पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for March 9th, 2014

यवतमाळ जिल्ह्यात ढगफाटले, युवकाचा मृत्यू , महिला जखमी, घाटंजी टॉवरवर वीज कोसळली

यवतमाळ – जिल्ह्यात आठवड्यापासून वादळीवाºयासह गारपीटीने थैमान घातले आहे. आज रविवारी ढगफाटल्याने वादळी वाºयासह जोरदार पाऊस पडला. पुसद तालुक्यातील जामनाईक येथील एका युवकाचा मृत्यू झाला. वीज कोसळल्याने दिग्रस तालुक्यातील मांडवा येथील महिला जखमी झाली, शेकडो कोंबड्या दगावल्या तर घाटंजी तहसीलच्या निर्माणाधिन टॉवरवर वीज कोसळून प्रचंड नुकसान झाले.
राळेगांव, बाभुळगाव, घाटंजी, दारव्हा, दिग्रस, पुसद, नेर तालुक्यात सायंकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण होऊन वादळीवाºयासह जोरात पाऊस पडला. गारपीट सुरू होताच भितीपोटी पुसद तालुक्यातील जामनाईक येथील युवक गजानन तुळशीराम कुबडे (२४) हा घराकडे धावत जात होता. अशातच तो खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला. दिग्रस तालुक्यातील मांडवा येथील शोभा क्षिरसागर (५०) ही महिलाही गारपीठीमध्ये जखमी झाली. तसेच शेकडो कोंबड्या गारपीटीने दगावल्या असून, घाटंजी येथील तहसील कार्यालयात टॉवर वीज कोसळली.

मनसेचा नरेंद्र मोदींना पाठिंबा

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रत्यक्ष महायुतीत सहभागी झाली नसली तरी, आगामी लोकसभा निवडणूकीसाठी भाजपने दिलेला मैत्रीचा प्रस्ताव मनसेने मान्य केला आहे.
मनसेच्या आठव्या वर्धापनदिन सोहळयाच्या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा देण्याची आपली भूमिका जाहीर केली. मनसेचे निवडून आलेले खासदार पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील असे राज यांनी सांगितले.या कार्यक्रमात राज यांनी मनसेची पहिली उमेदवार यादी जाहीर केली. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेची मनसेवर आगपाखड सुरु आहे. मनसे प्रभावहीन झाली असून, आगामी निवडणूकीत मनसेचा निभाव लागणार नाही अशी बोचरी टीका शिवसेनेकडून सुरु आहे. त्यामुळे राज आपल्या भाषणात शिवसेनेचा समाचार घेतली अशी अपेक्षा होती.मात्र राज यांनी योग्यवेळी आपण सर्व विषयांवर भाष्य करु असे सांगत टीका करण्याचे टाळले. आगामी निवडणूकीत मनसे आपली ताकत दाखवून देईल. तुम्ही लोकसभा निवडणूकांच्या कामाला लागा असे राज यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले.या कार्यक्रमात राज यांनी मनसेच्या मोबाईल अॅपचे लॉंन्च केले तसेच पुढच्या दोन ते तीन दिवसात ते राज्यातील गारपीटग्रस्त शेतक-यांची भेट घेणार आहेत. मनेसची दुसरी उमेदवार यादी पुढल्या दोन ते तीन दिवसात जाहीर होईल.

मनसेची उमेदवार यादी
दक्षिण मुंबई – बाळा नांदगावकर
दक्षिण मध्य मुंबई- आदित्य शिरोडकर
उत्तर-पश्चिम मुंबई – महेश मांजरेकर
कल्याण-डोंबिवली -राजू पाटील
शिरुर – अशोक खंडेभराड
नाशिक – डॉ.प्रदीप पवार
पुणे – दीपक पायगुडे

March 09, 2014 in मुख्य पान

रामदास कदम यांची मनसे भेट

मुंबई – आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची मनसेवर आगपाखड सुरु असताना, मनसे मात्र शांत राहून शिवसेनेचा एक एक नाराज मोहोरा आपल्या गळाला लावत आहे. भारतीय विद्यार्थी सेना आणि शिवसेनेच्या चित्रपट सेनेचे माजी अध्यक्ष अभिजीत पानसे यांना मनसेमध्ये आणल्यानंतर शिवसेनेच दुसरे वरिष्ठ नेते रामदास कदम हे ही मनसेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
रामदास कदम यांनी मनसेचे कोकण संघटक वैभव खेडेकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ही कौटुंबिक भेट असल्याचे वैभव खेडेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. मात्र येत्या काही दिवसात कोकणातील शिवसेनेच्या अंतर्गत राजकरणात मोठी उलथा-पालथ होणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. रामदास कदम गेल्या काही काळापासून शिवसेनेत नाराज असल्याची चर्चा आहे. रामदास कदम यांच्यासारखा वरिष्ठ नेत्यांने शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली तर, तो सेना नेतृत्वाला एक झटका असेल. आगामी लोकसभा निवडणूकीत भाजपशी मैत्रीचे नाते जपून शिवसेनेला झटका देण्याची मनसेची रणनिती आहे. त्यादृष्टीने मनसे मुंबई, ठाणे, कल्याण आणि नाशिकमध्ये शिवसेना उमदेवारांच्या विरोधात तगडे उमेदवार देणार आहे.

