पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for March 6th, 2014

विवाहेच्छुक मुला-मुलींसाठी ‘मॅट्रिमोनी फॉर अॅडॉप्टेड’

‘कम्युनिकेशन सपोर्ट’ व डिजिटल एम्पॉवरमेंट फाउंडेशनचा प्रयोग
पुणे – दत्तक घेतलेल्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न कसे होणार, हा अनेक पालकांना सतावणारा प्रश्न आता चुटकीसरशी सुटणार आहे. खास दत्तक विवाहेच्छुक मुला-मुलींसाठी ‘मॅट्रिमोनी फॉर अॅडॉप्टेड’ या वेबसाइटची निर्मिती करण्यात आली.कम्युनिकेशन सपोर्ट फाउंडेशन आणि डिजिटल एम्पॉवरमेंट फाउंडेशन या दोन संस्थांनी मिळून या वेबसाइटची निर्मिती केली आहे. दत्तक विवाहेच्छुक मुलांच्या विवाहाचा प्रश्न सोडविण्यासाठीच्या या अभिनव प्रकल्पाची माहिती प्रदीप दीक्षित आणि रवी घाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
‘जागतिकीकरण, महिला सक्षमीकरण अशा मुद्द्यांवर चर्चा करणारा समाज दत्तक मुलाचे किंवा मुलीचे स्थळ आल्यावर एक पाऊल मागे जाऊन विचार करू लागतो. लग्नाच्या बाजारात दत्तक मुलींच्या संदर्भात हा प्रश्न अधिकच गंभीर आहे. दत्तक असल्याने विवाह होत नसल्याचे अनेक मुलांच्या बाबतीत पाहण्यात आल्याने हा प्रश्न सोडविण्यासाठी अशा वेबसाइटची निर्मिती होणे ही काळाची गरज होती. ही गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे,’ असे दीक्षित म्हणाले. देशात विवाह नोंदणीच्या असंख्य वेबसाइट इंटरनेटवर उपलब्ध आहेत. मात्र, केवळ दत्तक विवाहेच्छुकांसाठीची ही पहिली वेबसाइट असल्याचा दावा दीक्षित आणि घाटे यांनी केला. दत्तक घेण्याविषयी जागृती वाढत असल्याचे सांगून, दीक्षित यांनी या वेबसाइटमुळे जगभरातील दत्तक विवाहेच्छुक एका व्यासपीठावर येण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. http://matrimonyforadopted.org/ हा वेबसाइटचा पत्ता आहे.

March 06, 2014 in मुख्य पान

कसारा घाटात अपघातात ३ ठार

इगतपुरी – मुंबई आग्रा महामार्गावर ठाणे येथून नाशिककडे जाणारी महिंद्र पिकअप दरीत कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. मृतांमध्ये एक वर्षीय बालकाचा समावेश आहे. जखमींना नाशिक जिल्हा रुग्‍णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
ठाणे येथून महिंद्र अॅन्ड महिंद्रा कंपनीची नवी कोरी पिकअप गुवाहटी (आसाम) कडे जात होती. कसारा घाटात वाहनचालकाचा ताबा सुटल्याने संरक्षक भिंत तोडून पिकअप १०० ते १५० फूट दरीत कोसळली. या अपघातात कसारा येथील कामडी पाड्यावरील सखाराम वले (वय ४५), चंद्रभागा तुकाराम सदगीर (वय ५५) आणि एक वर्षीय बालकाचा (नाव समजले नाही) मृत्यू झाला. सुनिता दत्तू बेनके (वय 3५), गणेश गायकवाड राहणार बऱ्हाणपूर, खंडू बांगर (वय ५५) खर्डी , वाहनचालक हबीब शेख (वय २६) राहणार चाळीसगाव, भास्कर राठोड (वय ४८) राहणार ढेकू तालुका नांदगाव, आरती वले (वय ४०) कामडीपाडा, कसारा हे प्रवासी अपघातात जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच मुंबई नाशिक एक्स्प्रेस वे लिमिटेड कंपनीच्या कर्मचा-यांनी जखमींना स्ट्रेचरच्या साहाय्याने बाहेर काढून इगतपुरी शहरातील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. गंभीर जखमींना नाशिक जिल्हा रुग्‍णालयात हलविण्यात आले.

