरकार चालवल्यानंतर आम आदमी पक्ष पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे. तर लोकसभा आणि विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भरघोस यश मिळवणारा भाजपा विधानसभा जिंकण्याच्या दृष्टीने तयारीत आहे. दिल्लीची सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी काँग्रेसनेही जोरदार तयारी केली आहे.
येत्या सात फेब्रुवारीला विधानसभेसाठी मतदान होत आहे. तर १० फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
0
यावर्षी १५ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका

मुंबई – यंदाच्या वर्षात संपूर्ण राज्यातील १५ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांनी दिली.
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसोबत या वर्षात नवी मुंबई, औरंगाबाद, वसई-विरार, कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुका, आठ नगर परिषदांच्या निवडणुका, १३९ नव्याने स्थापन झालेल्या नगर पंचायत, भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदा आणि १५ पंचायत समितींच्या निवडणुका होणार आहेत तसेच ठाणे जिल्हा परिषदेची निवडणूकही होणार आहे.
राज्यातील एकूण ग्रामपंचायतीच्या ५० हून अधिक टक्के निवडणुका एक दिवसात होणार असतील तर त्या तालुक्यांमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात येतील असेही सहारिया यांनी यावेळी सांगितले.
0
कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांना अटक

कोल्हापूर – कोल्हापूरच्या लाचखोर महापौर तृप्ती माळवी यांना गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक कऱण्यात आली.रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर एसीबीने त्यांना अटक केली.
३० जानेवारी रोजी माळवी यांना १६ हजार रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले होते. शिवाजी पेठेत राहणा-या संतोष पाटील यांची जमीन महापालिकेने ताब्यात घेतली होती. या जागेचा ताबा पुन्हा मिळवण्यासाठी संबंधित कागदपत्रावर महापौरांची स्वाक्षरी आवश्यक होती.
या कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी माळवी यांनी स्वीय सहायकअश्विन गडकरी यांच्या मार्फत चाळीस हजारांची लाच मागितली. अखेर संतोष पाटील सोळा हजार रुपये देण्यास तयार झाले.या प्रकरणी पाटील यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली असता विभागाने सापळा रचून माळवी आणि त्यांचे पीए अश्विन गडकरी यांना ताब्यात घेतले होते.
त्यानंतर दुस-याच दिवशी प्रकृतीच्या कारणास्तव माळवी यांना रुग्णालयात दाखल कऱण्यात आले होते. आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर एसीबीने त्यांना अटक केली.










