पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for February 23rd, 2015

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु 0

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु

President addresses Parliament
नवी दिल्ली – राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. ‘सबका साथ, सबका विकास’ या तत्वाने सरकार काम करणार असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले.
मागच्या नऊ महिन्यात सरकारने जी पाऊले उचलली, निर्णय घेतले त्याची माहिती राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात दिली. मागच्या नऊ महिन्यात केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेला गती देणारे निर्णय घेतले असून, गरीबांसाठी कल्याणकारी योजना राबवल्या आहेत.
ग्रामीण भारताचा दीर्घकालीन सामाजिक-आर्थिक विकास केंद्र सरकारसाठी महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छ भारत अभियानही सरकारचे महत्वाचे उद्दिष्टय़ असून, २०१९ पर्यंत हे अभियान यशस्वी करण्याचे लक्ष्य आहे. खासदारांनी आपला ५० टक्के खासदारनिधी स्वच्छ भारत अभियानावर खर्च करावा असे राष्ट्रपतींनी आवाहन केले.
या अधिवेशनात महत्वाची विधेयके मंजूर करण्याचे सरकारचे लक्ष्य असून, जमिन अधिग्रहण विधेयकावरुन सरकार आणि विरोधकांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे.
विरोधकांनी अडवून धरलेल्या विधेयकांची वाट निर्विघ्न व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समन्वयाची भाषा केली. ‘अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडून देशभरातील जनतेला मोठय़ा अपेक्षा असतात. हे अधिवेशन सुरळीत पार पडावे ही सर्व पक्षांची सामूहिक जबाबदारी असते, असे सांगत मोदी यांनी सर्वच पक्षांकडून सहकार्य मिळेल अशी आशा व्यक्त करत रविवारी आयोजित सर्वपक्षीय बैठकीत नरमाईची भूमिका घेतली.

February 23, 2015 in मुख्य पान
भूसंपादन कायद्याविरोधात अण्णांचे दिल्लीत आंदोलन 0

भूसंपादन कायद्याविरोधात अण्णांचे दिल्लीत आंदोलन

images (2)
नवी दिल्ली – भूसंपादन कायद्यात करण्यात आलेल्या बदलांविरोधात ज्येष्ठ सामाजसेवक अण्णा हजार सोमवारपासून दिल्लीत आंदोलन करणार आहेत. त्याआधी ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या या आंदोलनात माओवाद्यांशी संपर्क केला जाईल असे म्हटले आहे. माओवाद्यांच्या सहकार्याबाबत आंदोलनातील सहकारी मेधा पाटकर आणि अरुणा राय यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही अण्णा म्हणाले. जर सर्वांनी सहमती दर्शवली तर चर्चा होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
बीबीसी हिंदीला दिलेल्या मुलाखतीवेळी अण्णांना विचारण्यात आले, की माओवाद्यांचा दावा आहे की ते आदिवासींच्या जमीनींसाठी संघर्ष करत आहेत. तर, तुम्ही त्यांच्याशी संपर्क करु शकता का? यावर अण्णा हजारे म्हणाले, ‘अद्याप केलेला नाही. मात्र पुढे करु.’ अण्णा म्हणाले,की आतापर्यंत हा प्रश्न फक्त आदिवासींपूरता मर्यादित होता. आता सगळ्या देशातील शेतकर्‍यांचा झाला आहे. त्यांच्या भविष्याशी निगडीत हा प्रश्न आहे. जेव्हा अण्णांना विचारण्यात आले, की माओवादी, समाजवादी आणि इतरही अनेक छोट्या मोठ्या संघटना शेतकर्‍यांच्या हितासाठी लढा उभारत असल्याचा दावा करत आहेत, तर ते म्हणाले, की आंदोलन सुरु होईन काही दिवसच झाले आहेत. सर्वांशी संपर्क करायला जरा वेळ लागेल. सर्वांनी एका मंचावर आले पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन शेतकर्‍यांसाठी लढा दिला पाहिजे. शेतकर्‍यांची जमीन ज्या पद्धतीने हडपली जात आहे त्याविरोधात देशव्यापी आंदोलनाची गरज आहे.

