पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for February 22nd, 2015

बिबट्याचा गायीवर हल्ला 0

बिबट्याचा गायीवर हल्ला

images
झरी (यवतमाळ ), दि. २२ – तालुक्यातील मार्की(बु.) येथील उत्तम शिवराम पडघन यांच्या शेतात चौथ्यांदा बिबट्याने हल्ला चढविल्याची घटना आज रविवारी सकाळी घडली. आज सकाळी सदर शेतकरी शेतात गेला असता वासराला वाचविण्यासाठी गाय बिबट्यासोबत संघर्ष करीत असल्याचे दिसून आले. हे दृश्य बघून घाबरलेला शेतकरी एका झाडावर लपून बसला. बराच वेळ गाय व बिबट्यात संघर्ष चालला. त्यानंतर बिबट्या जंगलाच्या दिशेने निघून गेला. ही बाब उत्तम पडघन याने गावात येवून ग्रामस्थांना सांगितली. नागरिकांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. पायघन यांच्या शेतात बिबट्याने चौथ्यांदा हल्ला चढविला आहे. वनविभागाने परिसरात केवळ एक पिंजरा लावला. मात्र बिबट्याला जेरबंद करण्यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकºयांकडून रोष व्यक्त होत आहे.

February 22, 2015 in मुख्य पान
शाळेत विद्यार्थीनी जळाली, कळंब येथील घटना 0

शाळेत विद्यार्थीनी जळाली, कळंब येथील घटना

IMG-20150222-WA0018_resized
यवतमाळ, दि. २२ – कळंब येथील जिल्हा परिषद वरीष्ठ प्राथमिक कन्या शाळेतील इयत्ता सातवी मध्ये शिकत असलेली विद्यार्थीनी जळाल्याची घटना शुक्रवारी घडली.
वैष्णवी काळे असे विद्यार्थीनीचे नाव असून ती कळंब येथील जिल्हा परिषद वरीष्ठ प्राथमिक कन्या शाळेत ती सातव्या वर्गात शिक्षण घेत आहे. २० फेबु्रवारी रोजी ती भाजीची बकेट उचलून नेत असताना, ती खाली पडली. त्यावेळी अंगावर गरम भाजी सांडल्याने ती जळाली. विद्यार्थीनीची ओरड ऐकून शिक्षकांनी तेथे धाव घेऊन तिला रुग्णालयात भरती केले असून तीची प्रकृती चांगली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषी विरुद्घ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.

February 22, 2015 in महाराष्ट्र
महिलेवर सामुहीक अत्याचार 0

महिलेवर सामुहीक अत्याचार

download (1)
यवतमाळ , दि. २२ – देवदर्शनासाठी सोबत आलेल्या परभणीच्या महिलेवर अत्याचार केल्याची घटना महागाव तालुक्यातील कोंडरी परीसरातील महादेव मंदीर देवस्थानात घडली. सुनील उर्फ जगदीश बाबा, अरविंद जीप चालक, शिवाजी उजवणकर व कौशल्या उजवणकर अशी आरोपींची नावे आहे.
महागावनजीक असलेल्या कोंडरी येथील महादेव मंदीर देवस्थान प्रसिद्घ आहे. गेल्या वर्षभरापासून वरील आरोपी येथे दर्शनासाठी येत होते. यांच्यासोबत पिडीत महिला देखील येत होती. १९ फेब्रुवारीला ते जीप घेऊन आले होते. यातील सुनील उर्फ जगदीश बाबा यांने अरविंद जीप चालक, शिवाजी उजवणकर व कौशल्या उजवणकर यांच्याशी संगणमत करून पिडीत महिलेवर अत्याचार केला. त्यानंतर महिलेला तिथेच सोडून घटनास्थळावरून पसार झाले.याबाबत महिलेने महागाव पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली असून, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे.

