यवतमाळ, दि. २६ – गेल्या दोन महिन्यापूर्वी न्यायालयात एका नगरसेकावने याचिका दाखल केल्यामूळे स्थायी समितीच्या निवड प्रक्रियेवर स्थगीती आली होती. न्यायालयाने आज गुरुवारी ही स्थगीती उठविल्यानंतर निवड झालेल्या सभापतींनी पदभार स्विकारला आहे.
नगर पालिकेतील कार्यरत सभापतींचा कार्यकाळ संपल्यानंतर सभापती पदासाठी निवड प्रक्रिया सभागृहात राबविण्यात आली होती. यामध्ये बांधकाम सभापतीपदी प्रणिता खडसे, आरोग्य सभापती अरूणा गांवडे, महिला व बाल कल्याण सभापती मिना मसराम, नियोजन सभापती नंदा जिरापूरे, शिक्षण सभापती रेखा कोठेकर यांची अविरोध निवड करण्यात आली होती. निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर या प्रक्रियेवर नगरसेवक हरीष पिल्ले यांनी आक्षेप घेऊन याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामुळे सभापतीपदी निवड होऊनही नवनिर्वाचित सभापतींना पदभार स्विकारता आला नाही. दोन महिने न्यायालयीन लढाईत गेल्यानंतर आज न्यायालयाने निवड प्रक्रियेवरील स्थगिती उठविली. त्यामुळे निवड झालेल्या सभापतींनी आपआपला पदभार स्विकारला. यावेळी नगराध्यक्ष सुभाष राय व नगरसेवक उपस्थित होते.
Archive for February 26th, 2015
0
नगर परिषद सभापतींनी पदभार स्विकारला
0
यवतमाळ नगर परिषदेचा १०३ कोटींचा अर्थसंकल्प सादर

यवतमाळ , दि. २६ – नगरपरिषदेने २०१४-१५ या वर्षाचा सुधारित अर्थसंकल्प तर २०१५-१६ चा अंदाजपत्रकीय अर्थसंकल्प आज गुरुवारी सर्वसाधारण सभेत सादर केला. १०३ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकात कर वसूली उत्पन्नाचा ताळमेळच नाही. शासकीय अनूदानाच्या भरोशावर अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून, नगर पालिकेने तोटा लपविल्याचे मत व्यक्त होत आहे.
शहराच्या विकासाचे बारा वाजवणाºया नगर पालिकेने आज गुरुवारी अर्थसंकल्प सादर रून शहरवासीयांची शुद्घ धुळफेक केली आहे. शासकीय अनुदानातून प्राप्त होणाºया रक्कमाच नगर पालिकेने अंदाजपत्रकात सामाविष्ठ केल्या आहे. राष्ट्रीय मत्स्यीकी विकास अनुदान थेट दोन कोटी दाखविण्यात आले आहे. यापूर्वी ५० लाखांपैकी केवळ १८ लाख मिळाले आणि ३१ लाख येतील असे दाखविण्यात आले आहेत. नगरपरिषद हद्दवाढ वाढीव क्षेत्र विकास कामांचे एक कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. याच प्रमाणे बांधकाम शुल्कातही घसघशीत वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. शासनाकडून अनुदाने व अंशदानापोटी २२ कोटी ३४ लाख २७ हजार मिळतील असे दाखविण्यात आले आहे. बजेटमध्ये नगराध्यक्षांच्या अधिकारातील आकस्मिक निधी खचार्ला कात्री लावत २० लाखावरून १५ लाख करण्यात आले आहे. स्वच्छता अभियानाची तरतूद ३० लाखावरून आठ लाख इतकीच करण्यात आली आहे. आकस्मिक पाणी पुरवठ्याच्या बजेटमध्ये तब्बल दहा पटीने वाढ करीत दोन लाखावरून थेट १२ लाखाची तरतूद केली आहे. वीज बिलाचा खर्चही २५ लाखावरून एक कोटी होईल असे दाखविण्यात आले आहे. संगणक खरेदीसाठी नव्याने दहा लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वी मंजूर केलेल्या दहा लाखांपैकी केवळ नोव्हेंबर २०१४ अखेरपर्यंत दोन लाख खर्च झाल्याचे दाखविले आहे. अनेक योजनांवर प्रस्तावित निधीच खर्च झालेला नाही. निधी पडून असतानाही विकास कामे मार्गी लागलेली नसून, पाणीपूरवठा व स्वच्छता अभियाना अंतर्गतच्या मोफत नळ व शौचालय योजनेचे भिजत घोंगडे आहे. चंद्रपूरच्या एजंन्सीला देयके देखील अदा करण्यात आली आहे. अर्थसंकल्पातील तूट सर्वसामान्य जनतेच्या लक्षात येऊ नये यासाठी मोठ्या दिमाखादारपणे नगर पालिकेने आकडेमोड के ली आज सर्वसाधारण सभेत या अर्थसंकल्पावर सदस्यांनीही आक्रमक भूमिका घेतली नसल्याने शहरवासीयांचा पुन्हा एकदा भ्रमनिरास झाला आहे.