March 09, 2014 in महाराष्ट्र

अण्विक पाणबुडीला अपघात एक ठार

विशाखापट्टणम – भारतीय नौदलाच्या पाणबुडया, युध्दनौकांना होणा-या अपघातांची मालिका कायम असून, शनिवारी संध्याकाळी विशाखापट्टणम येथील नौदलाच्या युध्दनौका बांधणी तळावर बांधकामवस्थेत असलेल्या एका अणवस्त्रपाणबुडीला अपघात झाला. या दुर्घटनेत एका कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला असून, दोन कामगार जखमी झाले आहेत.
आयएनएस अरिहंत वर्गातील ही अणवस्त्र पाणबुडी आहे. पाणबुडीची दाब चाचणी सुरु असताना, हायड्रायुलिस टाकीचे झाकण उडून कामगाराच्या अंगावर पडले. त्यात या कामगाराचा मृत्यू झाला अशी माहिती डीआरडीओचे प्रमुख अविनाश चंदर यांनी दिली. अमर असे या कामगाराचे नाव असून तो २४ वर्षांचा होता. अमजद खान आणि विष्णू हे दोन अन्य कंत्राटी कामगार अपघातात गंभीर जखमी झाले असून, त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या दुर्घटनेत अण्विक पाणबुडीचे नुकसान झालेले नाही तसेच पाणबुडी विकसित करण्याच्या कार्यक्रमाला धक्का लागलेला नाही अशी माहिती चंदर यांनी दिली. डीआरडीओने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहे.शुक्रवारी संध्याकाळी मुंबईच्या माझगाव गोदीत आयएनएस कोलकाता श्रेणीतील ‘यार्ड-७०१’ विनाशिकेवर स्फोट होऊन एका अधिका-यांचा मृत्यू झाला होता. त्याआधी आयएनएस सिंधुरत्न पाणबुडीच्या चाचण्या सुरु असताना, झालेल्या अपघातात दोन नौदल अधिका-यांचा मृत्यू झाला होता.

