
सौंदर्य प्रसाधनांचे अनेक दुष्परिणाम आता पुढे यायला लागले आहे. या सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापरली जाणारी काही रसायने चक्क कर्करोगाला निमंत्रण देणारी असतात हे कळल्यापासून तर शास्त्रज्ञांनी लोकांना सौंदर्य प्रसाधनांच्या बाबतीत अतिशय सावध राहण्याचा इशारा द्यायला सुरुवात केली आहे. अमेरिकेतल्या कॅलिङ्गोर्निया विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी या संबंधात लिपस्टीकवर काही संशोधन केले तेव्हा असे आढळले की, लिपस्टीकमध्ये वापरल्या जाणार्या काही द्रव्यांमुळे हृदयविकार जडू शकतो किंवा स्नानू शैथिल्याचा विकार होऊ शकतो. लिपस्टीक मध्ये वापरले जाणारे हे द्रव्य हॅन्डवॉश आणि त्याच कामासाठी वापरल्या जाणार्या काही साबणांमध्येही वापरले जात असते. हे द्रव्य म्हणजे ट्रायक्लोसान. ट्रायक्लोसानमुळे हृदयाच्या स्नायूंवर गंभीर परिणाम होऊ शकतो. हे सिद्ध करण्यासाठी या शास्त्रज्ञांनी केवळ ट्रायक्लोसानचा हृदयावर काय परिणाम होऊ शकतो याची चाचणी घेतली तेव्हा असे आढळले की, हृदय या द्रव्याच्या संपर्कात केवळ २० मिनिटे आले तरी हृदयाच्या कार्यकलापावर २५ टक्के परिणाम होतो. म्हणजे लिपस्टीक आणि हॅन्डवॉशमध्ये वापरले जाणारे हे द्रव्य किती धोकादायक आहे हे यावरून लक्षात येते. त्या परिणामांचा हा सज्जड पुरावाच आहे. असे असले तरी या संशोधनाच्या आणि निष्कर्षाच्या बाबतीत सौंदर्य प्रसाधनांची इंडस्ट्री सावध झालेली आहे.
अमेरिकेत सौंदर्य प्रसाधनांमध्ये लिपस्टीकचा वापर मोठा आहे आणि त्यातल्या या द्रव्याच्या संदर्भात अशा प्रकारचे निष्कर्ष जाहीर झाले तर लिपस्टीकच्या विक्रीवर मोठा गंभीर परिणाम होईल अशी भीती या उद्योगातल्या जाणकारांना वाटायला लागली आहे. म्हणून या उद्योगात काम करणार्या काही संशोधकांनी ट्रायक्लोसानच्या संबंधातील या संशोधनाला आक्षेप घेतला आहे. कॅलिङ्गोर्निया विद्यापीठा तील शास्त्रज्ञांनी हे निष्कर्ष काढताना दोन चुका केल्या आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. पहिली गोष्ट म्हणजे ट्रायक्लोसानचा हृदयाच्या स्नायूंवर होणारा परिणाम पडताळून पाहण्यासाठी विद्यापीठातल्या संशोधकांनी उंदरांचा वापर केला आहे. म्हणजे हा प्रयोग उंदरांवर केला आहे. तो करताना ट्रायक्लोसान ची मात्रा जास्त वापरली आहे. प्रत्यक्षात लिपस्टीकमध्ये ट्रायक्लोसान त्यापेक्षा कमी प्रमाणात वापरले जात असते आणि विशेष म्हणजे ही लिपस्टीक ओठाला लावली जात असते. तिचा हृदयाशी काही संबंध येत नाही.
