पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for March 1st, 2014

मनसे

मनसे

pepar add

March 01, 2014 in मुख्य पान
आपत्कालीन वैद्यकीय सेवा : आरोग्य क्षेत्रातील लोकाभिमूख व क्रांतीकारी उपक्रम- मुख्यमंत्री 0

आपत्कालीन वैद्यकीय सेवा : आरोग्य क्षेत्रातील लोकाभिमूख व क्रांतीकारी उपक्रम- मुख्यमंत्री

MNAIMAGE86420cmaaa

मुंबई : राज्याच्या आरोग्य क्षेत्रातील आपत्कालीन वैद्यकीय सेवा हा उपक्रम नाविन्यपूर्ण असून जनतेच्या सेवेसाठी विनाशुल्क असणारा लोकाभिमुख व क्रांतीकारी उपक्रम आहे, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
आरोग्य विभागातर्फे आज पासून आपत्कालीन वैद्यकीय सेवांतर्गत 937 अत्याधुनिक रुग्णवाहिका राज्यभरात सुरु करण्यात आल्या असून या रुग्णवाहिकांना मुख्यमंत्री श्री.चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा, आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी, राज्यमंत्री फौजिया खान यांच्या हस्ते शनिवारी हिरवा झेंडा दाखवून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. येथील मरीन लाईन्स येथे हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, आपत्कालीन वैद्यकीय सेवाही भारतातील पहिली अत्याधुनिक आरोग्य सेवा असून या उपक्रमातील रुग्णवाहिका जागतिक दर्जाच्या आहेत. या सेवेत प्रशिक्षित डॉक्टर, ॲटोमॅटीक व्हेहिकल लोकेशन टेक्नॉलॉजी (इव्हीएलटी) उपकरणांचा समावेश आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, जीवन अमृत योजनांच्या पाठोपाठ राज्यातील जनतेला आरोग्य क्षेत्रातील अजून एका अभिनव योजनेची आम्ही भेट देत आहोत. आपत्कालीन परिस्थितीत 108 क्रमांक फिरविल्यास 20 ते 30 मिनिटात सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध होऊन रुग्णांचा जीव वाचविण्यास मदत होणार आहे, असेही श्री.चव्हाण यांनी यावेळी सांगितले. आरोग्य मंत्री म्हणाले, राज्य शासनाने सामान्यांच्या सेवेसाठी अजून एक अभूतपूर्व योजना अंमलात आणली आहे. गंभीर आजारात आणि आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ वैद्यकीय सेवेची उपलब्धता या योजनेमुळे होणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत शहरी भागात केवळ 20 मिनिटात तर ग्रामीण भागात 30 मिनिटांपर्यंत ही सेवा रुग्णांपर्यंत पोहोचणार आहे, या सेवेसाठी पुणे येथे मध्यवर्ती कॉल सेंटर कार्यरत असून त्याद्वारे रुग्णवाहिकांना संदेश देण्यात येतो, असेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
मरीन लाईन्स येथे झालेल्या भव्य सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुमारे 100 पेक्षा अधिक रुग्णवाहिकांना हिरवा झेंडा दाखवून या रुग्णवाहिका राज्यभरात पाठविण्यात आल्या. ढोल-ताशे, तुतारीच्या निनादात या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री श्री.चव्हाण, आरोग्यमंत्री श्री.शेट्टी, आरोग्य राज्यमंत्री श्रीमती फौजिया खान यांनी यावेळी रुग्णवाहिकांची पाहणी केली.  कार्यक्रमास खासदार प्रिया दत्त, मुख्य सचिव जे.एस.सहारिया, माजी मुख्य सचिव जयंत कुमार बाँठीया, आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती सुजाता सौनिक, सचिव श्रीमती मीना लोचन, ग्रामीण आरोग्य अभियानाचे प्रकल्प संचालक डॉ.गोविंद राज आदींसह मान्यवर उपस्थित होते.