 

February 22, 2015 in रोजगार
ठाणे येथे २८ फेब्रुवारीला पासपोर्ट मेळावा 0

ठाणे येथे २८ फेब्रुवारीला पासपोर्ट मेळावा

download
ठाणे – येथे २००१ मध्ये सुरु करण्यात अालेल्या या कार्यालयातून ठाणे,पालघर,रायगड,नवी मुंबई,जळगाव या विभागात राहणार्या लोकांसाठी एका दिवसाला १,००० पासपोर्ट देण्यात येतो.तसेच ठाणे पासपोर्ट अधिकारी एम.डी शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार,नवी मुंबई अाणि रायगडच्या पासपोर्ट बनविणार्यांची संख्या लक्षात घेऊन, शनिवार दि.२८ फेब्रुवारी या दिवशी विशेष पासपोर्ट मेळावा अायोजित करण्यात अालेला अाहे.मेळाव्यात तात्काळ व साधारण या दोन्हीही योजना राबविण्यात येणार असुन,अपाइमेंट न घेतलेल्यांनीही या मेळाव्यात ओरिजिनल कागदपत्रे घेऊन सहभाग घ्यावा.तसेच त्यांची पडताळणी करुन त्यांना लवकरात लवकर पासपोर्ट देण्यात येणार असुन,या मेळाव्याचे अायोजन दि.२८ फेब्रुवारी या दिवशी वागळे इस्टेट येथिल पासपोर्ट कार्यालयात करण्यात येणार अाहे.

February 22, 2015 in महाराष्ट्र
भारताने द.आफ्रिकेविरुद्ध १३० धावांनी मिळवला विजय 0

भारताने द.आफ्रिकेविरुद्ध १३० धावांनी मिळवला विजय

Virat Kohli

मेलबर्न – इतिहास हे नेहमी बदलण्यासाठीच असतात हे भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आजच्या सामन्यातून दाखवून दिले. विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध विजयाची परंपरा कायम ठेवणा-या भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पराभवाची मालिका अखेर खंडित केली. आजवर विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्घ भारत एकही सामना जिंकलेला नाही. मात्र या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर चमकदार कामगिरी करत भारताने द.आफ्रिकेविरुद्ध १३० धावांनी विजय मिळवला. तर विश्वचषकात सलग दुसरा विजय नोंदवला.
भारताने प्रथम फलंदाजी करत ५० षटकात सात बाद ३०७ धावा केल्या. भारताच्या गोलंदाजीसमोर आफ्रिकेचा संघ ४०.२ षटकात १७७ धावांवर संपुष्टात आला. शिखर धवनची शतकी आणि अजिंक्य रहाणेचे ७९ धावांची तडाखेबाज खेळी भारताच्या विजयात महत्त्वाची ठरली. गेल्या अनेक दिवसांपासून फॉर्मात नसलेल्या शिखर धवनला या सामन्यात सूर गवसला आणि त्याने दमदार १३७ धावांची खेळी साकारली. १४६ चेंडूत त्याने १६ चौकार आणि दोन षटकारांची बरसात करत १३७ धावा केल्या.शिखरचे एकदिवसीय कारकिर्दीतील हे सातवे शतक आहे. त्याला उत्तम साथ दिली ती अजिंक्य रहाणेने. त्याने ६० धावांत ७९ धावा केल्या. यामध्ये सात चौकार आणि तीन षटकारांचा समावेश आहे. या दोघांनी द.आफ्रिकेच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली.
प्रत्युत्तरादाखल मैदानात आलेल्‍या दक्षिण आफ्रिकेला दुस-याच षटकात मोहम्‍मद शामीने पहिला धक्का दिला. सलामीचा फलंदाज क्विंटन डी कॉकला अवघ्या सात धावांवर विराटकडे झेल देऊन बाद केले. दक्षिण आफ्रिका एक बाद १२ धावा अशी स्थिती असताना मैदानात उतरलेल्या हाशिम आमला याला मोहित शर्माने बाद केले. त्याने २२ धावा केल्या. त्यानंतर कर्णधार एबी डिविलिअर्स आणि फाफ ड्यु प्‍लेसिसने दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र, मोहित शर्माच्‍या अप्रतिम थ्रोवर धोनीने एबीला बाद केले. डिविलियअर्सने ३८ चेंडूंत तीन चौकारांच्‍या मदतीने ३० धावा केल्‍या. पाठोपाठ अर्धशतक करणा-या फा डू प्लेसिसला बाद करुन मोहित शर्माने आफ्रिकेला चौथा धक्का दिला. प्लेसिस बाद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा डाव गडगडला. ठराविक अंतराने द. आफ्रिकेचे फलंदाज बाद होत गेले. अखेर ४०.२ षटकात १७७ धावांतच द.आफ्रिकेचा डाव संपुष्टात आला. फिरकीपटू आर.अश्विनने सर्वाधिक तीन गडी बाद केले.
तत्पूर्वी, भारताने सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. सामन्याला सुरुवात झाल्यानंतर भारत नऊ धावांवर असताना रोहित शर्माच्या रुपाने दक्षिण आफ्रिकेला पहिले यश मिळाले. रोहित शर्मा भोपळा न फोडता माघारी परतला. त्यानंतर शिखर आणि विराटने डावाला आकार देण्यास सुरवात केली. विराटने शिखरच्या साथीने दुस-या विकेटसाठी महत्त्वपूर्ण १२७ धावांची भागीदारी साकारली. अर्धशतकासाठी चार धावा बाकी असताना विराट इम्रान ताहिरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.विराट कोहली ४६ धावांवर बाद झाला.
त्यानंतर धवन आणि अजिंक्य रहाणेची जोडी मैदानावर जमली. या दोघांनी तिस-या विकेटसाठी १२५ धावांची भागीदारी केली. तर भारताचा सलामीवीर शिखर धवनने दमदार शतक झळकावले. १२२ चेंडूत त्याने हे शतक साकारले. शिखर १३७ धावांवर बाद झाला. शिखर बाद झाल्यानंतर मात्र भारताचा डाव कोसळला. अखेरच्या ६.३ षटकात भारताने केवळ ४६ धावा करत पाच गडी गमावले. शिखरपाठोपाठ रैना केवळ सहा धावा करुन बाद झाला. त्यानंतर ७९ धावांची खेळी करत रहाणेही बाद झाला. कर्णधार महेंद्रसिंग धोनी या सामन्यात पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याने १८ धावा केल्या. भारताने ५० षटकात सात गड्यांच्या मोबदल्यात ३०७ धावा केल्या. द. आफ्रिकेच्या मॉर्केलने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.
संक्षिप्त धावफलक
भारत – सात बाद ३०७(५०) विजयी शिखर धवन(१३७), अजिंक्य रहाणे(७९),विराट कोहली(४६)
द.आफ्रिका – सर्वबाद १७७(४०.२), फाफ ड्यु प्‍लेसिस(५५),
सामनावीर – शिखर धवन(१३७)

