पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for March 2nd, 2014

  यवतमाळ येथे साकारणार २२  एकरात  उद्यान व म्युझियम 0

यवतमाळ येथे साकारणार २२ एकरात उद्यान व म्युझियम

20
केंद्रीय रेल्वे मंत्री खरगे यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण
यवतमाळ : – वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाला गती देण्यासाठी पुढील वर्षाच्या अथर्संकल्पात अधिक निधीची तरतूद करणार, असे केंद्रीय रेल्वे मंत्री मल्लीकार्जुन खरगे यांनी सांगितले.
यवतमाळ येथे रेल्वेच्या २२ एकर जागेवर रेल्वे विभाग भव्य उद्यान उभारणार असून त्या उद्यानाच्या नामफलकाचे अनावरण श्री.खरगे यांच्याहस्ते झाले. अनावरणानंतर दर्डा मातोश्री सभागृहात आयोजित समारंभात ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे, खा.विजय दर्डा, खा.भावना गवळी, आ.वामनराव कासावार, माजी खासदार हरीभाऊ राठोड, नगराध्यक्ष योगेश गढीया, मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर सुनिलकुमार सुद, सुबोध जैन, माजी आमदार कीर्ती गांधी आदी उपस्थित होते.
यवतमाळ रेल्वे प्रकल्प केंद्र आणि राज्य शासनाच्या आर्थिक सहभागातून राबविण्यात येत आहे. प्रकल्पाला गती देण्यासाठी अधिक निधीची तरतूद करण्यासोबतच मनरेगाच्या माध्यमातून काही कामे केल्यास स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्यादृष्टीनेही विचार सुरू असल्याचे श्री.खरगे म्हणाले. यवतमाळ येथे नॅरोगेज रेल्वे लाईन सुरू आहे. या रेल्वेलाईनची नियमीत देखभाल करण्यासोबतच यवतमाळ येथे कॉरीडॉरसाठी सर्व्हेक्षण केले जाणार असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्याला लागून असलेले पोहरादेवी हे बंजारा समाजाचे श्रध्दास्थान आहे. त्यामुळे पोहरादेवी या ठिकाणाला या प्रस्तावित रेल्वेमार्गाला जोडण्यात येतील. यासाठी रेल्वेच्या अधिकाºयांनी कायर्वाही करावी, अशा सुचना त्यांनी यावेळी दिल्या. रेल्वे सेवा ही सवर्सामान्यांची सेवा आहे. अधिकाधिक जनतेला सदर सेवा देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे ते म्हणाले. यवतमाळ येथे प्रस्तावित रेल्वे उद्यानात रेल्वेची ओळख करून देणारे साहित्य ठेवण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या. रेल्वेचे इंजीन, डबे अशा वस्तु ठेवून चांगले म्युझीयम तयार करण्याच्या सुचना देखील त्यांनी केल्या. यावेळी खा.विजय दर्डा यांचेही भाषण झाले. यावेळी त्यांनी रेल्वे मार्गाला गती देण्याची विनंती केली. वेळेवर हा मार्ग पुर्ण करण्यासोबतच कॉरीडॉर आणि रेल्वेचे म्युझियम उभारण्याची मागणी त्यांनी केली. प्रास्ताविक मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर सुनिलकुमार सुद यांनी केले. आभार रेल्वेचे अधिकारी महेशकुमार गुप्ता यांनी मानले. यावेळी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अस्वच्छ  व्यवसायातील कामगारांच्या पुनर्वसनाला प्राधान्य  द्या -  डॉ.महातो 0