March 01, 2014 in मुख्य पान

पाटापांगरा जंगला सापडलात महिलेचा सांगाडा

यवतमाळ – एका अज्ञात महिलेचा सांगाडा पाटापांगरा जंगलात सापडल्याने खळबळ उडाली आहे. २५ दगडाने ठेचून महिलेचा खून केला असून  अजुनही ओळख पटली नाही. या महिलेची हत्या कोणी व का केली हे शोधण्याचे आवाहन पारवा पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
घाटंजी तालुक्यातील पाटापांगरा जंगलातील नाल्यात एक मृतदेह आढळल्याची माहिती झटाळा येथील पोलीस पाटील लक्ष्मण गेडाम यांनी  पारवा पोलिसांना दिली. त्यावरून पारवा पोलिसांनी २८ फेबु्रवारी दुपारी २ वाजता घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यावेळी ३५ ते ४० वर्षीय वयोगटातील महिलेच्या अंगावर मोठमोठे २० ते ३० दगड असल्याचे दिसून आले. तर संपूर्ण शरीराचे मास गळल्याने फक्त शरीराचा सांगाडा शिल्लक होता. त्यावरून या महिलेचा एक महिन्यापूर्वी खून झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. मृतक महिलेने गुलाबी रंगाची साडी परिधान केली असून घटनास्थळापासून काही अंतरावर तोडलेले लाकुड, पाण्याची बॉटल, चप्पला पडून होत्या. कोण्यातरी लाकुड तोडणाºया व्यक्तीने सदर महिलेचा खून केला असावा अशी शंका व्यक्त होत आहे. जंगलात गेलेल्या एका व्यक्तीला दुर्गंधी आल्याने ही घटना उजेडात आली. डॉक्टरांना घटनास्थळी पाचारण करून शवविच्छेदन केले. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. ही महिला कोण, तीचा खून कोणी व का केला हे शोधण्याचे आवाहन पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. याप्रकरणी पारवा पोलिसांनी अज्ञात  मारेकºयाविरूद्घ खुनाचा गुन्हा दाखल केला असून ठाणेदार संजय शिरभाते तपास करीत आहे.

पाण्यासाठी महिलेला पेटविले

यवतमाळ – पाणी भरण्याच्या कारणावरून तीन जणांनी महिलेच्या अंगावर रॉकेल टाकुन पेटवून दिल्याची घटना शनिवारी झाडकिन्ही येथे घडली. २२ फेबु्रवारी रोजी कविता नामक महिला पाणी भरत होती. अशातच  गावातीलच हरिचंद्र पैकु पाटील (४०) व अन्य दोन व्यक्तीने या महिलेसोबत वाद केला. त्यानंतर तीच्या अंगावर रॉकेल टाकुन पेटवून दिले व जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ही महिला गंभीररित्या भाजली असून तीच्यावर वसंतराव नाईक महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहे. जिल्ह्यात उन्हाळ््यात पाणी टंचाई निर्माण होऊन वाद होतांना दिसतात. मात्र यावर्षी जोरदार पाऊस झाला असून  भविष्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाही. तरीही फेबु्रवारी महिन्यात पाणी भरण्याच्या कारणावरून सदर महिलेला पेटवून दिल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची तक्रार महिलेचे वडील मोतीराम भाऊराव चौधरी (६५) यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळंब पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास ठाणेदार बाळु गायगोले करीत आहे.

वनरक्षकासोबत हमरीतुमरी

यवतमाळ –  माथनी येथील अभयारण्यात दोन जणांनी वनरक्षाकासोबत हमरीतुमरी केल्याची घटना  शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता घडली.
अशोक दिगांबर काळे (४४) रा. मादनी हे वनविभागात वनरक्षक म्हणून कार्यरत आहे. २८ फेबु्रवारी रोजी सायंकाळी ५ वाजता ते माथनी बिट अभ्यारण्यात कर्तव्य बजावत होते. अशातच शंकर भिमराव उरवते (२९) रा. पुनर्वसन अन्य एकाने सदर अभयारण्यात येऊन गेट पासचे कारणावरून वनरक्षकासोबत वाद केला. त्यानंतर अंगावर जाऊन धक्का बुक्की करून हमरी तुमरी केली. तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी पारवा पोलिसांनी दोन आरोपीविरूद्घ गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.