 

February 22, 2015 in क्रीडा, रोजगार
पानसरेंच्या मारेक-यांची माहिती देणा-यास पाच लाखांचे बक्षिस 0

पानसरेंच्या मारेक-यांची माहिती देणा-यास पाच लाखांचे बक्षिस

2015-02-21~2-15_ns

कोल्हापूर – कामगार, कष्टकरी, उपेक्षितांचे नेते आणि महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीचे ऊर्जाकेंद्र असलेल्या कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या मारेक-यांचा शोध लावण्यात अद्याप पोलिसांना यश आलेले नाही. पोलिसांनी पानसरेंवर हल्ला करणा-यांची माहिती देणा-यास पाच लाखांचे बक्षिस देण्याची घोषणा केली आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक मनोजकुमार यांनी ही माहिती दिली. यासंदर्भात माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असेही ते म्हणाले. माहिती देण्यासाठी ०९७६४००२२७४ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पोलिसांनी पानसरे यांच्या पत्नी उमा यांची सुरक्षा वाढवली आली आहे. उमा यांच्यावर अॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्या प्रत्यक्ष घटनेच्या साक्षीदार असल्याने पोलिस प्रशासनाने बंदोबस्त वाढवला आहे.
पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर १६ फेब्रुवारी अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. पाच दिवस पानसरेंची मृत्यूशी झुंज सुरू होती. शुक्रवारी रात्री पावणेअकरा वाजता मुंबईत पानसरेंची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मारेक-यांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी सर्व डाव्या पक्षांसह समाजातील सर्व स्तरातून होत आहे.

