
वणी- वणी तालुक्यातील धुनकी येथील २४ वर्षीय तरुणाची हत्या करुन शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नेरड पुरड शिवारातील रेल्वे पटरीवर टाकण्यात आल्याची घटना दि़२९ मार्चला उघडकीस आली़
धुनकी येथे वास्तव्यास असणारे अॅटो चालक नरेंद्र दामोदर सरपटे हे आपल्या मामाकडे देवादेवीच्या कार्यक्रमासाठी दि़२८ मार्चला पूरड येथे गेले होते़ त्या रात्री तो कार्यक्रम आटोपून ते गावी परत जात असतांना अज्ञान आरोपीने त्यांच्या डोक्यावर व पाठीवर धारदार शस्त्राने वार करुन हत्या केली़ व पुरावा नष्ट करण्यासाठी नेरड पूरड शिवारातील कायर-मुकूटबनकडे जाणाºया रेल्वे रुळावार तो मृतदेह आणून टाकला़ ही बाब आज दि़२९ मार्चला टूड्रा येथील पोलीस पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी शिरपूर पोलीसांना सुचना दिली़ तर मृतकाचे मामा चंद्रशेखर श्रीराम कोंगरे यांच्या तक्रारीवरुन शिरपूर पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुध्द भादवी ३०२, २०१ अन्वये गुन्हा नोंद केला असून तपास सुरु आहे़
Archive for March 29th, 2014
0
अॅटो चालकाची हत्या
0
सेनापती म्हणून लोकसभेचा किल्ला लढवा – आ. राठोड

यवतमाळ – शिवसैनिकांनी गाव, विभागाच्या सेनापतीची जबाबदारी घेऊन लोक सभेचा किल्ला लढवून महायुतीच्या उमेदवार भावना गवळी यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन आ. संजय राठोड यांनी केले.
मातोश्री विमलबाई चिरडे मंगल कार्यालय दिग्रस आयोजीत कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी भाजप जिल्हाध्यक्ष राजु डांगे, नामदेव खोब्रागडे, सुधाकर तायडे, परमानंद अग्रवाल, अजय बिहाडे, बाळासाहेब मुनगिनवार, मोहन भोयर, जितेंद्र महाराज, राजेंद्र पडगिलवार, महादेव सुपारे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, ६० वर्षात काँग्रेसने रोटी, कपडा और मकान चा प्रश्न कायम ठेवला. महिला अत्याचारांच्या घटनेत वाढ झाली आहे. शेतकरी-शेतमजुर आत्महत्या करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी महायुतीच्या उमेदवार भावना गवळी बोलतांना म्हणाल्या की, मिडीयाच्या माध्यमातून जनता जागृत झाली असून काँग्रेसचे पितळ उघडे पडत असल्याने काँग्रेस नेते नैराश्याच्या गर्तेत सापडल्याचेही त्या म्हणाल्या. तर भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे म्हणाले की, देशात खरी लोक शाही आणण्यासाठी काँग्रेस आघाडी सरकारला उलथविण्याचा संकल्प करा. नरेंद्र मोंदीना पंतप्रधान करायचे असेल तर २७२ खासदारांच्या आकड्या पर्यंत पोहचण्यासाठी आवर्जुन मतदान करा असे आवाहनही त्यांनी केले.
0
पाणी चोरणे महागात पडले; नागरिकावर गुन्हा

नेर – नगर परिषदची परवानगी न घेता पाईप लाईन फोडून पाणी चोरणाºया नागरिकाविरुद्घ गुन्हा दाखल केला. या कारवाईने पाणी चोरणाºया नागरिकांचे धाबे दणानले आहे.
मार्च एन्डींग असल्याने नगर परिषदने थकबाकी कर, पाणी कर, लाईन कराची वसुली मोहीम हाती घेतली आहे. आज शनिवारी नगर परिषदचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर व कर्मचाºयांनी वार्ड क्र. १६ चमननगर मध्ये ही मोहीम राबविली. यावेळी अब्दुल आदिल अब्दुल गफ्फार या व्यक्तीने नगर परिषदची परवानगी न घेता पाईप लाईन फोडली. त्यावरुन नळ कनेक्शन घेऊन पाणी चोरी केल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार पाहुण मुख्याधिकाºयांनी थेट पोलिस ठाणे गाठून पाणी चोरीची तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी अब्दुल आदिल याच्याविरुद्घ भादंवि कलम ३७९ अंतर्गत गुन्हा दाखल केला. नगर परिषदकडे अर्ज करुनही नळ कनेक्शन मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना पाईप लाईन फोडून पाणी चोरत असून याला प्रशासन जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. पाणी चोरी करणाºया अनेक नागरिकांवर दंडात्मक कारवाई केला. मात्र पाणी चोरी प्रकरणी गुन्हा दाखल केल्याची हि पहिलीच वेळ असावी. या कारवाईने अवैधपने नळ घेणाºया नागरिकांचे धाबे दणानले आहे.
0
लाखोचा गुटखा साठा जप्त

