जळगाव – वॉरन्ट बजावण्याचा बहाणा करीत ओळखीच्या महिलेला भेटण्यासाठी गेलेला पोलिस कर्मचारी दुसऱ्याच महिलेच्या घरात शिरला आणि त्याच्या असभ्य वर्तणुकीमुळे बिल्डींगमध्ये गुरुवारी रात्री एकच गोंधळ उडाला. या घटनेमुळे बिल्डींगमधील संतापलेल्या महिलांनी संबंधित पोलिसांला बेदम चोप दिला. अखेर बचावासाठी त्या पोलिसाला महिलांसमोर सपशेल शरणागतीच पत्करावी लागली.
सूरज पाटील असे पोलिसाचे नाव आहे. तो एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या डीबी पथकात कार्यरत आहे. तो गुरुवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास शिरसोली नाक्यावरील एका अर्पाटमेंन्टमध्ये वॉरन्ट बजावण्यासाठी गेला. वॉरन्ट हे फक्त निमित्त होते. मात्र, त्या बिल्डींगमध्ये राहणाऱ्या व शहरात प्रसिध्द असलेल्या एका महिलेला भेटण्याच्या उद्देशाने तो याच भागात एकासारख्या दिसणाऱ्या रुबी अपार्टमेंटमधील दुसऱ्याच फ्लॅटमध्ये घुसला. त्या फ्लॅटमधील महिलेला सूरजने अश्लील भाषेत शिवीगाळही केली. संबंधित महिलेचा पती घरात असतांना सूरज थेट किचनमध्ये गेला. तेथे त्याने महिलेसोबत अश्लिल चाळे केले. याची माहिती परिसरातील नागरिकांना मिळाली आणि लगेच जमाव जमा झाला. जमावाला पाहून भांबावलेल्या सूरजने समन्सचा बहाणा केला. तसेच बोंब कराल तर मी आत्महत्या करेल, अशी धमकीही दिली. या प्रकाराने संतप्त महिलांनी सूरजला चोप दिला आणि त्याला घरात कोंडूनही ठेवले.
Archive for March 22nd, 2014
महिलांनी पोलिसाला बदडले
0
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी २९ उमेदवारांचे ४३ अर्ज

यवतमाळ – यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी आज शनिवारी २९ उमेदवारांनी ४३ अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करावयाच्या शेवटच्या दिवसाअखेर उमेदवारी दाखल करणाºयांची संख्या ४४ इतकी झाली असून या उमेदवारांनी एकून ७२ अर्ज दाखल केले आहे.
आज शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणाºयांमध्ये ना अॅड.शिवाजीराव शिवरामजी मोघे (इंडीयन नॅशनल कॉंगेस-४), खा भावना पुंडलीकराव गवळी (शिवसेना-४), माजी सहकार आयुक्त बळीराम परशराम राठोड(बहुजन समाज पार्टी-१), माजी पोलीस महानिरीक्षक मोहन मल्लु राठोड (भारीप बहुजन महासंघ-१), अॅड. नरेश फुलसिंग राठोड (आम आदमी पार्टी-३), प्रशांत पंढरीनाथ सुर्वे (अपक्ष-१), रामकृष्ण पुंडलीकराव सावके(भारतीय कम्युनिष्ट पक्ष-१), दिनेश फुलसिंग राठोड (अपक्ष-१), नरेश महादेवराव गुघाने (अपक्ष-१), राजानंद श्रावणजी गणवीर (अपक्ष-१), विनोद नारायण चव्हाण (अपक्ष-१), हेमेंद्र राजेश्वर ठाकरे (अपक्ष-१), रामराव सवाई पवार (अपक्ष-१), उत्तम भगाजी कांबळे (प्रबुध्द रिपब्लीकन पार्टी-३), अबरार अहेमद मेहबुब खान (वेलफेअर पार्टी आॅफ इंडीया-१), शेख मेबबुब शेख छोटू (बहुजन समाज पार्टी-१), शामकुमार बापुराव लोखंडे (अपक्ष-१), राजु उर्फ भरतराजे उध्दवराव पाटील (मनसे-१), इंदुवर काशिराम राठोड (बहुजन मुक्ती पार्टी-१), गोविंद देवाजी चव्हाण (अपक्ष-१), अहेमद परवेज इकबाल (समाजवादी पार्टी-२), रघुनाथ शंकरराव शेळके (आंबेडकरवादी रिपब्लीकन पार्टी-१), अशोक शंकरराव शेंडे(अपक्ष-२), सुधाकर नामदेव घायवान (रिपब्लीकन पार्टी आॅफ इंडीया-१), बळीराम परशराम राठोड(बहुजन समाज पार्टी-१), राजेंद्र विठ्ठल गायकवाड (लोकशासन-१), प्रकाश चिमणाजी धोत्रे (अपक्ष-१), ज्ञानेश्वर शंकरराव राठोड, सुरजुसे सुरेश श्रावणजी (अपक्ष-१), पुरूषोत्तम डोमाजी भजगवरे (राष्ट्रीय बहुजन कॉंग्रेस पार्टी-१) यांचा समावेश आहे. शुक्रवार २१ मार्च पर्यंत सुरेश राजाराम मुखमाले, बंडू गणपत मेश्राम, उपेंद्र बाबाराव पाटील , इंदूवर काशीराम राठोड , प्रकाश रघुनाथ राऊत, महादेव हरीभाऊ ताटके, जांबुवंतराव बापुराव धोटे , उल्हास वसरामजी जाधव, प्रशांत पंढरीनाथ सुर्वे, पवार रमेश गोरसिंग, मनिष रामकृष्ण ढाले, मुधकर रंगलाल पवार, रमेश विठोबा गुरनुले , शेख जब्बार शेख युनुस, ज्ञानेश्वर तुकाराम मेश्राम, युनुस शेख अ.गनी, संदीप अनंतराव देवकते यांनी अर्ज दाखल केले आहे. आतापर्यंत ४४ उमेदवारांनी ७२ उमेदवारी अर्ज दाखल केले. आज १४ उमेदवारांनी ४४ अर्ज नेले आहे. आजपर्यंत एकूण १३१ उमेदवारांनी ३४६ अर्ज नेले आहे.
0
सोनिया गांधी यांना पासपोर्ट जमा करण्याचे आदेश

