पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for March 15th, 2014

शिक्षकाची प्रेयसीच्या घरी आत्महत्या

झरी जामणी (यवतमाळ) – धानोरा येथील विवाहीत शिक्षकाने प्रेयसीच्या घरी आत्महत्या केल्याची घटना आज शनिवारी सकाळी ७.३० वाजता उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पाटण पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रेयसीविरुद्घ गुन्हा दाखल केला.
गंगाराम आनंद बरपटवार (५०) रा. धानोरा असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव असून तो जिल्हा परिषद शाळा खडकडोह येथे कार्यरत होता. झरी येथील एका विधवा महिला कोडपाखिंडी येथे शिक्षीका म्हणून कार्यरत असताना त्याची ओळख झाली होती. काही दिवसाने त्याच्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्याने बरबटवार हे गत १७ वर्षापासून महिलेच्या घरी राहत होता. अशातच काही दिवसापासून त्याच्यात भांडण-तंटे सुरु होते. दोन दिवसापूर्वी त्या दोघांचे कडाक्याचे भांडण झाले. यावेळी महिला या शिक्षकाला अपमानास्पद व अर्वाच्य भाषेत बोलली होती. त्यामुळे वाईट परिणाम होऊन बरपटवार याने प्रेयसिच्या घरीच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही बाब निदर्शनास येताच प्रेयसीने शिक्षकाच्या मुलाला भ्रमणध्वनीवरून ही माहिती दिली. कुटुंबीय व नातेवाईकांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह थेट पाटण पोलिस ठाण्यात नेऊन आरोपीच्या अटकेची मागणी केली. अन्यथा अत्यसंस्कार करणार नाही असा पवित्रा घेतला. यावेळी पाटणचे ठाणेदार मसराम, मुकुटबनचे ठाणेदार असलम खान यांनी नातेवाईकांची समजुत काढली. याप्रकरणी प्रतीक गंगाराम बरपटवार याने पाटण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यामध्ये सदर महिलेच्या तक्रारीवरून बरपटवार याने आत्मत्या केल्याचे नमुद केले होते. त्यावरून पोलिसांनी प्रयेसिविरुद्घ आत्महत्येस प्रवृत्त गुन्हा दाखल केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून अधिक तपास ठाणेदार मसराम करीत आहे.

लाकडे तोडण्याची वेळ आता गेली ! 0

लाकडे तोडण्याची वेळ आता गेली !

20140315_134957
यवतमाळ – भारतीय संस्कृतीत होळीला अनन्यसाधारण महत्त्व असून त्या दिवशी वाईट प्रवृत्तींचे दहन करण्यासाठी होळी पेटवली जाते. मात्र सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड करून होळी साजरी केली जाते. पर्यावरण बचावासाठी प्रयत्न सुरू असतानाच होळीसाठी झाडांची सर्रासपणे कत्तल केली जाते. यावर्षी होळीच्या दिवशी वृक्षतोड थांबवावी म्हणून वनविभागाने जनजागृती सुरु केली आहे. लाकडे तोडण्याची वेळ आता गेली असून वृक्ष पुजन करण्याची वेळ आली असे फलक शहरात लावले आहे.
होळीसाठी झाडे तोडण्याऐवजी केरकचरा व अन्य टाकाऊ पदार्थांची होळी करावी असे आवाहन पर्यावरण प्रेमी करित आहेत. होळीच्या निमित्ताने पर्यावरणाची माहिती देण्याचे काम स्वयंसेवकांनी करावे तसेच दुर्गुणांच्या पुतळाची प्रतिकात्मक होळी करून हा सण साजरा करावा, असेही सांगितले जात आहे. होळीच्या पर्वावर होणारी वृक्षतोड रोखण्यासाठी, लाकडांची होळी न करता वृक्षपूजन करून होळी साजरी करा असे आवाहन वनविभागाने केले आहे. लाकडे तोडण्याची वेळ आता गेली असून वृक्षपूजन करण्याची वेळ आली आहे असा संदेश देणारे फलक शहरातील शासकीय कार्यालयासह सार्वजनीक ठिकाणी वनविभागाने लावले आहे. वृक्ष वल्ली अम्हा सोयरी असा संदेश संत तुकारामांनी दिला. त्याच संदेशाला अनुसरुन आज ‘वृक्ष देवो भव’ हा नवा मंत्र आत्मसात करून सार्वांनी वाटचाल केल्यास निसर्ग संवर्धनास मोलाचा हातभार लागेल. होळी सणला वृक्षपुजन केल्यास आपल्या जगण्यासाठी प्राणवायु देणाºया वनाराईची कत्तल तर कमी होईलच शिवाय भावी पिढीलाही पर्यावरण संरक्षणाचा संदेश मिळेल. होळीच्या दिवशी लाकडांची होळी न करता सार्वजनिक ठिकाणावरील काडी कचरा गोळा करुन त्याची होळी करावी. तसेच होळीच्या दिवशी एक झाड लावावे, तसेच उन्हाळ््यात निर्माण होणारी पाणी टंचाई लक्षात घेऊन पाण्याचा अपव्यय टाळावा. असे आवाहन उपवनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा व दारव्ह्याचे वनपाल श्रीराम कडूकार यांनी केले.