March 09, 2014 in देश-विदेश

महिलांसाठी एसएमएस हेल्पलाइन

मुंबई – शहरात एकटय़ाने प्रवास करणा-या महिलांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिस व एमटीएनएलतर्फे एसएमएसद्वारे हेल्पलाइन सेवा सुरू केली आहे. तसेच महिला व ज्येष्ठ नागरिकांना तत्काळ टॅक्सी अथवा रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठी शहरातील प्रमुख रेल्वेस्थानकांबाहेर पोलिसांचे विशेष ‘डेस्क’ तयार केल्याची माहिती पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी शनिवारी दिली.
जागतिक महिलादिनी मुंबई पोलिस आणि ‘एमटीएनएल’च्या वतीने ‘ट्रॅव्हल सेफ, व्हेन अलोन’ ही नवीन योजना सुरू करण्यात आली असून, एकटीने प्रवास करणा-या महिलांसाठी एसएमएसद्वारे हेल्पलाइन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय एकटी प्रवास करणारी महिला व ज्येष्ठ नागरिकांना तत्काळ टॅक्सी अथवा रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठी शहरातील प्रमुख रेल्वेस्थानकांबाहेर पोलिसांचे विशेष ‘डेस्क’ उपलब्ध असतील, अशी माहिती पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी शनिवारी दिली.मुंबईत नुकतेच इस्थर अनुह्या प्रकरणावरून महिलांच्या सुरक्षित प्रवासाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही योजना सुरू केली आहे. रात्री-अपरात्री टॅक्सी किंवा रिक्षाने प्रवास करणा-या महिलेला असुरक्षित वाटल्यास ९९६९७७७८८८ या हेल्पलाइनवर ती प्रवास करत असलेल्या वाहनाचा क्रमांक एसएमएस केल्यानंतर महिला नेमक्या कोणत्या ठिकाणी आहे, प्रवासी महिलेचा मोबाइल क्रमांक व महिलेने पाठवलेला एमएमएस सव्‍‌र्हवरवर साठवून ठेवला जाईल. त्यामुळे एखादा अनुचित प्रकार घडल्यास आरोपींपर्यंत सहज पोहोचता येऊ शकेल. ही सेवा विनामूल्य उपलब्ध करण्यात आली आहे. हे एसएमएस सेव्ह करण्यासाठी अद्ययावत सव्‍‌र्हर वापरण्यात येणार असून, एका वर्षात एक कोटी एसएमएस सेव्ह करण्याची त्याची क्षमता आहे.याशिवाय नोकरीव्यवसायानिमित्त एकटय़ा प्रवास करणा-या महिलांच्या सुरक्षा व सुविधेसाठी दादर, वांद्रे, लोकमान्य टिळक टर्मिनस, बोरिवली, मुंबई सेंट्रल, छत्रपती शिवाजी टर्मिनस या प्रमुख रेल्वेस्थानकांबाहेर वाहतूक पोलिस, विभागीय परिवहन विभागाचे अधिकारी (आरटीओ), रेल्वे सुरक्षा दल यांचे संयुक्त विशेष डेस्क उपलब्ध करण्यात येणार असून, या डेस्कच्या माध्यमातून महिलांना प्रवासासाठी तत्काळ टॅक्सी व रिक्षा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या डेस्कच्या माध्यमातून महिला व ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे मारिया यांनी स्पष्ट केले. या वेळी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात महिला सुरक्षा मार्गदर्शिकेचेही प्रकाशन करण्यात आले. या मार्गदर्शिकेत महिलांचे अधिकार, त्यांच्या सुरक्षेबाबतची माहिती, महिलांविषयीचे कायदे, अदखलपात्र गुन्हा व गुन्ह्यांमधील फरक, लैंगिक अत्याचार, महिलांविरोधातील गुन्हे, अ‍ॅसिड हल्ला आदींची कायदेशीर माहिती देण्यात आली आहे.

March 09, 2014 in महाराष्ट्र

पत्नीची काळजी न घेणारी व्यक्ती देशाची सेवा करणार काय ? – दिग्विजय सिंह

नवी दिल्ली- पत्नीची काळजी घेऊ न शकणारी तसेच महिलांचा आदर न करणारी व्यक्ती देशाची सेवा काय करणार, असा सवाल उपस्थित करत काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर शनिवारी टीका केली.
मोदींच्या मनात स्त्रियांबद्दल थोडा जरी सन्मान असता तर त्यांनी निवडणूक अर्जामध्ये आपल्या पत्नीचे नाव दिले असते. मोदी यांनी विवाहासंदर्भातील माहिती का लिहिली नाही, ते अविवाहित आहेत किंवा त्यांनी आपल्या पत्नीला का सोडून दिले, याबाबतची माहिती त्यांनी का दिली नाही.जशोदाबेन असे त्यांच्या पत्नीचे नाव सांगितले जाते. त्या अजूनही एका भाडयाच्या घरात राहतात. त्यांच्या निवासासाठी मोठे घर का दिले गेले नाही, असा सवालही त्यांनी केला. ते एक मोठे व्यक्ती आहेत असे म्हणतात, तर त्यांनी आपल्या पत्नीसाठी सोयी का उपलब्ध करून दिल्या नाहीत. ज्यांच्या मनामध्ये महिलांसाठी आदर नाही, तो देशाची सेवा कशी करणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.मुंबई पोलिस महिलांच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध असून, त्यांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येतील. महिलांचा वावर अधिक असणा-या ठिकाणांच्या सुरक्षेची मुंबई पोलिसांकडून विशेष पाहणी केली

March 09, 2014 in मुख्य पान

केजरीवालांच्या घराबाहेर ‘आप’कार्यकर्त्यांची निदर्शने

नवी दिल्ली- आम आदमी पक्षाचे असंतुष्ट कार्यकर्त्यांनी ‘आप’चे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर रविवारी निदर्शने केली. तिकीटवाटपात अनेकांना डावलल्याने ‘आप’च्या असंतुष्टांमध्ये भर पडत आहे.
एकीकडे ‘आप’कडून संपूर्ण स्वराज्यच्या गप्पा मारल्या जात आहेत तर दुसरीकडे पक्षामध्येच त्याची अंमलबजावणी केली जात नाही, असा आरोप ‘आप’च्या राष्ट्रीय परिषदेच्या सदस्य अश्विनी उपाध्याय यांनी केला. या गोष्टी केजरीवाल यांना लक्षात आणून देण्यासाठी येथे जमलो असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाने केलेल्या तिकिटवाटपाबाबत आपण समाधानी नाही. मात्र केजरीवाल कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी वेळही देत नसल्याचे त्या म्हणाल्या.
केजरीवालांचा शपथविधी १३.४१ लाखांत!
अरविंद केजरीवाल यांच्या दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी कार्यक्रमाचा तसेच जाहिरातीचा खर्च १३ लाख ४१ हजार रुपये झाला असल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले. रामलीला मैदानात झालेल्या शपथविधीसाठी ६.३३ लाख तर त्याच्या जाहिरातीसाठी ६.७ लाख रुपये खर्च झाल्याचे दिल्ली सरकारच्या प्रशासकीय विभागाने ही माहिती दिली आहे. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, उत्तर दिल्ली महानगरपालिका, दिल्ली जलमंडळ, अग्निशमन विभाग आणि विद्युत विभाग या सर्व विभागांचा खर्चाचा समावेश आहे.