अमेरिकी कोर्टाचा झटका
वृत्तसंस्था, जालंधर – शीखविरोधी दंगलीच्या वेळी सोनिया गांधी अमेरिकेत होत्या. या केसप्रकरणी अमेरिकेतील एका कोर्टाने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधा यांना आपल्या पासपोर्टची एक प्रत सात एप्रिलपर्यंत कोर्टात जमा करावी, असे आदेश कोर्टाने दिले आहेत.
शीख फॉर जस्टीस (एसएफजे) या संघटनेने सोनिया गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. यापूर्वीही सोनिया गांधी यांना सप्टेंबर २०१३ मध्ये समन्स बजावण्यात आले होते. दंगल झाली तेव्हा सोनिया या न्यूयॉर्कमधील मेमोरियल स्लोन-केटरिंग कॅन्सर सेंटर हॉस्पिटलमध्ये उपस्थित होत्या, असा दावा एसएफजे संघटनेने केला आहे. यावर सोनिया यांनी, आपण २ ते ९ सप्टेंबर २०१३ काळात अमेरिकेत नव्हतो, असे कोर्टाला सांगितले; तर, कोर्टाने गांधी यांना समन्स बजावले तेव्हा त्या अमेरिकेतच होत्या, असा दावा या संघटनेने केला आहे. सोनिया यांनी त्या या वेळी अमेरिकेत नसल्याचे आवश्यकक पुरावे कोर्टाला दिलेले अद्याप दिलेले नाहीत. त्यामुळे कोर्टाने सोनिया यांना सांगितलेले एवढे कारण पुरेसे ठरत नसल्याचे सांगून, त्यांनी आपल्या पासपोर्टची कॉपी जमा करण्यास सांगितले आहे.गांधी यांनी त्यांच्या पासपोर्टची प्रत दिलेल्या मुदतीत जमा न केल्यास त्यांच्याविरुद्ध शीखविरोधी दंगलीमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेस नेत्यांना संरक्षण देत असल्याच्या आरोपाखाली खटला चालविण्याची मागणी केली जाईल, असे या संघटनेचे कायदे सल्लागार गुर्पतवंत सिंग यांनी सांगितले.
0
माणसाला येतात १ हजार अब्ज वास, संशोधनातील निष्कर्ष

