पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for February 20th, 2015

२६ विद्यार्थ्यांना विष बाधा

 

भिवंडी – भिंवडी येथील एका आश्रम शाळेतील २६ विद्यार्थ्यांना विष बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. २६ विद्यार्थ्यांपैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना ठाणे येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
एका खासगी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार शाळेतील काही विद्यार्थ्यांनी दुपारच्या वेळात विहिरीतील पाणी प्यायले. त्यानंतर थोड्याच वेळात या विद्यार्थ्यांना मळमळ, पोटदु:खीचा त्रास जाणवू लागला. एका पाठोपाठ एक असे २६ जण शिक्षकांकडे गेले. तिथे उपस्थित शिक्षकांनी तत्काळ विद्यार्थ्यांना हॉस्पिटलमध्ये हलवले. २६ पैकी दोन विद्यार्थ्यांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना ठाणे येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आल्याचे कळते.

February 20, 2015 in रोजगार

भंडाऱ्यात तरुणीचा भरदिवसा खून

भंडारा – मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांच्या विदर्भात भंडारा जिल्ह्यात महिला सुरक्षेचे भरदिवसा वाभाडे काढणारी धक्कादायक घटना घडली आहे. छेडछाड करणाऱ्याने दिवसाढवळ्या महाविद्यालयीन तरुणीचा तीक्ष्ण हत्याराने भोसकून खून केला. देवा गभने असं आरोपीचं नाव आहे. विशेष म्हणजे तरुणीने आरोपीविरोधात छेडछाडीची तक्रार करुनही पोलिसांनी त्याच्यावर काहीच कारवाई केली नाही.
महाविद्यालयात जात असताना आरोपी देवा गभने सतत पीडित तरुणीची छेड काढून तिचा छळ करत होता. त्याच्या छेडछाडीला आणि छळाला वैतागून पीडित तरुणीने आणि तिच्या वडिलांनी पोलिसात तक्रारही दाखल केली होती. पण पोलिसांनी आरोपीविरोधात काहीच कारवाई केली नाही. ही पीडित तरुणी आज महाविद्यालयात जात असताना आरोपीने तिच्यावर रस्त्यातच हल्ला केला. मरेपर्यंत त्याने तिच्यावर धारधार हत्याराने वार केले. यात पीडित मुलीचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी देवा गभने याने स्वतःला पोलिसांच्या हवाली केलं. पोलिसांनी अटक करून त्याच्यावर खूनचा गुन्हा दाखल केला आहे.
खूनाच्या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी पोलिस ठाण्यात बाहेर आंदोलन करत पोलिसांच्या नाकर्तेपणाविरोधात घोषणाबाजी केली. तक्रार करुनही काहीच कारवाई न केल्याने ग्रामस्थ पोलिसांवर संतापले होते. घटनास्थळी मोठ्या संख्यने अजूबाजूच्या गावातीलही गावकरी गोळा झाले. आणि पोलिसांना पीडित तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घेऊन जाण्यास नकार दिला, अशी माहिती रामचंद्र भुरे या स्थानिक ग्रामस्थाने दिली.

February 20, 2015 in मुख्य पान

पल्स पोलिओ लसिकरणाचा दुसरा टप्पा 22 फेब्रुवारी रोजी, 2 लाख 66 हजार बालकांना लस पाजणार