0
पूर्व वैमनस्यातून ‘त्या’ युवकाचा खून, एका आरोपीस अटक

दोन विधी संघर्षग्रस्त बालकही ताब्यात
यवतमाळ, दि. २६ – स्थानिक उमरसºयातील तीन फोटो चौकात युवकाचा मंगळवारी रात्री १० वाजता खून झाला होता. याप्रकरणी वडगाव रोड पोलिसांनी एका आरोपीसह दोन विधी संघर्षग्रस्त बालकांनाही ताब्यात घेतले आहे. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.
शुभम बाबाराव वंजारी (१९) रा. जूना उमरसरा असे आरोपीचे नाव आहे. दारव्हा तालुक्यातील गौळपेंड येथील प्रवीण उर्फ पºया शामराव वानखडे हा आई ललीता वानखडे सोबत गेल्या काही वर्षापासून उमरसºयातील गोवर्धन इंगळे यांच्या घरी किरायाच्या खोलीत राहत होता. रोजमजुरीचा व्यवसाय करणाºया प्रवीणचे शुभम व त्याच्या दोन सहकाºयाशी वाद झाला होता. या वादाचा बदला घेण्याच्या दृष्टीकोणातून शुभम व त्याच्या दोन मित्रांनी त्याचा खून केला. प्रवीणची हत्या झाल्यानंतर मारेकºयांना शोधण्यासाठी पोलिसांनी चौफेर तपास सुरू करून सुरूवातीला प्रवीणशी वाद झालेल्या चौघांना ताब्यात घेतले होते. मात्र त्यांच्याकडून कुठलिही माहिती प्राप्त न झाल्याने त्यांना पोलिसांनी सोडून दिले. दरम्यान प्रवीणचा वाद शुभमशी देखील असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. पोलिसांनी चौकशी करून शुभम व त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतल्यानंतर प्रवीणच्या खूनाचे रहस्य उलगडले. पूर्व वैमनस्यातून प्रवीणचा खून केल्याची कबूली शुभम व दोन अल्पवयीन मुलांनी दिली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
0
वकीलावर प्राणघातक हल्ला

यवतमाळ, दि. २६ – पैशाच्या वादातून वकीलावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना गोधणी मार्गावर काल बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुामारास घडली. अॅड. भरत डी. होरा असे जखमी झालेल्या वकीलाचे नाव असून, वडगावरोड पोलीस प्रकरण दडपण्याच्या हालचाली करीत आहे.
