पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for March 24th, 2014

इजिप्तमध्ये ५२९ मोर्सी समर्थकांना फाशी 0

इजिप्तमध्ये ५२९ मोर्सी समर्थकांना फाशी

download (1)
कैरो – इजिप्तचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांचे समर्थन करणा-या ५०० हून अधिक जणांना पोलिसांची हत्या तसेच इतर हिंसक घटनांप्रकरणी दोषी ठरवत न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. इजिप्तमधील मिन्या येथील न्यायालयाने हा निर्णय दिला. मोर्सी यांच्या एकूण ५२९ समर्थकांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
या सुनावणीदरम्या न्यायालयाने २६ जणांची सुटका केली आहे. शिक्षा सुनावण्यात आलेल्या सगळ्यांनाच पोलिसांनी गेल्या वर्षी ऑगस्ट २०१३ मध्ये अटक केली होती. मोर्सी यांची पुनर्नियुक्ती करण्यात यावी या मागणीसाठी समर्थकांनी दक्षिण इजिप्तमध्ये हिंसक आंदोलन सुरू केले होते. पोलिसांनी बळाचा वापर करुन हे आंदोलन मोडून काढत सगळ्यांना अटक केली होती.यावेळी पोलिसांनी १२०० मोर्सी समर्थकांविरुद्ध विविध आरोप ठेवून खटले दाखल करण्यात आले होते.

March 24, 2014 in मुख्य पान
जसवंत सिंग यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल 0

जसवंत सिंग यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

jaswant-singh_bjp-300x271
बारमेर – पक्षाकडून लोकसभा निवडणूकीसाठी तिकीट न मिळाल्याने नाराज झालेले भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंग यांनी सोमवारी बारमेरमधून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. याआधी रविवारी त्यांनी आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले होते.
बारमेरमधून निवडणूक लढवण्याची आपली इच्छा असताना आपल्याला डावलून काँग्रेसमधून भाजपात आलेल्या कर्नल सोनाराम चौधरींना पक्षाने उमेदवारी दिली. त्यामुळे सिंग यांनी बंडाचा पवित्रा घेतला होता.सध्याच्या भाजप या पक्षात बाहेरून आलेल्या लोकांनी अतिक्रमण केल्याचा आरोप जसवंत सिंग यांनी केला होता. तसेच आपल्या बाबतीत पक्षाने दुसर्‍यांदा असे केले असल्याचे जसवंतसिंग म्हणाले होते.

March 24, 2014 in देश-विदेश
शरद पवारांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार 0

शरद पवारांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

The-man-2009-awaits
मुंबई – राज्यात तीन टप्प्यात होणा-या निवडणूकीचा फायदा घेऊन, दोनवेळा मतदान करा असा सल्ला पक्ष कार्यकर्त्यांना देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार अडचणीत सापडले आहेत.
भाजपने त्यांच्या या विधानाविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिका-यांना पत्र देऊन रीतसर तक्रार दाखल केली आहे. पवारांवर लोकप्रतिनिधी कायद्यातंर्गत करावाई करण्याची मागणी करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसवर बंदी घालावी अशी मागणीही त्यांनी केली. सोमय्या यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली. किरीट सोमय्या प्रसिध्दी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. कुठल्याही प्रकारे प्रसिध्दीच्या झोतात रहाण्याचा सोमय्या यांचा नेहमीच प्रयत्न असतो अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी केली. रविवारी नवी मुंबईत माथाडी कामागाराच्या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तीन टप्प्यात होणा-या निवडणूकीचा फायदा घ्या, दोनवेळा मतदान करा असा सल्ला दिला होता. या विधानावरुन शरद पवारांवर टीका सुरु झाल्यानंतर त्यांनी आपण हे विधान गंमतीने केले अशी सारवासारव केली.

