पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for February 21st, 2015

रविवारी महाराष्ट्र बंद 0

रविवारी महाराष्ट्र बंद

2015-02-21~2-15_ns
मुंबई, दि. २१ – कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ डाव्या संघटांनी उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. पानसरे यांची हत्या झाल्याने जनतेत आक्रोश आहे. पुरोगामी विचारधारांनी उद्या रस्त्यावर उतरुन कारभार बंद ठेवावा असे आवाहन डाव्या पक्षाचे नेेते भालचंद्र कांगो यांनी केले आहे.
गोविंद पानसरे यांच्या हत्येचे पडसाद राज्यभर उमटत आहे. राज्यात ठिकठिकाणी डाव्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन सरकारविरोधात घोषणाबाजी केली. शुक्रवारी रात्री पानसरे यांचे मुंबईत उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या हत्येचे वृत्त समजताच कोल्हापूरमध्ये शोककळा पसरली आहे. आज सकाळपासून कोल्हापूरमधील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. डाव्या पक्षाचे नेते भालचंद्र कांगो यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना उद्या (रविवारी) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. बारावीच्या परीक्षा असल्याने आम्ही आज किंवा सोमवारी बंद ठेवणार नाही. उद्या रविवार असल्याने पुरोगामी विचारांनी बंद पाळावा असे त्यांनी सांगितले.