शहरात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. उमरसºयातील युवकाच्या हत्येची घटना ताजीच असताना, पैशाच्या वादातून गोधणी मार्गावर मधू सिघांनिया याने वकिलाला अडवून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये जखमी झालेल्या वकीलाने वडगावरोड पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविल्यानंतर लगेच मधू सिंघानिया याने देखील पैशाची मागणी केली असता, मारहाण करून शिविगाळ केल्याची तक्रार वकीलाविरोधात नोंदविली. वकीलाला मारहाण झाल्याचे त्याच्या शरीरावरील इजा वरून व वैद्यकीय तपासणीनंतर स्पष्ट झाले असताना, पोलीस कारवाई करण्यात चालढकल करीत आहे. सिंघानिया दुपारपासूनच वकिलाला मारण्याच्या बेतात होता. तो वकिलाचा शोध घेत गोधणी मार्गावर पोहोचला. यावेळी त्याला अॅड. होरा दिसताच तो त्यांच्या अंगावर तुटून पडला. दोन जणांनी मध्यस्थी केल्यामुळे वकिलाचे प्राण वाचल्या गेले. वडगावरोड पोलिसांनी या प्रकरणात परस्परविरोधी गुन्हे नोंदवून सिंघानियाला वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बोलले जात आहे.
0
शेतकऱ्यांनो आत्महत्या टाळा कुटुंबाला उघड्यावर पाडू नका – संजय राठोड

दाभडीसह चार ठिकाणी आत्महत्याग्रस्त कुटुंबास भेट, आत्महत्याग्रस्त कुटुंबास तातडीने मदत वितरणाचे आदेश
यवतमाळ, दि. २६ : शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. काही अडचणी असल्यास संबंधीत अधिकारी अथवा थेट आम्हास भेटा. आत्महत्या अडचणींवरील उपाय नव्हे. तुमच्या सर्व अडीअडचणी सोडविण्यासाठी शासन कटीबध्द आहे. परंतु आत्महत्या करू नका. आत्महत्या करून कुटुंबाला उघड्यावर पाडू नका, असे भावनिक आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्ह्यातील समस्त शेतकऱ्यांना केले.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला पालकमंत्र्यांनी आज भेटी देऊन कुटुंबियांशी चर्चा केली. त्यावेळी दाभडी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधतांना त्यांनी सदर आवाहन केले. दाभडी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपुर्वी भेट दिली होती. त्यामुळे चर्चेत आलेल्या या गावातील विठ्ठल सवाई राठोड या शेतकऱ्याने नुकतीच कर्जबजारी व नापीकीमुळे आत्महत्या केली होती. दाभडी येथे या कुटुंबास भेट देऊन कुटुंबियांशी पालकमंत्र्यांनी चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधतांना आत्महत्या हा अडचणींवरील मार्ग नव्हे. प्रत्येकाच्या आयुष्यात चांगल्यासोबतच वाईट दिवसही येत असतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्याने खंबीरपणे सामना केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
या भेटीत पालकमंत्री श्री. राठोड यांनी उमरखेड तालुक्यातील सुभाष मधुकर बिचेवार या शेतकऱ्याच्या कुटुंबासही भेट दिली. यावेळी सुभाष बिचेवार यांच्या मुलांशी संवाद साधतांना पालकमंत्र्यांनी खचुन न जाता खंबीरपणे परिस्थितीचा सामना करण्याचे आवाहन केले. मृत शेतकरी बिचेवार यांना आपला मुलगा इंजिनिअर व्हावा असे वाटत होते. मात्र वडिलांच्या मृत्युमुळे इंजिनिअर होण्याचे स्वप्न अधांतरी असलेल्या त्यांच्या सागर नावाच्या मुलास वडिलांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी इंजिनिअरींचा सर्व खर्च उचलण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. तसेच शासन म्हणून आपण कुटुंबियांच्या पाठीशे असल्याचे ते म्हणाले.
त्यानंतर दिग्रस तालुक्यातील सावंगी खुर्द येथील शेतकरी रविंद्र सखाराम कोटे तसेच दिग्रस तालुक्यातील विठाळा येथील शेतकरी धरमसिंग संगडा जाधव या शेतकऱ्यांनीही नापिकी आणि कर्जबजारीपणाने आत्महत्या केल्याने त्यांच्या कुटुंबासही पालकमंत्र्यांनी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी भेटी दिलेल्या ठिकाणी त्यांनी पक्षाच्यावतीने कुटुंबियांना मदत वितरीत केली. शासनाच्यावतीने देय असणारी मदतही तातडीने वितरीत केली जातील, असे त्यांनी यावेळी सांगितले. राज्य शासन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अनेक योजना राबवित आहे. त्यात दिर्घकालीन व अल्पकालीन योजनांचा समावेश आहे. आणखीही काही उपाययोजना हाती घेण्याचे प्रस्तावित आहे. यातुन शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळेल. त्यामुळे आत्महत्या करू नका, असे कडकडीचे आवाहनही त्यांनी चारही ठिकाणी सान्तवणपर भेटी दरम्यान केले. तसेच आत्महत्याग्रस्त कुटुंबांना तातडीने मदत वितरीत करण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी पालकमंत्र्यांसोबत माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार, उमरखेडचे उपविभागीय अधिकारी दिपक सिंगला तसेच ठिकठिकाणचे तहसिलदार उपस्थित होते.