लुटमार प्रकरणी पाच आरोपींना अटक

यवतमाळ – भांबराजा-हिवरी मार्गावर इंडीगो वाहन अडवून चालकाला चाकुच्या धाक दाखवून मारहाण केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली होती. याप्रकरणी ग्रामिण पोलिसांनी ४८ तासात पाच आरोपींना अटक केली.
प्रफुल भगवान येलम (२०), रुपेश नरेश तंटक (२१), आकाश इिलीप शेंडे (२१), मंगेश मारोतराव शिरभाते (२०), अविनाश उर्फ चिमणा वासुदेव अजमिरे (२२) सर्व रा. यवतमाळ अशी आरोपींची नावे आहे. दुर्गेश आनंद ठाकरे (४२) रा. शिवाजी नगर यवतमाळ हे १३ मार्च रोजी दुपारी इंडीगो कारने आर्णीवरून यवतमाळकडे येत होते. अशातच भांबराजा ते हिवरी रस्त्यात अचानक पाच जणांनी कार अडवून ठाकरेसह एकाला चाकुचा धाक दाखवून लाथा बुक्क्याने बेदम मारहाण केली. तसेच लुटण्याचा प्रयत्न करून सदर युवक दोन दुचाकीवरुन पसार झाले. यावेळी ठाकरे यांनी एका दुचाकीचा (एम.एच. २९ / एच. ४१८० )क्रमांक पाहिला होता. याप्रकरणी ठाकरे यांनी यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार देऊन सदर क्रमांक नमुद केला. त्यावरून पाचही आरोपीविरुद्घ भादंवि कलम १४७, १४९, ३४१, २९४, ५०६, ४२७, ३२३ अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे पत्रव्यवहार करुन दुचाकी कुणाच्या नावाने आहे याबाबत माहिती मांगतली. या कार्यालातून प्राप्त माहितीच्या आधारावरुन पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावुन पाचही आरोपींना अटक केली. ही कारवाई ग्रामीणचे ठाणेदार महिपालसिंग चांदा यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक जगदिश मंडलवार, जमा. भक्तराज बन्सोड, महेश फुनसे करीत आहे.