यवतमाळ – शहरातील तलाव फैल परिसरातील एका खोलीत असलेला गुटखा साठा आज सायंकाळी जप्त केला. उपविभागीय पोलीस अधिकाºयांच्या पथकाने ही कार्यवाही केली असून एकास अटक केली.
बंट्टी उर्फ अतुल सुभाष डगवार (२८) रा. तलाव फैल असे आरोपीचे नाव असून त्याचे सरोज टॉकीज जवळ साईराम सुगंध सेंटर आहे. दररोज अवैधपने गुटखा, जर्दा तम्बाखुची विक्री करतो. तलाव फैलमधील नेवारे या महिलेच्या घरी त्याने खोली भाड्याने करुन तेथे गुटखा साठवून ठेवत होता. या बाबतची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या पथकाला मिळाली होती. त्यावरुन पथकाने आज शनिवारी सायंकाळी धाड टाकुन खोलीची झडती घेतली. यामध्ये गुटखा, जर्दा तंम्बाखु पुड्या निदर्शनास आल्या. यावेळी पोलिसांनी गुटखा साठा जप्त करुन आरोपीस अटक केली. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी विश्वजीत शिंदे, प्रफुल येवले यांना पाचारण करुन गुटखा स्वाधिन केला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार राहुल मनवर, तुषार नेवारे, इकबाल शेख, वसीम शेख, प्रमोद मडावी, विजय जाधव, संजय कांबळे, अन्सार बेग यांनी केली.
अपघातात तिन ठार
यवतमाळ – जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या अपघातामध्ये तीन जण ठार झाल्याच्या घटना शुक्रवारी घडल्या. दौलत तुकाराम नेवारे (४५) रा. देवी नगर लोहारा हे आपल्या दुचाकीने(एम.एच. २९/एफ ५९४९) इचोºयावरुन जात होते. अशातच दुचाकी भरधाव व निष्काळजीपने चालवुन वाहन रस्त्यावर आदळले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी श्रीकृष्ण जागोजी भोंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन लाडखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. भानुदास चोपने रा. वरध अपार्टमेंन्ट वणी हे वरोरा रोडवर उभे होते. अशातच भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने (एम.एच. २९ टि ९२४) जोरदार धडक दिल्याने चोपने जागीच ठार झाले. या प्रकरणी वणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तर चारगाव चौकीजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने रविंद्र नटकडे रा. शिरपूर हे जागीच ठार झाले. या प्रकरणी शिरपूर पोलिसांनी वाहन चालकाविरुद्घ गुन्हा दाखल केला.
0
इंटरनेटवर अवैध छायाचित्र ओळखणारी यंत्रणा

