पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for February 24th, 2015

चिमुकलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ, वडिलानेच खुन केल्याचा आरोप 0

चिमुकलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ, वडिलानेच खुन केल्याचा आरोप

12 11

दिग्रस (यवतमाळ), दि. २४ – तालुक्यातील इसापूर येथे एका चिमुकलीचा मृतदेह विहिरीत आढळल्याची घटना आज मंगळवारी सकाळी उघडकीस आली. दिव्या शाम गायकवाड (६) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. दिव्याचा खून वडीलानेच केल्याची तक्रार यशोदा शाम गायकवाड या महिलेने दिग्रस पोलीस ठाण्यात दिली.
सोमवारी दि. २३ फेबु्रवारी रोजी यशोदा व शाम या दाम्पत्यात कौटुंबिक कलह निर्माण झाला होता. यशोदा ही भावाकडे पुसद येथे निघून गेली. रात्री पतीने फोन करून उद्या सकाळपर्यंत मुलगी दिसणार नाही, असा फोन करून धमकाविल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आज सकाळी १०.४० वाजता दरम्यान दिव्याचा मृतदेह दिग्रस-पुसदरोडवर असलेल्या संजय नालमवार यांच्या शेतातील विहिरीत आढळून आला. ही वार्ता गावात पसरताच घटनास्थळी गर्दी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. शवविच्छेदन झाल्यानंतर दिव्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर यशोदाने दिग्रस पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कौटुंबिक कलहातून चिमुकलीला जिव गमवावा लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे करीत आहे.

 

February 24, 2015 in मुख्य पान
१५ लाखाचा साखर घोटाळा, तत्कालीन तहसिलदारांवर गुन्हा 0

१५ लाखाचा साखर घोटाळा, तत्कालीन तहसिलदारांवर गुन्हा

2014-11-06~fraud_ns images
उमरखेड ,दि. २४ – १५ लाख रुपयाच्या साखर घोटाळ््याप्रकरणी अखेर तत्कालीन तहसीलदार सुरेश थोरात व शैलेश सुरोशे (कोपरकर) यांच्याविरुद्ध उमरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
सन २०१२ मध्ये ३२० क्विंटल साखर माहे जून, जूलै व आॅगस्ट २०१२ या कालावधीतील ४४५ क्विंटल साखर अशी एकूण ७६५ क्विंटल साखरेची किंमत १४ लाख १५ हजार रुपये किंमतीची साखर रास्त भाव दुकानदार यांना वितरीत न करता अपहार करून व शासनाची फसवणूक केली होती. त्यानुसार विभागीय अमरावती विभगा अमरावती यांनी तसेच जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या पत्रानुसार सदर अफरातफर झालेला साखरच्या गैरव्यवहार करिता जवाबदार असलेले शैलेश सुरोशे साखर नॉमिनी उमरखेड व तत्काली तहसिलदार सुरेश थोरात यांचे विरोधात तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी निर्देश दिले होते. त्यावरून तहसिलदार उमरखेड यांचे पुरवठा निरीक्षक रविंद्र चंद्रकांत चन्नावार यांनी उमरखेड पोलीस स्टेशनला या तक्रार दाखल केली. त्यावरून तहसीलदार व सुगर नामिनीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. साखर घोटाळा झाला त्याच वर्षी तहसीलदार थोरात हे अन्य एका विषयामुळे वादग्रस्त ठरले होते. आचारसंहिता काळात काँग्रेस नेत्याच्या गळ््यात हार टाकल्याप्रकरणी गोत्यात आले होते. तसेच विटभट्टी चालकाच्या तक्रारीवरून एलसीबीच्या पथकाने धाड टाकून २० डिसेंबर २०१२ रोजी रंगेहाथ पकडल्याची घटना त्याच काळात घडली होती. साखर घोटाळा प्रकरण तहसीलदार व सुगर नॉमिनी दोघांनाही चांगलेच भोवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

February 24, 2015 in विदर्भ
डॉक्टरकडून जिवे मारण्याची धमकी 0

डॉक्टरकडून जिवे मारण्याची धमकी

images (2)

यवतमाळ : डॉक्टरने युवकास जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. राजेंद्र ठाकूर (२८) रा. यवतमाळ असे फिर्यादीचे नाव असून, संजीय जोशी (५०) रा. पिंपळगाव व अन्य एक असे धमकी देणाºया डॉक्टरचे नाव आहे. डॉ. जोशी यांनी ठाकूर यांना न्यायालयात प्रकरण का दाखल केले असे म्हणून, युवकास मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत शहर पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविण्यात आली असून, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

February 24, 2015 in विदर्भ
शेतकºयाची आत्महत्या 0

शेतकºयाची आत्महत्या

download (1)
आर्णी, दि २४ – संपूर्ण देशात नरेन्द्र मोदी यांच्या चहा पे चर्चा या कार्यक्रमाने प्रसिद्ध झालेल्या दाभडी येथे मंगळवारच्या सकाळी साडे पाच वाजता स्वताच्या घरात गळफास लावुन शेतककºयाने आत्महत्या केल्याची घटना घडली. विठ्ठल सवाई राठोड (४५) असे आत्महत्या केलेल्या शेतकºयाचे नाव आहे. सदर शेतकºयावर विविध कार्यकारी सोसायटीचे ३५ हजार रुपए कर्ज आहे.अडीच एकर कोरडवाहु शेती असून सतत नापीकीने त्रस्त झालेल्या विठ्ठल राठोड यांनी राहत्या घरीच गळपास लावुन जिवन यात्रा संपविली. शेतकºयाच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा आणि पत्नी असा आप्त परिवार आहे.