ओठापासून हृदय खूप लांब असते. तेव्हा ट्रायक्लोसानच्या हृदयावर होणार्या परिणामां बाबतचे हे निष्कर्ष अतिशयोक्तीपूर्ण आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु विद्यापीठातल्या शास्त्रज्ञांना हा आक्षेप मंजूर नाहीत. उंदरांवर प्रयोग करताना मात्रा जास्त वापरली आहे परंतु निष्कर्ष लवकर हाती यावेत म्हणून ती जास्त वापरली आहे. प्रत्यक्षात लिपस्टीकमध्ये ती कमी असते ही गोष्ट खरी, परंतु एकदा ओठाला लिपस्टीक ङ्गासली की, तिचा परिणाम केवळ २० मिनिटे नव्हे तर २४ तास रहात असतो आणि तो कमी असला तरी अधिक काळ होत असतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ओठाला लावलेल्या लिपस्टीकचा हृदयाशी काही संबंध नाही हे म्हणणे चूक आहे. ओठाला लावलेली लिपस्टीक केवळ हृदयापर्यंतच नव्हे तर तिथून झिरपत झिरपत शरीराच्या सगळ्याच अवयवापर्यंत जात असते. म्हणजे ती हृदयाला तर त्रासदायक ठरतेच, तर शरीराच्या इतर अवयवांच्या स्नायूंनाही शिथिलता आणत असते.
Archive for March 18th, 2014
0
लिपस्टीकचा परिणाम हृदयावर
0
वैद्यकीय व्यवसायावरही इंटरनेटचे अतिक्रमण

सध्याच्या जगात इंटरनेटशिवाय जगणे अशक्य बनले आहे. सध्याच्या जगातील प्रत्येक व्यक्ती इंटरनेटवर अवलंबून आहे. घरबसल्या सर्व कामे इंटरनेटवरून सहजशक्य होतात. त्यामुळे मोबाइल रिचार्ज, रेल्वेची व विमानाची तिकिटे, ई-कॉमर्स आदी सर्व व्यवहार इंटरनेटवर सहजगत्या करतात येतात. तसेच जगातील विविध विषयांची माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्यामुळे क्लिक करताच माहितीचा धबधबा कोसळतो. यामुळे व्यक्तीचे जीवन अत्यंत सोपे झाले आहे. वैद्यकीय व्यवसायावरही इंटरनेटचे अतिक्रमण होण्याची शक्यता आहे.
सध्या रुग्ण किंवा सर्वसामान्य व्यक्ती आपल्याला झालेल्या आजाराची माहिती पहिल्यांदा इंटरनेटवर घेतात. त्यानंतर ते डॉक्टरकडे जातात. त्यामुळे येत्या काही वर्षात इंटरनेट डॉक्टरची जागा घेण्याची शक्यता आहे. कारण आजारी असलेले बहुतांश लोक आपल्याला होणारा त्रास अन्य नेटिझन्सशी शेअर करीत आहेत. तसेच या नेटिझन्सकडून आजारावर विविध सल्ले मागत असल्याचे आढळले आहे. गेल्या दशकात इंटरनेटचा वापर आरोग्यविषयक कामासाठी अधिक होऊ लागला. २००१ ते २०१३ या काळातील रुग्णांच्या मुलाखती घेण्यात आल्या. २००० पूर्वी बहुतांश व्यक्ती आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी ऑनलाइन माहिती घेत असत. मात्र त्यानंतर ते अन्य रुग्णांशी आपल्या आजाराविषयी चर्चा करून उपचाराची दिशा ठरवू लागले, असे ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक स्यू झिआब्लँड यांनी सांगितले.
रुग्णांना केवळ माहिती ऐवजी आता वास्तविक सल्ल्याची आणि आधाराची अधिक गरज आहे. दरवर्षी कोटयवधी जण ऑक्सफर्डच्या www.healthtalkonline.org या वेबसाइटला भेट देतात. तेथे अन्य रुग्णांकडून ते आपल्या आजाराविषयी माहिती घेतात. चित्रपट, अॅनिमेशन, ध्वनी, चित्र, व्यक्तिगत अनुभव यांच्या माध्यमातून रुग्णांना त्याच्या आजाराची माहिती रंजकपणे मिळू शकते. यामुळे रुग्णांना आपल्या आजारावर उपचार करण्याची मानसिकता तयार होते. तसेच डॉक्टरला उपचारात मदत करू शकतात.इंटरनेटचा वाढता वापर लक्षात घेऊन डॉक्टरही रुग्णांसाठी उपयुक्त वेबसाइट पाहण्याची शिफारस करत आहेत. मात्र इंटरनेटवरून माहिती घेऊन डॉक्टरशी चर्चा केल्याचे दुष्परिणाम डॉक्टर व रुग्ण संबंधावर होऊ शकतात, अशी भीतीही रुग्णांच्या मनात असते.जनरल प्रॅक्टिशनर आणि परिचारिका हे रुग्णांना इंटरनेटचा वापर करायला सांगतात. तसेच त्यांच्या रुग्णांना आपल्या आजाराविषयी अन्य रुग्णांशी चर्चा करायचा सल्ला देतात, असे झिआब्लॅँड यांनी सांगितले.