यवतमाळ,दि.20: पल्स पोलिओ लसिकरण मोहिमेचा दुसरा टप्पा दि. 22 फेब्रुवारी रोजी जिल्हाभर राबविण्यात येणार आहे. मोहिमेसाठी आरोग्य विभागाने आवश्यक तयारी केली असून पालकांनी आपल्या 0 ते 5 वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकांचे लसिकरण करून मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले जिल्ह्यात दुसऱ्या टप्यात शहरी व ग्रामिण भागात एकूण 2 लाख 66 हजार बालकांना पोलिओ लस देण्यात येणार आहे. सदर मोहिम यशस्वी करण्यासाठी ग्रामीण भागात 2343, शहरी भागात 275 असे 2618 बुथ राहणार आहे. तसेच ग्रामीण व शहरी भागात 519 ट्रांझीट टिम तसेच 114 मोबाईल पथके नेमण्यात आली आहे. मोहिमेसाठी पुरेसे मनुष्यबळ नेमण्यात आले आहे. त्यात जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य विस्तार अधिकारी याशिवाय 126 वैद्यकीय अधिकारी, 154 आरोग्य सहाय्यक, 795 आरोग्य सेवक, 2295 आशा कार्यकर्ती, 2255 अंगणवाडी सेविका यासह विविध सामाजिक संघटनांचा सहभाग राहणार आहे. जिल्ह्यातील सर्व बालकांचे लसिकरण होण्याच्यादृष्टीने पालकांनी आपल्या 0 ते 5 वर्ष वयोगटातील तसेच नव्याने जन्मास आलेल्या सर्व बालकांना पोलिओ बुथवर आणून लसिकरण करुन घ्यावे व पोलिओ मुक्तीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. के.झेड. राठोड व जिल्हा शल्य चिकित्सक प्रेमानंद निखाडे यांनी केले आहे.

February 20, 2015 in विदर्भ

पालक सचिव व्ही.गिरीराज यांच्याकडून जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांची पाहणी

यवतमाळ, दि. 20 : ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव व्ही.गिरीराज यांनी आज जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामांना भेटी देऊन पाहणी केली. या भेटीत त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.मल्लिनाथ कलशेट्टी, गटविकास अधिकारी प्रकाश नाटकर, तालुका कृषी अधिकारी श्री.भवरे, मनपुर गावचे सरपंच श्री.पारधी यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत मनपुर येथे शेततळ्याचे काम सुरू आहे. या शेततळ्याची श्री.गिरीराज यांनी पाहणी केली. तसेच कामाबाबत गावकऱ्यांशी चर्चा केली. मनपुर येथीलच पाणी शुध्दीकरण प्रकल्पासही त्यांनी भेट दिली. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात आलेल्या रस्ता दुतर्फा वृक्ष लागवडीची पाहणीही त्यांनी केली. यावेळी उपस्थित सरपंच, ग्रामसेवक यांना वृक्षांची निगा राखण्याचे निर्देश त्यांनी दिले. जास्तित जास्त झाडे जगली पाहिजे, असे ते म्हणाले. जलयुक्त शिवार अभियानाची माहितीही त्यांनी यावेळी गावकऱ्यांकडून घेतली.

February 20, 2015 in विदर्भ
खुनाच्या प्रयत्नातील पाच आरोपींना अटक, दोन तलवारी जप्त 0

खुनाच्या प्रयत्नातील पाच आरोपींना अटक, दोन तलवारी जप्त

यवतमाळ, दि. २० – खुनाच्या प्रयत्नात असलेल्या पाच आरोपींना दोन तलवारीसह अटक करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अशोकनगर, पाटीपुरा येथे केली. अंकुश दामोधर रामटेके (३०), रा. पाटीपुरा, आकाश वसंता वानखडे (२३) रा. आष्टा, संजय शंकर शेळके (३०) रा. नागपूर, मंगेश गुलाब नंदपटेल (२८) रा. अशोकनगर यांच्यासह विधीसंघर्ष ग्रस्त बालक अशा पाच जणांना अटक करण्यात आली. तर पोलिसांच्या कारवाईची कुणकुण लागल्याने सय्यद टकल्या व प्रितम उर्फ प्राजी दामोधर रामटेके (३५) दोघेही रा. अशोकनगर हे फरार झाले.
काही इसम अशोकनगरातील सय्यद टकल्या याच्या घरी घातक शस्त्रासह बसून असल्याची टीप सहाय्यक पोलीस निरीक्षक कडून यांना मिळाली. त्यावरून पोलीस अधीक्षक संजय दराडे, पोलीस निरीक्षक संजय पुजलवार यांच्यामागर्दशनात सापळा रचण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकताच पाच जणांना अटक केली. गादीखाली ठेवून असलेल्या दोन तलवारी जप्त केल्या. सदर इसम खून करण्याच्या बेतात होते, अशी माहिती पोलीस सूत्राने दिली. आरोपीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक कडू, ऋषी ठाकूर, अमोल चौधरी, किरण पडघण, शहजाद खान, ओमप्रकाश यादव, भीमराव सिरसाट, वासू साठवणे, मो.शकील, सचिन घुगे, गणेश देवतळे, रेवन जागृत यांनी केली.