February 23, 2015 in मुख्य पान
गोपीनाथ मुंडेंचे स्मारक होणार 0

गोपीनाथ मुंडेंचे स्मारक होणार

images (1)
औरंगाबाद – ‘माजी केंद्रीयमंत्री कै. गोपीनाथ मुंडे यांच्या सामाजिक, राजकीय कार्यकर्तृत्वाची ओळख जपणारे सुसज्ज असे स्मारक येथील जालना रोडवरील शासकीय दूध डेअरी जमिनीवर लवकरच उभारले जाईल,’ अशी घोषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत केली.
सुभेदारी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री. खडसे बोलत होते. ‘मराठवाड्याच्या विकासासाठी कायम अग्रणी भूमिका घेणारे मराठवाड्याचे सुपूत्र गोपीनाथ मुंडे यांची सामान्य माणसाबद्दलची निष्ठा आणि विकास कामाबद्दलचा आग्रह या भूमिकेतून त्यांनी केलेली राजकीय वाटचाल ही प्रेरक आहे. त्यांच्या वाटचालीतील महत्त्वपूर्ण प्रसंगांची माहिती करून देणारे दृकश्राव्य चित्रण, त्यांची निवडक भाषणे, त्यांच्या जीवनाबद्दल माहिती देणाऱ्या वस्तूंचे संग्रहालय त्यासोबत ग्रंथालय आणि सुंदर बाग अशा सुविधांनी युक्त उत्कृष्ट असे स्मारक येत्या वर्षभरात उभे करण्याचा शासनाचा विचार आहे,’ असे खडसे म्हणाले.
‘लवकरच मंत्रीमंडळाची मान्यता घेऊन स्थानिक आमदार, तज्ज्ञ व्यक्ती, समाजसेवक यांचा समावेश असणारी जिल्हाधिकारी नियंत्रित स्मारक समिती गठीत केली जाईल. या समितीच्या माध्यमातून स्मारक उभारणीचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल,’ असेही खडसे यांनी सांगितले .

 

February 23, 2015 in रोजगार
ऑस्करमध्ये ‘बर्डमॅन’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट 0

ऑस्करमध्ये ‘बर्डमॅन’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

OSCARS
लॉस एन्जल्स – लॉस एन्जल्समध्ये रंगलेल्या ८७ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळयात ‘बर्डमॅन’ने यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार मिळवला.
अलेजांद्रो गोन्झालेझ इनारीतू दिग्दर्शित ‘बर्डमॅन’ आणि वेस अँडरसन दिग्दर्शित ‘द ग्रँड बुडापेस्ट हॉटेल’ या चित्रपटांना सर्वोत्तम चित्रपटासह एकूण नऊ विभागांत नामांकने मिळाली होती.
बर्डमॅनसाठी अलेजांद्रो गोन्झालेझ इनारीतूला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचाही पुरस्कार मिळाला. द थिअरी ऑफ एव्हरीथिंगसाठी एडी रेडमनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर, स्टील अॅलिससाठी ज्यूलिअन मूरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
हॉलिवुडमधील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणा-या या पुरस्कार सोहळयाला हॉलिवुडमधील आघाडीचे कलाकार उपस्थित होते.
द ग्रॅड बुडापेस्ट हॉटेल आणि व्हीपलॅश या सिनेमाने प्रत्येकी तीन पुरस्कार मिळवले आहेत. ऑस्करच्या परदेशी भाषा चित्रपट विभागामध्ये पुरस्कारासाठी भारताकडून ‘लायर्स डाइस’ या हिंदी चित्रपटाची निवड झाली होती. मात्र हा चित्रपट पुरस्काराच्या शर्यतीतून बाद झाला.
हरवलेल्या पतीच्या शोध घेण्यासाठी निघालेल्या एका आदिवासी महिलेच्या प्रवासाची गोष्ट या चित्रपटात दाखवली होती. ‘इडा’ या पोलंडच्या चित्रपटाने भाषा विभागात सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार मिळवला.
ऑस्कर विजेते –
सर्वोत्कृष्ट चित्रपट – बर्डमॅन
सर्वोत्कृष्ट अभिनेता – एडी रेडमन (द थिअरी ऑफ एव्हरीथिंग)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – ज्यूलिअन मूर (स्टील अॅलिस)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – अलेजांद्रो गोन्झालेझ इनारीतू (बर्डमॅन)
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी – बर्डमॅन
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – पॅट्रिशिया ऍराक्वेट (बॉयहूड)
सर्वोत्कृष्ट लाईव्ह ऍक्शन शॉर्ट फिल्म – बॅग बाय द फोन कॉल
सर्वोत्कृष्ट साउंड एडिटिंग – ऍलन रॉबर्ट मुरे आणि बुब अस्मान (अमेरिकन स्नायपर)
सर्वोत्कृष्ट साउंड मिक्सिंग – क्रेग मन, बेन विलकिन्स, आणि थॉमस कर्ले (व्हिपलॅश)
सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म – क्राईसिस हॉटलाईन
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन – ऍडम स्टॉकहाऊसेन व ऍना पिनॉक (द ग्रँड बुडापेस्ट हॉटेल)
सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स – इंटर्सटेलर
ऍनिमेटेड शॉर्ट फिल्म – पॅट्रीक ऑसब्रोन व क्रिस्टिना रिड (फिस्ट)
सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड फिचर फिल्म – डॉन हॅल, ख्रिस विल्यम्स व रॉय कोनली (बिग हिरो ६)
परदेशी भाषांतील सर्वोत्कृष्ट चित्रपट – इडा (पोलंड)
सर्वोत्कृष्ट वेशभूषा – मिलेना कॅनोनेरो (द ग्रँड बुडापेस्ट हॉटेल)

 