0
रेल्वे अर्थसंकल्पावर सोनिया गांधींची टीका

नवी दिल्ली – केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सादर केलेल्या रेल्वे अर्थंसकल्पाबाबत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी नाराजी व्यक्त केली.
‘यंदाचा रेल्वे अर्थसंकल्प निराशाजनक आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काही योजना सुधारित स्वरुपात मांडल्या आहेत’, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी लोकसभेत रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना नव्या योजनांची घोषणाबाजी न करता रेल्वेच्या पायाभूत बदलावर अधिक भर दिला आहे. रेल्वेच्या प्रवासी भाड्यात कोणतीच दरवाढ करण्यात आलेली नाही मात्र त्याच बरोबर कोणत्याही नव्या गाड्यांची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पावरुन विरोधकांता नाराजी व्यक्त केली जात आहे. माजी रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनीही मोदी सरकारचा अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचे म्हटले आहे. डिझेलच्या दरात घट होऊनही प्रवासी भाड्याच्या दरात कपात न करणे हा अन्याय असल्याचे ते म्हणाले.
0
रेल्वे अर्थसंकल्प सादर, सर्वसामान्यांना दिलासा

नवी दिल्ली – केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गुरुवारी लोकसभेमध्ये आपला पहिला रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना प्रवासी भाडयामध्ये कोणतीही वाढ न करुन सर्वसामान्यांना दिलासा दिला.
मात्र त्याचवेळी कोणत्याही नव्या रेल्वे गाडीची घोषणा न करुन त्यांनी भ्रमनिरासही केला. दरवर्षी रेल्वे अर्थसंकल्पामध्ये नव्या रेल्वे गाडयांची घोषणा केली जाते. मात्र यापुढे सर्वेक्षण करुन नव्या रेल्वे गाडयांची घोषणा करु असे प्रभू यांनी सांगितले.त्यांच्या या निर्णयावर सर्वच पक्षांनी टिका केली आहे. एनडीएमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने प्रभू यांच्या रेल्वे अर्थसंकल्पावर जोरदार टिका केली. या अर्थसंकल्पाने महाराष्ट्र आणि मुंबईला ठेंगा दाखवला आहे.
गर्दीच्यावेळी मुंबईतला लोकल प्रवास जीव नकोसा करणारा असतो. त्यामुळे प्रभू मुंबईतील लोकलसेवेवरील वाढता भार लक्षात घेऊन काही घोषणा करतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी मुंबईच्या तोंडाला पाने पुसली. मागच्या रेल्वे अर्थसंकल्पात ज्या घोषणा झाल्या होत्या. त्याचे काय झाले असा सवाल बसप प्रमुख मायावती यांनी उपस्थित केला.
प्रभू यांनी या अर्थसंकल्पातून प्रवासी सुविधा आणि रेल्वेच्या आधुनिकीकरणावर भर दिला आहे. गेल्या काही वर्षात रेल्वे सुविधांमध्ये फारशी प्रगती न झाल्याने गुंतवणूक कमी झाल्याचे प्रभू यांनी आपल्या भाषणात सांगितले.
सार्वजनिक-खासगी भागीदारीतून पुढच्या पाचवर्षात रेल्वेने ८.५ लाख कोटींच्या गुंतवणूकीचे लक्ष्य ठेवले आहे. सुरक्षा आणि पायाभूत सुविधांमध्ये रेल्वेला सर्वोत्तम बनवायचे असल्याचे प्रभू म्हणाले.