‘व्हॉट्सअॅप’वरील चॅटिंग धोकादायक 0

‘व्हॉट्सअॅप’वरील चॅटिंग धोकादायक

WhatsApp-300x300
सध्या तरुण पिढीवर सोशल मीडियाचा मोठा प्रभाव आहे. फेसबुकनंतर आलेले ‘व्हॉट्सअॅप’ तरुण-तरुणींमध्ये प्रसिद्ध झाले आहे. उठण्या-झोपण्यापासून सर्व जण आपली माहिती मित्र, मैत्रिणींना शेअर करत असतात. मात्र अँड्रॉइड फोनमधील ‘व्हॉट्सअॅप’ वापरणा-यांना थोडे सावध व्हावे लागणार आहे. कारण तुम्ही ‘व्हॉट्सअॅप’वर चॅटिंग करताना कोणीही तुमच्या चॅट अकाउंटमध्ये ‘लॉगइन’ करून तुमचे संभाषण पाहू शकणार आहे.
पोर्तुगाल येथील सुरक्षा सल्लागारांच्या मते, अँड्रॉइड फोनच्या एसडी कार्डवर ‘व्हॉट्सअॅप’ संदेश साठवले जातात. मात्र अँड्राइड फोनमध्ये विविध अॅप्सची माहिती शेअर केली जात असल्याने कोणतेही अॅप ती माहिती वाचू शकते, असे त्यांचे म्हणणे आहे. ‘व्हॉट्सअॅप’चा डेटाबेस एसडी कार्डवर केला जातो. अँड्रॉइड वापरणा-यांनी एसडी कार्ड वापरण्याची परवानगी दिल्यास ते अॅप्लिकेशन कोणीही वाचू शकतो, असे बास बोस्केर्ट यांनी ब्लॉगवर लिहिले आहे.
एखाद्याचा ‘व्हॉट्सअॅप’ डेटाबेस पाहायचा असल्यास तो साठवण्यासाठी जागेची गरज भासणार आहे. दुसरे म्हणजे तो डेटाबेस संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी अँड्रॉइड अॅप्लिकेशनची गरज लागणार आहे. प्ले स्टोर किंवा एपीके फाइलद्वारे एकदा अँड्रॉइड अॅप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर ते अॅप फोनला नेटवर्क आणि एसडी कार्ड वापरण्यासाठी परवानगी मागते.
बोस्केर्ट यांनी हॅक करण्यासाठी वेब सव्र्हर सेट केला आणि नंतर फोनमध्ये विशेष परवानगी मागणारे अँड्रॉइड अॅप्लिकेशन तयार केले. मात्र अँड्रॉइड फोनची ऑपरेटिंग सिस्टीम फोनमधील विविध विभाग वापरण्याची परवानगी त्या अॅप्लिकेशनला देतो. त्यामुळे अँड्रॉइडधारक कोणतीही माहिती अॅपद्वारे आरामात शेअर करू शकतात, असे त्यांनी सांगितले. ‘व्हॉट्सअॅप’ची जुनी आवृत्ती खूपच असुरक्षित होती. एकदा वेब सव्र्हरवर अपलोड केल्यानंतर या जुन्या ‘व्हॉट्सअॅप’मधील माहिती कोणीही वाचू शकत होते. तसेच ‘व्हॉट्सअॅप’च्या नवीन आवृत्तीतही संगणकीय प्रणालीचा उपयोग होऊ शकतो. खरे तर फेसबुकला ‘व्हॉट्सअॅप’ विकत घेण्याची काहीच गरज नव्हती, असे बोस्कर्ट यांनी गमतीने म्हटले आहे.

प्रतिभावंत कवी सुधीर मोघे यांचे निधन 0

प्रतिभावंत कवी सुधीर मोघे यांचे निधन

moghe
पुणे : प्रतिभावंत कवी आणि गीतकार सुधीर मोघे यांचे शनिवारी दीर्घ आजारपणाने निधन झाले.काही दिवसांपूर्वी त्यानी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती गंभीर होती. शनिवारी दुपारी अडीजच्या सुमारास मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
सहजसुंदर शब्दरचना करणारे कवी-गीतकार म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचे आत्मरंग, गाण्याची वही, पक्ष्यांचे ठसे, लय, शब्द धून, स्वतंत्रते भगवती असे कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत.त्यांनी पन्नासहून अधिक चित्रपटांसाठी गीतलेखन केले होते. तसेच त्यांनी अनेक गाण्यांना संगीतही दिले होते. दूरदर्शन व आकाशवाणीसाठी त्यांनी अनेक कार्यक्रम केले होते.

March 15, 2014 in मनोरंजन
केजरीवाल यांना न्यायलयाकडून दंड 0

केजरीवाल यांना न्यायलयाकडून दंड

download
नवी दिल्ली- सुनावणी दरम्यान न्यायालयात गैरहजर राहिल्याबद्दल दिल्लीतील न्यायालयाने आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदीया यांना दंड ठोठावला आहे.
काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांचे पुत्र अमित यांनी केजरीवाल आणि सिसोदीया यांच्यारविरोधात दिल्लीतील न्यायालयाने खटला दाखल केला होता. मात्र या खटल्याच्या सुनावणी दरम्यान गैरहजर राहिल्याबद्दल न्यायालयाने दोघांना प्रत्येकी दोन हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.