March 24, 2014 in मुख्य पान
 अनिवासी केरळी मतदारांसाठी दुबईहून विमान 0

अनिवासी केरळी मतदारांसाठी दुबईहून विमान

images
देशात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. या निवडणुकीबाबत परदेशातील अनिवासी भारतीयांमध्ये उत्सुकता आहे. हे अनिवासी भारतीय केवळ टीव्ही किंवा वर्तमानपत्रातील बातम्यांवर समाधान मानतात. मात्र, दुबईतील केरळ मुस्लीम कल्चरल सेंटरने (केएमसीसी) केरळमध्ये मतदान करण्यासाठी जाऊ इच्छिणा-या नागरिकांसाठी खास चार्टर्ड विमानाची सोय करण्याचे ठरवले आहे.
दुबईत केरळ मुस्लिम कल्चरल सेंटरचे ५०,३०० सदस्य आहेत. या संस्थेने केरळमध्ये सात एप्रिल रोजी होणा-या मतदानात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या मतदारांसाठी चार्टर्ड विमान करण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे कोझिकोडे जिल्ह्यातील नागरिकांना एका फेरीचे तिकीट सवलतीत मिळणार आहे. या मतदारांना भारतात आणण्यासाठी खासगी विमान कंपन्यांसह एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेसकडून चार्टर्ड विमान भाडयाने घेण्याची चर्चा सुरू आहे. ही सुविधा केवळ केरळातील मतदारांसाठी आहे, असे केएमसीसीचे महासचिव इब्राहिम इलेत्तिल यांनी सांगितले.
मतदानासाठी भारतात जाऊ इच्छिणा-या नागरिकांच्या संख्येवर विमानांची संख्या अवलंबून राहणार आहे. १६५ प्रवाशांसाठी खासगी कंपनीचे विमान भाडयाने घेतल्यास प्रति प्रवाशामागे ८३१९ रुपये तिकीट राहणार आहे. तर अन्य दोन कंपन्यांनी भारतातून दुबईसाठी १८० प्रवाशांसाठी प्रति प्रवाशामागे १२,४७७ आणि ९९८१ रुपये तिकीट आकारण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे मतदारांवर कोणताही प्रभाव टाकण्याचा हा प्रकार नाही. मतदार त्यांच्या इच्छेनुसार मतदान करू शकतात, असे इलेत्तिल यांनी सांगितले.

March 24, 2014 in देश-विदेश
टी-२० विश्वचषक: भारताचा सलग दुसरा विजय 0

टी-२० विश्वचषक: भारताचा सलग दुसरा विजय

download1
मिरपूर- आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेतील ‘ब’ गटातील सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर सात गडी राखून विजय मिळवला. स्पर्धेतील भारताचा हा सलग दुसरा विजय आहे. तसेच ‘ब’ गटात भारताने चार गुणांसह अव्वल स्थान कायम राखले आहे.
प्रथम फलंदाजीकरत वेस्ट इंडिजने भारतापुढे विजयासाठी १३० धावांचे आव्हान ठेवले होते. शिखर धवन शून्यावर बाद झाल्यामुळे भारताची सुरुवात खराब झाली. मात्र त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी दुस-या विकेटसाठी १०६ धावांची भागीदारी केली. कोहली ५४ धावांवर बाद झाला. तर रैनाने नाबाद ६२ धावा केल्या.त्याआधी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. वेस्ट इंडिजकडून धोकादायक ख्रिस गेलने सर्वाधिक ३४ धावा केल्या. यासाठी त्याने ४९ चेंडू घेतले. तर संघातील अन्य फलंदाजांनाही मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. त्यामुळे वेस्ट इंडिजला २० षटकात सात बाद १२९ धावा केल्या.भारताकडून रवींद्र जडेजाने तीन, अमित मिश्राने दोन तर आर अश्विनने एक गडी बाद केले.

