पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for March 16th, 2014

होळी 0

होळी

1_n

March 16, 2014 in मुख्य पान

वाहतुक पोलिसासोबत झटापट

यवतमाळ  – जिल्हा वाहतुक शाखेच्या पोलीस शिपायासोबत दुचाकीस्वारांनी झटापट केल्याची घटना शनिवारी दुपारी १.२५ वाजता विठ्ठलवाडी येथे घडली. जिल्हा विशेष शाखेचे पोलीस शिपायी दिवाकर जोशी हे आपल्या सहकार्यासह लाडखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटर वाहन नियमांचे उल्लंघन करणाºया वाहन धारकांविरुद्घ कार्यवाही करण्यासाठी गेले होते. अशातच विठ्ठलवाडी फाट्यावर एका दुचाकीवरुन दोन जण जात होते. त्यांना थांबवुन दुचाकीचे कागदपत्र व लायसन्स संदर्भात विचारणा केली. त्यावरून ईम्तीयाझ इब्राहीत खॉ (३०) व अन्य एक रा. बोरी अरब यांने सदर  शिपायासोबत झटापट करुन अश्लिल शिवीगाळ केली. जीवे मारण्याची धमकी देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी जोशी याच्या तक्रारीवरून लाडखेड पोलिसांनी दुचाकीस्वाराविरुद्घ गुन्हा दाखल केला. अधिक तपास ठाणेदार सतीश पाटील करीत आहे.

जिल्हा बार असोशिएशच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. चव्हाण

यवतमाळ – यवतमाळ जिल्हा बार असोशिएशनची वार्षिक निवडणूक १५ मार्च रोजी जिल्हा न्यायालयात पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी अ‍ॅड. राजेश चव्हाण हे विजयी झाले असून दोन सचिव  व अंकेक्षकांची अविरोध निवड करण्यात आली.
जिल्हा बार असोशिएशनचे अध्यक्ष, सचिव, सभासद, अंकेक्षकपदाची १५ मार्च रोजी निवडणूक आयोजीत केली होती.अध्यक्षपदासाठी अ‍ॅड. राजेश चव्हाण,अ‍ॅड. अरुण मोहड, अ‍ॅड. दिपक चांभारे यांनी अर्ज दाखल केले होते. तर चार सभासदासाठी पाच जणांनी अर्ज दाखल केले. दोन सचिवांसाठी दोनच अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची अविरोध निवड झाली. यामध्ये अ‍ॅड. चव्हाण यांना १५३ मते मिळाल्याने ते विजयी झाले. तर त्याचे प्रतिस्पर्धी अ‍ॅड. चांभारे यांना ८३ व अ‍ॅड. मोहोड यांना ५८ मते मिळाली. अ‍ॅड. डि.बी. गायकवाड, अ‍ॅड. सुरज जयसिंगपुरे यांची अविरोध निवड झाली. सभासद म्हणून अ‍ॅड. निरंजन दाढे, अ‍ॅड. शिवाजी गाडे, अ‍ॅड. अमान पठाण, अ‍ॅड. आनंद रुईकर व अंकेक्षक म्हणून अ‍ॅड. भारत सोधी यांची निवड  झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अ‍ॅड. रविशेखर बदणोरे, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी अ‍ॅड. अजय चमेडीया  यांनी काम पाहिले.

वन विभाग होणार ‘स्मार्ट’