February 21, 2015 in महाराष्ट्र
कॉम्रेडला गोविंद पानसरे यांना अखेरचा लाल सलाम 0

कॉम्रेडला गोविंद पानसरे यांना अखेरचा लाल सलाम

untitled-1_1424523625
कोल्हापूर – कॉम्रेड गोविंद पानसरे यांना पंचगंगेच्या घाटावर कुठलेही धार्मिक विधी न करता अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांना त्यांची सून आणि नातवाने अग्नी दिला. दसरा चौकातून निघालेली अंत्ययात्रा सायंकाळी सहा वाजता पंचगंगेच्या काठावर आली. कम्युनिस्टांनी अंत्ययात्रेला ‘संघर्षयात्रा’ म्हटले होते. पंचगंगेच्या काठी कार्यकर्त्यांनी पुरोगामी विचारांची शपथ ग्रहण केली आहे. येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, बी.जी.कोळसे पाटील, ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांनी शोकसभेत भाषण केले. तसेच शाहीर संभाजी भगत आणि शितल साठे यांनी क्रांतिगीत गाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
सुरुवातीला त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी दसरा चौकात ठेवण्यात आले होते. येथे हजारो लोकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. येथे भावूक वातावरण होते. त्याचबरोबर शहिद कॉम्रेड गोविंद पानसरे अमर रहेच्या घोषणा दिल्या गेल्या. कार्यकर्ते आणि पानसरे यांच्या विचारांवार श्रद्धा असलेले लोक मोठ्या संख्येने हजर होते. यात कामगार, कष्टकरी, विद्यार्थी, कॉम्युनिस्ट कार्यकर्ते, घरकामगार महिलांची संख्या मोठी होती. बहुतेक कार्यकर्ते आणि महिला या लाल रंगाचे झेंडे घेऊन उभे होते. दुपारी दिड ते साधारण तीन वाजता पर्यंत अंत्यदर्शन घेण्यात आले. त्यानंतर अंत्ययात्रा पंचगंगेच्या दिशने निघाली. दरम्यान, माजी न्यायमुर्ती बी.जी.कोळसे पाटील यांनी पानसरेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार का नाही? असा सवाल केला.
पानसरे यांचे शुक्रवारी रात्री 10.45 वाजता ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्यावर 16 फेब्रुवारी रोजी गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. शनिवारी सकाळी मुंबईत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर 10.30 वाजता एअर अॅम्ब्युलन्सद्वारे कोल्हापूरला आणले गेले. यावेळी मुंबई विमानतळावर शासनाचा एकही प्रतिनिधी नव्हता. त्यांचे पार्थिव मुंबई विमानतळावर तासभर रखडल्याचा आरोप आमदार कपिल पाटील यांनी केला.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) शनिवारी कोल्हापूर बंद पुकारला होता तर, रविवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. यात सर्व डाव्या पक्षांसह भारिप-बहुजन महासंघ, रिपब्लिकन पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस देखील बंद मध्ये सहभागी असणार आहे.
कॉम्रेड पानसरे यांच्या अंत्यविधीसाठी शासनाचा एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. पानसरेंवरील हल्ल्यानंतर पाच दिवसांनी त्यांचे निधन झाले. अद्याप पर्यंत त्यांच्या मारेकर्‍यांचा सुगावा लागलेला नाही. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संतप्त भावना आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन मंत्रिमंडळातील कोणीही पानसरेंच्या अंत्ययात्रेत सहभागी होणार नाही, अशी शक्यता सुत्रांनी वर्तवली होती.
कोल्हापूरमध्ये शनिवारी भाकपचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार होते. या अधिवेशनाचे कॉम्रेड पानसरे अध्यक्ष असणार होते. त्यांच्यावर 16 फेब्रुवारी रोजी हल्ला झाल्यानंतरही अधिवेशन रद्द करण्यात आले नाही. आज त्याच अधिवेशनाचे त्यांच्या शोकसभेत रुपांतर झाले. अधिवेशनासाठी मुंबईसह नाशिक, औरंगाबाद, पुणे येथून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आले होते. दुर्दैवाना त्या सर्वांना पानसरे यांच्या अंत्ययात्रेत सहभागी व्हावे लागले.
कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र
भाकपच्या अधिवेशनानिमीत्त राज्यभरातून कार्यकर्ते कोल्हापूरमध्ये आले आहेत. कॉम्रे़ड पानसरेंच्या निधनाची बातमी कळाल्यापासून कार्यकर्त्यांना भावना अनावर होत आहेत. कार्यकर्त्यांनी आजच महाराष्ट्र बंदची हाक देण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र भाकप नेते डॉ. भालचंद्र कांगो यांनी रविवारी महाराष्ट्रात बंद पाळण्यात येईल असे सांगितले आहे.
महाराष्ट्राचा तालिबान होत चालला – भालचंद्र नेमाडे
महाराष्ट्राचा तालिबान होत चाललाय त्याला वेळीच रोखायला पाहिजे. आता महाराष्ट्राला पुरोगामी म्हणण्याची लाज वाटत असल्याची खंत ज्ञानपीठ विजेते लेखक भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केली आहे.
दाभोलकरांची हत्या होऊन दीड वर्ष झाले तरी त्यांचे मारेकरी का पकडले जात नाही? असा सवाल करुन नेमाडे यांनी राज्यातील सरकार आणि पोलिसात अपात्र माणसे असल्याचे म्हटले आहे. कॉम्रेड पानसरेंच्या हत्येनंतर महाराष्ट्राला पुरोगामी कसे म्हणावे असा सवाल त्यांनी केला. ते म्हणाले आता या राज्याला पुरोगामी म्हणण्याची लाज वाटत आहे.
आभाळ फाटले
आमच्या डोक्यावरचे आभाळ फाटले आहे. बोटभर चिंधीने आम्ही ते सांधू शकणार नाही, अशी प्रतिक्रिया शेतकरी कामगार पक्षाचे नेते एन.डी.पाटील यांनी व्यक्त केली. दाभोलकरांच्या हत्येला दीड वर्ष झाले तरी मारेकरी मोकाट आहे. तेव्हा आम्ही म्हणालो होतो, सामाजिक समतेच्या लढ्यातील हे शेवटचे बलिदान आहे. दुर्दैवाने दीडवर्षात कॉम्रेड गोविंद पानसरेंसारखा योद्धा आम्ही गमावला. आता कार्यकर्त्यांचे सांत्वन करण्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत. महाराष्ट्र सरकारकडे राजकीय इच्छाशक्ती नसल्याने राज्यात हे घडत आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया एन.डी. पाटील यांनी व्यक्त केली.

 