February 24, 2015 in विदर्भ
जमिन अधिग्रहण विधेयकावरून संसदेत विरोधकांनी केला सभात्याग 0

जमिन अधिग्रहण विधेयकावरून संसदेत विरोधकांनी केला सभात्याग

download
नवी दिल्ली- लोकसभेत आज विरोधी पक्षांच्या मोठ्या विरोधानंतरही जमिन अधिग्रहण विधेयक सादर करण्यात आले. सरकार एकतर्फी निर्णय लादत असल्याचे सांगत विरोधकांनी लोकसभेतून सभात्याग केला. लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जून खर्गे यांनी सरकार लोकशाहीचा गळा घोटत असल्याचे म्हटले आहे. भाजपचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनीही वॉक आऊट केला आहे.
लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी म्हटले आहे की, जमिन अधिग्रहण विधेयकावर आता चर्चा करण्याची नव्हे कृती करण्याची गरज आहे. दुसरीकडे संसदीय कार्यमंत्री व्यंकया नायडू यांनी म्हटले आहे की, लोकसभेत या विधेयकावरून चर्चा करावी. त्यातून योग्य तो सार काढावा आम्ही विधेयकात बदल करण्यास तयार आहे.
त्याआधी अर्थमंत्री अरूण जेटली यांनी राज्यसभेतही जमिन अधिग्रहण अध्यादेश आणण्याचे जोरदार समर्थन केले. सरकारने आपल्या अधिकारांतर्गत हा अध्यादेश आणला आहे. संसदेला बायपास करून अध्यादेश मंजूर केल्याचे विरोधकांचे आरोप चुकीचे आहेत. यूपीए सरकारने आपल्या कार्यकाळात असे अनेक अध्यादेश मंजूर केले होते. आनंद शर्मा यांनी मात्र जेटलींवर हल्ला चढवत, काय आपल्याला वाटत आहे की संसद रबर स्टॅम्पसारखे आपल्या अध्यादेशाला मान्य करेल?
बॅकफूटवर जाण्याची गरज नाही, विधेयक योग्यच: मोदी
दरम्यान, आज सकाळी भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक झाली. ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सहभाग घेतला. या बैठकीत जमिन अधिग्रहण विधेयक लोकसभेत सादर करण्याची रणनिती ठरवली गेली. या बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी हे विधेयक अतिशय योग्य असल्याचे सांगत या मुद्यांवरून बॅकफूटवर जाण्याचे कोणतेही कारण नसल्याचे सांगितले. हे विधेयक शेतकरीविरोधी नसून शेतक-यांच्या हिताचे असल्याचेही मोदींनी ठासून सांगितले.
अण्णांच्या आंदोलनाठिकाणी आज गर्दी वाढली- केंद्र सरकारने संसदेला बायपास करून जमिन अधिग्रहण विधेयक मंजूर केल्याने सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिल्लीत आंदोलन सुरु केले आहे. आज या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. सोमवारीच्या तुलनेत आज लोकांची गर्दी वाढली आहे. अण्णांचे एकेकाळचे सहकारी व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज अण्णांच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. सोमवारी सायंकाळी केजरीवाल आणि मनिष सिसोदिया यांनी महाराष्ट्र सदनात अण्णांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला होता. अण्णांनीही या दोघांना आशिर्वाद देत आपचा पाठिंबा स्वीकारला आहे. सत्ताधारी भाजप वगळता काँग्रेससह इतर सर्व विरोधी पक्षांनीही अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यातील बहुतेक पक्षाचे नेते अण्णांच्या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे.

 

February 24, 2015 in मुख्य पान
इतक्या मोठ्या विजयाचा स्वप्नातही विचार केला नव्हता – गावस्कर 0