March 24, 2014 in क्रीडा
गुगलचे ई-मेल्स होणार अधिक सुरक्षित 0

गुगलचे ई-मेल्स होणार अधिक सुरक्षित

gmail-logo
पत्रलेखन मागे पडून आता जमाना झाला. आता प्रत्येक पत्र ‘ई-मेल’द्वारे लिहिले जाते. या ‘ई-मेल’ने जगात क्रांती घडवली आहे. जगभरातील इंटरनेटवर लक्ष ठेवणा-या अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा कार्यक्रमाने खळबळ उडाली. कारण आपले ‘ई-मेल’ अकाउंट सुरक्षित नसल्याने सर्वच नेट वापरणा-यांमध्ये घबराट पसरली. आपण लिहिलेले पत्र कोणीही वाचत असल्याचे लक्षात आल्याने प्रत्येक या सेवेविषयी साशंक राहू लागला. आता जगातील सर्वाधिक लोकप्रिय सर्च इंजिन गुगलने आपल्या ‘ई-मेल’ना अधिक सुरक्षेचे कवच पुरवले आहे. त्यामुळे ही सेवा वापरणाऱ्यांना खात्रीशीर सुरक्षेचा अनुभव मिळणार आहे.
तुमचे ‘ई-मेल’ अकाउंट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे ते अधिक सुरक्षित असावे अशी तुमची इच्छा असते. ही बाब आमच्यासाठी अधिक महत्त्वाची आहे, असे ‘जी-मेल’चे सुरक्षा अभियंता निकोलस लिडबोरस्की यांनी सांगितले. गुगलने ‘जी-मेल’ची सेवा सुरू केली तेव्हापासून ती कायम ऌळळढर’चा वापर करते. आजपासून या ई-मेल अकाउंटला अधिक सुरक्षा कवच पुरवले आहे. त्यामुळे तुमचा संदेश कोणीही वाचू शकणार नाही. तुम्ही सार्वजनिक ठिकाणी ‘वाय-फाय’ सेवा वापरून संगणक, फोन आणि टॅब्लेट वापरल्यावरही सुरक्षेबाबत काहीच अडचण येणार नाही.
तुम्ही पाठवलेला प्रत्येक ‘ई-मेल’ हा १०० टक्के सुरक्षित आहे. याची माहिती केवळ तुम्ही आणि जी-मेलच्या सव्र्हरलाच असते. तसेच ही माहिती गुगलच्या डेटा सेंटरला असते. २०१३ मध्ये जी-मेल वापराचे प्रमाण ९९.९७८ टक्के होते. वर्षभरात केवळ दोन तास ही सेवा बंद राहिली होती. आमचे अभियांत्रिकी तज्ज्ञ आठवडयाचे सात दिवस व २४ तास यंत्रणेवर लक्ष ठेवून असतात. कोणतीही अडचण उद्भवल्यास ते तत्काळ त्यातून मार्ग काढतात. तसेच यंत्रणेत एखादा दोष निर्माण झाल्यास भविष्यात तो उद्भवू नये, म्हणून आमचे तज्ज्ञ त्याचे पूर्णपणे विश्लेषण करतात, असे लिडबोरस्की यांनी सांगितले.

मोदींना 'मानवी बॉम्ब'चा धोका 0

मोदींना ‘मानवी बॉम्ब’चा धोका

Narendra
नवी दिल्ली – देशातील सध्याचे सर्वाधिक चर्चेतील नेते व भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर मानवी बॉम्बचा हल्ला होण्याची भीती गुप्तचर अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून लालकृष्ण आडवाणी, राहुल गांधी, मुलायमसिंह, केजरीवाल यांच्यासह काही नेत्यांच्या सुरक्षेची खबरदारी घेण्याचेही आदेश दिले आहेत.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर १९९१ साली झालेल्या हल्ल्याची पुनरावृत्ती करून देशातील धार्मिक सौहार्द बिघडवण्याचा दहशतवाद्यांचा कट आहे. त्यासाठी निवडणूक काळात प्रमुख नेत्यांना लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर वाराणसी किंवा वडोदऱ्यामध्ये हल्ला होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे गुजरात, महाराष्ट्र व यूपीतील सुरक्षा संस्थांना खास खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दिल्लीतील शास्त्री पार्क येथे २६ मार्च रोजी नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. या पार्कापासून जवळ असलेल्या सीलमपूर, जाफराबाद या वसाहतींमध्ये मुस्लिमांची संख्या लक्षणीय आहे. ही सभा म्हणजे भाजपचा मुस्लिमांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जाते. तर मुस्लिमबहुल भागातील या सभेचा फायदा घेऊन दहशतवादी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू शकतात, अशी भीती गुप्तचर विभागाने व्यक्त केली आहे.’मोस्ट वॉण्टेड’ दहशतवादी वकास व त्याचे साथीदार हाती लागल्याने पोलिसांना मोठा दिलासा मिळाला असला तरी धोका अजूनही कायम आहे. त्यांचे काही साथीदार अद्यापही फरार असून लश्कर व हरकत उलच्या दहशतवाद्यांमध्ये संभाषण झाल्याची कुणकुणही गुप्तचर अधिकाऱ्यांना लागली आहे. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे.

March 24, 2014 in देश-विदेश
सोनिया गांधी यांना हिशेब का विचारत नाही - मुख्यमंत्री पर्रिकर 0