0
बेपत्ता विमानाचा तालिबानी भागातून प्रवास

क्वालालंपूर- दहा दिवसांपूर्वी बेपत्ता मलेशियन एअरलाइन्सच्या विमानाचे गूढ अजूनही कायम आहे. या विमानाने बेपत्ता झाल्यानंतर तालिबानी भागातून प्रवास केल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यासाठी हे विमान अवघ्या पाच हजार फूट उंचीवरून उडवण्यात येत होते. दरम्यान, विमानातील संदेशवहन यंत्रणा बंद झाल्यानंतर या विमानाच्या सहवैमानिकाने अखेरचा संदेश पाठवल्याचा पुरावा सापडला आहे.
या बेपत्ता विमानाचा शोध २६ देशांच्या शोध पथकांद्वारे घेतला जात आहे. तरीही या विमानाचा थांगपत्ता लागलेला नाही. या विमानाच्या कॉकपिटमधून सहवैमानिकाने अखेरचा संदेश पाठवल्यानंतर या विमानाची स्वयंचलित प्रणाली कार्यरत करण्यात आली, असे एअरलाइन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी जोहरी याह्या यांनी सांगितले.या विमानाचे वैमानिक कॅप्टन जहारी अहमद शहा आणि प्रथम अधिकारी फारिक अब्दुल हमीद यांच्यावर संशय असून त्यादृष्टीने तपास सुरू झाला आहे. सहवैमानिकाच्या अखेरच्या संभाषणानंतर १२ मिनिटांनी विमानाच्या संदेशवहन यंत्रणेने शेवटचा संदेश पाठवला. या विमानाच्या प्रमुख वैमानिकाच्या अत्याधुनिक फ्लाइट सिम्युलेटरची तपासणी सुरू केली आहे. विमानाची संदेशवहन यंत्रणा बंद करण्याचे काम केवळ अत्यंत प्रशिक्षित वैमानिकच करू शकतो. त्यामुळेच हे विमान रडारवर दिसू शकले नाही, असे मलेशियाच्या अधिका-यांनी सांगितले.
0
अनामत रक्कम वाढवूनही, उमेदवार संख्या घटेना

नवी दिल्ली– निवडून येण्याची शक्यता नसलेल्या उमेदवारांनी लोकसभा निवडणूक लढवू नये, यासाठी निवडणूक आयोगाने उमेदवारांची अनामत रक्कम पाचेश रुपयांवरुन पंचवीस हजार रुपये केली. मात्र रक्कम वाढवूनही उमेदवारांची संख्या कमी झालेली नाही. उलट वाढत्या अनामत रक्कमेबरोबर उमेदवारांची संख्याही वाढत चालली आहे.
१९९८ मध्ये ४,७५० उमेदवारांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. २००९ मध्ये हेच प्रमाण ७,५१४ होते. महत्वाचे म्हणजे ८५ टक्के उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त होते. सर्वाधिक ८० खासदार असलेल्या उत्तरप्रदेशमध्ये एकहजारहून अधिक उमेदवार निवडणूक लढवतात. त्याखालोखाल मध्यप्रदेश बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांचा क्रमांक लागतो.
२००९ मध्ये महाराष्ट्रातून ८१९ उमेदवार लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात होते. प्रत्येक लोकसभा मतदारसंघामागे उमेदवारांचे सरासरी प्रमाण १७ होते. देशातील सर्व लोकसभा मतदारसंघात उमेदवारांचे राष्ट्रीय सरासरी प्रमाण १४ आहे. मात्र तामिळनाडूमध्ये हेच प्रमाण जास्त आहे. ३९ खासदार असलेल्या तामिळनाडूमध्ये २००९ मध्ये प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून २१ उमेदवार रिंगणात होते. २०१४ मध्ये आप सारख्या पक्षांमुळे ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. जाती-धर्माच्या आधारावर मते खाऊन एखाद्या उमेदवाराचा विजयाचा मार्ग सुकर करण्यासाठी अनेक जण निवडणूक रिंगणात उतरतात. प्रसिध्दीसाठी इच्छुक असणा-यांसाठी २५ हजार ही आता जास्त रक्कम राहिलेली नाही असे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एन.गोपालस्वामी यांनी सांगितले.
