
यवतमाळ, दि. १० – यवतमाळ वनवृत्तातील वनक्षेत्रातील बिबट असूरक्षित असल्याचे गेल्या काही घटनांवरून स्पष्ट झाले आहे. दारव्हा वनपरीक्षेत्रात एकाच महिन्यात दोन मृतावस्थेत आढळल्याची घटना ताजीच असताना, आज मंगळवारी बोरजई शिवारात बिबटला विष पाजून मारण्यात आल्याची घटना उघडकीस आल्याने वनविभागाची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली आहे. मारोती अैईसकर , गणेश खडके असे अटकेतील आरोपींची नावे आहे.
वनसंपदनेने नटलेल्या जिल्हा जंगलाने व्यापलेला आहे. त्यामुळेच यवतमाळ, पुसद व पांढरकवडा अशा तीन वनवृत्ताची विभागणी करण्यात आली आहे. यवतमाळ वनवृत्तातील आठ वनपरीक्षेत्रापैकी, यवतमाळ, हिवरी, दारव्हा या रेंजमधिल राखीव वनात सागवान झाडे मोठ्या प्रमाणात आहे. सागवान वृक्षांसोबतच वन्यप्राण्यांचे देखील वनात वास्तव असून, बिबटची संख्या देखील लक्षनिय आहे. त्यामुळे या वनपरीक्षेत्रावर तस्करांचा नेहमीच डोळा असतो. यवतमाळ वनपरिक्षेत्रात मध्यतंरी बिबट मृत्यूची तीन घटना घडल्या होत्या. बिबटच्या मृत्यूचे गुढ वनविभाग उकलण्यात अपयशी ठरले असताना, गेल्या महिन्याभरात दारव्हा वनपरीक्षेत्रात बिबट मृत्यूची मालिका सुरू आहे. दोन बिबट मृत्यूची चौकशी सुरू असताना, आज मंगळवारी चाणी बिटमधिल बोरजई शिवारात बिबट मृतावस्थेत पडून असल्याची वनविभागाला माहिती मिळाली. महिन्याभरात बिबट मृत्यूची घटना घडल्याने उपवनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा यांनी घटनास्थळी भेट दिली. उपविभागीय वनअधिकारी राहुल गवई, वनपरीक्षेत्र अधिकारी नाल्हे व क्षेत्रसाहाय्यक धोत्रे यांच्या चौकशी दरम्यान बिबटला विष पाजून मारण्यात आल्याची माहिती पुढे आली. यामध्ये मारोती अैईसकर , गणेश खडके या दोघांना अटक करण्यात आली आहे. मात्र यापूर्वी दोन घटनेतील बिबट मृत्यूचे गुढ वनअधिकाºयांनी उकलले नसून, वनविभागाच्या दुर्लक्षितपणामुळे बिबटच्या सुरक्षितेतचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.






