नवी दिल्ली – छोट्याशा गोष्टीचा वास येणाऱ्याला त्याचे नाक किती खूर आहे, असे नेहमी बोलले जाते. मात्र, प्रत्येक माणसाचेच नाक खूर असते आणि जवळपास एक हजार अब्ज प्रकारचे वास आपल्याला जाणवू शकतात, असे एका संशोधनामध्ये समोर आले आहे. आतापर्यंत आपल्याला १० हजार प्रकारचेच वास जाणवतात, असा अंदाज होता. मात्र, ही क्षमता किती तरी पटीने अधिक असल्याचे या संशोधनामध्ये समोर आले आहे.
‘हॉवर्ड ह्युजेस मेडिकल इन्स्टिट्यूट’च्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनामधून हा निष्कर्ष समोर आला आहे. या संशोधनातील निष्कर्ष ‘सायन्स’ या नियतकालिकात नुकतेच प्रसिद्ध झाले आहेत. या पूर्वी १९२०च्या दशकामध्ये संशोधन करण्यात आले होते आणि त्यानुसार माणसाची वास घेण्याची क्षमता दहा हजार वासांपर्यंतच मर्यादित असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, त्यासाठी कोणताही पुरावा किंवा आकडेवारी नव्हती. डोळ्यांमध्ये प्रकाश स्वीकारणाऱ्या तीन यंत्रणा एकत्रित काम करतात, त्यामुळे आपण एक कोटी प्रकारच्या रंगांमधील फरक समजून घेऊ शकतो. त्याचप्रमाणे सर्वसामान्य व्यक्तीच्या नाकामध्ये वास स्वीकारू शकणाऱ्या ४०० यंत्रणा असतात, त्यामुळे ही क्षमता किती तरी अधिक असण्याचा अंदाज होता, असे लेस्ली वॉसहॉल यांनी सांगितले. या संशोधनामध्ये शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारच्या १२८ वासांची मिश्रणांमधून फरक ओळखण्याचे आव्हान काही स्वयंसेवकांना देण्यात आले होते. त्यांपैकी प्रत्येकांना या वासांची २६४ मिश्रणे ओळखण्यास सांगण्यात आले होते.
0
केजरीवालांच्या रोड शोला नागरिकांकडून काळे झेंडे

फरिदाबाद – येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या फरिदाबादमधील रोडशो दरम्यान तेथील स्थानिक नागरिकांनी केजरीवाल यांना काळे झेंडे दाखवत विरोध दर्शवला.
शनिवारी सकाळी केजरीवाल आणि त्यांचे समर्थक फरिदाबादला पोहोचल्यानंतर तेथील स्थानिक रहिवाशांनी केजरीवालांना काळे झेंडे दाखवले तसेच त्यांच्याविरोधात घोषणाबाजीही केली. काळे झेंडे दाखवणे हा प्रकार आपल्या देशात काही नवीन नाही. विरुद्ध पक्षाकडून असे नेहमीच केले जाते. केजरीवाल हे असे नेते आहेत जे चांगल्या प्रकारे सरकार चालवू शकतात असे आपच्या एका समर्थकाने यावेळी सांगितले.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल फरिदाबादम आणि गुडगावमध्ये रोड शो करणार आहेत. रविवारी योगेंद्र यादव यांना उमेदवारी देण्यात आलेल्या गुडगावमध्ये केजरीवाल यांचा रोड शो होणार आहे.
0
संजय दत्त पुन्हा तुरुंगात

मुंबई – पॅरोलची मुदत संपल्याने अभिनेता संजय दत्त पुन्हा एकदा येरवडा तुरुंगात दाखल झाला आहे. पत्नी मान्यता आजारी असल्याने त्याला पॅरोल देण्यात आली होती. तब्बल दोनवेळा पॅरोलची मुदत वाढवल्याने जोरदार टीकाही झाली होती. मुंबई १९९३साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट दरम्यान बेकायदा शस्त्रे बाळगल्याप्रकरणी संजयला दोषी ठरवण्यात आले होते. मात्र पत्नी मान्यता आजारी असल्याने त्याला सगल तीन वेळा पॅरोल मंजूर करण्यात आला होता. संजय दत्त २१ डिसेंबर २०१३पासून पॅरोलवर तुंरुगाबाहेर आहे.दरम्यान, तुरुंगात जाताना मुंबईतील घराबाहेर आणि येरवडा तुरुंगाबाहेर निदर्शने करण्यात आली.
0
धावत्या लोकलमध्ये महिलेची हत्या