अस्वच्छ व्यवसायातील कामगारांच्या पुनर्वसनाला प्राधान्य द्या – डॉ.महातो

4x6=10 (1)
यवतमाळ – हातानेमैला साफ करणे, डोक्यावर वाहून नेणेही प्रथा घृणास्पद  आहे. त्यामुळे अशा व्यवसायात काम करणाºया कामगारांना इतर व्यवसायाकडे प्रवृत्त करून त्यांचे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या पुनर्वसन करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी प्राधान्य द्यावे, असे निर्देश राट्रीय सफाई कमर्चारी आयोगाच्या सदस्या डॉ.लता महातो यांनी दिले.
दिग्रस नगरपरिषदेच्या सभागृहात जिल्ह्यातील सफाई कामगारांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीला नगर परिषदेचे उपाध्यक्ष डॉ.मुश्ताक, नगरसेवक रामु पवार, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश भट, ओमप्रकाश महातो, शंकर पवार आदी उपस्थित होते. अस्वच्छ व्यवसायातील सफाई कामगारांच्या पुनर्वसनासाठी शासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. तेव्हा जुन्या प्रचलीत पध्दतीनुसार काम करणारे कामगार आढळल्यास तसा अहवाल तत्पर पाठवावा. या समाजाची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. ही बाब विचारात घेऊन योजना राबविणाºया यंत्रणांनी अंमलबजावणी करावी. सफाई कामगार वा त्यांच्या पाल्यांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करावे व व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा सुचना डॉ.महातो यांनी केल्या. कंत्राटी पध्दतीने काम देतांना सफाई कर्मचाºयांवर अन्याय होणार नाही तसेच सदर कर्मचाºयांचे वेतन नियमित देण्यात यावे. त्यांच्या सेवेचा लेखाजोगा व्यवस्थित ठेवावा. सफाई कमर्चाºयांच्या रिक्त जागा भरणे, त्यांना कालबद्द पदोन्नती, घरकुल देण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत. वैद्यकीय शिक्षण आरोग्य सेवेतील कर्मचाºयांना  क वर्ग कर्मचाºयांचा दर्जा देण्यासाठी कायर्वाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. प्रास्ताविक दिग्रसचे मुख्याधिकारी प्यारेलाल यांनी केले. सफाई कर्मचाºयांचे वेतन व इतर लाभ देण्यासाठी पुर्णपणे निधी मिळणे आवश्यक आहे. तसेच श्रमसाफल्य ही योजना सफाई कामगारांसाठी राबविण्यात येते. या योजनेंतर्गत४००कोटी रूपयाचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

ट्रक अपघातात बालक ठार, एक जखमी

यवतमाळ –  मोहदा येथून जवळच असलेल्या अंतरगाव येथे भरधाव ट्रकने सायकलला धडक दिल्याची घटना शनिवारी दुपारी ४ वाजता घडली. यामध्ये एक ल्बालक जागीच ठार झाला असून एक जण जखमी आहे.
वैभव गजानन सहस्त्रबुद्घे (१२) रा. अंतरगाव असे मृतकाचे तर मयुर सुभाष सहस्त्रबुद्घे (१५) असे जखमीचे नाव आहे. काल दुपारी ते सायकलने रस्ता ओलांडत होते. अशातच मेटीखेडा येथून राळेगावकडे जाणाºया ट्रकने (ए.पी. १६/ टी.ए.७५६७) सायकलला धडक दिली. यामध्ये वैभव व मयुर हे दोघे गंभीर जखमी झाले. त्याना यवतमाळ   येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान वैभवचा मृत्यू झाला. यावेळी संतप्त नागरिकांनी मेटीखेडा-राळेगाव मार्गावर रस्ता खोदून चक्काजाम आंदोलन केले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती होताच सायंकाळी वडगाव जंगल पोलिसांनी घटनास्थळ गाठून अपघातग्रस्त ट्रक जप्त केला. चारवर्षापूर्वी वैभवच्या वडीलांचाही मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठ आता वैभवचाही अपघाती मृत्यू झाल्याने त्याची आई नलुबाई सहस्त्रबुद्घे यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

विद्यार्थ्यांची आत्महत्या

पांढरकवडा – झरी जामणी तालुक्यातील हिवरा येथील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना आज रविवारी सकाळी १० वाजता स्थानिक कॉटन मार्केट परिसरात घडली.
राजेश मारोती आत्राम (१८) रा. हिवरा ता. झरी असे मृतकाचे नाव असून पांढरकवडा येथील बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालयात अकराव्या वर्गात शिक्षण घेत होता. आज सकाळी १० वाजता कॉटन मार्केटच्या मागील बाजुला असलेल्या वडाच्या झाडाखाली त्याने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. ही बाब परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. आजोबाची तीन एक शेती करून तो शिक्षण घेत होता. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