February 20, 2015 in विदर्भ
छायाचित्र स्पर्धेत रामदास पद्मावार प्रथम 0

छायाचित्र स्पर्धेत रामदास पद्मावार प्रथम

PurskarPhoto 01
दिग्रस, दि. २० – सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती यवतमाळच्या वतीने आयोजीत छायाचित्र स्पर्धेत येथील छायाचित्रकार रामदास पद्मावार यांनी प्रथम पुरस्कार पटकाविला. शिवजयंतीनिमित्त आझाद मैदान यवतमाळ येथे एका समारंभात पद्मावार यांना हा पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्राच्या अध्यक्षस्थानी आ. ख्वाजा बेग तर प्रमुख पाहुणे म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप महाले, जिजाऊ ब्रिगेडच्या राज्याध्यक्षा छाया महाले, विजया थोटे, ज्ञानेश्वर रायमल, स्मीता गवळी, नरेंद्र उन्हाळे, इजाज जोश, प्रशांत ठाकरे उपस्थित होते.

February 20, 2015 in विदर्भ
 २२ हजार विद्यार्थी देणार बारावीची परिक्षा, १५६ बैठे व सात भरारी पथकाची निर्मीती 0

२२ हजार विद्यार्थी देणार बारावीची परिक्षा, १५६ बैठे व सात भरारी पथकाची निर्मीती

images (1)
यवतमाळ, दि. २० – इयत्ता बारावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरूवात होणार असून, टर्निंग पॉर्इंट ठरणाºया परीक्षेला जिल्ह्यातील २२ हजार विद्यार्थी सामोरे जाणार आहे. एकूण ९९ परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे. चिटोरेबहाद्दरांना रोखण्यासाठी यंदाही कॉपीमुक्त अभियान राहणार आहे. त्यासाठी १५६ बैठे पथकांसह सात भरारी पथकाचा वॉच राहणार आहे.
करिअर कशात करायचे, यासाठी बारावीची परीक्षा महत्वाची ठरते. मायमराठीच्या पेपरने सुरू होणारी परीक्षा २२ हजार विद्यार्थी देणार आहे. गैरमार्गाशी लढा उपक्रमातंर्गत कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून करण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्रावर अनुचित प्रकार आढळल्यास केंद्रप्रमुख, संचालक, पर्यवेक्षक यांना जबाबदार धरण्यात येईल. तसेच शाळेची मान्यता रद्द करण्याचा इशारा जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी दिला आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वीपासून तर संपेपर्यंत प्रत्येक केंद्रावर बैठे पथकाचा ठिय्या राहणार आहे. त्यासाठी १५६ पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. सोबतच सात भरारी पथकही राहणार आहे. ही पथके अकस्मात कुठल्याही परीक्षा केंद्रावर भेट देऊ शकतात. भारनियमनामुळे विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून जनरेटरची व्यवस्था करण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले आहे. कॉपी आढळल्यास केंद्र प्रमुख, संचालक, पर्यवेक्षक यांच्यावर कारवाईची कुºहाड कोसळणार असून, शाळांची मान्यता रद्द करण्याचा इशारा देण्यात आल्याने संस्थाचालकांचे धाबे आतापासूनच दणाणले आहे.

February 20, 2015 in विदर्भ

बिहारचे मुख्यमंत्री जीतराम मांझी यांचा राजीनामा

 