February 21, 2015 in मुख्य पान
ऑटीस्टीक विद्यार्थ्यांना 'कॅल्सी'ची परवानगी 0

ऑटीस्टीक विद्यार्थ्यांना ‘कॅल्सी’ची परवानगी

E0-A4-95-E0-A5-85-E0-A4-B2-E0-A4-95-E0-A5-8D-E0-A4-AF-E0-A5-81-E0-A4-B2-E0-A5-87-E0-A4-9F-E0-A4-B0
मुंबई – ‘ऑटीस्टीक’ विद्यार्थ्यांना करावी लागणारी आकडेमोड सोपी व्हावी, यासाठी १२वीच्या परीक्षेतील गणित विषयासह भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, बुक कीपिंग, अकाऊंटण्सी या विषयांसाठी साधा (बेसिक) कॅलक्युलेटर वापरण्याची परवानगी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ही माहिती दिली. ही सुविधा ११वीच्या विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे.
लर्निंग डीसॲबिलीटीज आणि ऑटीस्टीक असणाऱ्या ११वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांना बेसिक कॅलक्युलेटर वापरता येणार आहे. तो विद्यार्थ्यांना स्वत:च आणावा लागेल. मोबाईलमधील कॅलक्युलेटर किंवा तत्सम कॅलक्युलेटर वापरता येणार नाही, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.
लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, पालक संघटना, शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञांनी ऑटीस्टीक विद्यार्थ्यांना गणितीय संकल्पनांसाठी अशा प्रकारचा कॅलक्युलेटर परीक्षेच्या काळात वापरण्यास परवानगी देण्याची मागणी अनेकदा केली होती. त्याची दखल घेत शालेय शिक्षणमंत्री तावडे यांनी हा निर्णय घेतला. ११वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांना ही सुविधा देण्याची सूचना परीक्षा केंद्र संचालकांना देण्यात आल्या आहेत; तसेच या परिपत्रकाच्या सूचना परीक्षा केंद्रांवर प्रसिध्द करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

February 21, 2015 in रोजगार
चळवळीतील नेत्यांना संरक्षण द्या! - माणिकराव ठाकरे 0

चळवळीतील नेत्यांना संरक्षण द्या! – माणिकराव ठाकरे

download
मुंबई – डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर राज्यातील पुरोगामी आणि सामाजिक चळवळीतील नेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे यापुढील काळात अशा चळवळीतील नेत्यांना सरकारने संरक्षण द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
कॉ. पानसरे यांच्या हत्येने महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेला तडा गेला आहे. या घटनेमुळे राज्यात प्रतिगामी आणि सनातनी विचारधारा डोके वर काढत असल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर पुरोगामी आणि सामाजिक चळवळीतील; तसेच पीडित, शोषितांसाठी आवाज उठवणाऱ्या सर्वच नेत्यांना संरक्षण देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने अशा नेत्यांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन त्यांना संरक्षण देण्यासाठी ठोस पावले उचलावीत, असे ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.
विचारांशी लढाई विचारानेच झाली पाहिेजे, अशी भूमिका घेऊन स्वस्थ बसणे योग्य नाही. धर्म आणि संस्कृती रक्षणाच्या नावाने गुंडगिरी सुरू आहे. देशात वैचारिक दहशतवाद थैमान घालत आहे. या सर्व प्रवृत्तींना रोखले नाही, तर आगामी काळात देशाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
कॉ. पानसरे यांच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणीही त्यांनी केली. आवश्यकता भासल्यास या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा; तसेच भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळायची असेल तर, सनातन व प्रतिगामी विचारधारेचे समर्थन करणाऱ्या संघटनांवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी त्यांची मागणी आहे.

February 21, 2015 in मुख्य पान
धार्मिक अहंकारापेक्षा देशाचा सन्मान मोठा-आ.प्रा. जोगेंद्र कवाडे 0

धार्मिक अहंकारापेक्षा देशाचा सन्मान मोठा-आ.प्रा. जोगेंद्र कवाडे

2014-09-07~Jogendra-Kawade-Girish-Gandhis-65th-birthday_ns
यवतमाळ, दि. २१ – साध्वी, महाराजांकडून सुरू असलेले वक्तव्य राष्टÑहिताचे मुळीच नाही. धार्मिक अहंकारापेक्षा देशाचा सन्मान मोठा आहे, अशा शब्दात पिरिपाचे अध्यक्ष आ. प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी टीका केली. विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
अल्पसंख्याक समाजाचे नैतिक रक्षण करण्याची जबाबदारी बहुसंख्य समाजावर असते. दुर्देवाने मात्र सध्या गळचेपी धोरण सुरू आहे. देशात असेच सुरू राहिले तर अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही, अशा इशारादेखील आ.प्रा.कवाडे यांनी दिली. २६ जानेवारीच्या जाहिरातीमधून भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकात असलेले धर्मनिरपेक्ष व समाजवाद हे शब्द वगळण्यात आले. हा देशाची अखंडता व एकात्मतेवर घाला घालण्याचा प्रयत्न आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे यांच्या हत्येमागे गोडसेप्रवृतीचा हात असल्याचा आरोपही आ. कवाडे यांनी केला. रिपब्लिकन ऐक्य झाल्यास पक्षाचे विलिकरण करण्यात यावे, त्यासाठी माझा सर्वप्रथम पुढाकार असेल. प्रत्येकाने निवडणूक आयोगाकडून गटाची मान्यता रद्द करून घ्यावी, रिपब्लिकन ऐक्यासंदर्भात विचारलेल्या एका प्रश्नावर भूमिका स्पष्ट केली. यावेळी विदर्भ अध्यक्ष चरणदास इंगोले, खडसे, कृष्णा परिपगार, कृष्णा रंगारी, रवी श्रीरामे, सुरेश मेश्राम, यू.पी. इंगोले, बंडू तागडे यांच्यासह पीरिपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