February 23, 2015 in मनोरंजन
२५ फेब्रुवारी पासून बैंक ४ दिवस बंदचा इशारा 0

२५ फेब्रुवारी पासून बैंक ४ दिवस बंदचा इशारा

download

मुंबई – देशभरातील एकूण २८ सरकारी बैंक कर्मचार्यांची संख्या ८ लाख असुन,कर्मचार्यांच्या पगार वाढीचा मुद्दा गेल्या नोव्हेंबर २०१२ पासून प्रलंबित अाहे,पगार वाढीचा मुद्दा लवकरात लवकर मर्गी लावण्याचा इशारा दिला अाहे,व ४ दिवस बैंक बंद असतील, तसेच बैंक बंद इशारा बद्दल अाज सोमवारी महत्वाची बैठक बैंक कर्मचार्यांनी व इंडियन बैंक असोसिएशन,यूनायटेड फोरम अाॅफ बैंक यूनियंस (महाराष्ट्र) अाणि अाॅल इंडिया बैंक एम्प्लाइजचे अध्यक्ष विश्वास उत्गी यांची बैठक अायोजित केली अाहे.
इंडियन बैंक असोसिएशन अाणि बैंकचे कर्मचारी संघ यांनी या बैंक बंदच्या विषय टाळण्यासाठी विचार करत अाहेत.तसेच या बैठकीत तसे झाले नाही तर दि.२५ पासून ४ दिवस बैंक बंद राहणार अशी माहिती असोसिएशनने दिली अाहे.हा बैंक बंदचा इशारा बैठकिमध्ये मान्य करण्यात अाला तर,वित्तीय वर्षातील हा ५ वा बैंक बंदचा इशारा ठरेल.

February 23, 2015 in महाराष्ट्र
राज्य सरकार शिवस्मारकाला झेड प्लस सुरक्षा देणार 0

राज्य सरकार शिवस्मारकाला झेड प्लस सुरक्षा देणार

shivaji-thumb
मुंबई-(महाराष्ट्र न्यूज नेटवर्क,सतिष राठोड)- राज्य सरकारने अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बांधण्याचे निर्णय घेतले असुन,केंद्र सरकारने या स्मारकाला मंजुरी दिली अाहे.नरीमन पाॅईंट येथून समुद्रात सुमारे २.५ कि.मी अंतरावर शिवरायांचे भव्य स्मारक बांधण्यात येणार अाहे,२०१९ मध्ये या स्मारकाचे काम पूर्ण होईल असा अंदाज अाहे.व हे स्मारक मुंबईच्या पर्यटन दृष्टीकोनातून प्रमुख अाकर्षण ठरणार असुन,स्मारक तयार झाल्यावर दररोज सुमारे १०,००० पर्यटक स्मारकाला भेट देतील.या स्मारकाला अभैद्य सुरक्षा कवच देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल.
२६/११ च्या हल्ल्यात दहशतवादी समुद्र मार्गाने भारतात अाले होते,या पार्श्वभूमीवर शिव स्मारकात कोणतीही उणीव राहू नये म्हणून सरकारचे याकडे लक्ष राहील.स्मारकात सीसी टीव्ही कॅमेरा तसेच सुरक्षा दलांना दहशतवाद्यांना कडेकोट उत्तर देता यावे,यासाठी बंकरेही असतील.एनएसजी ची तुकडीही शिव स्मारकाच्या रक्षणासाठी तैनात असेल.तटरक्षक दल,मुंबई पोलीसही या स्मारकाच्या रक्षणासाठी सज्ज असतील.सर्वात महत्वाचे म्हणजे स्मारकात अॅंटी रडार सिस्टम असेल,यामुळे कोणत्याही रडारवर स्मारक दिसू शकणार नाही.हे स्मारक १६ हेक्टरच्या जागेत बांधण्यात येणार असुन स्मारकाची उंची १९० फूट व स्मारक बांधण्यासाठी १९०० कोटी रुपये खर्च अपेक्षित अाहे.त्यामुळे हा स्मारक सर्वदृष्ट्या प्रेक्षणिय असणार अाहे.

February 23, 2015 in महाराष्ट्र
नितीश कुमार बनले चौथ्यांदा मुख्यमंत्री 0

नितीश कुमार बनले चौथ्यांदा मुख्यमंत्री

nitish-kumar
पाटणा : बिहारच्या राजकारणातील चाणक्य मानले जाणारे नितीश कुमार यांनी रविवारी चौथ्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. जितनराम मांझी यांनी जबर आव्हान उभे केल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर पडदा टाकत नितीश कुमार यांना नऊ महिन्यांनंतर पुन्हा पदारूढ होण्यात यश आले.
राजभवनात राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी ६३वर्षीय नितीश कुमार आणि २२ मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. त्यात तीन महिला आमदारांना स्थान मिळाले आहे. मांझी यांच्या सरकारमधून राजीनामा देणाऱ्या २० मंत्र्यांना पुन्हा स्थान मिळाले असून, उर्वरित २ मंत्र्यांची मांझी यांनी हकालपट्टी केली होती. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीश कुमार यांचे टिष्ट्वटरद्वारे अभिनंदन केले.

February 23, 2015 in रोजगार