चेहरे ओळखा स्पर्धा आंगलट , तरुणीची लाखाने फसवणूक

वणी – दुरचित्रवाणीवरील चेहरा ओळखा स्पर्धेत भाग घेणाºया येथील  तरुणीस बक्षीस जिंकल्याचे आमिष दाखवत बँकेच्या विविध  खात्यात वेळोवेळी पैशाची भरणा करण्यास सांगून १ लाख रुपयाने फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे़शहरातील दामले फैल परिसरात राहणाºया राणी मिलींद पथाडे ही तरुणी तीन महिन्यापूर्वी आपल्या घरी दुरचित्रवाणीवर चेहरे ओळखा ही स्पर्धा बघत होती़ तीने चेहरे ओळखल्यावर टिव्हीस्क्रिनवर आलेल्या क्रमांकावर संदेश पाठविला. तीला तात्काळ केदार शर्मा नामक इसमाचा (८००२१४३२९४) भ्रमणध्वनीवरुन बक्षीस जिंकल्याचा फोन आला आणि  स्पर्धेत १२ लाख ८० हजार रुपये जिंकल्याचे सांगीतले़ या घटनेमुळे सदर तरुणी चांगलीच आनंदीत झाली व तीला ही रक्कम   मिळण्याकरीता स्टेट बँकेचे खाते क्ऱ२०१६८०३६३८९ देवून ९ हजार रुपयाचा भरणा करण्यास सांगीतले़ सदर तरुणीने दुसºया दिवशी बँकेत बक्षीस मिळण्याच्या उद्देशाने रक्कम भरली. पुन्हा सदर इसम वेळोवेळी वेगवेगळे खाते क्रमांक देवून विविध कारणे सांगून पैशाचा भरणा करण्यास सांगत होता. त्यावरुन सदर तरुणीने तब्बल १ लाख ६ हजार ४०० रुपयाचा भरणा केल्यावरही बक्षीसाची रक्कम मिळत नसल्याने तरुणी हताश झाली़ आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्याने तरुणीने पोलीस स्टेशन गाठून केदार शर्मा नामक इसमाच्या विरोधात  तक्रार दिली.  त्यावरून वणी पोलीसांनी भादवी कलम ४२०, ६६(अ) माहिती व तंत्रज्ञान अधिनियमा अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे़

नौकरीचे आमिष दाखवून फसवणूक

वणी –  चिखलगांव हद्दीतील मेघदुत कॉलनी मधील एका बेरोजगार युवकाला परदेशात नौकरी लावून देण्याचे आमिष दाखवून गुजरात मधील रेनॉल्ड ट्रव्हल्स कंपनीने ७२ हजार रुपयाने फसविल्याची घटना उघडकीस आली. कुलविंदरसिंग अजितसिंग सैनी या युवकाने परदेशात नौकरी बाबतची जाहिरात वाचून त्यावरील दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधला.  अहमदाबाद गुजरात येथील रेनॉल्ड ट्रव्हल्स कंपनीचे संचालक आऱपटेल यांनी इंग्लंडमध्ये खाजगी नौकरी लावून देण्याचे सांगीतले़ परदेशात नौकरी मिळणार या आशेवर सदर तरुण असतांना त्याला बँक आॅफ बडोदा या बँकेचा खाते क्रमांक देवून वेळोवेळी पैशाचा भरणा करण्यास सांगीतले़ यावरुन सदर बेरोजगार युवकाने  २१ जून २०१३ पासून आज पर्यंत विविध खात्यात ७२ हजार ५०० रुपयाचा भरणा केला़ मात्र त्याला नौकरी दिली नाही या बाबत सदर कंपनीचे संचालक आऱपटेल यांना नौकरी बाबत विचारणा केली असता टोलवाटोलवीची उत्तरे मिळाल्याने आपली फसगत झाल्याचे लक्षात येवून त्याने या बाबत वणी पोलीसात रितसर तक्रार दाखल केली असून ट्रव्हल्स कंपनीच्या संचालकावर भादवी कलम ४२०,४६८, ४७१ अन्वये गुन्हा नोंद केला आहे़

