पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for February 12th, 2015

 खुनातील चार आरोपींना जन्मठेप, हातोला येथील खून प्रकरण 0

खुनातील चार आरोपींना जन्मठेप, हातोला येथील खून प्रकरण

images
यवतमाळ, दि. १२ – मुलाला का मारले याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा खून करणाºया हातोला येथील चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. दारव्हा येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश संजय देशमुख यांनी आज गुरुवारी हा निकाल दिला.
संतोश बहिरट, पंडीत बहिरट, रवी बहिरट, शिवाजी बहिरट सर्व रा. हातोला अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहे. नोव्हेंबर २०११ मध्ये हातोला येथील मृतक विठ्ठल पंडीत खामकर यांचा मुलगा आशिष खामकर यास आरोपी संतोष, पंडीत याने मारहाण केली होती. याचा जाब विचारण्यासाठी मृतक विठ्ठल खामकर गेले होते. यावेळी संतोष, पंडीत, रवी व शिवाजी या चौघांनीही चाकुने भोसकुन विठ्ठल याचा खून केला होता. याप्रकरणी दारव्हा पोलिसांनी आरोपीविरूद्घ भादंवि कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला केला. त्यानंतर आरोपींना अटक करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश संजय देशमुख यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. सरकारी पक्षाच्या वतीने एकुण ११ साक्षीदार तपासले. यामध्ये आरोप सिद्घ झाल्याने चारही आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी १० हजार रुपये दंड ठोठावला. दंडाची रक्कम मृतकाची पत्नी सुनीता खामकर यांना देण्याचे आदेश दिले. तर सुभाष राठोड यास खोटी साक्ष दिल्याच्या कारणावरून नोटीस काढण्यात आली आहे. सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड. अविनाश शेटे यांनी काम पाहिले.

 

February 12, 2015 in मुख्य पान
घरफोडीतील दोन महिला अटकेत 0

घरफोडीतील दोन महिला अटकेत

IMG-20150212-WA0006
यवतमाळ, दि. १२ – येथील डेहनकर ले-आऊटमध्ये घरफोडी करणाºया दोन महिलांना डिवायएसपीच्या पथकाने आज गुरूवारी अटक केली. त्यांच्या कडून ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गीता अर्जून भोसले (३०) रा. परसोडी, हल्ली मुक्काम कळंब, अनिता माउली भोसले (२०) रा. वर्धा व दोन अल्पवयीन मुले असे अटकेतील चोरट्यांची नावे आहे.
ब्रिजलाल छोटेलाल यादव रा. डेहणकर ले-आऊट यांच्या घराचे दरवाजाचे कुलूपकोंडा तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख असा ६४ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी वडगावरोड पोलीस स्टेशनला तक्रार नोंद झाल्यानंतर पोलीस चोरट्यांचा शोध घेत होती. दरम्यान आज सकाळी चोरीतील कोºया नोटा दोन महिलांकडे असल्याची माहिती डीवायएसपीच्या पथकाला मिळाली. त्यांनी चौकशी केली असता, रोख रक्कम व चोरीतील मुद्देमाल महिलांकडे मिळाला. पथकाने दोन महिलांसह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांना वडगावरोड पोलिसांच्या स्वाधिन केले आहे. या महिलांनी वर्धा येथून अ‍ॅक्टीव्हा दुचाकी वाहनाची चोरी केल्याची कबूली सुद्घा पथकापुढे दिली असून, दुचाकी वर्धेत असल्याचे सांगितले. याबाबत वर्धा पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली आहे. हि कारवाई डिवायएसपी राहुल मदने, संतोष मडावी, प्रमोद मडावी, इकबाल शेख, रूतूराज मेढवे, विजय जाधव आदींनी केली.

February 12, 2015 in विदर्भ
नेर येथे व्यापाºयाकडे सापडले स्फोटके 0

नेर येथे व्यापाºयाकडे सापडले स्फोटके

download (6)
व्यापाºयास अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
यवतमाळ , दि. १२ – नेर शहरातील एका हार्डवेअर दुकानातून विना परवाना स्फोटके विकणाºया व्यापाºयास रंगेहात अटक केली. आज गुरूवारी यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली असून तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मनोज टिकाचंद दर्डा (५०) रा. गांधी नगर नेर असे अटक केलेल्या व्यापाºयांचे नाव आहे. शहरात मिश्री मशिनरीज येथे अवैध स्फोटके विकल्या जात असल्याची गोपनीय माहीती यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून सापळा रचुन कॉरपेट विकत घेण्यासाठी बनावट ग्राहकाला पाठविण्यात आले. त्यावेळी दोन लोखंडी पत्राच्या पेटीमधून १२० किलो कारपेट स्फोटके आढळून आले असून ते जप्त करण्यात आले. त्यानंतर व्यापारी मनोज दर्डा यास पोलीसांनी अटक केली. आज येथील दिवाणी न्यायालयात सदर व्यापाºयास हजर करून एक दिवस पोलीस कोठडी मिळविली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुगत पुंडगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून व्यापाºयाविरूद्घ गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून अधिक तपास सुरू आहे. ही कारवाई सहा. पोलीस निरीक्षक सुगत पुंडगे, जमा. संजय दुबे, सचिन हुमने, आशिष चौबे, साजीद खान, सुरेंद्र वाकोडे यांनी केली.