March 15, 2014 in देश-विदेश
दिल्ली सामूहिक बलात्कार- दोघांच्या फाशीला स्थगिती 0

दिल्ली सामूहिक बलात्कार- दोघांच्या फाशीला स्थगिती

index
नवी दिल्ली- दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारपैकी दोन आरोपींच्या फाशीच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायालयने या दोघांच्या फाशीला ३१ मार्चपर्यंत स्थगिती दिली आहे.
न्यायालयाने मुकेश आणि पवन गुप्ता या दोघांच्या फाशीला स्थगिती दिली आहे. १३ मार्च रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणातील चौघा आरोपींची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती.
१६ डिसेंबर २०१२ च्या रात्री दिल्लीतील एका धावत्या बसमध्ये सहा नराधमांनी मिळून निर्भयावर अत्यंत क्रूर पध्दतीने सामूहिक बलात्कार केला होता. यावेळी निर्भयासोबत असणा-या तिच्या मित्रालाही या सहाजणांनी बेदम मारहाण करुन त्या दोघांना रस्त्यावर फेकून दिले होते. गंभीर जखमी झालेल्या निर्भयाचा २९ डिसेंबर २०१२ रोजी सिंगापूरमधील माऊंट एलिझाबेथ रुग्णालय़ात उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता.या प्रकरणी सहापैकी एक अल्पवयीन आरोपी होता. त्याला तीनवर्षांची शिक्षा झाली. एकाने दिल्लीच्या तिहार तुरुंगात आत्महत्या केली. सप्टेंबर २०१३ मध्ये सत्र न्यायालयाने मुकेश (२६), आकाश ठाकूर (२८), पवन गुप्ता (१९), विनय शर्मा (२०) यांना फाशीची शिक्षा सुनावली होती.

March 15, 2014 in मुख्य पान
जॅक न लावता कंन्टेनरचे चाकाची चोरी 0

जॅक न लावता कंन्टेनरचे चाकाची चोरी

Exif_JPEG_420
लाडखेड (यवतमाळ) –  रात्रीच्यावेळी बसस्थानकासमोर उभ्या केलेल्या कंन्टेनरचे १५ चाके चोरट्यांनी चोरुन नेल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी रात्री एम.एच. ४०/ वाय ८४८० क्रामंकाचा कन्टेंनर येथील बसस्थानकासमोर उभा होता. अशातच रात्रीच्यावेळी चोरट्याने कंन्टेंनरला जॅक ऐंवजी दगडाचा वापर करून १५ चाके व  डिक्स (किंमत पाच लाख) चोरुन नेले.आज सकाळी ही बाब चालकाच्या निदर्शनास आली. घटनेची माहिती मिळताच लाडखेडचे ठाणेदार सतीश पाटील, पोलीस उपनिरीक्षक संतोष मनवर, गजानन शेजुलकर, नागोराव मेश्राम, अनील आडे, दिपक शेंडे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

सर्वसामान्यांच्या न्याय, हक्कासाठी ‘लोकशासन आंदोलन’ 0

सर्वसामान्यांच्या न्याय, हक्कासाठी ‘लोकशासन आंदोलन’

IMG_4786
यवतमाळ  –  जिल्ह्यातील बेघर, भूमिहीन, वैयक्तीक सहकारी जमिन मागणी अर्ज भरुन जिल्हा कार्यालयात देण्यासाठी १४ मार्च रोजी पोस्टल ग्राऊंड येथे लोकशासन आंदोलनाचे आयोजन केले होते. याबाबत परवानगी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. मात्र प्रशासनाने आंदोलनाची परवानगी नाकारल्याने न्या. कोळसे पाटील यांनी मोर्चा ऐंवजी सभेला परवानगी मिळविली. जिल्ह्यातील ग्रामीण भागातून अनेक  कष्टकरी, नागरिक, महिला सकाळपासून पोस्टल मैदानावर जमले होते. दुपारी २ वाजल्यानंतरही आंदोलनाचे अध्यक्ष न्या. कोळसे पाटील आले नव्हते त्यामुळे नागरिक भर उन्हात बसुन होते. त्यानंतर काही वेळातच सभेच्या ठिकाणी येताच नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी आंदोलनात राजकीय पक्ष व प्रशासनावर घाणाघात केला. यावेळी त्यानी दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा करुन त्याना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्ह्यातील महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भांबराजा-हिवरी मार्गावर वाटमारी