0
‘संदूक’मधून सुमीत राघवनचं मराठी चित्रपटांत पदार्पण

मराठी चित्रपटांनी गेल्या काही वर्षांत उमटवलेला ठसा तसेच बॅाक्स आॅफिसवर मिळवलेले घवघवीत यश त्यामुळे हिंदीतले अनेक मराठी चेहरे मराठी चित्रपटांकडे वळले आहेत. गेली काही वर्षे हिंदीत रमलेला सुमीत राघवनही आता मराठी चित्रपटांत पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. ‘ओरँजेन एंटरटेनमेंट’चे विशू गायकवाड आणि मंदार केणी यांची निर्मिती असलेल्या ‘संदूक’मधून सुमीत मराठी चित्रपटांत प्रथमच नायकाच्या भूमिकेत झळकणार असून आजवर अनेक यशस्वी मराठी चित्रपटांचा अनुभव गाठीशी असलेला अतुल काळे याचे दिग्दर्शन या चित्रपटाला लाभणार आहे.
१९४०च्या दशकातील गोष्ट मांडणारा ‘संदूक’ विनोदी चित्रपट आहे. मराठी रंगभूमीवरून पदार्पण केलेला आणि नंतर हिंदीत आपला ठसा उमटवणारा सुमीत राघवन ‘संदूक’मधून प्रथमच मराठीत नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. एप्रिल महिन्यात या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून सुमीतला शरद पोंक्षे, अरुण नलावडे यांसारख्या कसदार अभिनेत्यांची भक्कम साथ लाभणार आहे. ‘मातीच्या चुली’, ‘दे धक्का’, ‘शहाणपण देगा देवा’, ‘तिचा बाप त्याच बाप’ आणि ‘असा मी अशी ती’ यांसारख्या यशस्वी चित्रपटानंतर ‘संदूक’मधून प्रथमच गतकाळ उभा करणारा दिग्दर्शक अतुल काळे म्हणतो, “‘संदूक’ हे माझं ब-याच वर्षांपासूनचं स्वप्न आहे. शक्य असतं तर माझा पहिला चित्रपट म्हणून ‘संदूक’च बनवणं मला आवडलं असतं. माझं हे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी १२ वर्षं लागली आहेत. त्यामुळे मी अर्थातच आनंदी आहे आणि आघाडीचे कलाकार आणि तंत्रज्ञांची साथ या स्वप्नाला लाभणं हा माझ्यासाठी दुग्धशर्करा योग आहे. सुमीतशी माझी गेल्या दोन दशकांहून अधिक काळ मैत्री असून ‘संदूक’साठी अन्य कोणत्याच नावाचा विचार करणं मला अशक्य होतं.” यासंदर्भात सुमीत म्हणतो, “‘संदूक’ माझ्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण आहे. एकतर हा माझा पहिला मराठी चित्रपट आहे. दुसरं म्हणजे माझा बालपणापासूनचा मित्र अतुल काळे याच्या दिग्दर्शनात मला काम करायला मिळणार आहे. आणि हा खूप भव्य, महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. माझ्या समविचारी सहका-यांसोबत लवकरात लवकर चित्रीकरण सुरू करण्यासाठी मी उत्सुक आहे. इतक्या वर्षांची प्रतीक्षा फळाला आली, असं मी म्हणेन.” विशू गायकवाड म्हणाले, “३ फेब्रुवारी २०१२ रोजी प्रदर्शित झालेल्या येड्यांची जत्रा या आमच्या पहिल्या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिल्यानंतर आमची ‘ओरँजेन एंटरटेनमेंट’ ही कंपनी चांगल्या संहितेच्या शोधात होती. गेली दोन वर्षे आम्ही शोधात होतो, पण आता ‘संदूक’ ज्या प्रकारे आकाराला येतोय, ते पाहाता प्रेक्षकांना हाही चित्रपट आवडेल, याची आम्हाला खात्री आहे. ‘संदूक’मध्ये सकस आशय आहे, विनोदाचा शिडकावा आहे, अॅक्शन आहे, पण याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ही गोष्ट १९४०च्या दशकातील आहे. ‘संदूक’ची सर्वांनाच भुरळ पडेल, असा आम्हाला विश्वास आहे.” ‘संदूक’ची पटकथा अतुल काळे, आशिष रायकर आणि सुबोध खानोलकर यांनी लिहिली असून हृषिकेश जोशी याचे संवाद आहेत. छायालेखनाची जबाबदारी अजित रेड्डी पार पाडणार असून कला दिग्दर्शन महेश कुडाळकर यांचे असेल. गुरू ठाकूरच्या गाण्यांना अजित-समीर ही संगीतकार जोडी संगीतबद्ध करणार असून वेशभूषा महेश शेर्ला यांची, तर अॅक्शन संकल्पना प्रद्युम्नकुमार यांची असणार आहे.