March 09, 2014 in मुख्य पान

न्यायाधिशांचे घरी चोरी, दोन अटकेत

यवतमाळ – आर्णी येथील न्यायाधिशांचे घर फोडणाºया दोन चोरट्यास विशेष पथकाने अटक केली. न्यायालयात हजर करून दोन्ही आरोपींना १० मार्च पर्यंत पोलीस कोठडी मिळविली. शेख अनवर शेख मुख्त्यार (२४), शेख अखबर शेखर मुसा (२३) रा. तुकाराम बापू वार्ड पुसद अशी आरोपींची नावे आहे. १४ आॅक्टोंबर रोजी आर्णी येथील न्यायाधिश आगलावे याच्या घरी ४४ हजाराची चोरी झाली होती. दरम्यान चार महिन्यानंतर शनिवारी आरोपी शेख अनवर, शेख अखबर यास अटक करून १० मार्च पर्यंत पोलीस कोठडी मिळविली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिरी याच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुगत पुंडगे, जमा. भिमराव सिरसाठ, लिलाधर वानखेडे, गुड्डू शेख, नितीन वास्टर, आशिष गुल्हाणे, सतीश पांडे, चालक देवतळे यांनी केली.

एकाच दिवशी पाच ठिकाणी चोरी

यवतमाळ – जिल्ह्यात चोरट्याने थैमान घातला असून एकाच दिवशी पाच ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या. ढाणकी येथील गोविंद भावसिंग आडे (४६) याचे देशी दारुचे दुकानाची जाळी वाकवून गल्ल्यातून ६२ हजार ५५२ रुपये चोरुन नेले. याप्रकरणी बिटरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच पांढरकवडा तालुक्यातील झुंझरपूर शिवारातून मोबाईल टॉवरच्या ५३ बॅटºया (किंमत ५३ हजार) चोरट्याने चोरुन नेल्या. याप्रकरणी लखन प्रेमसिंग चव्हाण रा. अंतरगाव याच्या तक्रारीवरून पांढरकवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मराठवाकडी येथील वसंता गंगाराम देशट्टीवार यांच्या शेतातून ९ झाडे आरोपी वासुदेव धोंडू टेकाम (३५) रा. गोंडवाकडी याने चोरुन नेले. सवना येथील गजानन रामराव देशमुख याची दुचाकी (एम.एच. २९/ एल ९७४५) चोरट्याने चोरुन नेली. या प्रकरणी पुसद शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तर परसोडा येथील श्रीधर बालाजी मसे (६३) यांचे नवरगाव येथील गोदाम चोरट्याने फोडले. त्यामधून १८ क्विंटल सोयाबीन चोरुन नेले. या प्रकरणी शिरपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

यवतमाळात ७० लाखांची घरफोडी

यवतमाळ – शहरातील धामणगाव बायपास पिंपळगाव येथील दालमिल व्यावसायिकांचे घर फोडून हिºयासह ७० लाखांच्या मुद्देमालावर डल्ला मारला. आज रविवारी सकाळी हा प्रकार कामगारांच्या निदर्शनास आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
विनोद भरतीया रा. धामणगाव बायपास पिंपळगाव रोड हे दोन दिवसापूर्वी आपल्या कुटुंबीयासह अंत्यसंस्कारासाठी गेले होते. अशातच काल रात्री चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातून हिरे, सोन्याचे दागिने, चांदी, रोख आदी ७० लाखाचा मुद्देमाल चोरून नेला. या घटनेची माहिती मिळताच यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदणे, शहरचे ठाणेदार अरुण आगे यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. अंगुली मुद्रा तज्ज्ञ सहा. पोलीस निरीक्षक नरेंद्र नक्षणे, अमित मेश्राम यांना पाचारण करून कपाटावरील चोरट्याचे ठसे घेतले.

March 09, 2014 in मुख्य पान