यवतमाळ, दि. 13 : बंजारा समाजाचे अजूनही अनेक प्रश्न, समस्या आहे. त्या सोडविण्याला आपला प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. दुर्गम भागात वसलेले तांडे विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांना महसुली दर्जा द्यावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी आपला प्रयत्न राहील, असे महसुल राज्यमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
नागपूर शहर बंजारा समाजाच्यावतीने श्री. राठोड यांचा मॉरिश कॉलेजच्या सभागृहात आयोजित समारंभात सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री आमदार मनोहर नाईक, आ. हरिभाऊ राठोड, माहिती संचालक मोहन राठोड, यवतमाळ जिल्हा परिषदचे सदस्य दिवाकर राठोड, ॲङ अमर चव्हाण, राजाराम जाधव आदी उपस्थित यावेळी सत्काराला उत्तर देतांना श्री. राठोड यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले असून या पुढेही समाजसेवेचे काम आपल्याकडून सुरु राहणार असल्याचे सांगितले. समाजकारण करत असतांना राजकारणाचा विचार केला नाही. लोकांची कामे प्राणिकपणे केली. आताही सर्वसामान्यांचा आवाज शासन दरबारी बुलंद करण्याचे काम करत राहू.बंजारा समाजाचे आजही अनेक प्रश्न, व्यथा आहे. त्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहील. बंजारा समाजाचे पारंपारिक तांडे या समाजाची खरी ओळख आहे. परंतु हे तांडे अद्यापही दुर्लक्षित आहे. तांड्यांमध्ये विकासाची कामे झाली पाहीजे. तांड्याला महसुली दर्जा मिळाला पाहीजे, यासाठी जातीने लक्ष घालणार आहे, असे श्री. राठोड पुढे बोलतांना म्हणाले.यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना माजी मंत्री आ. मनोहर नाईक यांनी संजय राठोड यांनी बंजारा समाजाच्या विकासासाठी करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले. समाजाच्या कल्याणासाठी खऱ्या अर्थाने काम करणारा कार्यकर्ता असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी आ. हरिभाऊ राठोड, प्रा. मोहन चव्हाण, ना.मा. जाधव यांचेही भाषणे झाली. यावेळी संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून समावेश झाल्याबद्दल शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला. तसेच मनोहर नाईक व हरिभाऊ राठोड यांचाही यावेळी सत्कार झाला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. लक्ष्मण राठोड यांनी केले तर आभार टी.एन. चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी राजू चव्हाण, मनोज राठोड, निहाल राठोड, प्रवीण राठोड, प्रा. सुजित चव्हाण, कुंदन शेरे, दिनानाथ वाघमारे, मुंकुंद आडेवार, एकनाथ पवार, प्रा. वसंत पवार यांनी सहकार्य केले.
Archive for December 13th, 2014
0
तांड्याला महसुली दर्जा देण्यासाठी प्रयत्न करु – संजय राठोड
0
पत्नीने केला दारुड्या पतीचा खून

यवतमाळ,दि. १३ (प्रतिनिधी) – दारूने अनेककांचे संसार उद्घवस्त झाले आहे. दारू पिऊन येणाºया पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीनेच कुºहाडीने खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री पार्डी येथे घडली. याप्रकरणी वडकी पोलिसांनी आरोपी महीलेला अटक करून तीन दिवस पोलीस कोठडी मिळविली आहे.
नानाजी मुनेश्वर असे मृतकाचे नाव आहे. तो दररोज दारू पिऊन पत्नी बेबी मुनेश्वर (५५) हिला शारीरीक व मानसिक त्रास देत होता. दारूसाठी पैशाची मागणी करीत तिला मारहाण करीत असायचा, दारू पिऊन आल्यानंतर तिला वेठीस धरायचा. दररोजच्या त्रासाला बेबी कंटाळून गेली होती. अशातच काल रात्री दोघा पती-पत्नीमध्ये वाद निर्माण झाला. यावेळी रागाच्या भरात बेबीने घरातील कुºहाड घेवून नाननाजीच्या डोक्यात सपासप वार केले. यामध्ये गंभिर जखमी झालेल्या नानाजीला नातेवाईकांनी सावंगी मेघे येथील रुग्णालयात दाखल केले. यावेळी त्यानी अपघातामध्ये नानाजी जखमी झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर रात्री सदर इसमाचा मृत्यू झाला. याबाबत संजय मुनेश्वर (३५) रा. पार्डी याने वडकी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरूद्घ भादंवि कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. आरोपीला राळेगाव येथील न्यायालयात हजर करून १५ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळविली. अधिक तपास वडकीचे ठाणेदार अमोल माळवी करीत आहे.
0
नथुराम गोडसे खुनीच -मुख्यमंत्री