March 06, 2014 in देश-विदेश

टीईटीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी

मुंबई – राज्यातील शिक्षणाची गुणवत्ता आणि दर्जा वाढविण्यासाठी पहिल्यांदाच १५ डिसेंबर २०१३ रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल शुक्रवारी, सात मार्च रोजी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या http://mahatet.in या संकेतस्थळावर दुपारी तीन वाजता ऑनलाइन जाहीर होईल अशी माहिती परीक्षा परिषदेचे आयुक्त व्ही.बी. पायमल यांनी ‘प्रहार’शी बोलताना दिली.
टीईटी परीक्षेचा निकाल १५ फेब्रुवारीपर्यंत लागणे अपेक्षित होते, परंतु परीक्षा परिषदेकडून गेल्या काही दिवसांमध्ये तारीख पे तारीख करण्यात आली. यामुळे या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांमध्ये निकाल कधी लागेल यासाठीची उत्सुकता निर्माण झाली होती. राज्यात घेण्यात आलेल्या टीईटीची पहिलीच परीक्षा सहा लाख २१ हजार ११५ शिक्षक उमेदवारांनी दिली आहे. राज्यातील शाळांमध्ये नव्याने नियुक्त होणा-या या शिक्षकांच्या गुणवत्तेची कसोटी म्हणून टीईटीची ही घेण्यात आलेली पहिलीच परीक्षा आहे. यामुळे या परीक्षेत किती शिक्षक यशस्वी होतील याबाबतची उत्सुकता या शिक्षकांसोबतच सर्व शिक्षणक्षेत्रात निर्माण झाली आहे.
टीईटीच्या निकालासाठी थोडा उशिरा झाला असला तरी त्यासाठीची पूर्ण तयारी करण्यात काही अडचणी होत्या. टीईटीचा निकाल परिषदेच्या या संकेतस्थळावर उपलब्ध होणार असल्याने त्याचे वेळी गुणपत्रिकेसंदर्भातील माहितीही उमेदवारांना उपलब्ध असेल. गुणपडताळणी अथवा काही शंका असल्यास त्यासाठीचीही सर्व माहिती टीईटीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येणार आहे.

March 06, 2014 in महाराष्ट्र

आपच्या १४ कार्यकर्त्यांना अटक

नवी दिल्ली – भाजपच्या नवी दिल्लीतील राष्ट्रीय मुख्यालयाबाहेर आप आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी दिल्ली पोलिसांनी प्राथमिक तक्रार दाखल करुन, आपच्या चौदा कार्यकर्त्यांना अटक केली आहे. पत्रकारितेतून राजकरणात प्रवेश करणारे आशुतोष आणि शाझिया इल्मी यांच्या विरोधातही तक्रार दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पार्लमेंट स्ट्रीट पोलिस स्टेशनमध्ये बुधवारी रात्री हा गुन्हा दाखल करण्यात आला. दंगल, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, सरकारी कर्मचा-यांच्या कामकाजात अडथळा आणणे या कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी सुरुवातीला ३३ जणांना ताब्यात घेतले होते त्यातील १४ जणांना अटक करण्यात आली.आपचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल यांना बुधवारी गुजरातमध्ये रोड शो करण्यापासून रोखण्यात आले. त्याच्या निषेधार्थ आपचे दिल्लीतील कार्यकर्ते भाजप मुख्यलयाबाहेर प्रदर्शन करत होते. त्यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. केजरीवाल यांना रोखण्याचे लखनऊमध्येही हिंसक पडसाद उमटले. तेथेही दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.या हाणामारीमध्ये एकूण २८ जण जखमी झाले. यात आपचे तेरा आणि भाजपचे दहा कार्यकर्ते असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटक केलेल्या आरोपींनी गुरुवारी दुपारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

March 06, 2014 in देश-विदेश

काँग्रेस गरीबांचा पक्ष – राहुल गांधी

भिवंडी- देशात मनरेगा, अन्नसुरक्षा विधेयक, लोकपाल विधेयक मंजूर करुन काँग्रेसने गरीवांना आधार दिल्याचे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी भिवंडी येथे झालेल्या जाहीर सभेत सांगितले. आपला पक्ष श्रीमंतांचा नाही तर गरीबांचा आहे. देश पुढे न्यायचा असेल तर गरिबांचे ऐकावे लागेल, महिलांनाही आता मागे न रहाता प्रत्येक बाबतीत पुढाकार घ्यावा लागेल, असे मतही राहुल यांनी यावेळी व्यक्त केले.
काँग्रेसचे विचार या देशाच्या मातीत रुजले आहेत. काँग्रेसनेच देशातील गरीबांचा विचार करुन देशात मनरेगा, अन्नसुरक्षा विधेयक, लोकपाल विधेयक मंजूर केले. या सगळ्या उपायांमुळे भारतातील गरीबांना काँग्रेसने आधार दिल्याचे राहुल म्हणाले.
महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल हे काँग्रेसचे नेते होते, त्यांची आरएसएस संदर्भात काय मते होती हे सगळ्यांना माहित आहे, परंतु भाजपाचे नेते लोकांची दिशाभूल करत असल्याचे गांधी म्हणाले. ज्या लोकांनी गांधीजींची हत्या केली, त्याच संघाचा पाठींबा असलेल्या भारतीय जनता पार्टीचे लोक आज गांधीजींच्या नावाचा वापर करत असल्याची टिकाही राहूल गांधी यांनी केली.