यवतमाळ –  आर्णी येथून येणारी कार अडवून चालकास  बेदम मारहाण करुन लुटण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी दुपारी ४.३० वाजता भांबराजा – हिवरी मार्गावर घडली. दुर्गेश आनंद ठाकरे (४२) रा. शिवाजी नगर यवतमाळ हे इंडीगो कारने आर्णीवरून यवतमाळकडे येत होते. अशातच भांबराजा ते हिवरी रस्त्यात अचानक पाच जणांनी कार अडवली. यावेळी ठाकरे याच्यासह एकाला चाकुचा धाक दाखवून लाथा बुक्क्याने बेदम मारहाण करुन लुटण्याचा प्रयत्न केला. ठाकरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून यवतमाळ ग्रामीण पोलिस पोलिसांनी आरोपीविरुद्घ भादंवि कलम १४७, १४९, ३४१, २९४, ५०६, ४२७, ३२३ अंतर्गत गुन्हा दाखल केला. अधिक तपास ठाणेदार महिपालसिंग चांदा यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक जगदिश मंडलवार करीत आहे.

यवतमाळात सात लाखाची घरफोडी 0

यवतमाळात सात लाखाची घरफोडी

IMG_4799
यवतमाळ – शहरातील टिळकवाडी येथील फोटो ग्राफरचे घर फोडून सात लाखाचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना गुरुवारी रात्री उजेडात आली. अश्विन आनंद वगारे रा. टिळकवाडी हे आपल्या कुटुंबीयासह कापड खरेदी करण्यासाठी गुरुवारी अमरावती येथे गेले होते. अशातच चोरट्याने घरफोडून कपाटातील सोन्याच्या पाटल्या, मंगळसूत्र, अंगठी, पोत, चांदीचे दागिने, नगदी १० हजार रुपये असा एकुण सात लाख ५०० रुपयाचा माल चोरुन नेला. रात्री १२.३० वाजताच्या सुमारास घरी परत आल्यानंतर ही घटना उजेडात आली. या घटनेची माहिती मिळताच यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिरी, वडगाव रोडचे ठाणेदार सुर्यकांत राऊत, डी.बी. पथकाने भेट देऊन पाहणी केली. तसेच श्वान पथक व अंगुली मुद्रा तज्ञांना पाचारण केले होते. याप्रकरणी वडगाव रोड पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्घ गुन्हा  दाखल केला.

‘ड’ जीवनसत्त्वामुळे कर्करोगावर करता येते मात

शरीराला जीवनसत्त्वे अत्यावश्यक आहेत. त्यामुळे रुग्णाची प्रकृती सुदृढ राहण्याबरोबरच विविध आजारांचा सामना करता येतो. कर्करोगावर मात करण्यासाठी ‘ड’ जीवनसत्त्व अत्यंत उपयुक्त ठरते. विशेषत: स्तनांचा कर्करोग झालेल्या रुग्णांना ‘ड’ जीवनसत्त्व दिल्यास त्यांना ते फायदेशीर ठरू शकते, असे नव्या संशोधनात आढळले आहे.
कॅलिफोर्निया विद्यापीठातील कुटुंब आणि प्रतिबंधात्मक औषधे विभागाचे प्राध्यापक सेड्रिक गारलॅँड यांनी या विषयावर व्यापक संशोधन केले. ज्या स्त्रियांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता असते त्यांना स्तनांचा कर्करोग होण्याचे प्रमाण अधिक असते. शरीरातील ‘हायड्रोक्सीव्हिटॅमिन डी’ हे जीवनसत्त्व शरीरात निर्माण होते. त्याचा आणि स्तनांच्या कर्करोगाचा जवळचा संबंध आहे.गारलॅँड आणि त्यांच्या सहका-यांनी ‘२५ ‘हायड्रोक्सीव्हिटॅमिन डी’ वर तब्बल नऊ वर्षे व्यापक संशोधन केले. यासाठी त्यांनी स्तनांचा कर्करोग झालेल्या ४४४३ महिलांचा अभ्यास केला. ‘ड’ जीवनसत्त्वातील घटकांमुळे कर्करोगाची वाढ पूर्णपणे थांबते. त्यामुळे ‘डी’ जीवनसत्त्व असणारे रुग्ण कर्करोगाचा सामना अधिक चांगल्या रीतीने करू शकतात. महिलांच्या रक्तात प्रति मिलीलिटर ३० नॅनोग्रॅम्स ‘हायड्रोक्सीव्हिटॅमिन डी’ आढळते. तर स्तनांचा कर्करोग असलेल्या महिला रुग्णांच्या रक्तात या जीवनसत्त्वाचे प्रमाण १७ नॅनोग्रॅम्स मिलीलिटर आढळते.स्तनांच्या कर्करोगावर पारंपरिक पद्धतीने उपचार केल्यास तो फायदेशीर ठरू शकतो. त्यासाठी ‘डी’ जीवनसत्त्वाचे प्रमाण वाढवणे गरजेचे आहे, असे मत यूसी डिएगोमधील असोसिएट प्राध्यापक हिथर हॉफिक यांनी व्यक्त केले.औषधांसोबतच ‘ड’ जीवनसत्त्वांचा डोस दिल्यास कर्करोगावर निश्चितपणे मात करता येते. हे संशोधन अँटी कॅन्सर जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे.