नागपूर : नथुराम गोडसे याने महात्मा गांधी यांची हत्या केली आहे. तो खुनीच आहे. त्यामुळे गोडसेचा कुठल्याही प्रकारे गौरव करणो राज्य सरकार खपवून घेणार नाही. असे प्रयत्न करणा:यांवरही कडक कारवाई केली जाईल, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडली.
राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी यासंबंधीचा मुद्दा उपस्थित केला होता. एका संघटनेने गोडसे याचा जन्मदिवस पनवेलमध्ये शौर्य दिवस म्हणून साजरा केला. भारतीय लोकशाहीने ज्या खुन्याला फाशी दिली त्याचा असा गौरव केला जात असेल तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे, असे ते म्हणाले.
0
आक्षेपार्ह वक्तव्यामुळे आव्हाड निलंबित

नागपूर : विधानसभेत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल त्यांना चालू अधिवेशन संपेर्पयत निलंबित करण्यात आले. संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी मांडलेला निलंबनाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
आव्हाड यांनी नाथुराम गोडसेचा जन्मदिवस साजरा करणा:यांवर कारवाई करण्याची मागणी केली असता, मुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांनी त्यावर निवेदन केले. यावर आव्हाड पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करीत असताना गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता मध्येच बोलायला उठले. अध्यक्षांनी त्यांना बसण्यास सूचना केली असता महेता अध्यक्षांनाच ‘तुम्ही थांबा’, असे म्हणाले. हा अध्यक्षांचा अवमान असल्याचा मुद्दा पुढे करीत आव्हाडांसह विरोधी सदस्यांनी नारेबाजी केली. या वेळी महेता व छगन भुजबळ यांच्यात खटके उडाले. या गोंधळात मुख्यमंत्री बोलत असताना आव्हाडांनी जागेवर बसून आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यामुळे त्यांना निलंबित केले गेले. त्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसने सभात्याग केला.
0
अपघातात भय्यू महाराज जखमी

बीड : राष्ट्रसंत भय्यू महाराज यांच्या कारचे टायर फुटल्याने त्यांच्यासह इतर दोघे किरकोळ जखमी झाले. अंबाजोगाई- युसुफवडगाव रोडवरील कळंबनजीक शुक्रवारी रात्री सव्वानऊला हा अपघात झाला. परळी येथे गोपीनाथ गड स्मारकाचे भूमिपूजन आटोपून परतत असताना कळंबनजीक त्यांच्या कारसमोर एक गाय आली. तिला वाचविताना गाडीचे टायर फुटले. या अपघातात भय्यू महाराज यांच्या पायाला किरकोळ जखम झाली.
0
भारत ४८ धावांनी पराभूत