March 06, 2014 in देश-विदेश

आॅटो चालकाच्या खूनातील आरोपीस अटक

यवतमाळ – मादणी बोरगाव येथील आॅटो चालकाच्या खून प्रकरणातील एका आरोपीस शहर पोलिसांनी अटक केली. जिल्हा न्यायालयात हजर करून आरोपीची ९ मार्च पर्र्यंत पोलीस कोठडी मिळविली.
अविनाश देवराव धोटे (४५) रा. सुरभी नगर पिंपळगाव असे आरोपीचे नाव आहे. २४ मार्च रोजी मध्यरात्री दशरथ मारोती मदने (२३) रा. मादणी (बोरगाव) याचा गळा आवळून खून झाला होता. दुसºया दिवशी सकाळी उकंडा शिवारातील जंगलात त्याचा मृतदेह आढळला. यावेळी घटनास्थळावर विषारी औषधीची बॉटल व अन्य साहित्य आढळून आले होते. अनैतिक सबंधातून या युवकाचा खून केल्याची चर्चा आहे. दरम्यान आज शहर पोलिसांनी सदर आरोपीला अटक केली. जिल्हा न्यायालयात हजर करून सदर आरोपीची ९ मार्च पर्र्यंत पोलीस कोठडी मिळविली. अधिक तपास शहरचे ठाणेदार अरुण आगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक सि.पी. कडू करीत आहे.

आचार संहितेचे कटाक्षाने पालन करा – जिल्हाधिकाºयांचे निर्देश

यवतमाळ – निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१४ ची घोषणा केली आहे. या निवडणूक कालावधीसाठी आदर्श आचार संहिता जारी करण्यात आली आहे. या आचार संहितेमधील मार्गदर्शक तत्वांचे सर्वांनी कटाक्षाने पालन करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी आज संबंधित अधिकाºयांना दिलेत. निवडणूक कालावधीमध्ये आचार संहितेचे उल्लंघन होवू नये तसेच गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघात ३ ते ४ भरारी पथकांची, बैठे पथकांची स्थापना करण्यात येत आहे.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघाची निवडणूक १० एप्रिल रोजी होत असून १६ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या काळात आचार संहिता लागू झाली आहे. याच पाश्वर्भुमिवर जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी आज गुरुवारी निवडणूकीसंबंधी असलेले नोडल आॅफीसर तसेच जिल्हास्तरीय अधिकाºयांची बैठक घेतली. यावेळी मुख्य कायर्कारी अधिकारी मल्लीनाथ कलशेट्टी, अतिरीक्त जिल्हाधिकारी इंद्रसेन तिटकार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नरेंद्र फुलझेले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, उपविभागीय अधिकारी भागवत डोईफोडे, आदींची बैठकीला प्रमुख उपस्थिती होती. निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेमध्ये अनेक परिवर्तन केल असून लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या खर्चावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. मतदारांनी निर्भय व नि:पक्षपातीपणे मतदान करण्यासाठी पुढे आले पाहिजे यादृष्टीने जिल्ह्यात मतदार जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. परिणामी १ लाख २३ हजार नवीन मतदारांची भर पडली. निवडणूक कालावधीमध्ये आचार संहितेचे उल्लंघन होवू नये तसेच गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघात ३ ते ४ भरारी पथकांची, बैठे पथकांची स्थापना करण्यात येत आहे. उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तपासणी करण्यासाठी लेखा तपासणी चमू प्रत्येक पथकासोबत राहणार आहे. कोठेही गैरप्रकार निदशर्नास आल्यास त्याचा पंचनामा व व्हिडीओग्रॉफीद्वारे चित्रीकरण करण्यात येणार आहे. या निवडणूक प्रक्रियेत नोडल आॅफीसर, सेक्टर आॅफीसर, व अन्य संबंधित अधिकाºयांनी दक्ष रहावे. अशा सुचनाही जिल्हाधिकाºयांनी यावेळी केल्या. आचार संहितेच्या अनुषंगाने सरकारी कार्यालयाच्या, नगर पालीकेंच्या अधिकारातील होर्डिंगचा जाहिरातीसाठी वापर होवू नये याची काळजी घेण्यात यावी. निवडणुकीसाठी अधिग्रहित करण्यात येणारी वाहने सुस्थितीत पाठवावी. ज्या कार्यालयांनी निवडणूक कामासाठी कमर्चाºयाची यादी अद्याप सादर केली नाही ती यादी तात्काळ सादर करण्यात यावी. कोणत्याही अधिकारी कमर्चाºयास दिघर्काळासाठी रजा मंजूर करु नये,पुर्व परवानगी शिवाय मुख्यालय सोडू नये असेही जिल्हाधिकाºयांनी यावेळी सांगितले. या बैठकीत अतिरीक्त जिल्हाधिकारी इंद्रसेन तिटकारे यांनी आचार संहितेबाबत माहिती दिली.