February 22, 2015 in मुख्य पान
बांगलादेशमध्ये १०० प्रवाशांनी भरलेली बोट बुडाली 0

बांगलादेशमध्ये १०० प्रवाशांनी भरलेली बोट बुडाली

download
ढाका – बांगलादेशमध्ये पद्मा नदीत १०० हून अधिक प्रवाशांनी खच्चून भरलेल्या एका प्रवासी बोटीला रविवारी अपघात झाला. या दुर्घटनेत अनेक जण ठार झाल्याची भिती व्यक्त करण्यात आहे मात्र नेमका आकडा अद्याप समोर आलेला नाही.
राजबारी भागातील दौलतदिया येथून पतुरियाच्या दिशेने ही बोट निघाली होती. या बोटीत सुमारे १०० हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. या दुर्घटनेत किती जण ठार अथवा बेपत्ता झाले आहेत याची अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे
कार्गो ट्रॉलरची या बोटीला धडक बसल्याने ही दुर्घटना झाल्याचे मणिकगंज जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी सांगितले. गेल्या दहा दिवसांतील ही दुसरी घटना आहे.
यापूर्वी १३ फेब्रुवारी रोजी बांगलादेशमधी पैरा नदीत २०० हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारी प्रवासी बोट बुडाली होती. यात सुमारे पाच जण ठार झाले होते. तर गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये बांगलादेशमध्येच झालेल्या बोट दुर्घटनेत १३० जण ठार झाले होते.

 

February 22, 2015 in देश-विदेश
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ आरपीआयचे कार्यकर्त्यांनी मुंबईत रास्ता रोको केला. 0

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ आरपीआयचे कार्यकर्त्यांनी मुंबईत रास्ता रोको केला.