उत्तम प्रवासी सुविधा, सुरक्षित प्रवास, आधुनिक पायाभूत सुविधा आणि रेल्वेचे आर्थिक स्वावलंबन या चतुसूत्रीने रेल्वेचा कायापालट करण्याचे प्रभू यांचे लक्ष्य आहे. रेल्वे मधल्या स्वच्छतेसाठी रेल्वे मंत्रालयात स्वतंत्र विभाग सुरु करण्याची घोषणा प्रभू यांनी केली.
रेल्वे अर्थसंकल्पातील वैशिष्ट्ये
»रेल्वे भाड्यात कोणतीही वाढ नाही- रेल्वेमंत्री
»येत्या पाच वर्षांत ८.५ लाख कोटींची गुंतवणूक करणार
»रेल्वेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी खासगी कंपन्यांची मदत घेणार
»रेल्वेच्या सफाईसाठी नवीन विभाग
»रेल्वेला स्वच्छ भारत अभियानाशी जोडणार – रेल्वेमंत्री
»विमानाप्रमाणे रेल्वेतही व्हॅक्युम टॉयलेटची सुविधा
»नवा रेल्वे हेल्पलाईन क्रमांक १३८ तर संकटसमयी १८२ हा क्रमांक एक मार्चपासून सुरु होणार
»जनरल डब्यांमध्ये मोबाईल चार्जिंगची सुविधा
»रेल्वेचे आयआरसीटीसी हे संकेतस्थळ अन्य भारतीय भाषांमध्येही
»महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे
»गाड्यांची माहिती देण्यासाठी एसएमएस अलर्टची सुविधा
»हिंदी आणि इंग्रजीसोबत इतर भारतीय भाषांमध्ये ई तिकीटची सुविधा उपलब्ध होणार
»मुंबईत एसी लोकल चालवणार – रेल्वेमंत्री
»पाच मिनिटात ई-तिकीट मिळणार, १०८ रेल्वेत ई-केटरिंगची सुविधा
»मोठ्या स्थानकांवर लिफ्ट आणि सरकत्या जिन्यांची सुविधा
»४०० स्थानकांवर वायफायची सुविधा
»रेल्वे स्थानकांवर १७०० बायोटॉयलेट उभारणार
»स्वच्छ रेल, स्वच्छ भारत मोहीम राबवणार
»मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर अलार्मची सुविधा
»रेल्वेच्या नऊ मार्गांवर ताशी २०० किमी वेगाने रेल्वे धावणार
»रेल्वे अपघात टाळण्यासाठी पाच वर्षांचा आराखडा
»दिल्ली-कोलकाता, दिल्ली-मुंबई प्रवासाचा वेळ कमी करणार
»देशातील चार विद्यापीठात रेल्वे संशोधन अभ्यासक्रम
»वर्धा-नागपूर तिस-या मार्गासाठी नवी योजना लवकरच
»निधी उभारण्यासाठी रेल्वे स्थानक, गाड्यांना कंपनीची नावे देणार
»कोकण रेल्वेवर तीन वर्षांत ५० हजारांना रोजगाराची संधी
»तीन हजार मानवरहीत फाटक काढून टाकणार
»सर्व्हे करुनच नव्या गाड्यांची घोषणा- प्रभू
»व्हील चेअरची सुविधा आता ऑनलाईन बुकिंग करता येणार
»लोकल रेल्वेला आधुनिक बनवण्याची योजना
»महिला सुरक्षेसाठी निर्भया फंडातून निधी उपलब्ध करुन देणार
0
कार्यकारी अभियंत्याच्या खुर्चीची प्रेतयात्रा
यवतमाळ – शहरानजीकच्या वाघापूर परिसरात रस्ता डांबरीकरणाचे काम सुरू आहे. खासदार भावना गवळी यांच्या निधीतून महात्मा फुले सोसायटीमध्ये सदर काम करण्यात येत आहे. मात्र या रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप आहे. कार्यकारी अभियंत्यांच्या कक्षात शिवसैनिकांनी डांबर गिट्टी टाकून खुर्चीची प्रेतयात्रा काढली. तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्यांना ही खुर्ची भेट दिली. येथील जिल्हा परिषद बांधकाम क्रमांक-१ मध्ये बुधवारी दुपारी घडलेल्या या प्रकाराने एकच खळबळ उडाली.