अमरावतीत सापडले ७६ लाख 0

अमरावतीत सापडले ७६ लाख

images
अमरावती- निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू असताना शहरात ७६ लाख रुपये रोख सापडल्याने महापालिकेच्या निवडणुकीची पुनरावृत्ती झाल्याचे दिसून येत आहे. अमरावती महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळीही असेच एक कोटी रुपये अमरावतीत एका वाहनातून जप्त करण्यात आलेले होते. तथापि, ही रक्कम कोणत्या उमेदवाराची, हीच चर्चा आज सर्वत्र होती. वृत्त लिहीपर्यंत या रकमेचा उद्देश व ती कुणासाठी अमरावतीत आली, याचा उलगडा होऊ शकला नाही. अर्जुननगर सीलिंग पॉइंटवर पोलिसांनी एका कारमधून ७५ लाख ६४ हजार ६०० रुपये एवढी रोख जप्त केली. चालकासह रक्कम घेऊन येणा-या तिघांना पोलिसांनी पकडले. हे तिघेही नागपूरचे आहेत. महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळी अशाच स्वरूपात एक कोटी रुपयांची रोख पोलिसांनी पकडलेली होती. त्या रकमेवर आजपर्यंत कोणीही दावा केलेला नसल्याने ही रक्कम आधी अनेक महिने ट्रेझरीत व त्यानंतर बँकेत पडून आहे.

March 15, 2014 in महाराष्ट्र
वादग्रस्त वक्तव्यावरुन केजरीवालांचे घुमजाव 0

वादग्रस्त वक्तव्यावरुन केजरीवालांचे घुमजाव

arvind-kejriwal-650_101812061901
नागपूर – भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासाठी प्रसारमाध्यमे विकली गेली आहेत या आपल्या वादग्रस्त विधानावरुन आपचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल यांनी घुमजाव केले आहे.
नरेंद्र मोदींच्या प्रचारासाठी प्रसारमाध्यमांनी पैसे घेतले आहेत. उद्या आपचे सरकार आले तर, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन, अशा विकाऊ पत्रकारांना तुरुंगात टाकू असे वादग्रस्त वक्तव्य केजरीवालांनी नागपूर येथील कार्यक्रमात केले होते. त्यांच्या या विधानावर काँग्रेस, भाजप आणि सीपीआयने जोरदार टीका केल्यानंतर त्यांनी आपल्या विधानावरुन घुमजाव केले. मी असे बोललोच नाही असे सांगत केजरीवालांनी पलटी मारली.गेल्या वर्षभरापासून प्रसारमाध्यमे नरेंद्र मोदींचा प्रचार करत आहेत. काही वृत्तवाहिन्यांचा तर, आता भ्रष्टाचार संपून रामराज्य येणार अशा पध्दतीने प्रचार सुरु आहे. वाहिन्या असे का दाखवत आहेत ? कारण त्यांना मोदींचा प्रचार करण्यासाठी पैसा देण्यात आला आहे. गेल्या दहावर्षात गुजरातमध्ये ८०० शेतक-यांनी आत्महत्या केल्या मात्र कुठल्याही वृत्तवाहिन्या या बातम्या दाखवत नाही. हा एक मोठा कट आहे उद्या आपचे सरकार आले तर अशा पत्रकारांना तुरुंगात टाकू असे वादग्रस्त विधान केजरीवालांनी या कार्यक्रमात केले होते.