नाशिक – कूर्मगतीने चालणाऱ्या कामकाज पद्धतीला फाटा देऊन वन विभागाच्या कामकाजात अधिक गतिमानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी ‘स्मार्ट’ पर्याय शोधण्यात आला आहे. फिल्डवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्मार्टफोन आणि जीपीएस यंत्रणेद्वारे कनेक्ट केले जात असून याद्वारे प्रत्यक्ष जंगलात असलेली सद्यस्थिती कळून चुकणार आहे.
घनदाट जंगल आणि वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या भागात नक्की सद्यस्थिती काय आहे, हे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही काही वेळा माहिती नसते. तसेच, वनकर्मचारी प्रत्यक्ष फिल्डवर आहेत की नाही, याचीही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना नसते. या सर्व प्रश्नांवर वन विभागाने ‘स्मार्ट’ तोडगा काढला आहे. त्यानुसार फिल्डवर काम करणाऱ्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या स्मार्टफोनमध्ये एक अत्याधुनिक सॉफ्टवेअर देण्यात आले आहे. जीपीएस यंत्रणेवर आधारित हे सॉफ्टवेअर या कर्मचाऱ्यांना अपडेट ठेवणार आहे. नॅशनल इन्फर्मेटिक्स सेंटरच्या माध्यमातून हे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आल्याची माहिती वन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांनी ‘मटा’शी बोलताना दिली. अभयारण्य किंवा जंगलामधील अतिक्रमण, शिकार, वणवा, वृक्षलागवड किंवा वृक्षतोड निदर्शनास आल्यानंतर वनरक्षक तेथील फोटो काढून तो या सॉफ्टवेअरमध्ये टाकू शकेल. त्यामुळे संबंधित घटनेचे निश्चित ठिकाण (अक्षांश आणि रेखांशांद्वारे) समजू शकेल. हा फोटो किंवा ही माहिती वन विभागाच्या कार्यालयापासून ते थेट मंत्रालयापर्यंत सॉफ्टवेअरद्वारे सहज पाहता येऊ शकेल. तसेच, वनरक्षक या सॉफ्टवेअरद्वारे प्रथमिक माहिती अहवालही (एफआयआर) विभागाला देऊ शकणार आहेत. जीपीएस यंत्रणा आणि नव्या सॉफ्टवेअरच्या मदतीने वन विभागाच्या कार्यालयातील अधिकारीही थेट फिल्डशी कनेक्ट होतील. यामुळे वनरक्षकांचे सध्याचे ठिकाण, तेथील सद्यस्थिती क्षणार्धात समजेल. यामुळे वन विभागाच्या कामकाजात अधिक पारदर्शकपणा येईल.संवेदनशील किंवा अतिसंवेदनशील भागातील वनरक्षकांना प्रथम हे सॉफ्टवेअर दिले जात आहे. नाशिक जिल्ह्यातही पेठ, बारे, उंबरठाण या भागातील १२५ वनरक्षकांच्या स्मार्टफोनमध्ये हे सॉफ्टवेअर दिले जाणार असल्याची माहिती माहिती नाशिकचे मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील यांनी दिली आहे. येत्या मार्चअखेरीपर्यंत अधिकाधिक वन कर्मचाऱ्यांना ते देण्याचा प्रयत्न असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.

March 16, 2014 in महाराष्ट्र

पाकिस्तानात हिंदू मंदिरावर हल्ला

इस्लामाबाद -पाकिस्तानात अल्पसंख्याक हिंदूंवर अधूनमधून होणारे हल्ले सुरूच असून शनिवारी रात्री सिंध प्रांतातील लरकाना परिसरातील एका मंदिरावर कट्टरपंथी मुस्लिमांनी हल्ला चढवला. संतप्त जमावाने मंदिराची धर्मशाळा जाळून टाकली. या घटनेमुळे लरकानामध्ये प्रचंड तणाव पसरला असून येथील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
‘कराची पोस्ट’ या पाकिस्तानी वृत्तपत्राने केलेल्या ट्वीटनुसार, शनिवारी रात्री काही संतप्त लोकांनी हिंदू समाजाच्या घरांना घेराव घातला. या लोकांनी हिंदूंच्या मालमत्तेवर हल्ले केले आणि जवळच असलेल्या मंदिराची धर्मशाळा जाळून टाकली. मनोरुग्ण असलेल्या एका हिंदू तरुणाने कुराणाची पाने जाळल्याचा आरोप करत हे हल्ले करण्यात आल्याचे सांगितले जाते.या हिंसाचाराची माहिती मिळताच पाकिस्तानी पोलीस व रेंजर्स घटनास्थळी धावले. पोलिसांनी अश्रूधूर सोडून व हवेत गोळीबार करून जमावाला पांगवले. परिस्थिती चिघळू नये म्हणून या भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सिंध प्रांताचे गव्हर्नर इशरतुल खान यांनी शांततेचे आवाहन केले असून मंदिरावर हल्ले करणाऱ्यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानी तरुण व सुजाण नागरिकांनी ट्विटरवरून या हल्ल्याचा निषेध केला आहे. अन्य धर्मीयांच्या धार्मिक स्थळांवर हल्ले करणे हे इस्लामविरोधी असल्याचे ट्वीट बहुतांश तरुणांनी केले आहे. हल्लेखोरांना अटक करण्याची मागणीह होत आहे.