मारहाण करून पोलीसाला लुटले

पुसद – घराकडे पायी जाणाºया पोलिसावर लोखंडी रॉडने मारहाण करून लुटल्याची घटना शनिवारी सायंकाळी श्रीरामपूर परिसरातील राममंदिरासमोर घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
सुभाष मोतीराम राठोड (४८) रा. गोविंद नगर हे पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात नायक पोलीस शिपायी म्हणून कार्यरत आहे. शनिवारी सायंकाळी ७ वाजता ते घराकडे पायी जात होते. अशातच श्रीरामपूर येथील राममंदिरासमोर राठोड याना तीन जणांनी अडवून लोखंडी रॉडने मारहाण करून हल्ला चढविला. त्यांच्या खिशातील मोबाईल, गळ््यातील १० ग्रॅमची चैन असा एकुण २० हजार रुपयाचा ऐवज हिस्कावून तेथून पोबारा केला. या परिसरातील पोलीस चौकी नेहमीच बंद राहत असून त्याच्या दुर्लक्षीत धोरणाचा आज पोलीसालाच फटका बसला आहे.  यापूर्वी परिसरात चोरी व लुटामारीच्या घटना घडल्या असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्घ गुन्हा दाखल केला.

कतार स्फोटात पाच भारतीयांचा मृत्यू 0

कतार स्फोटात पाच भारतीयांचा मृत्यू

AP1_20_2014_000027B
दोहा- कतारची राजधानी दोहा येथे मॉलशेजारी असलेल्या एका तुर्कीश रेस्टॉरंटमध्ये झालेल्या स्फोटात पाच भारतीय नागरिकांसह ११ विदेशी नागरिकांचा मृत्यू झाला. अन्य ३५ जण जखमी आहेत. कतार सरकारने या स्फोटाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
मृत भारतीयांचा ओळख पटली असून या स्फोटात रियाज किझाकेमनोलिल, अब्दुल सलीम पालनगड, झकारिया अनाकंदी, व्यंकटेश आणि शेख बाबू या पाच भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला.मृत्युमुखी पडलेल्या अन्य नागरिकांमध्ये चार जण नेपाळचे आणि दोनजण फिलिपिन्सचे रहिवाशी आहेत. भारतीयांचे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी भारताचे राजदूत संजीव अरोरा हे कतार सरकारच्या संपर्कात आहेत.रुग्णालयात दाखल केलेल्या १० जखमींमध्ये आठ पुरुश आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. यातील प्रत्येकी तीन नेपाळ आणि पाकिस्तान, दोघे फिलिपिन्स आणि प्रत्येकी एक भारत आणि इजिप्तचे नागरीक असल्याचे समजते.

March 02, 2014 in देश-विदेश

चीनमध्ये हल्ला, ३३ ठार

बिजींग – चीनच्या युनान भागातील कुनामिंग या रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री चाकूधारी हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात ३३ जण ठार झाले तर १३० लोक जखमी झाले आहेत.
चीनच्या झिनुआ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी युनानची राजधानी असलेल्या कुनमिंग रेल्वेस्टेशनवर हल्लेखोरांनी हल्ला केला. यात ३३ प्रवाशांना आपला जीव गमावावा लागला तर १३० जण जखमी झाले आहेत. यासंबधीचे फोटो ‘सिना वेबो’ या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.हल्लेखोरांपैकी एकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. मात्र मिळालेल्या पुराव्याच्या आधारे हा दहशतवादी हल्ला असल्याचे सांगण्यात येत आहे.