मुंबई – विरार – चर्चगेटदरम्यान धावत्या लोकल ट्रेनमध्ये शनिवारी एका महिलेची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे.
पन्ना अंधेर असे या महिलेचे नाव आहे. वसई पोलिस अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी चारच्या सुमारास ही घटना घडली. लोकल विरारहून चर्चगेटच्या दिशेने जात असताना वसई स्थानकादरम्यान मालडब्यातील भाजी विक्रेत्या पन्ना यांच्यावर एका अज्ञात व्यक्तीने चाकूने हल्ला केला. यानंतर हल्लेखोराने ताबडतोब तेथून पोबारा केला.हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पन्ना यांना तात्काळ वसई येथील रवी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घडलेल्या प्रकारामुळ लोकलमधील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
0
टँकर स्फोट, सात ठार

मुंबई – अहमदाबाद मार्गावरील डहाणू – चारोटी नाक्याजवळ शनिवारी दुपारी टँकर उलटल्याने आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.केमिकल घेऊन जाणारा हा टँकर डहाणू-चारोटी नाक्याजवळ अचानक उलटला आणि त्याने पेट घेतला. आग लागल्याने खबरदारी म्हणून दोन्ही मार्गांवरची वाहतूक १०० मीटर अंतरावर थांबवण्यात आली आहे. तसेच रस्त्यालगतची दुकानेही बंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे सध्या या मार्गावरील वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली आहे.
सांस्कृतिक नेतेगिरी
काल तू म्हणालास ,
जात म्हणजे थुकायचं डबडं
धर्म म्हणजे हाडीताप
लोकशाही , शेळीचं शेपूट
विद्रोह , ठिणग्यांचं मोहोळ
बांधिलकी , सुसंस्कृत कपडेलत्ते
अस्मिता , हाडामांसाचं बहरलेलं झाड
आणखी न समजणारं बरंच बोललास .
आम्ही जामखुश ,
आम्हास तू प्यार झालास ,
आज गेलास तू
प्रस्थापित कॉलनीतच राहायला
जातीपेक्षा प्रवृत्ती महत्वाची
धर्मातील विसंगती टाळू शकतो
विद्रोह म्हणजे भडक स्टेटमेंट
बांधिलकी , नर्मदेचा गोटा
अस्मिता , बिनपाऱ्याचा आरसा
संयम , विनय , मनस्वी , तामसी वगैरे
शब्द लागलास बरळायला
तू बदलल्याचा प्रश्न आहेच !
त्याहून दिशेचा मोठा प्रश्न आहे
विष आणि विषत्व वेगळं नसतं रे !
आम्ही तुझ्याशी नातं तोडीत आहोत
तू आमचा होतास , हे ही
विसरून जात आहोत
आमची रेशनकार्डे आम्ही
वेगळी करीत आहोत ….
अरुण काळे
आज पन्नास वर्षांनी …
तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं
सूर्यफुलांनी पाठ फिरविली होती
मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा
खाचखळग्यांनी तुझे स्वागत केले .
ठेचाळलास रक्ताळलास कधी निर्भर्त्सना
सहन केलीस
तरीही तू पुढेच चाललास
पाठीमागे उधाणलेला समुद्र .
तुझ्या आवाजात आवाज मिळविणाऱ्या बेफाम लाटा
तुला झेलणाऱ्या कुरवाळणाऱ्या ‘
अशाही लाटा आल्या : तुला गिळू गिळू म्हणणाऱ्या
पण तू तर त्यांनाच गिळलस.
तू झालास परिस्थितीवर स्वार
आणि घडविलास नवा इतिहास
यु झालास मूक समाजाचा नायक
आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत .
तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर
तू तोडल्या गुलामांच्या पायातल्या बेड्या
आणि केलेस उभे चवदार तळ्याच्या काठावर
युद्धात जवानांना उभे करावे तसे.
तुझे शब्दच असे की
काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात
तुझा संघर्षच असा की
महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत
ओरबाडलास भूतकाळ , शिलगावलीस मने
मुक्त केलीस हिसकावलेली शस्त्र अन पुकारलेस युद्ध
तुझ्या डरकाळीने हादरलं आकाश : डचमळली पृथ्वी
आणि बघता बघता चवदार तळ्याला आग लागली.
आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय सूर्यफुले तुझा
ध्यास घेतायत
बिगूल प्रतीक्षा करतोय
चवदार तळ्याचं पाणी : तेही थंड झालंय
आणि तू , तू पेटवतोयस मला
आता समुद्राला आग आपणच लावली पाहिजे .
ज. वि .पवार