फाशीची शिक्षा रद्द करण्याचा निकाल अवैध 0

फाशीची शिक्षा रद्द करण्याचा निकाल अवैध

index
नवी दिल्ली- दया अर्जावर निर्णय घेण्यास विलंब झाल्याने फाशीची शिक्षा जन्मठेपेत रुपांतर करा-या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर केंद्र सरकारने पूनर्विचार याचिका दाखल केली आहे. दयेच्या अर्जावर निर्णय घेण्यास विलंब झाल्याने फाशीची शिक्षा रद्द करून त्याचे रुपांतर जन्मठेपेत करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अवैध असल्याचे केंद्राने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने १५ कैद्यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत रुपांतर केली. या कैद्यांमध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेक-यांचाही समावेश होता.या महत्त्वाच्या विषयावर घटनात्मक पीठाने निर्णय द्यायला हवा. सर्वोच्च न्यायालयाच्या पीठाने दिलेला निकाल अवैध आणि दस्ताऐवजातील त्रूटींमुळे हा निकाल दिला गेला आहे. घटनेच्या कलम २१ नुसार (जगण्याचा हक्क) आरोपींच्या बाजूने निकाल दिला गेला आहे. मात्र, घटनेच्या कलम १४५ मधील तरतुदी लक्षात घेऊन पाच न्यायाधीशांच्या पीठाने याबाबत सुनावणी करणे गरजेचे आहे.

March 01, 2014 in मुख्य पान
तेलंगण विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी, आंध्रमध्ये राष्ट्रपती राजवट 0

तेलंगण विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी, आंध्रमध्ये राष्ट्रपती राजवट

president-Pranab-Mukherjee-e1380969867350
नवी दिल्ली- राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आंध्रप्रदेश पूर्नरचना विधेयक२०१४ विधेयकावर स्वाक्षरी केली. यामुळे तेलंगण राज्य निर्मितीची औपचारीकता पूर्ण झाली आहे. या विधेयकाला संसदेच्या दोन्ही सभागृहाने मंजूर दिली होती. याच बरोबर राष्ट्रपतींनी आंध्र प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे.
संसदेने मंजूर केलेल्या विधयेकावर स्वाक्षरी केल्यानंतर देशातील २९वे राज्य म्हणून तेलंगण राज्य निर्मितीची प्रक्रिया पूर्ण सुरु होईल. नव्या राज्यामुळे आंध्र प्रदेशमध्ये १३ जिल्हे राहतील तर तेलंगण राज्यात दहा जिल्हे असतील. तेलंगण राज्य निर्मितीवेळी केंद्र सरकारने सिमांध्रला विशेष पाच वर्ष विशेष राज्याचा दर्जा देण्याची घोषणा केली होती.
दरम्यान, तेलंगण राज्य निर्मितीला संसदेने मंजुरी दिल्यानंतर काँग्रेसचे मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांनी १९ फेब्रुवारी रोजी राजीनामा दिला होता. यासंदर्भात केंद्र सरकारने शुक्रवारी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली होती. त्याला राष्ट्रपतींनी मंजूरी दिली.

March 01, 2014 in मुख्य पान
प्रसिध्द चित्रकार प्रफुल्ला डहाणूकर यांचे निधन 0

प्रसिध्द चित्रकार प्रफुल्ला डहाणूकर यांचे निधन

prafuula
मुंबई – आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या प्रसिध्द चित्रकार प्रफुल्ला डहाणूकर यांचे शनिवारी सकाळी मुंबईच्या जसलोक रुग्णालयात निधन झाले. त्या ८० वर्षांच्या होत्या.
गेल्या काही दिवसांपासून डहाणूकर आजारी होत्या. अखेर आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. गोव्यात जन्मलेल्या डहाणूकर यांची संपूर्ण कारर्कीद मुंबईत घडली.मुंबईच्या जे.जे.स्कूल ऑफ आर्टमधुन १९५५ साली त्यांनी चित्रकलेची पदवी घेतली. त्या बॅचच्या त्या सुवर्णपदक विजेत्या पदवीधर होत्या. १९६१ साली फ्रान्स सरकारने त्यांना फाईन आर्टच्या पुढील शिक्षणासाठी शिष्यवुत्ती देऊन गौरवले होते.चित्रकलेतील कौशल्यासाठी प्रफुल्ला डाहणूकर यांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार मिळाले होते. जे.जे. आर्ट स्कूलमधून पदवीघेऊन बाहेर पडल्यानंतर काही दिवसातच प्रफुल्ला डहाणूकर यांना बॉम्बे आर्ट सोसायटीच्या वार्षिक चित्रप्रदर्शनात रौप्यपदक मिळाले. भारतासह संपूर्ण जगात वेगवेगळया चित्रप्रदर्शनांमध्ये त्यांच्या चित्रांची दखल घेतली गेली.