February 12, 2015 in महाराष्ट्र
चोरट्यास दोन वर्ष सश्रम कारावास 0

चोरट्यास दोन वर्ष सश्रम कारावास

2014-10-15~court_ns
यवतमाळ, दि. १२ – घरासमोर उभी असलेले दुचाकी वाहन व अन्य साहित्य चोरून नेणाºया चोरट्यास दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा मुख्यन्यादंडाधिकारी आरती देशपांडे यांनी सुनावली.
अमित राजेंद्र केणे (२२) रा. यशोदा नगर बनोडा अमरावती असे आरोपीचे नाव आहे. शहरातील उत्कवर्ष सोसायटी राऊत नगरमधील रहिवासी निरू अरुण जाधव या महिलेच्या घरासमोरून दुचाकी, आतमधून मोबाईल व एक हजार ५०० रुपये नगदी असा एकुण ४० हजार रुपयाचा मुद्देमाल ३१ मे २०१४ रोजी रात्री चोरी गेला होता. या प्रकरणी जाधव यांनी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्घ भादंवि कलम ४५७, ३८० अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. अशातच अमरावती येथील फेजरपुरा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक सुखानंद इंगळे यांनी संशयास्पदरित्या फिरत असतांना अमित केणे याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची कसुन चौकशी केली असता जाधव यांच्याकडे चोरी केल्याची कबुली दिली. त्यावरून अमरावती फैजरपुरा पोलिसांनी यवतमाळ शहर पोलिसांना पाचारण करून आरोपी व दुचाकी ताब्यात दिली. शहरचे जमादार अनिल डेरे यांनी या प्रकरणाचा तपास पुर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. मुख्य न्यायदंडाधिकारी आरती देशपांडे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यामध्ये एकुण ९ साक्षदार तपासले. त्यामध्ये आरोप सिद्घ झाल्याने भादवि कलम ४५७ अंतर्गत दोन वर्ष सश्रम करावास व ५०० रुपये दंड ठोठावला. तर भादंवि कलम ३८० अंतर्गत १ वर्ष सश्रम कारावास आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता एस.आर. मोरे यांनी काम पाहिले.

 

February 12, 2015 in विदर्भ
आॅटो उलटल्याने चालक ठार 0

आॅटो उलटल्याने चालक ठार

IMG-20150125-WA0003
महागांव, दि. १२ – प्रवाशी घेऊन जाणारा आॅटो गतिरोधकावर उलटल्याने चालक ठार झाल्याची घटना आज गुरूवारी सकाळी ७ वाजता खडका फाटयावर घडली.
प्रमोद प्रकाश गायकवाड (२२) रा. खडका असे मृतकाचे नाव आहे. तो अ‍ॅटो चालवुन आपल्या कुटुंबाचा उदर निर्वाह करत होता. नेहमी प्रमाणे आज सकाळी ७ वाजता आॅटो घेवुन खडका फाट्यावर जात होता. अशातच पुसद-माहुर रस्त्यावर शेतामध्ये पाणी सोडण्यासाठी नाली खोदण्यात आली. नाली बुजविण्यात आल्यानंतर तेथे गतिरोध प्रमाणे रस्ता झाल्याने अ‍ॅटो उलटला. यामध्ये जखमी झालेल्या गायकवाड यांना पुसद येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली.

February 12, 2015 in विदर्भ
दीपिका, करण जोहरसह १२ जणांविरुध्द गुन्हा दाखल करा - कोर्ट 0

दीपिका, करण जोहरसह १२ जणांविरुध्द गुन्हा दाखल करा – कोर्ट

aib-knockout44-200x125
मुंबई, दि. १२ – अश्लीलता आणि बिभत्सतेच्या कारणावरून अल्पावधीतच लोकप्रीय व वादग्रस्त ठरलेल्या ‘एआयबी नॉक आऊट’ या वादग्रस्त कार्यक्रमाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाने गुरूवारी कडक कारवाईचे आदेश दिले. अभिनेत्री दीपिका पदुकोण, चित्रपट निर्माता करण जोहर यांच्यासह अन्य १२ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आभा सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेसंदर्भातील सुनावणीच्यावेळी न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.
या कार्यक्रमात अतिशय अश्लिल आणि कमरेखालचे विनोद असून महाराष्ट्रातल्या सुसंस्कृत घरात हा कार्यक्रम पाहिलाच जाऊ शकत नाही, असे सांगत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘एआयबी नॉकआऊट’ कार्यक्रमावर बंदी आणण्याची मागणी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेत हा कार्यक्रम उधळून लावण्याची धमकीही दिली होती. दरम्यान, अभिनेता आमीर खानने या कार्यक्रमावर उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती.