RPI protests Pansare murder

February 22, 2015 in मुख्य पान
गुरू रविदास , जयंती विशेष 0

गुरू रविदास , जयंती विशेष

22022015-md-so-20-17105-1-large
गुरू रविदासांचा जन्म अशा वेळेस झाला की, ज्यावेळेस शूद्रांवर अन्याय, अत्याचार होत होते. हिंदू समाजव्यवस्थेत जातिवाद, वर्णवाद, रूढिवाद, पुरोहितवाद, अस्पृश्यता वाढत होती. वर्षानुवष्रे चालत ते स्वत: उभे राहिले. रविदासांनी आपल्या अमृतवाणीने संपूर्ण देशाला जागृत केले.
गुरूरविदासांच्या कार्यांची स्मृती अनेक संतांनी केलेली आहे. ज्यात संत तुकाराम, गुरुनानक, गुरूकबीर, संत सेना, संत मीराबाई, संत एकनाथ, संत धन्ना, संत हरिदास, संत दादू, संत नाभादास इ. गुरूरविदासांनी सामाजिक विषमतेविरुद्ध त्या काळात कठीण संघर्ष केला. गुरू रविदासांनुसार ब्राह्मण, मौलवी, शीख, हिंदू, मुसलमान, चांडाळ, क्षत्रिय, वैश्य, शूद्र इ. जेवढी माणसे आहेत ती सर्व सारखी आहेत. या सर्वांना निर्माता एकच आहे. सगळे हाड, मांस, चामड्यापासून तयार झालेले आहेत म्हणून एकमेकांना उच्च-नीच समजू नये, सगळे एकच आहेत.
हिंदू-मुसलमान मंदिर-मशिदीसाठी भांडत असतात. याविषयी गुरू रविदास म्हणतात. मंदिर-मशीद एकच आहे, राम-रहिम एकच आहे. राम मंदिरात नाही आणि अल्ला मशिदीमध्ये नाही म्हणून तुम्ही निर्थक भांडू नका. मंदिर आणि मशिदीमध्ये नतमस्तक होण्याची गरज नाही, कारण परमेश्‍वर सर्वव्यापी आहे.
ज्याला तुम्ही शोधता तो मथुरा, काशी, हरिद्वार इ. तीर्थस्थानात नाही; तो माझ्या मनात आहे. पोथी, पुराण आणि पुजारी यांच्यामागे लागू नका, असा मोलाचा सल्ला गुरूरविदासांनी दिला. संत मीराबाई गुरू रविदासांकडून दीक्षा घेऊन शिष्या झाली. मीराबाईने मोठय़ा सन्मानाने गुरू रविदासांच्या उल्लेख आपल्या पदांमध्ये केलेला आहे.
”मेरो मन लागो गुरु सो’ अब नरहुंगी अटकी गुरु मिलिया रैदास जी, दीन्ही ज्ञान की गुटकी।”
”रैदास सन्त मिले मोह सत्गुरु दीन्ही सुरत सहदा की।”
”मीरा के प्रभु तेही स्वामी श्री रैदास सत्गुरु जी।”
”मीरा ने गोविंदा नित्या जी गुरु मिल्या रैदास।”
हजारो वर्षांपासून बहुजन समाज गुलामी आणि लाचारीने जीवन जगत आहे. आधुनिक काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या गुलामांच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. डॉ. बाबासाहेब म्हणतात, ”गुलामांना गुलामगिरीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून उठतील आणि आपल्या स्वातंत्र्यासाठी संषर्घ करतील.”
हाच विचार रविदासांनी त्यांच्या काळात ठेवला होता आणि समाजाला गुलामीविरोधात विद्रोह करण्याचा संदेश दिला होता. ज्या व्यवस्थेने बहुजनांसाठी संघर्ष करणार्‍या अनेक संतांचा छळ केला, अनेक महापुरुषांचा छळ केला, काहीचा खून केला. हजारो वर्षांपासून बहुजन समाज या देशात अपमानित होत आहे. त्याचे एकमेव कारण म्हणजे बहुजन समाजाला त्याच्या गुलामीची, पराधीनतेची जाणीव नाही. आज बहुजन समाज ६000 जातींमध्ये विभागलेला आहे. अनेक धर्मांमध्ये विभागलेला आहे. बहुजन समाजाची धारणा आहे की, ‘ठेवीले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असू द्यावे समाधान.” तेव्हा त्याला त्याच्या गुलामीविरुद्ध जागृत केल्याशिवाय येणारा काळ, अन्यायमुक्त, शोषणमुक्त होणार नाही. येणारा काळ जर अन्यायमुक्त, शोषणमुक्त करायचा असेल तर समाजातील सुज्ञ लोकांनी स्वत:ची जबाबदारी ओळखून प्रत्येक समाज जागृत करावा लागेल. दीन दु:खी केहीत जउ, वारै अपने प्रान। ‘रविदास’ उह नर सुर कौं, सांचा छत्री जान।। दीन, दु:खी लोकांचे दु:ख नष्ट करण्यासाठी जे झटतात, चंदनासारखे झिजतात, आपल्या प्राणाचे बलिदान देतात तेच खरे शूरवीर आहेत, क्षत्रिय आहेत. आपण सर्व गुरू रविदासांना आपल्या समाजाचे आदर्श महापुरुष मानतो. मार्गदर्शक मानतो. आता आपल्याला विचार करायचा आहे की आपण त्यांना कशाप्रकारे मानतो. आणि खरंच मानीत आहोत का? त्यांनी आमच्या कल्याणासाठी, प्रगतीसाठी आणि हक्क, समानतेसाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. आपण विचार करायला पाहिजे की, त्यांनी दाखविलेला कल्याणकारी मार्ग आणि महत्त्वपूर्ण सल्ल्याला आपण जीवनात स्वीकारले का? त्यांचा फोटो आदरपूर्वक ठेवल्याने त्यांचे स्वप्न पूर्ण होईल का? किंवा त्यांच्या विचारांना जीवनात समावेश करून त्यांचे स्वप्न पूर्ण होईल का? आमच्या प्रगतीसाठी त्यांनी जो मार्ग दाखविला तो कुणाची भक्ती केल्याने पूर्ण होईल का? की कर्म केल्याने पूर्ण होईल?
”सांडू दे रक्त वाहू दे पाट
क्रांती! कधीचीच बघते तुझी वाट।”
”बता रे पंडित ज्ञानी कौन चाम से न्यार।
चाम का ब्रह्म, चाम का विष्णु,
चाम का सकल पसारा।
चाम काय योगी, चाम का भोगी,
चाम का गुरु तुम्हारा।
कह रैदास सुनो रे पंडित ज्ञानी, चाम का गुरु नाहिं हमारा।
संत शिरोमणी गुरू रविदासजी.

लेखिका – शुभांगी विजय मालखेडे
मो. ९९७0३९६३७0