March 02, 2014 in देश-विदेश
१०वीची परीक्षा सोमवारपासून 0

१०वीची परीक्षा सोमवारपासून

index
मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा येत्या सोमवारपासून (तीन मार्च) सुरू होणार आहे. या परीक्षेला नवीन अभ्यासक्रमानुसार २० हजार ७२३ शाळांमधील १५ लाख ५८ हजार ६३९ तर जुन्या अभ्यासक्रमानुसार एक लाख ६९ हजार ७२९ असे एकूण १७ लाख २८ हजार ३६८ विद्यार्थी बसणार आहेत. यात नऊ लाख ६७ हजार ७१४ विद्यार्थी तर सात लाख ६० हजार ६५४ विद्यार्थिनी आहेत. यात मुंबई विभागातून तीन लाख ७६ हजार ८९२ तर कोकण विभागातून ४२ हजार ७५७ विद्यार्थी बसणार आहेत. राज्यातील नऊ विभागीय शिक्षण मंडळाच्या चार हजार ८०२ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. राज्यात दहावीची सुरळीत आणि कॉपीमुक्त होण्यासाठी प्रत्येक मंडळाने प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथके, विशेष भरारी पथके आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष पथके नेमली आहेत. हॉल तिकिटांमध्ये त्रुटी आढळल्यास त्यावरील दुरुस्ती करण्यासाठी खास पर्यवेक्षक परीक्षा केंद्रावर असतील, अशी माहिती शिक्षण मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी दिली.

March 02, 2014 in मुख्य पान
मुकेश अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती 0

मुकेश अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

index.jpeg..
नवी दिल्ली- रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत . देशातील ७० अब्जाधीशांपैकी अंबानींकडे १८ अब्ज डॉलरची संपत्ती असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच ६८ अब्ज डॉलरचे मालक बिल गेटस श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या स्थानावर कायम आहेत.
चीनमधील हुरुन या कंपनीने जाहीर केलेल्या यादीनुसार, भारताने श्रीमंत व्यक्ती असणा-या देशाच्या यादीत पाचवे स्थान मिळवले आहे. अंबानी जागतिक यादीत ४१ व्या स्थानावर आहेत. अंबानी यांच्यापाठोपाठ १७ अब्ज डॉलरचे मालक असलेले डॉ. लक्ष्मी मित्तल हे जगातील ४९वे अब्जाधीश आहेत.१३.५ अब्ज डॉलरची संपत्ती असलेले सन फार्मास्यूटिक उद्योगाचे दिलीप संघवी आणि विप्रोचे अझिम प्रेमजी हे दोघेही ७७ व्या स्थानावर आहेत. गतवर्षी डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्याने या यादीत भारतीय व्यक्तींची संख्या कमी झाल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

March 02, 2014 in देश-विदेश
विना अनुदानित सिलेंडरच्या दरात ५३ रुपयांने कपात 0

विना अनुदानित सिलेंडरच्या दरात ५३ रुपयांने कपात

images.jpeg10
नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गॅसच्या किंमती उतरल्याने विना अनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात ५३.५० रुपयांने कपात करण्याचा निर्णय तेल कंपन्यांनी घेतला आहे. स्वयंपाकाचा १४.२ किलो वजनाचे अनुदानित १२ सिलेंडर नंतर खरेदी केल्यानंतर दिल्लीतील गॅसधारकांना पुढील प्रत्येक सिलेंडर १,१३४ ऐवजी आता १,०८० रुपयाला मिळेल.
या वर्षाच्या सुरुवातीलाच विना अनुदानित गॅसच्या किंमतीमध्ये २२० रुपये अशी भरमसाठ वाढ करण्यात आली होती. त्यात एक फेब्रुवारी रोजी विना अनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात १०७ रुपयांने कपात करण्यात आली होती. त्यापूर्वी एका सिलेंडरसाठी १,२४१ रुपये मोजावे लागत होते. मात्र फेब्रुवारी महिन्यात १,२४१ ऐवजी १,१३४ रुपये दर झाला होता. त्यात आता आणखी ५३ रुपये ५० पैशांनी दर कमी केले आहेत. यामुळे गॅस सिंलेंडरचे दर कमी होत असल्याने महागाईने होरपळत चाललेल्या सर्वसामान्य नागरिकांना यामुळे दिलासा मिळणार आहे. दिल्लीतल्या इंडियन ऑईल कंपनी, हिंदूस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन या तीन प्रमूख इंधन कंपन्या महिन्याच्या पहिल्या दिवशी इंधनाच्या आंतरराष्ट्रीय किंमतीचा आढावा घेऊमन आपल्या किंमती ठरवत असतात.गेल्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किंमती कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे पेट्रोलियम मंत्रालयातर्फे सांगण्यात आले. मात्र आता विना अनुदानित गॅस सिलेंडरचे दर सुमारे दिडशे रुपयाने कमी झाले आहेत.

March 02, 2014 in अर्थ