इंटरनेट ही जगातील सर्वात मोठी गरज बनली आहे. जगाच्या कानाकोप-यांतील कोणतीही माहिती तुम्हाला इंटरनेटवरून तत्काळ मिळू शकते. याच इंटरनेटवर माहितीबरोबरच जगातील छायाचित्रांचा खजिना असतो. असंख्य नागरिक इंटरनेटवरून छायाचित्रे डाउनलोड करीत असतात. याच नेटवर अवैध छायाचित्रांचे प्रमाण मोठे आहे. ही छायाचित्रे ओळखणारी यंत्रणा संशोधकांनी शोधून काढली आहे.
नेदरलॅँडच्या व्टेन्ट विद्यापीठातील संशोधकांनी इंटरनेट वापरणा-या व्यक्तींच्या खासगीपणाला धक्का न लावता ही पद्धत विकसित केली आहे. या यंत्रणेचा वापर करून तुमचे नेटवर्क ‘स्वच्छ’ ठेवण्यास मदत मिळते. बालकांचे अश्लील चित्रीकरणासह अन्य बाबी शोधून काढण्यासाठी पोलिसांना या यंत्रणेचा लाभ घेता येऊ शकतो. इंटरनेटवरील तुमचा डेटाबेस गुन्हेगारांच्या हाती लागल्यास त्याचा गैरवापर होऊ शकतो. इंटरनेटवरील हॅकर्सचा माग काढणे ही तुम्हाला कठीण बनू शकते. पोलिसांच्या डेटाबेसमध्ये या नवीन यंत्रणेचा वापर केल्यास त्यांना अवैध छायाचित्रांचा धोका राहणार नाही, असे संशोधक अँड्रस पीटर यांनी सांगितले.
0
फेसबुक देणार ड्रोनने इंटरनेटची सुविधा

फेसबुक जगातील सर्वात मोठी सोशल मीडिया वेबसाइट आहे. अमेरिकेपासून ऑस्ट्रेलियापर्यंत, फ्रान्सपासून दक्षिण आफ्रिकेपर्यंत, भारतापासून जपानपर्यंत सर्व जण फेसबुकचे वेडे आहेत. पण, प्रत्येक गोष्टीला अपवाद असतोच. त्यामुळे जगाच्या काही दुर्गम भागात इंटरनेट पोहोचलेले नाही. त्यामुळे फेसबुक कंपनीने संपूर्ण पृथ्वीतलावर इंटरनेट पोहोचवण्यासाठी चक्क आकाशमार्गाचा सहारा घेण्याचे ठरवले आहे. विमाने, ड्रोन आणि उपग्रहांवर एक विशेष प्रयोगशाळा उभारली जाणार आहे. त्याद्वारे जगभरात इंटरनेट पोहोचवण्याचा मानस फेसबुकने केला आहे.
जगातील सर्व व्यक्तींना आकाशातून इंटरनेट देण्याचे स्वप्न आम्ही साकारणार आहोत. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी फेसबुक कंपनी इंटरनेट. ऑर्गच्या सहाय्याने ‘कनेक्टिव्हिटी लॅब’ उभारत आहे. या नवीन तंत्रज्ञानाने संपूर्ण जग नक्कीच जोडले जाईल, असे फेसबुकचा सहसंस्थापक-प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांनी सांगितले.
ही ‘कनेक्टिव्हिटी लॅब’ बांधण्यासाठी अंतराळ विज्ञान आणि कम्युनिकेशन तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. यात नासातील जेट प्रोपल्शन लॅब अॅँड अॅम्स रिसर्च सेंटरच्या माजी अधिका-यांचाही समावेश आहे. जगातील दुर्गम भागात राहणा-या लोकसंख्येपर्यंत इंटरनेट पोहोचवण्यासाठी उपग्रहांचा वापर केला जाणार आहे. तसेच शहरांमध्ये राहणा-या नागरिकांना विमानातून इंटरनेटची सुविधा दिली जाणार आहे. ही विमाने वातावरणाच्या बाहेरून प्रवास करणार असून ती सौरऊर्जेवर चालणार आहे. ही विमाने महिनोनमहिने आकाशात राहू शकतात, असे फेसबुकचे अधिकारी येल मॅग्युरी यांनी सांगितले.
ही तर केवळ सुरुवात आहे. आमच्या टीममध्ये अनेक तज्ज्ञ व चांगली संकल्पना असलेले लोक आहेत. हे तंत्रज्ञान विकसित करण्यात काही अडचणी असून त्या निश्चितपणे दूर केल्या जातील, असेही मॅग्युरी यांनी सांगितले.
0
लष्करी तळाबाहेर सापडली स्फोटके