रस्त्याच्या कामात ३५ टक्के डांबराचा वापर आणि बीबीएम कारपेट न टाकताच रस्ता तयार करण्यात येत असून त्याकडे बांधकाम विभाग डोळेझाक करीत आहे. या प्रकाराने शिवसैनिक संतप्त झाले. या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी संतोष ढवळे यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद सदस्य मंदा गाडेकर, वाघापूरचे सरपंच संजय कोल्हे, लता ठोंबरे, राज कोल्हे, मनीषा चौधरी, ललिता वाघ, राजू गिरी आदी शिवसैनिक जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज सहारे यांच्या कक्षात धडकले. या ठिकाणी त्यांनी सोबत आणलेली गिट्टी टाकली. तसेच कक्षातील खुर्ची उचलून चक्क प्रेतयात्रा काढीत जिल्हा परिषद गाठली.ही खुर्ची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांना भेट देत संबंधितांवर कारवाईची मागणी केली. या प्रकाराला कंत्राटदार आणि वरिष्ठ जबाबदार असल्याचा आरोप केला. यावेळी अनंत उंबरकर, चेतन काळे, इशू मावळे, राजू मेहरे, संतोष चंदनखेडे, रमेश भगत, बबन गावंडे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.जिल्हा परिषद बांधकाम विभागात घडलेल्या या प्रकाराने एकच खळबळ उडाली.
0
उमरसरा येथे तरुणाचा खून

यवतमाळ : सिमेंटच्या बाकावर झोपून असलेल्या एका तरुणाच्या डोक्यावर अज्ञात मारेकर्यांनी टणक वस्तूने जोरदार प्रहार करून त्याला जागीच ठार केले. ही घटना मंगळवारी रात्री १0 वाजताच्या सुमारास येथील उमरसरा परिसरातील तीन फोटो चौकात घडली. याप्रकरणी चार संशयीतांना ताब्यात घेण्यात आले. मात्र घटनेचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.
प्रवीण ऊर्फ पर्या शामराव वानखडे (२१) रा. गौळपेंड, ता. दारव्हा असे मृताचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून तो येथील उमरसरा परिसरातील गोवर्धन ले-आऊटमध्ये आई ललिता वानखडे यांच्यासह वास्तव्याला होता. तसेच तणस विक्रीचा व्यवसाय करीत होता. मंगळवारी रात्री तो तीन फोटो चौकातील एका टपरीसमोरील बाकावर झोपून होता. दरम्यान तेथे अज्ञात तिघे जण आले. यावेळी संधी साधून त्यांनी पर्यावर टणक वस्तूने प्रहार केला. त्यामध्ये डोक्याला जबर दुखापत होऊन प्रचंड रक्तस्त्राव झाला. त्यातच पर्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले. ही बाब स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ घटनेची माहिती वडगाव रोड पोलिसांना दिली. त्यावरून पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पाठोपाठ उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल मदने, ठाणेदार बाळकृष्ण जाधव, फौजदार केंद्रे, स्थानिक गुन्हे शाखा आदी पथकेही तेथे पोहोचली. यावेळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. त्यानंतर पर्याची आई ललिता वानखडे यांची रितसर तक्रार घेऊन अज्ञात मारेकर्यांविरुद्ध वडगाव रोड पोलिसांनी भादंवि ३0२ कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल केला. रात्रीच पोलिसांनी गोपनीय माहितीवरून मारेकर्यांचा शोध घेतला. वडगाव रोड पोलिसांनी चार संशयीतांना ताब्यात घेतले.
