पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for February 4th, 2015

दिल्लीतून ३२ लाखांची रोकड तर ३४ हजार दारुच्या बाटल्या जप्त 0

दिल्लीतून ३२ लाखांची रोकड तर ३४ हजार दारुच्या बाटल्या जप्त

index1

नवी दिल्ली – दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी केवळ तीन दिवस शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसा तसेच दारुचा महापूर दिल्लीत आला आहे. निवडणूक आयोगाच्या शोध पथकाने केलेल्या कारवाईत दिल्लीतून ३२ लाख रुपयांची रोकड आणि ३४ हजार दारुच्या बाटल्या जप्त केल्या.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, भरारी पथकाने राज्यातून आतापर्यंत ३२ लाख २० हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे तर विविध ठिकाणांहून तब्बल ३४ हजार ३२३ दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.

निवडणुकीदरम्यान होणा-या अवैध प्रकारांना आळा घालण्यासाठी नेमण्यात आलेल्या पथकात निवडणूक आयोगाने प्राप्तीकर विभाग, सेवा कर, पोलीस आणि उत्पादक शुल्क विभागांतील अधिका-यांची नेमणूक केली आहे.

येत्या सात फेब्रुवारीला दिल्लीत विधानसभेसाठी मतदान होत आहे. तर १० फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

 

तैवानमध्ये विमान नदीत कोसळले, २२ ठार 0

तैवानमध्ये विमान नदीत कोसळले, २२ ठार

taiwan-plane-acident

तैपेई– ५३ प्रवाशांना घेऊन जाणारे ट्रान्स एशियाचे प्रवासी विमान बुधवारी सकाळी तैवानची राजधानी तैपेईमधील कीलुंग नदीत कोसळले. या अपघातात २२ जण ठार झाल्याची माहिती तैवानच्या प्रसार माध्यमांनी दिली आहे. तर १५ प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातात अद्याप २१ प्रवासी बेपत्ता आहेत.

तैपेईच्या संघसन विमानतळावरुन ट्रान्स एशियाचे एटीआर ७२ हे विमान किनमेन बेटाच्या दिशेने निघाले होते. यावेळी विमान पुलाला धडकले आणि कीलुंग नदीत कोसळले. या दुर्घटनेतील १५ लोकांना आतापर्यंत सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले आहे. मात्र इतर २१ प्रवासी तसेच क्रू मेंबर्सबाबत कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही, अशी माहिती तैवानच्या सेंट्रल न्यूज एजेन्सीने दिली आहे. दरम्यान, घटनास्थळी बचाव पथक दाखल झाले असून बचावकार्य वेगाने सुरु आहे.

महिन्याभरापूर्वी तैवानच्या ट्रान्स एशिया एटीआर ७२ या विमानालाच अपघात झाला होता. यामध्ये ४८ जण ठार झाले होते तर १० जण जखमी झाले होते.

 

February 04, 2015 in मुख्य पान

अल-कायद्याच्या दोन जिहादींना जॉर्डनमध्ये फाशी

अम्मन, जॉर्डन – जॉर्डनच्या वैमानिकाला जिवंत जाळल्याचा व्हिडीओ इसिसने प्रसिद्ध केल्यानंतर बुधवारी अल-कायद्याच्या दोन जिहादी कैद्यांना फाशी दिल्याची माहिती जॉर्डनच्या सरकारी प्रवक्त्यांनी दिली आहे.

जॉर्डनच्या ताब्यात असलेल्या साजिदा –अल-रिश्वी आणि झैद-अल-कर्बोली या दोन जिहादींना बुधवारी सकाळी फाशी देण्यात आल्याचे प्रवक्त्यांनी सांगितले. २००५ मध्ये झालेल्या अम्मन येथील तीन हॉटेल्समध्ये स्फोट घडवून आणल्याप्रकरणी रिश्वीला जॉर्डन सरकारने ताब्यात घेतले होते.

गेल्या वर्षी २६ डिसेंबरमध्ये जॉर्डनचा वैमानिक मोएथ-अल-कसाबेहच्या विमानाला पूर्व सिरियाच्या भागात अपघात झाला होता. त्यानंतर इसिसने मोएथला बंदी बनवले होते. या वैमानिकाला पिंज-यात ठेवून जिवंत जाळण्यात आल्याचा व्हिडीओ मंगळवारी इसिसकडून प्रसारित करण्यात आला आहे.

व्हिडीओमध्ये वैमानिक केशरी रंगाचे कपडे घालून पिंज-यात बंद असलेला दिसत आहे आणि पिंज-याच्या चारही बाजूंनी आग लावण्यात आली आहे. २२ मिनिटांचा हा व्हिडीओ ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून प्रसारित कऱण्यात आला आहे.

इसिसने वैमानिकाची निघृणपणे हत्या केल्यानंतर जॉर्डन सरकारने अल-कायद्याच्या दोन जिहादींना फासावर लटकवले आहे. इसिसचा व्हिडीओ प्रसारित झाल्यानंतर काही तासांमध्येच जॉर्डनने इसिसच्या दोन जिहादींना फाशी देत इसिसला जशास तसे उत्तर दिले आहे.