श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या काथुआ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी नागरिकांवर केलेल्या अंदाधुंद गोळीबाराची घटना ताजी असतानाच, शनिवारी सकाळी श्रीनगरमधील लष्करी तळाच्या बाहेर स्फोटके सापडली.
श्रीनगरच्या बीमीना भागात गस्तीवर असणा-या जवानांना लष्करी तळाच्या बाहेरील रस्त्यावर एक संशयास्पद बॅग आढळली. जवानांनी ही बॅग उघडली असता त्यात प्रेशर कुक होता.जवानांनी तात्काळ बॉम्ब निकामी पथकाला पाचारण केले. या कुकरमध्ये पाच किलो स्फोटके होती. बॉम्ब निकामी पथकाने ही सर्व स्फोटके नष्ट केली. जवानांच्या सर्तकतेमुळे मोठी हानी टळली. कथुआमध्ये शुक्रवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षापथकांनी सर्तकतेचा इशारा जारी केला आहे. महत्वाच्या लष्करी तळावरील सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला होता.
0
राज्यातील मतदानाच्या वेळेत वाढ

मुंबई : राज्यात १०, १७ आणि २४ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करण्यासाठी राज्यातील मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत (११ तास) राहील, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी शुक्रवारी दिली.
राज्यातील निवडणूक पूर्व कामाचा आढावा घेण्यासाठी संपत यांनी विविध राजकीय पक्ष, मुख्य सचिव, पोलिस अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. नक्षलग्रस्त भागात सकाळी सात ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत मतदान करता येईल.
0
भारताची विजयाची हॅटट्रिक

मिरपूर- यजमान बांगलादेशवर आठ विकेटनी विजय मिळवत माजी विजेता भारताने टी-२० वर्ल्डकपमधील उपांत्य फेरी जवळपास निश्चित केली. गटवार साखळीतील भारताचा हा सलग तिसरा विजय आहे. या विजयासह भारताने ब गटात सहा गुणांसह अव्वल स्थान कायम ठेवले आहे.
विराट कोहली आणि रोहित शर्माच्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारताने शुक्रवारी बांगलादेशचे १३९ धावांचे आव्हान नऊ चेंडू राखून पार केले. बांगलादेशने विजयासाठी दिलेल्या १३९ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. शिखर धवन केवळ एक धावा काढून बाद झाला. त्यानंतर रोहित आणि विराट यांनी दुस-या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. शर्मा ५६ धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट आणि महेंद्रसिंग ढोणीने विजयाची औपचारीकता पूर्ण केली. त्याआधी पहिल्या दोन टी-२० लढतींतील ‘सामनावीर’ ठरलेला भारताचा लेगस्पिनर अमित मिश्राने पुन्हा प्रभाव (तीन विकेट) पाडल्याने बांगलादेश सात बाद १३८ इतकीच मजल गाठू शकला. तीन बाद २१ या स्थितीतून यजमानांनी स्वत:ला सावरले असले तरी त्यांना अपेक्षित दीडशे धावांचाही पल्ला गाठता आला नाही. मिश्राने टाकलेल्या डावाच्या शेवटच्या षटकात त्याची हॅटट्रिकची संधी हुकली असली तरी ४-०-२६-३ असे त्याचे पृथ:करण होते. पुन्हा एकदा त्याने गुगली हे त्याचे प्रभावी अस्त्र वापरले.तत्पूर्वी, सलग तिस-या लढतीत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. भारताने सलग तिस-या लढतीत संघात बदल केला नाही. बांगलादेशची सुरुवात चांगली झाली नाही. तमिम इक्बाल (६), शमशूर रहमान (०) यांना डावाच्या चौथ्या षटकात लागोपाठच्या चेंडूंवर ऑफस्पिनर रवीचंद्रन अश्विनने बाद केले. मात्र त्याचीही हॅटट्रिकची संधी हुकली. मात्र पुढच्याच षटकात भुवनेश्वरने धोकादायक शाकिब अल हसनला (१) त्रिफळाचित करत बांगलादेशची अवस्था बिकट केली. मात्र कर्णधार मुशफिकुर रहिम आणि फॉर्मात असलेला सलामीवीर अनामूल हक यांनी चौथ्या विकेटसाठी ४६ धावा करत बांगलादेशला सावरले. शामीने मुशफिकुरला (२४) बाद करत ही जोडी फोडली.पाठोपाठ अनामूलही ४३ चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांसह ४४ धावा फटकवत बाद झाला. मिश्राने त्याला त्रिफळाचीत केले. मात्र बांगलादेशला १३० पार नेण्याचे काम नासीर हुसेन (१६) आणि मोहम्मदुल्ला (२३ चेंडूंत नाबाद ३३) यांनी केले. सातव्या क्रमांकाचा फलंदाज मोहमदुल्लाच्या खेळीत पाच चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे.
0
भाजप दाऊदलाही उमेदवारी देईल!