पाटणा – आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा करणारे बिहारचे मुख्यमंत्री जीतराम मांझी यांनी नेमक्या परीक्षेच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी बिहार विधानसभेत बहुमत सिध्द करण्याआधी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
त्यामुळे मांझी यांचा बंडाचा बार फुसका ठरला असून, यामध्ये भाजपाची सपशेल हार झाली आहे. कारण मांझींच्या बंडाला भाजपाने पाठिंबा दिला होता.
बिहार विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला जाण्याच्या तासभर आधी मांझी यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रधान सचिवांनी मांझी यांच्या राजीनाम्याची घोषणा केली.
मांझी यांच्या राजीनाम्यामुळे नितीश कुमार यांचा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी आसनस्थ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नितीश कुमार यांना स्वपक्षातल्या ९७ आमदारांसह राजद, काँग्रेस आणि सीपीआयच्या आमदारांचा पाठिंबा आहे. नितीश कुमार यांच्याजवळ १२८ आमदारांचा पाठिंबा आहे.
याउलट माझींकडे स्वपक्षाच्या आठ आणि भाजपाच्या ८७ आमदारांचा पाठिंबा होता. पण या पाठिंब्यावर बहुमत सिध्द करता येणार नाही हे लक्षात येताच, मांझींनी बहुमताच्या लढाईत पराभव पत्करण्यापेक्षा राजीनामा देण्याचा पर्याय स्वीकारला.
मला पाठिंबा देणा-या आमदारांना जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या म्हणून मी राजीनामा दिला अशी सारवासारव मांझींनी केली आहे. गुप्त मतदान घेतले असते तर, मला १४० आमदारांनी पाठिंबा दिला असता असाही मांझी यांचा दावा आहे.
एकूणच भाजपाने मांझींच्या खांद्यावर बंदूक ठेवून नितीश यांच्यावर नेम साधण्याची चाल रचली होती. पण ऐनवेळी मांझींनी माघार घेतल्याने भाजपाचा डाव फसला. लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये झालेल्या जनता दल युनायटडेच्या दारुण पराभवानंतर नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन, त्या ठिकाणी दलित कार्ड खेळत जीतनराम मांझी यांना मुख्यमंत्रीपदाच्या गादीवर बसवले होते. नंतर पक्षाने पायउतार होण्यास सांगितले. तेव्हा मांझींनी मुख्यमंत्रीपद सोडण्यास नकार देत नितीश कुमार यांना आव्हान दिले.

February 20, 2015 in देश-विदेश

आ.कुलकर्णी यांना स्वाइन फ्लू

पुणे – राज्यातील स्वाइन फ्लू आजाराची लागण झालेल्यांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. पुण्यातील कोथरुड मतदारसंघाच्या भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांनाही स्वाइन फ्लू या आजाराची लागण झाली आहे. त्यांच्यावर एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून मेधा कुलकर्णी उपचारांना प्रतिसाद देत आहेत. राज्यात आतापर्यंत स्वाइन फ्लूमुळे ८३ जणांचा मृत्यू झाला आहे तर देशात याच आजारामुळे ७०४ जण दगावले आहेत. दरम्यान, राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर आरोग्य विभागातर्फे स्वाइन फ्लूमुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी ठोस उपाययोजना करायला सुरुवात झाली आहे.