March 15, 2014 in मुख्य पान
मुंबईत सात मजली इमारत कोसळली 0

मुंबईत सात मजली इमारत कोसळली

vakola-building-collapse
मुंबई – सांताक्रूझ पूर्वेला वाकोला यशवंतनगरमधील शंकरलोक ही सात मजली इमारत शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास कोसळली. या दुर्घटनेत सुधा श्रीधरन या ३२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले असून, त्यांना जवळच्या व्ही.एन.देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिस, अग्निशमन दल आणि पालिकेचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, मदतकार्य सुरु आहे. या इमारतीचा काही भाग शेजारच्या झोपडयांवरही कोसळला आहे. त्यामुळे जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ढिगा-याखाली अजून चार ते पाच जण अडकल्याची भिती आहे. रोहिणी जगताप(४७), अक्षय केसरकर(१८) आणि सीता केसरकर(६०) ही जखमी व्यक्तींची नावे आहेत.मुंबई महापालिकेने आधीच ही इमारत धोकादायक इमारत म्हणून जाहीर केल्याने या इमारतीतील बहुतांश कुटुंबांनी अन्यत्र स्थलांतर केले होते. फक्त दोन कुटुंबे या इमारतीत रहात होती. डिसुझा कुटुंब आणि एका वकिलाचे कुटुंब इमारतीच्या तळमजल्यावर आणि दुस-या मजल्यावर रहात होते.आतापर्यंत चार जणांना ढिगा-याखालून बाहेर काढले असून, अजून सहाजण आत अडकल्याची भिती आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात डॉकयार्ड रोड येथील मुंबई महापालिका कर्मचा-यांची इमारत कोसळली होती. या दुर्घटनेत ६१ रहिवाशांचा मृत्यू झाला होता. त्याआधीही मुंबई-ठाण्यामध्ये अनेक धोकादायक इमारती कोसळून निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

March 15, 2014 in मुख्य पान
माझी फसवणूक झाली – हजारे 0

माझी फसवणूक झाली – हजारे

Anna Hazare with Mamata Banerjee
नवी दिल्ली – ज्येष्ठ समासेवक अण्णा हजारे यांनी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचा पाठिंबा काढून घेत असल्याचे शुक्रवारी जाहीर केेले.
लोकसभा निवडणुकीसाठी आपण कोणत्याच पक्षाला पाठिंबा देणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हजारे यांनी देशातील सर्व राजकीय पक्षांना १७ मुद्दे पाठवले होते. सत्तेत आल्यानंतर आम्ही सांगितलेल्या १७ गोष्टींची अमलबजावणी करण्याचे आश्वासन बॅनर्जींनी दिले होते. तसेच देशात स्थिर सरकार यावे यासाठी बॅनर्जींना पाठिंबा द्यायचे ठरवले होते. मात्र फसवणूक होत असल्याचे दिसल्यामुळे अण्णांनी अखेर पाठिंबा मागे घेत असल्याचे शुक्रवारी जाहीर केले.जेव्हा मी सभेसाठी दिल्लीत पोहोचलो तेव्हा दुपारचे १२ वाजून गेले तरी दोन हजार ते अडीच हजार लोकच तेथे उपस्थित होते. माझेही आंदोलन याच रामलीला मैदानावर झाले. त्यावेळी मोठ्या प्रमाणातील जनसमुदायाने मला पाठिंबा दिला. मात्र बुधवारच्या सभेत चार हजार लोकही उपस्थित नव्हते. या सभेसाठी माझी दिशाभूल करण्यात आली. बॅनर्जी यांच्या सभेसाठी या असे निमंत्रण मला देण्यात आले तर ममता यांना अण्णा हजारे यांच्या सभेसाठी येण्यास सांगण्यात आले. ही तर संपू्र्णपणे फसवणूक आहे, असे अण्णा म्हणाले.

March 15, 2014 in मुख्य पान