नवी दिल्ली : संयुक्त जनता दलातून हकालपट्टी करण्यात आलेले नेते साबीर अली यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्याच्या मुद्दय़ावरून भाजपचे ज्येष्ठ नेते मुख्तार अब्बास नक्वी कमालीचे संतप्त झाले असून, यापुढील काळात भाजपमध्ये दाऊद इब्राहिमलाही प्रवेश दिला जाईल, असा घरचा आहेर त्यांनी शुक्रवारी दिला.
मुस्लीम मतदारांना आकर्षित करण्यासाठी साबीर अली यांना भाजपमध्ये मोठा गाजावाजा करून प्रवेश देण्यात आला होता. त्यानंतर काही तासांतच नक्वी यांनी, दहशतवादी भटकळच्या मित्राचा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे.
लवकरच दाऊदलाही स्वीकारले जाईल.. असे ट्विट केले. काही महिन्यांपूर्वी भटकळला साबीर अलींच्या मुंबईमधील घरातून अटक झाली होती, असे सांगत नक्वी यांनी त्यांच्या दाव्याचे समर्थन केले.
0
पाकमध्ये हनुमान मंदिर पेटवले

कराची – पाकिस्तानातील सिंध प्रांतात तीन अज्ञात व्यक्तींना हनुमान मूर्ती तोडून नंतर मंदिर पेटवून दिल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून मूर्तीची विटंबना करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करा, अशी मागणी करत जमाव रस्त्यावर उतरला आहे.
लतीफाबाद भागात असलेल्या या मंदिरात येत्या १४ एप्रिल रोजी वार्षिकोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्याआधीच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. मंदिराची देखभाल करणारा पुजारी दर्शन याने सांगितल्यानुसार, शुक्रवारी तीन व्यक्ती मंदिरात होणाऱ्या प्रार्थनेसाठी आले होते. पूजा-अर्चा झाल्यानंतर या तिघांनी हनुमानाच्या मूर्तीला लक्ष्य केले. मूर्तीची विटंबना करताना तेथील तेल ओतून या समाजकंटकांनी मंदिरात आग लावली. त्यामुळे एकच हलकल्लोळ माजला आणि त्याचाच फायदा घेऊन हल्लेखोर पसार झाले. या घटनेचे वृत्त परिसरात पसरताच संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. या भागात हिंदू वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. त्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली. हा तणाव लक्षात घेऊन पोलीस महानिरीक्षक सनाउल्ला अब्बासी यांनी तडकाफडकी स्थानिक पोलीस उपअधिक्षक आणि पोलीस निरीक्षकांना निलंबित केले.
0
मसूदना १४ दिवसांची कोठडी

नवी दिल्ली – भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना मारण्याची धमकी देणारे सहारणपूरचे काँग्रेसे उमेदवार इमरान मसूद यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. इमरान मसूदच्या या प्रतापामुळे काँग्रेसची गोचीच झाली असून उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज सहारणपूरमध्ये होणारी आपली सभा रद्द केली आहे.
शुक्रवारी रात्री उशीरा अटक करण्यात आलेल्या इमरान मसूद यांना शनिवार सकाळी देवबंद कोर्टात सादर करण्यात आले. यावेळी कोर्टाने मसूद यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या आधी कोर्टाच्या बाहेर मसूद यांच्या कार्यकर्त्यांनी काही काळ गोंधळ घातला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मसूद यांच्या विरोधात तक्रारही नोंदवल्याने काँग्रेसने राहुल गांधी यांची सभा रद्द केली आहे. पुढली वेळ मिळाल्याशिवाय येथील सभेचे वेळापत्रक ठरणार नाही, असे काँग्रेसचे नेते प्रदीप माथुर यांनी सांगितले.