इतक्या मोठ्या विजयाचा स्वप्नातही विचार केला नव्हता – गावस्कर

sunil-gavaskar_650_102512094115
पर्थ – दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दणदणीत विजय मिळवल्याबद्दल भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनीही भारतीय संघाचे कौतुक केले आहे. महेंद्रसिंग धोनी आणि त्याच्या सहका-यांनी द.आफ्रिकेविरुद्ध मिळवलेल्या मोठ्या विजयाचा आपण स्वप्नातही विचार केला नव्हता अशी भारताच्या विजयावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विश्वचषकात यापूर्वी भारत-दक्षिण आफ्रिकेदरम्यान झालेल्या तीन लढतीत एकदाही भारताला विजय मिळवता आला नव्हता. मात्र रविवारी झालेल्या विश्वचषकाच्या लढतीत भारताने दिमाखदार विजय मिळवत पराभवाची मालिका खंडित केली.
‘भारत इतक्या मोठ्या फरकाने द.आफ्रिकेविरुद्ध विजय मिळेल याचा कधीच विचार केला नव्हता. मला नेहमीच संघाच्या प्रदर्शनाबाबत आत्मविश्वास होता. मी सुरुवातीपासून हेच सांगत होतो की सलामीवीरांनी सामन्याच्या सुरुवातीला घाई करु नये. मात्र दुर्देवाने रविवारच्या सामन्यात रोहित शर्मा धावचित झाला. त्यानंतर विराट आणि शिखर यांनी सावध फलंदाजीस सुरुवात केली. २४ षटकानंतरच त्यांनी मोठे शॉटस खेळण्यास सुरुवात केली.’
‘मला वाटले होते की भारत ३० ते ४० धावांनी विजय मिळवेल. ३०८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणा-या द.आफ्रिका संघाला भारत २७०-८० पर्यंत रोखेल. मात्र या सामन्यात भारताने १६० धावांवर त्यांचा डाव रोखला. भारताने जो काही विजय मिळवला तो खरंच अनाकलनीय आहे,’ असे गावस्कर यावेळी म्हणाले. द.आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात जबरदस्त १३७ धावांची खेळी करणा-या शिखर धवनचेही त्यांनी यावेळी कौतुक केले.

February 24, 2015 in क्रीडा
हैदराबादमध्ये स्फोटात दोन ठार, १३ जखमी 0

हैदराबादमध्ये स्फोटात दोन ठार, १३ जखमी

47499-blast-show-1
हैदराबाद- कुकटपल्ली येथील गल्फ ऑइल कॉर्पोरेशनच्या आवारात सोमवारी सायंकाळी झालेल्या एका स्फोटात दोन कामगार मृत्युमुखी पडले असून अन्य १३ जण भाजल्याने जखमी झाले.
जखमींना जवळच्या रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे. स्फोटानंतर भडकलेली आग आटोक्यात आल्याचे मधापूर क्षेत्राचे पोलीस उपायुक्त कार्तिकेय यांनी सांगितले.येथे डिटोनेटर्स निष्कासित करत असताना अचानक स्फोट झाल्याचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त एम. श्रीनिवास राव यांनी सांगितले.

February 24, 2015 in मुख्य पान
फौजदारी, कर खटल्यांसाठी स्वतंत्र न्यायालये 0

फौजदारी, कर खटल्यांसाठी स्वतंत्र न्यायालये

supreme-court
नवी दिल्ली – फौजदारी आणि कर निवाडय़ासंदर्भातील खटले तातडीने निकाली काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारपासून दोन स्वतंत्र न्यायालये सुरू केली आहेत. प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार एम. के. हंजुरा म्हणाले की, जुने फौजदारी खटले आणि करविषयक याचिका निकाली काढण्यासाठी सरन्यायाधीशांनी ही न्यायालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या सर्वोच्च न्यायालयात ११,१३७ फौजदारी आणि १०८४३ करविषयक खटले प्रलंबित आहेत. या न्यायालयासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने आवश्यक त्या पायाभूत सुविधा पुरवल्या आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात मोफत ‘वाय-फाय’ सुविधा पुरवल्या जाणार आहेत.

February 24, 2015 in देश-विदेश
ठाण्यात शिवसेना-भाजप युती कायम 0

ठाण्यात शिवसेना-भाजप युती कायम

BJP_Shiv_Sena_356_2345_356
मुंबई-(महाराष्ट्र् न्यूज नेटवर्क-सतिष राठोड)
राज्यात गेल्या काही दिवसांपासून भाजप-शिवशेनेच्या नेत्यांनी एकमेकांवर अारोप लावण्याचे काही कमी केले नाही.हे सर्वांना माहितच अाहे,पण अाता शिवसेना-भाजप हे दोन्हीही पक्ष अागामी महापालिका निवडणणुकांच्या पार्श्वभूमीभूमीवर ठाण्यात शिवसेना-भाजप एकत्र राहणार अाहे,तसेच शिवसेना – भाजपमधील वाढत्या तणावाचा विचार लक्षात घेऊन आज शिवसेना नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्या निवासस्थानी ‘वर्षा’ बंगल्यावर बैठक झाली. ्या बैठकित शिवसेनेचे विधीमंडळ गट नेते एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक सोबत अादी नेते उपस्थित होते.तसेच मीरा-भाईंदर महापालिकेत महापौर पदासाठी भाजपच्या गीता जैन, तर उपमहापौर पदासाठी शिवसेनेचे प्रविण पाटील उमेदवारी अर्ज भरण्याबाबतही शिक्का मोर्तब करण्यात अाला.

February 24, 2015 in महाराष्ट्र