March 01, 2014 in मुख्य पान
२०२९ पर्यंत मानवाला मागे टाकणार संगणक! 0

२०२९ पर्यंत मानवाला मागे टाकणार संगणक!

1
पीटीआय –  सध्या संगणक युग आहे. आपल्या जीवनात हे संगणक इतके आवश्यक झाले आहेत की, अगदी साधी कामेसुद्धा आपण संगणकाद्वारे करून घेतो. संगणकावरील या प्रमाणाबाहेरील परावलंबित्वामुळे भविष्यात हेच संगणक मानवाला गुलाम करून संपूर्ण जगावर अधिराज्य गाजवतील अशी भीती फार पूर्वी व्यक्त करण्यात येत होती. त्या वेळी काल्पनिक समजल्या जाणा-या या प्रकाराकडे लक्ष वेधणारे अनेक हॉलिवुडपट येऊन गेले. तर काही वर्षापूर्वी भारतातही मानवापेक्षा जास्त ताकदवान असलेल्या रोबोने उडवलेला हाहाकार चित्रपटातून पाहायला मिळाला होता.
या बाबीकडे आपण जास्त गांभीर्याने पाहिलेले नसले तरी आगामी काळात ही भीती खरी ठरण्याची चिन्हे आहेत. त्याला कारणही तसेच आहे. ज्या प्रकारे मानव संगणकाला कृत्रिम बुद्धिमत्ता प्रदान करत आहे व सातत्याने त्याची क्षमता वाढवत जात आहे ते पाहता आगामी १५ वर्षामध्ये मानवाने आपल्या सोयीसाठी बनवलेले संगणक आणि यंत्रमानव मानवालाच मागे टाकणार असल्याचे भाकीत गुगलमधील तज्ज्ञांनी वर्तवले आहे. आगामी २०२९पर्यंत संगणक मानवापेक्षाही अधिक हुशार होणार असून आपण काय बोलत आहोत आणि कोणत्या गोष्टी सांगत आहोत याचेही आकलन संगणकांना सहजपणे होणार आहे, असे भाकीत गुगलमधील अभियंता विभागाचे संचालक रे कुर्झवेल यांनी वर्तवले आहे.फ्लॅटबेड स्कॅनर्स, चेहरा ओळखू शकणारा संगणक प्रोग्राम आणि लिपीचे श्राव्य शब्दात रूपांतर करणारे ‘टेक्स्ट टू स्पीच’ सिंथेसायझर यांसारख्या उपकरणांचा शोध कुर्झवेल यांनी लावला आहे. १९९० मध्ये त्यांनी वर्तवलेले भाकीत महत्त्वाचे होते. त्या काळात त्यांनी असे भाकीत केले होते की १९९८ पर्यंत बुद्धिबळाच्या विश्वविजेत्यालाही पराभूत करणारा संगणक तयार होईल आणि आश्चर्याची बाब म्हणजे १९९७मध्ये आयबीएमच्या डीप ब्लू या संगणकाने गॅरी कॅस्पारोव या बुद्धिबळ विश्वविजेत्याला पराभूत केले. तसेच इंटरनेटचे महत्त्व खूपच जास्त प्रमाणात वाढणार असल्याचे भाकीतही कुर्झवेल यांनी त्या वेळी वर्तवले होते.त्यांनी वर्तवलेले भाकीत मनुष्याप्रमाणेच आता संगणकही आपल्या हुशारीचे दर्शन घडवेल, असे कुर्झवेल यांनी गेल्या वर्षी म्हटले होते. ‘द सिंग्युलॅरिटी’ ही संकल्पना लोकप्रिय करणारे तंत्रज्ञ म्हणून ते ओळखले जातात. मानवाप्रमाणेच बुद्धिमान वर्तन ज्या दिवशी संगणक करू लागतील त्या दिवसापासून त्यांनी मानवाला मागे टाकलेले असेल आणि हा दिवस २०२९ पर्यंत उगवेल, असे त्यांनी म्हटले आहे.