February 21, 2015 in महाराष्ट्र
दिल्लीत महिलेवर सामूहिक बलात्कार 0

दिल्लीत महिलेवर सामूहिक बलात्कार

repd

नवी दिल्ली- राजधानी दिल्लीत एका नायजेरियन महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पिडीत महिलेने या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे.
पिडीत महिला दक्षिण दिल्लीतील छत्तरपूर येथून घरी जाण्यास निघाली होती. यावेळी गाडीत बसलेल्या राकेश, सनी, दीपक आणि जॉन्सन यांनी या महिलेला लिफ्ट देऊ केली आणि तिनेही ती स्वीकारली.
यादरम्यान या चौघांनी परिस्थितीचा फायदा घेत तिच्यावर चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार केला आणि त्यानंतर तिला गाडीबाहेर फेकून दिले. चिला बॉर्डरजवळील पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर तिला गाडीतून फेकून दिले आणि ते चौघेही पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, पिडीत महिलेला लिफ्ट दिल्याचे आरोपींनी मान्य केले आहे मात्र तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला आहे.

February 21, 2015 in मुख्य पान
कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे निधन 0

कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे निधन

pansare_kolhapur_medical-216x160
मुंबई- ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते, पुरोगामी विचारवंत कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांचे शुक्रवारी रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. गेल्या पाच दिवसांपासून मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर शुक्रवारी थांबली. ते ८२ वर्षांचे होते.
सोमवारी १६ फेब्रुवारीला कोल्हापुरातील राहत्या घराजवळ कॉम्रेड पानसरे आणि त्यांची पत्नी उमा यांच्यावर गोळीबार झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर कोल्हापुरातील अॅस्टर आधार रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांना पुढील उपचारासाठी शुक्रवारी सायंकाळी त्यांना कोल्हापूरहून हवाई रुग्णवाहिकेद्वारे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात हलवण्यात आले होते.
सायंकाळी सात वाजेपर्यंत त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले. त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास त्यांना फुफ्फुसात रक्तस्राव झाला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार सुप्रिया सुळे, रिपाई नेते रामदास आठवले यांनी रुग्णालयास भेट देऊन पानसरे यांचे अंतिम दर्शन घेतले. सकाळी साडेदहा वाजता हवाई रुग्णवाहिकेद्वारे पानसरे यांचे पार्थिव कोल्हापूरात नेण्यात येणार आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत कोल्हापुरातील दसरा चौकात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर पंचगंगेच्या काठावर अंत्यविधी होणार आहेत.
अहमदनगरमधील श्रीरामपूर तालुक्यातील कोल्हार या गावात पानसरे यांचा जन्म झाला. तरुण वयात राष्ट्र सेवा दलाच्या मुशीत घडलेले पानसरे नंतर कम्युनिस्ट चळवळीकडे वळले. शोषित, वंचित, उपेक्षित कामगार, कष्टकरी वर्गासाठी ते अखेरच्या श्वासापर्यंत लढले. त्यांचे सध्याचे वास्तव्य कोल्हापुरात असले तरी संबंध महाराष्ट्रात पुरोगामी राजकीय चळवळीत ते आघाडीवर होते. कोल्हापूरच्या टोलविरोधी आंदोलनात ते असेच आघाडीवर राहिले होते. उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला.
दरम्यान, पाच दिवसांचा कालावधी लोटला असला तरी अद्याप या हल्ल्यातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे.
लाल सलाम…!
कॉ. गोविंद पानसरे यांच्या निधनाने एक झुंजार आणि लढवय्या नेता आपल्यातून हिरावून नेला, याचे मला अतिशय दु:ख वाटते.- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कॉ. गोविंद पानसरे यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्राचे नुकसान झाले आहे. – खासदार सुप्रिया सुळे
कॉ. गोविंद पानसरे यांच्या निधनाने डाव्या चळवळीबरोबरच शोषित, दलित समाजाचे नुकसान झाले आहे – रिपाइं नेते रामदास आठवले

February 21, 2015 in मुख्य पान