February 20, 2015 in मुख्य पान

न्यूझीलंडचा इंग्लंडवर दणदणीत विजय

वेलिंग्टन –न्यूझीलंड विरुध्द इंग्लंड लढतीत न्यूझीलंडने सामन्यावर एकहाती वर्चस्व गाजवत विश्वचषक स्पर्धेतील सलग तिस-या विजयाची नोंद केली.
न्यूझीलंडने इंग्लंडवर आठ गडी आणि तब्बल ३८ षटके राखून दणदणीत विजय मिळवला. शुक्रवारी वेलिंग्टन येथे झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडला अक्षरक्ष लोळवले.
आधी टीम साउदीची आग ओकणारी गोलंदाजी त्यानंतर ब्रेंडन मॅककलमच्या वादळाने इंग्लिश आर्मीची दाणादाण उडवून दिली. साउदीने नऊ षटकात ३३ धावा मोजत इंग्लंडच्या तब्बल सात फलंदाजांना माघारी धाडले. त्यानंतर १२४ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीला आलेला न्यूझीलंडचा कर्णधार मॅककलम पहिल्या चेंडूपासून इंग्लिश गोलंदाजांवर तुटून पडला.
अवघ्या १८ चेंडूत त्याने अर्धशतक झळकवले. ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या सामन्यात हॅटट्रीक घेणा-या स्टीव्हन फिनच्या गोलंदाजीच्या तर मॅककलमने अक्षरक्ष चिंधडया उडवल्या. फिनच्या दोन षटकात न्यूझीलंडने ४९ धावा कुटल्या. मॅककलमने २५ चेंडूत ७७ धावा केल्या. यात आठ चौकार आणि सात षटकारांचा समावेश होता. १०५ धावांची सलामी दिल्यानंतर ख्रिस वोक्सने मॅककलमच्या यष्टया वाकवल्या.
मार्टिन गुप्टील २२ धावा करुन बाद झाला. त्यालाही वोक्सने बाद केले. विल्यमसन आणि टेलरने न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. न्यूझीलंडने या सामन्यातील खेळाने आपण विजेतेपदाचे प्रबळ दावेदार का आहोत ते दाखवून दिले. हा विजय न्यूझीलंडचे मनोबल उंचावणारा तर, इंग्लंडचे मनोधैर्य खच्ची करणारा आहे.
तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा इंग्लिश कर्णधार इयॉन मॉर्गनचा निर्णय इंग्लंडच्या चांगलाच अंगलट आला. टिम साउदीच्या आग ओकणा-या गोलंदाजीसमोर इंग्लिश फलंदाज धारातीर्थी पडले.
साउदीच्या भेदक गोलंदाजीमुळे इंग्लंडचा डाव अवघ्या १२३ धावात संपुष्टात आला. साउदीने नऊ षटकात ३३ धावांच्या मोबदल्यात इंग्लंडच्या सात फलंदाजांना तंबूची वाट दाखवली. रुटचा अपवाद वगळता इंग्लंडचा एकही फलंदाज न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा समर्थपणे सामना करु शकला नाही.
रुटने सर्वाधिक (४६) धावा केल्या. तब्बल सतरा षटके बाकी असताना इंग्लंडचा डाव आटोपला. इंग्लंडचे शेवटचे सहा फलंदाज फक्त १९ धावात तंबुत परतले. संघाची धावसंख्या १०४ असताना मॉर्गनच्या (१७) रुपात इंग्लंडचा चौथा गडी बाद झाला त्यानंतर इंग्लंडच्या डावाला जी गळती लागली ती शेवटपर्यंत थांबलीच नाही. रुट बाद होणारा इंग्लंडचा शेवटचा फलंदाज ठरला. त्याला मिल्नेने व्हिटोरीकरवी झेलबाद केले.
इंग्लंडकून फक्त रुट आणि मॉर्गनमध्ये चौथ्या विकेटसाठी ४७ धावांची मोठी भागीदारी झाली. त्या व्यतिरिक्त इंग्लंडकडून डाव सावरणारी एकही भागीदारी होऊ शकली नाही. सात दिवसात तिसरा सामना खेळणारा न्यूझीलंड आतापर्यंत श्रीलंका आणि स्कॉटलंड विरुध्दचे दोन सामने जिंकून गटात अव्वल स्थानावर आहे.

February 20, 2015 in क्रीडा
विदर्भासाठी महत्वाची घोषणा होणार 0

विदर्भासाठी महत्वाची घोषणा होणार

000000download
मुंबई-(सतिष राठोड /महाराष्ट्र न्यूज नेटवर्क) – मुख्यमंत्री व राज्याचे वित्तमंत्री हे विदर्भाहून अाहेत,त्यामुळे याचा पडसाद राज्याचा बजेटवर दिसेल.विजय केळकर समितीच्या अाग्रहानुसार विदर्भासाठी महत्वाची घोषणा होणार अाहे,अशी माहिती वित्त विभागाच्या सुत्रांनि दिली अाहे.तसेच या बजेटमध्ये एलबीटी रद्द होण्याचे संकेत अाहेत,बजेटमध्ये अारोग्य,शिक्षण,जलसिंचन,रस्ते, या विषयावर विशेष भर देण्यात येणार असून,९ मार्च पासून सुरु होणार्या विधानसभा अधिवेशनामध्ये १७ ते १९ मार्च दरम्यान बजेट मांडण्यात येईल.राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची बजेट मांडण्याची पहिलीच वेळ अाहे,तसेच महसुल वाढविण्यासाठी नविन कर लावणे किंवा जुन्या करात वाढ करण्याच्या एैवजी सरकारी खर्च कमी करण्यावर जोर देणार असल्याची माहिती प्राप्त झाली अाहे.

February 20, 2015 in महाराष्ट्र