सोनिया गांधी यांना हिशेब का विचारत नाही – मुख्यमंत्री पर्रिकर

16_12_2013-parrikar160c33img_45972_sonia_gandhi_240x180
नागपूर – ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल हे काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांना दहा वर्षांतील कारभाराबद्दल का विचारत नाहीत? त्यांनाही हिशेब विचारा ना, असे आव्हान गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी रविवारी येथे ‘आप’ला दिले.
‘फ्रेण्ड्स ऑफ बीजेपी’च्यावतीने ‘व्हिजन ऑफ बीजेपी फॉर डेव्हलप्ड इंडिया’ या​ विषयावर शंकरनगरातील साई सभागृहात संवाद आयोजित करण्यात आला होता. भाजपचे नितीन गडकरी यांच्या प्रचारानिमित्त नागपूरकरांशी संवाद साधताना पर्रिकर यांनी सहज शैलीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचे गुणगान करून गोव्याच्या विकासाकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. पक्षाची लहान राज्यांची भूमिका असल्याचे सांगत वेगळ्या विदर्भाचे समर्थन करताना त्यांनी सावध पवित्रा घेतला. ‘अरविंद केजरीवाल यांनी आघाडी उघडताच माझी अचानक किंमत वाढली. देशभरातून आमंत्रणे येऊ लागली’, असे सांगून मनोहर पर्रीकर यांनी केजरीवाल यांचे उपरोधिक आभार मानले व त्यांच्या साधेपणावर टोले लगावले. पत्रकारांशी बोलतानाही त्यांनी केजरीवाल यांच्यावर टीका केली. साधेपणासोबत एखादी बाब घडवणे व तिची योग्य अंमलबजावणी करण्याची क्षमता आवश्यक आहे. त्यासाठी चांगल्या माणसाची गरज आहे. सद्यस्थितीत नरेंद्र मोदी सोडल्यास कुणीही अशी क्षमतावान व्यक्ती नाही, असा दावाही पर्रिकर यांनी केला. आयआयटीयन्सचे वैशिष्ट्य अधोरेखित करताना त्यांनी एक किस्साही सांगितला. १८ वर्षांपासून राजकारणात असलो तरी, अद्याप राजकारणी झालो नाही, असे पर्रिकर म्हणाले. यानंतर त्यांनी श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. भाजपच्या कोषाध्यक्ष शायना एन.सी. मॉडरेटर होत्या. ‘वेद’चे देवेंद्र पारेख, नाग-विदर्भ चेम्बर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष दीपेन अग्रवाल, रमेश मंत्री आदी उपस्थित होते. संचालन नितीन रोंघे यांनी केले.

March 24, 2014 in देश-विदेश
जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकºयानी घेतले विष 0

जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकºयानी घेतले विष

IMG-20140324-WA0032
यवतमाळ – जिल्ह्यात गारपिटीने शेतातील पिके उद्घवस्त झाली असून शासनाने अजुनही आर्थीक मदत दिली नाही. अशातच आकपूरी येथील एका शेतकºयाने आज सोमवारी २४ मार्च रोजी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्रशन केल्याने खळबळ उडाली आहे.
जनार्दन राऊत (६५)असे या शेतकºयाचे नाव आहे. जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या गारपिटीने अनेक शेतकरी हवालदिल झाले आहे. शासनाने जाहीर केलेली मदत अद्यापही मिळाली नाही. त्यामुळे आज सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्राशन केले. ही बाब निदर्शनास येताच शहर पोलिस व नागरिकांनी त्याला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. त्याचवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या शेतकºयाच्या खिशात आढलेल्या तीन चिठ्ठीमध्ये एका राजकीय पदाधिकाºयासह काही अधिकाºयांची नावे असल्याची माहिती आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख आ. संजय राठोड, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब मांगुळकर यांच्यासह अनेक पदाधिकाºयांनी भेटी दिल्या.