February 12, 2015 in मनोरंजन
स्वाइन फ्लू : हैदराबादमध्ये ६ जणांचा मृत्यू 0

स्वाइन फ्लू : हैदराबादमध्ये ६ जणांचा मृत्यू

download (1)
हैदराबाद, दि. १२ – स्वाइन फ्लू या संसर्ग आजारामुळे हैदराबादमध्ये एकाच दिवशी सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अधूनमधून जाणवणा-या स्वाइन फ्लूने देशभरात चांगलेच डोके वर काढले असून मुंबई, पुणे, गुजरात, राजस्थान आणि हैदराबादमधील अनेकांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याने मृत्यू ओढावल्याच्या घटना समोर आल्या आहेत. गुरुवारचा दिवस ख-या अर्थाने स्वाइन फ्लू डे ठरला. गुरुवारी हैदराबादमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. हैदराबादमध्ये वर्षभरात स्वाइन फ्लूने बळी जाण्याची संख्या ५९ वर पोहाचली आहे. हैदराबादमधील गांधी हॉस्पिटलमध्ये चार जणांचा तर दोन जणांचा पालिका रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, आज दुपारी जोधपूरमध्ये एका ७० वर्षीय स्वित्झर्लंड महिला पर्यटकाचा स्वाइन फ्लूची लागण झाल्याने मृत्यू झाला.
देशाच्या अनेक भागात स्वाइन फ्लूने डोके वर काढले असून मुंबईत एकाच दिवशी ३ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असून महाराष्ट्रात आत्तापर्यंत १०० जणांचा बळी गेला आहे. राजस्थानच्या ३३ जिल्हयात याची लागण झाली आहे. १४०४ लोकांना तपासणी केल्यानंतर लागण झाल्याचे निष्पन्न झाले. १ जानेवारीपर्यंत ११७ जणांचा बळी गेल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. जयपूरमध्ये २१, अजमेर १९, बारमार ११, नागौर ०९, जोधपूर ०८, चितौडगड ०७, बानसवारा ०६, कोटा ०५, बिकानेर आणि टोंक प्रत्येकी ०४, सिकार आणि भिलवाडा प्रत्येकी ०३, डौसा, झूनझूनू, पाली, बुंदी आणि उदयपूर प्रत्येकी २, तर भारतपूर, चुरु, जैसलमेर, श्रीगंगांर, हनुमानगड, डुंगरपूर आणि अल्वर येथे प्रत्येकी एकचा बळी गेल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे.

February 12, 2015 in मुख्य पान
 अण्णा करणार मोदी सरकार विरोधात आंदोलन 0

अण्णा करणार मोदी सरकार विरोधात आंदोलन

modi211
पुणे – जमिन अधिग्रहण पूर्नवसन कायदा २०१३ मधील सुधारणांवरुन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकार विरोधात दंड थोपटले आहेत.
या कायद्यातील सुधारणांविरोधात अण्णा हजारे २४ फेब्रुवारीला दिल्लीत जंतर-मंतरवर होणा-या एका आंदोलनात सहभागी होणार आहेत. मागच्या काही दिवसांपासून सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर टिका करणारे अण्णा हजारे प्रथमच मोदी सरकार विरोधातील आंदोलनात सहभागी होत आहेत.
त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये मोदी विरुध्द अण्णा असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. केंद्रातल्या तत्कालिन काँग्रेस प्रणीत संपुआ सरकारने २०१३ मध्ये शेतक-यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन जमिन अधिग्रहण पूर्नवसन कायदा मंजूर केला होता.
मात्र आताचे मोदी सरकार शेतक-यांऐवजी उद्योगपतींच्या हिताला पहिले प्राधान्य देऊन या कायद्यात उद्योगांना अनुकूल ठरणारे बदल करत आहे. त्यामुळे अनेक स्वयंसेवी संस्थांचा या सुधारणांना विरोध आहे. येत्या २४ फेब्रुवारीला नवी दिल्लीमध्ये अनेक स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन हे आंदोलन आयोजित केले असून, यामध्ये समाजसेविक मेधा पाटकरही सहभागी होऊ शकतात.

 

February 12, 2015 in मुख्य पान