अतुल कुलकर्णीची पुणे ते गोवादरम्यान ‘हॅप्पी जर्नी
अतुल कुलकर्णी हा परिपूर्णतेसाठी ओळखला जाणारा कलाकार आहे. प्रत्येक चित्रपटातील आपल्या भूमिकेला योग्य तो न्याय देण्यासाठी आणि त्या भूमिकेत पूर्णपणे उतरण्यासाठी तो जीवाचे रान करतो. त्याच्या या झपाटलेपणालाही एक सूत्र आहे आणि आपल्या या कलेत सर्वोत्तम उतरवण्यासाठी आवश्यक समर्पणही आहे. ‘हॅप्पी जर्नी’ या नवीन चित्रपटातील त्याच्या नव्या भूमिकेतही हीच बाब नव्याने समोर आली आहे. ‘हॅपी जर्नी’ची निर्मिती एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटने केली असून त्याचे सध्या चित्रीकरण सुरू आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण पुणे, गोवा, वेल्हे आणि मांणगाव अशा विविध ठिकाणी केले जात आहे. या नव्या चित्रपटासाठी एक विशेष गाडी(हाऊस ऑन व्हिल्स) तयार केली गेली आहे. इमरान यांनी एका टेम्पो ट्रॅव्हलरचे रूपांतर अत्यंत कौशल्याने एका ‘काफिल्या’मध्ये केले आहे. इमरान यांनी प्रख्यात कार डिझायनर दिलीप छाब्रीया यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम केले आहे. अतुल कुलकर्णीला काही ही गाडी चालवता येत नव्हती. पण चित्रपटात मात्र त्याला ही गाडी मोठ्या प्रमाणावर चालवायची होती. आपल्या अभिनयात सहजता यावी आणि कोणत्याही अडचणीत गाडी चालवता यावी, यासाठी अतुलने गाडीचे प्रशिक्षण घेतले. केवळ प्रशिक्षण घेऊनच तो थांबला नाही तर ती आरामात चालवता यावी, म्हणून अतुलने पुणे ते गोव्यादरम्यान या गाडीतून अनेक फे-याही मारल्या. रस्त्यात काही ठिकाणी थांबून त्याने भरपूर सराव केला. अतुलने आपल्या भूमिकेसाठी मेहनत घेतली. आजच्या कलाकारांमध्ये अत्यंत अभावाने आढळणारा असा हा गुण आहे. दिग्दर्शकाने या चित्रपटातील गादी चालवण्याच्या दृश्यांच्या चित्रीकरणाला गोवा येथे सुरूवात करेपर्यंत अतुल ही गाडी चालविण्यामध्ये वाकबगार झाला होता. चित्रपटाशी संबंधीत सर्वच तंत्रज्ञांसाठी हा एक आश्चर्याचा सुखद असा धक्का होता. प्रिया बापट आणि पल्लवी सुभाष या सहकलाकारांबरोबरचे चित्रीकरण त्यामुळे अधिक सुलभ झाले. हा चित्रपट सप्टेंबर २०१४ मध्ये प्रदर्शित होत आहे.