March 16, 2014 in देश-विदेश

ठाण्यात इमारतीला आग, दोघांचा मृत्यू

ठाणे – समतानगर भागातील सुंदरबन पार्कमधील गुलमोहर सोसायटीच्या नवव्या मजल्यावर लागलेल्या आगीत होरपळून एका वृध्द दांम्पत्याचा मृत्यू झाला असून, दोन जण जखमी झाले आहेत.
सकाळी सहाच्या सुमारास नवव्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये ही आग भडकली. वेगाने ही आग अन्य मजल्यांपर्यंत पसरली. अग्निशमन दलाने आता आगीवर नियंत्रण मिळवले असून, इमारतीत अडकलेल्या नागरिकांची सुखरु सुटका केली आहे. अजूनही घटनास्थळी मदतकार्य सुरु आहे.अग्निशमन दलाच्या बारा गाडयांनी मिळून आगीवर नियंत्रण मिळवले. ठाणे महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीराव चौगुले (८४), निर्मला चौगुले (७८) या दांम्पत्याचा आगीत होरपळून मृत्यू झाला. विक्रमादित्य सावे (५५) आणि त्यांची पत्नी रंजना सावे (५५) जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

March 16, 2014 in महाराष्ट्र
वाराणासीत नरेंद्र मोदी विरुध्द केजरीवाल 0

वाराणासीत नरेंद्र मोदी विरुध्द केजरीवाल

downloadnaren
नवी दिल्ली – दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल वाराणासीतून नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे.
नरेंद्र मोदी वाराणासीमधुन निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अरविंद केजरीवालही तेथूनच निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. रविवारी संध्याकाळी बंगळुरुमध्ये होणा-या आपच्या सभेमध्ये अरविंद केजरीवाल यासंबंधी आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.अनेक जण मला मोदींविरोधात निवडणूक लढवणार का ? म्हणून विचारत आहेत. मी आज संध्याकाळी सभेमध्ये यावर बोलेन असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

March 16, 2014 in देश-विदेश
केंद्रात पुन्हा युपीए सरकार- राहुल गांधी 0

केंद्रात पुन्हा युपीए सरकार- राहुल गांधी

22rahul-gandhi11
नवी दिल्ली-  लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा विजय होईल आणि केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार येईल असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला.
सध्या विविध जाहीर होणारे ओपिनियन पोल म्हणजे एक मोठा विनोद असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला २००९ लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या २०६पेक्षा अधिक जागा मिळतील. याआधीही २००४ आणि २००९मध्ये ओपीनीनय पोलमध्ये काँग्रेसचा पराभव होईल असे सांगण्यात येत होते. मात्र पत्यक्षात काँग्रेसने चांगली कामगिरी केल्याची आठवण काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी करुन दिली.या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसपासून डीएमके आणि तृणमूल काँग्रेस पक्ष वेगळे झाले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस, आरजेडी, जेएमएम, आरएलडी आणि नॅशनल कॉन्फरन्स या काँग्रेस पक्षाची आघाडी असल्याचे राहुल यांनी सांगितले.जर पुन्हा तृणमूल अथवा डेएमके सोबत आघाडी करावी लागली तर आम्ही नक्की त्याच्यासोबत आघाडी करु असेही ते म्हणाले. काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि राजकीय विचारांशी जवळीक असणा-या पक्षांना आम्ही सोबत घेऊ.

पाणी

हा घनघोर इतिहास नाही पाण्याचा : माणसांचाही
माणूस का शिकत नाही पाण्याचा इतिहास
यांना कुणी तरी शिकवारे पाण्याचा इतिहास
इतिहास विसरतो त्याला घडवता येत नाही इतिहास
कुणी तरी लिहा रे पाण्याचा इतिहास
पाण्याला खेळू द्या रं मोकळ
पाण्याचा खेळ करणारे बंद करा वाटर किंग्डम पार्क
का गाजावताय स्वामित्व पाण्यावर
का केल पाणी बाटलीत बंद
का चाललाय पाण्याचा धंदा
कुणी उभे केले हे पाणी सम्राट
पाण्याचा पैसा
पैश्याच पाणी
पाण्यासारख्या पैश्यावर उद्या हे विकत घेतील
विहिरी, तलाव, नद्या सागर
पाणी रे पाणी तेरा कितना पैसा
पैसेवाला पाणी पिणार
बिनपैसेवाला तडफडून मरणार
पाण्याचे आटताहेत साठे जगभर
पाण्याला शोधले जातील पर्याय
पाण्याला पर्याय असते पाणी निष्कर्ष आल्यावर
अंतराळातून शोध घेतला जाईल पाण्याचा
बिनपाण्याचा देश करेल स्वारी पाण्याच्या देशावर
वाहतील रक्ताचे पाट पाण्यासारखे
जो जिता वही सिकंदर
आपल्या लोकांना वाचवण्यासाठी
एक एक देश करीत राहतील पादाक्रांत
त्यातून येईल तिसरे चौथे पाचवे महायुद्ध
ते टाळायला हवा असेल एक बुद्ध

मोतीराम कटारे
( पाणी या दीर्घ कवितेतील अंश )
लोकहो तुम्हीच आहात गुन्हेगार ‘ या कवितासंग्रहातून