March 24, 2014 in विदर्भ
विदर्भात १७ शेतकºयांच्या आत्महत्या 0

विदर्भात १७ शेतकºयांच्या आत्महत्या

nv053
नागपूर – विदर्भात गारपीटीनंतर नैराश्यग्रस्त कर्जबाजारी शेतकºयांच्या आत्महत्येचे सत्र पुन्हा सुरू झाले असून मागील पाच दिवसात १६ शेतकºयांनी आत्महत्या केल्याने सरकारच्या मदतीचे सर्व दावे फोल ठरले आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कर्ज वसुलीला त्रस्त होऊन अचानक आलेल्या प्रचंड नुकसानीमुळे अन्नापासूनही वंचित राहिल्याने आत्महत्या करत असल्याचा आरोप विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला आहे.
मागील ५ दिवसात यशवंत मुळे रा. पंचाळा जि. वाशीम, विजय धोटे रा. बोरगाव जि. नागपूर, दमडू राठोड, रा. दत्तापूर जि. यवतमाळ, योगेश्वर लढी रा. हिवरा जि. वर्धा, माधवराव लांजेवार, रा. निलागोंदी जि. भंडारा, अभिमान काळे रा. बोरगाव जि. चंद्रपूर, कृष्णा वानखडे रा. साखरा जि. यवतमाळ, सुधाकर पोटे, रा. नवरगाव, राजू घोटेकार रा. वडनेर जि. वर्धा, भगवंत महाजन, रा. धानोरा, जि. वर्धा, वासुदेव घुले, रा. पळसाड, जि. नागपूर, सुरेश भुसार रा. गंगापूर जि. नागपूर, विजय कस्तुरे रा. बोथली जि. चंद्रपूर, पंतय्या रेंगुडवार, रा. आंबेधानोरा जि. चंद्रपूर, शंकर गडमडे रा. वरुड (इजारा), जि. यवतमाळ, सुभाष भोगेकर रा. धानापूर जि. चंद्रपूर, संतोष लिचडे रा. कासारखेडा, जि.वर्धा या १७ शेतकºयांनी आत्महत्या केल्यानंतर यांच्या आत्महत्येची स्वतंत्र चमुद्वारे कारणमिंमासा केली. त्यामध्ये सदर शेतकरी प्रचंड कर्जबाजारीला तोंड देत असून मागील जुलै -आॅगस्ट महिन्याच्या अतिवृष्टीत सोयाबीन गमाऊन आता नव्या उमेदीने रब्बी मध्ये हरभरा व गहू लाऊन जीवन जागण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र गारपीटीने त्यांचे जीवन उद्ध्वस्त केले असून सरकारने घोषित केलेली मदतही ५० टक्क्याच्यावर नापिकी या अटी खाली हे सर्व शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहे. बँक आणि खासगी सावकारांनी यांचे जगणे कठीण केले आहे. अनेक शेतकºयांच्या घरी अन्नही नसून यावर्षी मुलीचे लग्न सुध्दा करावयाचे आहे, अशा कठीण परिस्थितीमध्ये मदत तर सोडा कोणताही सरकारी प्रतिनिधी वा राजकीय नेता मदत घेऊन त्यांच्या दारावर आलेला नाही. एकीकडे राजकीय नेते निवडणूकीत कोट्यावधीचा खर्च करत असून दुसरीकडे विदर्भात २ वेळेचे अन्न नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहे, अशा परिस्थितीमध्ये समाजाने समोर येऊन या शेतकºयांना दिलासा द्यावा, असे आवाहन सुध्दा किशोर तिवारी यांनी केले आहे.

March 24, 2014 in विदर्भ
लाचेची मागणी,वीज अभियंत्यास अटक 0

लाचेची मागणी,वीज अभियंत्यास अटक

download
यवतमाळ – शेतात वीज जोडणी करण्यासाठी खरेदी केलेले साहित्य जप्त करून कार्यवाही टाळण्यासाठी १५ हजारांची लाच मागणाºया राळेगाव वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्यास अटक केली.
अशोक वामन खोब्रागडे असे लाच मागणाºया कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे. मंगेश श्रीधर एंबडवार (३४) रा. अंतरगाव ता. राळेगाव याने दोन वर्षांपूर्वी शेतात विहीर खोदली होती. शेतामध्ये ओलीत करावयाचे असल्याने लाईनची व्यवस्था करण्यासाठी २६ नोव्हेंबर २०१२ रोजी एमएसईबी कार्यालय राळेगाव येथे अर्ज केला होता. परंतु अद्यापही शेतात लाईनची व्यवस्था केली नाही. त्यामुळे त्यांनी शेतात १ इलेक्ट्रिकवर चालणारी मोटार व इलेक्ट्रिक जोडण्यासाठी लागणारे केबल व साहित्य आणून शेतात ठेवले होते. त्यानंतरही सदर शेतकºयाने वीज जोडणी लवकरच देण्याची विनंती केली होती. एमएसईबीचे कनिष्ठ अभियंता अशोक खोब्रागडे, लाईनमन पुरुषोत्तम कुमरे याने शेतातून साहित्य जप्त करून चोरीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. ही कारवाई टाळण्यासाठी २० हजार लाचेची मागणी केली. एंबडवार यांनी ९ जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यावरून या विभागाने पंचासमक्ष पडताळणी केली असता, खोब्रागडे, कुमरे या दोघांनी १५ हजार लाचेची मागणी केली होती. त्यावरून आज २४ मार्च रोजी खोब्रागडे यांना अटक केली. ही कार्यवाही पोलीस उपअधीक्षक सतीश देशमुख, अरुण गिरी, प्रकाश शेंडे, नरेंद्र इंगोले, सुधाकर कोकेवार, गजानन राठोड, अमोल महल्ले, शैलेश ढोणे, अमित जोशी, नीलेश पखाले, सुधाकर मेश्राम, अनिल राजकुमार, किरण खेडकर यांनी केली.

March 24, 2014 in विदर्भ