अॅडलेड, दि. १३ – मुरली विजय (९९) व विराट कोहलीच्या (१४१) झुंजार खेळीनंतरही भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ४८ धावांनी पराभव पत्करावा लागला आहे. तळाच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी न केल्याने भारताचा डाव ३१५ धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाच्या लिऑनने ७ बळी टिपत भारताचा डाव गुंडाळला.
ऑस्ट्रेलियाने भारतासमोर जिंकण्यासाठी ३६४ धावांचे आव्हान ठेवले होते. धवन (९) व पुजारा (२१) पटापट बाद झाल्यानंतर मुरली विजय (९९) व विराट कोहली (१४१) यांची जोडी जमली. त्यांनी शानदार खेळ करत भारताला विजयाच्या समीप नेले. कर्णधार म्हणून पदार्पण करणा-या कोहलीने या कसोटीत दोन्ही डावात शतके ठोकली. मुरली विजयही शतकाच्या अगदी जवळ होता. मात्र ९९ धावावंर असताना लिऑनच्या चेंडूवर तो पायचीत झाला. नंतर आलेला रहाणे शून्यावर तर रोहित शर्मा ६ धावांवर बाद झाला. भारतीय फलंदाज एका पाठोपाठ तंबूत परतत असताना विराटने कर्णधाराला साजेसा खेळ करत भारताची बाजू सावरून धरली होती. मात्र तो १४१ धावांवर असताना बाद झाला व त्यानंतर टीम इंडियाचा डाव गडगडला. शमी (५), अॅरॉन शर्मा (१) व इशांत शर्मा( १) हे खेळाडू फक्त हजेरी लावून तंबूत परतले. भारताला विजयासाठी अवघ्या ४८ धावांची गरज असताना भारताचे सर्व फलंदाज बाद झाले व चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने खिशात टाकत १-० अशी आघाडी मिळवली.
0
मोदींनाही अटक करणार का? – ममता बॅनर्जी

कोलकाता- शारदा चिटफंड घोटाळ्यात सीबीआयने राज्याचे परिवहन मंत्री मदन मित्रा यांना अटक केल्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी चांगल्याच खवळल्या असून ‘सहाराप्रमुखांसोबत फोटो आहे म्हणून सीबीआय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही अटक करणार का?’, असा थेट सवाल ममतांनी आज केला.
शारदा घोटाळ्यामुळे ममता विरूद्ध केंद्र सरकार असा उघड संघर्ष सुरू झाला आहे. ममतांनी आजपासून मित्रा यांच्या अटकेविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी तसेच सीबीआयच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्ला केला. ‘सहारा’ घोटाळ्यात सुब्रतो रॉय यांना अटक झाल्यानंतर ‘सहारा’च्या कार्यालयावर छापे टाकण्यात आले. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या डायरीत अनेक बडी नावे आढळून आलीत. सहाराप्रमुखांसोबत पंतप्रधान मोदींचाही फोटो आहे. मग फोटो हा जर गुन्ह्याचा पुरावा ठरत असेल तर सहाराप्रमुखांसोबत फोटो आहे म्हणून पंतप्रधानांनाही अटक व्हायला हवी, अशी मागणी ममतांनी केली.
शारदा चिटफंडच्या एका कार्यक्रमाच्या व्हिडिओ फुटेजमुळे मित्रा अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर ममतांनी मोदींच्या फोटोचा मुद्दा छेडला. शारदा चिटफंडच्या प्रमुखासोबत सीपीएमच्याही अनेक नेत्यांचे फोटो आहेत. त्यांच्यावर का कारवाई करण्यात आली नाही, असा सवालही ममतांनी केला.
राजकारणाच्या आखाड्यात भाजप तृणमूलशी लढू शकत नाही त्यामुळेच सीबीआयला हाताशी धरून आम्हाला काऊंटर केलं जात आहे. भाजपच्या या राजकारणाविरोधात सामान्य जनताही आमच्यासोबत आहे, असे ममता म्हणाल्या. जे सत्तेत आहेत त्यांनी आपल्या मर्यादेत रहायला हवे, असा इशाराही त्यांनी केंद्र सरकारला दिला.
मित्रा मंत्रीपदी कायम!
मदन मित्रा यांना अटक करण्यात आली असली तरी ममतांच्या मंत्रिमंडळात मित्रांचं स्थान कायम राहणार आहे. मित्रा यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या खात्याचा कार्यभार मी पाहणार आहे, असे ममतांनी सांगितले.