0
केडीएमसी भ्रष्टाचार मुक्त करणार-.जितेंद्र अाव्हाड

कल्याण – कल्याण-डोंबिवली अंतर्गत होणाञा निकृष्ट दर्जाचे रस्ते, बी.एस.यू.पी घरकुल यात होणारा भ्रष्टाचार यावर एनसीपी चे माजी मंत्री जितेंद्र अाव्हाड यांनी त्यांची सत्ता गेल्यानंतर अारोपांची झोड लावली अाहे.
बुधवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी होणार्या भ्रष्टाचाराची माहिती दिली कि, बी.एस.यू.पी घरकुल यात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झालेले असून या विषयावर मागील महिन्यात नगरसेवकांना विश्वासात घेऊन एक बैठक घेण्यात अाली होती,व त्यावेळेस असलेले अायुक्त सोनवणे यांचा भ्रष्टाचाराच्या बाबतीत अधिकाञांवर असलेला अाशिर्वाद हे विषय बैठकीत मांडण्यात अाल्यावर सोनवणे यांची तात्काळ बदली झाली,पण बदली होऊन चालणार नाही,तर झालेला भ्रष्टाचाराचा सत्य जनतेसमोर यावा यासाठी अात्ता असलेले अायुक्त अर्दड यांची भेट घेउन,झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी असे त्यांना सांगितले अाहे,व अर्दड यांनी देखील चौकशीचे अाश्वासन दिले अाहे.कल्याण-डोंबिवली शहराची ओळख ही नौकरदाराचे व कष्टकञांचे शहर म्हणून ओळखले जाते. येथे २% उद्योगधंदा व ९८% लोक हे नौकरी-धंदा करणारा,मध्यमवर्गीयांचा व टॅक्स भरणारा शहर अाहे,तसेच कल्याण-डोंबिवली बिल्डींगमध्ये राहणाञा मध्यम वर्गीय माणसाने टॅक्स भरले नाही अशी तक्रार अाली नाही,तरी त्यांच्या नशिबी हे निकृष्ट दर्जाचे रस्ते व बी.एस.यू.पी घरकुल हे भ्रष्टाचाराचा मोठा उच्चांक अाहे.या भ्रष्टाचारा विषयी हायकोर्टात याचिका दाखल केली असून,मा.अायुक्त अर्दड यांनी पुढाकार घेऊन चौकशी केली तर सत्य समोर येईल.
0
केडीएमसी अधिकार्यांच्या बेशिस्तपणामुळे अायुक्तांनी काढले परिपत्रक

कल्याण-डोंबिवली महापालिकेत अायुक्त कार्यालयात नोंद न होता,काही फाईली अधिकारी काखेत घालून येत असतात.अधिकार्यांच्या या बेशिस्तपणाला लगाम घालण्यासाठी अायुक्त अर्दड यांनी एका परिपत्रकाद्वारे अधिकार्यांचे कान पिरगळले अाहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयात विविध कामानिमित्त अायुक्तांच्या दालनात येणार्या अधिकार्यांनी बेशिस्तीने येऊ नये यासाठी अायुक्त अर्दड यांनी हे परिपत्रक काढले अाहे.कार्यालयात येणार्या फाईलची नोंद न होता,अधिकारी वर्ग फाईल काखेत घालून अाणत असल्याचे निदर्शनास अाल्याने अायुक्तांनी हे परिपत्रक काढले अाहे.
सामान्य प्रशासनाचे उपायुक्त यांनी फाईल काखेत घालून अाणले हे निदर्शनास अाल्यानंतर अायुक्तांनी शिस्तपालनाचे हे परिपत्रक काढल्याचे बोलले जात अाहे.तसेच घनकचरा,मालमत्ता,पाणीपट्टी,तांत्रिक,सामान्य प्रशासन,नगर रचना,अतिक्रमण व परिवहन विभागाच्या येणार्या फाईल ही संबंधित खाते प्रमुखांनी घेऊन न येण्याचे सुचना अायुक्त अर्दड यांनी केली अाहे,हा बेशिस्तपणा असुन ,अायुक्त कार्यालयातील अावक-जावक संबंधित कार्यालयात नोंदणी झाल्यानंतर वेळोवेळी सादर करण्याचे अादेश अर्दड यांनी दिले अाहे.