सराफा व्यापारयांच्या घरी धाडसी दरोडा 0

सराफा व्यापारयांच्या घरी धाडसी दरोडा

10
भंडारा – महाशिवरात्रीच्या पूर्वरात्री दरोडेखोरांनी जिल्ह्यातील तुमसर येथील सराफा व्यापारी संजय सोनी-राजपूत यांच्या घरी धाडसी दरोडा टाकला. तिघांची निर्घृण हत्या करून सुमारे पाच कोटी रुपयांचा ऐवज लुटला. यातील सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून काही मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक कैलास कणसे यांनी शुक्रवारी दिली. यातील पाच जण तुमसरातील माता वॉर्डमधील असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, संजय यांना विहीरगावनजीक गाडीतच संपविल्याची कबुली दरोडेखोरांनी दिली आहे.
पोलिस अधीक्षक कैलास कणसे यांनी पत्रपरिषद घेऊन घटनेचा उलगडा केला. संजय सोनी हे सोन्या-चांदीचे ठोक व्यापारी होते. व्यवसाय मोठा असल्याने त्यांना नेहमीच चंद्रपूर, उमरेड, गोंदिया, बालाघाट, नागपूर, शिवणी, वर्धा, बडनेरा, अमरावती अशा विविध भागात जावे लागत होते. त्यासाठी गाडीवर ड्रायव्हर त्यांनी ठेवला होता. तो सुटीवर असल्यास शहरातील ओळखीच्या चालकाला रोजंदारीवर ठेवले जात होते. यात दरोडेखोरांपैकी एक असलेल्या चालकाला दोनवेळा संजय यांच्यासोबत जाण्याचा योग आला. त्यांच्या बोलण्यातून या चालकाला व्यवसायाची कल्पना आली. नागपूर येथील काही मित्रांना त्याने याविषयीची माहिती दिली. दरोड्याची योजना आखली. त्यानुसार नेहमीच्या चालकाच्या सुटीवर जाण्याची वाट पाहणे सुरू होते. २५ फेब्रुवारीला संजय यांनी त्याला गोंदिया, आमगावला दुसऱ्या दिवशी जाण्याविषयीची कल्पना दिली. त्याने लगेच होकार दिला. सहकाऱ्यांना याविषयीची माहितीही दिली. ठरल्यानुसार तो संजय यांच्यासोबत गेला. गोंदियाहून निघताना सहकाऱ्यांना फोन करून तिरोडा तालुक्यातील तुमसर रोडवरील बिरसी फाट्याजवळ राहा, असे सांगितले. त्यानुसार ते बिरसी फाट्यावर आले. सोबत नॉयलॉनची दोरी आणि इतर साहित्य खरेदी केले. गाडी बिरसी फाट्यासमोरून तुमसरकडे वळताच त्यांनी दुचाकीने पाठलाग केला. विहिरगावनजीक शेतशिवारात लघुशंकेसाठी चालकाने गाडी थांबविली. मागून आलेल्या सहकाऱ्यांनी दोरीने संजय यांचा गळा आवळून हत्या केली.
संजय सोनी यांना वाटेतच संपविले
मृतदेह गाडीतच ठेवून तुमसरला आले. त्यांच्याकडे असलेली दुचाकी उपजिल्हा रुग्णालयासमोर ठेवली. गाडीचा आवाज ऐकताच संजय यांच्या पत्नी पुनम व मुलगा दुमिल बाहेर आले. मुलाने गेट उघडली. गाडी पार्क झाली. दरम्यान, दुमिलचे तोंड दाबून संजयला चक्कर येत असल्याने पाणी आणण्यास पूनम यांना सांगितले. हीच संधी साधत सातही जण घरात शिरले. पूनम यांना संशय आल्याने त्यांनी दागिने घेऊन जा, पण आम्हाला सोडून जा अशी विनवणी केली. मात्र गाडी चालकाने पूनम आपल्याला ओळखत असल्याचे सांगितले. नंतर दोघांचाही गळा आवळून खून करण्यात आला. गाडीत असलेला संजयचा मृतदेह काढून वरच्या खोलीत नेऊन ठेवण्यात आला. तिथून रोख व मुद्देमाल घेऊन मिटेवानीमार्गे हिंगणा शेतशिवारात रात्री ३ वाजतादरम्यान गेले. मुद्देमालाची वाटणी करून निघून गेले. या घटनेने तुमसरात खळबळ उडाली. पोलिसांनी तपासासाठी दहा पथके तयार केले. विविध ठिकाणी पाठविण्यात आले. दरम्यान, गाडीचा चालक फरार असल्याचे लक्षात आले. चौकशीनंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.

March 01, 2014 in महाराष्ट्र