0
सामूहिक प्रयत्नातून धामणगाव (देव) चा विकास – ना. संजय राठोड

यवतमाळ : दारव्हा तालुक्यातील धामणगाव देव येथील श्री. भगवान मुंगसाजी माउली देवस्थानासह सर्व संस्थानांचा विकास आराखडा तयार करून, लाखो भक्तांचे श्रदधास्थान असलेल्या या तीर्थक्षेत्राचा सामूहिक प्रयत्नातून विकास करण्याची ग्वाही राज्याचे महसूल राज्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आज येथे दिली. मुंगसाजी माउली पुण्यतिथी महोत्सवानिमित्त मुख्यदरबार येथे रथपूजनाचा कार्यक्रम आज बुधवारी २५ फेब्रुवारीला सकाळी ८ वाजता ना. संजय राठोड यांच्याहस्ते पार पडला त्यावेळी ते बोलत होते.
धामणगाव देव येथे १९ फेब्रुवारीपासून भगवान मुंगसाजी माउलीचा पुण्यतिथी महोत्सव सुरू आहे. विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन या निमित्ताने करण्यात आले होते. विदर्भ, मराठवाड्यातील हजारो भाविक पालखी सोहळयासाठी धामणगाव देव येथे दाखल झाले होते. आज हजारो भक्तांनी माउलीच्या दर्शनासाठी गर्दी केली. यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत रथपूजन, पालखीसोहळा, महाआरती करण्यात आली, तसेच भक्तांना महाप्रसादाचे वितरणही करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांसह मुंगसाजी महाराज देवस्थान मुख्यदरबारच्या विश्वस्त मंडळाने चोख व्यवस्था ठेवली. या कार्यक्रमप्रसंगी ना. संजय राठोड यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मलिन्नाथ कलशेट्टी, मुख्य दरबारचे महंत मुरली अंभोरे महाराज, शिवसेना तालुका प्रमुख श्रीधर मोहोड, मनोज सिंघवी, शहर प्रमुख सुधीर दातीर, सरपंच जगदीश जाधव, चिंच देवस्थानचे डॉ. संजय देशमुख, उपविभागीय अधिकारी मनोहर कडू, तहसीलदार प्रकाश राउत, अरविंद गादेवार, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष पंडीत राठोड यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते.
0
जैन समाजातर्फे मौन मोर्चा

कल्याण- गेल्या दिवसात याच महिन्यात लोणावळा येथिल कुमार रिसाॅर्ट येथे एका लहान ७ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करुन हत्या केल्याची घटना समोर अाली होती,पण अात्तापर्यंत अारोपी पकडला गेलेला नाही,याचा निषेधार्थ कल्याण येथे जैन समाजातील महिला व पुरुषांनी हजारोच्या संख्येने,गांधी चौक ते कल्याण तहसिलदार कार्यालय पर्यत मौन मोर्चा काढला,व तहसिलदारला लेखी पत्र देऊन कुमार रिसाॅर्ट येथे झालेल्या बलात्काच्या अारोपींना लवकरात लवकर पकडण्यात यावा,तसेच कठोर कार्यवाही करण्याचे या पत्यात जैन समाजाने केलेली असुन,या मोर्चेमध्ये सहभाग घेण्यासाठी गुलाबचंद कोठारी हे अमेरिकेहून अाले होते.व म्हटले कि, ही घटना लाज वाटण्यासारखी अाहे,पण जैन समाज मुंबई ला दिल्ली नाही बनू देणार.तसेच या राकेश मुथा यांनी सांगितले कि, या घटनेला येवढे दिवस उलटून गेले,तरीही अजून पोलिसांना अारोपीला पकडण्यात यश अाले नाही,जर पोलिसांनी अारोपीला लवकर पकडले नाही,तर जैन समाजातर्फे अजून मोर्चा काढण्यात येईल.व नितिन जैन या व्यक्तीने अारोप लावले कि,कुमार रिसाॅर्ट हे बीजेपीचे माजी अामदारचे अाहे,तर सरकार त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत तर नाही ना ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला अाहे.











