पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for December 25th, 2014

हॅँन्ड ग्रेनेडसह काडतूस आढळले 0

हॅँन्ड ग्रेनेडसह काडतूस आढळले

unnamed
यवतमाळ, दि. २५ – आर्णी येथील अरुणावती नदीपात्रात एका लोखंडी पेटीत जिवंत हॅँन्ड गे्रनेड व काडतूस आढळल्याची घटना आज गुरुवारी दुपारी उघडकीस आली. या प्रकाराने तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली असून सदर बॉम्ब १५ वर्षापूर्वीचे असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
अफसर खान हा युवक आज २५ डिसेंबर रोजी वडील इसाक खान व काका शकूर महेबूब मातनासे यांच्यासह अरुणावती प्रकल्प परिसरात सरपण गोळा करण्यासाठी गेला होता. अशातच अरुणावती नदी पात्राच्या चिखलात लोखंडी पेटी पायाला लागली. त्यांनी पेटी काढून बघितले असता त्यामध्ये जिवंत हॅन्ड ग्रेनेड तीन, ए.के. ४७ रायफल राऊड २३, रिव्हालवर काडतूस ३ दिसून आले. पेटीत साहित्य दिसताच घाबरलेल्या युवकाने वडील व काकाला सांगितले. त्यानी ठाणेदार हनुमंत गायकवाड यांचे निवासस्थान गाठून हे बॉॅम्ब, काडतूस, राऊंड स्वाधीन केले. हे साहित्य बघून ठाणेदारासह पोलीस कर्मचाºयांची भंबेरी उडाली होती. काही वेळात ही वार्ता शहरासह तालुक्यात पसरल्याने खळबळ उडाली. आर्णी तालुका हा नक्षलग्रस्त असून या भागात १५ ते २० वर्षापूर्वी तेथे नक्षलवादी सक्रीय होते. अशातच हॅँड ग्रेनेड व काडतूस आढळल्याने खळबळ उडाली आहे. या पेटीतील बॉम्ब व साहित्य १५ वर्षापूर्वीचे असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली.
साहित्य नक्षलवाद्यांचे असण्याची शकतात- जे.बी.डाखोरे
आर्णी तालुका नक्षलग्रस्त म्हणून परिचित आहे. नांदेडमधील विजयकुमार नामक नक्षलवादी या भागात सक्रीय होता. तसेच त्यांने घातक कारवाई देखील केली होती. ही घातक शस्त्र नक्षलवादी, सिमेवरील सैनिक बाळगतात. त्यामुळे घातक शस्त्र नक्षलवाद्यांचे असू शकतात, असा अंदाज प्रभारी पोलीस अधीक्षक जे.बी.डाखारे यांनी वर्तविला.

 

 

December 25, 2014 in मुख्य पान
कत्तलखान्यात जाणाºया १३ बैलाची सुटका 0

कत्तलखान्यात जाणाºया १३ बैलाची सुटका

IMG-20141225-WA0084
दोन आरोपीस अटक, वाहन जप्त
यवतमाळ , दि. २५ – येथून मिनीडोअरमध्ये कोंबुन कत्तलखान्याकडे जाणाºया १३ बैलाची बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सुटका केली. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करून वाहन जप्त केले.
चालक फिरोज खान जरदुल्ला खान (४१), मोहम्मद साबीर मोहम्मद सुलेमान (४०) रा. मुबारकर नगर आर्णी अशी आरोपींची नावे आहे. एम.एच. ३४/ ए ५०४० क्रमांकाच्या वाहनातून जनावरे कत्तलीसाठी जात असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यावरून त्यानी दाभडी येथील बालाजी जिनींगजवळ सदर वाहन अडवून चालकाला विचारणा केली असता त्याने उडवाउडविचे उत्तर दिले. त्यामुळे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यावरून पोलीस उपनिरीक्ष सचिन भोंडे, दिनेश जाधव, गजानन खांदवे यानी घटनास्थळ गाठून वाहनासह १३ बैल ताब्यात घेतले. तसेच आरोपी फिरोज खान, मोहम्मद साबीर या दोघांना अटक करून गुन्हा दाखल केला.

December 25, 2014 in विदर्भ
 बालकाचा मृत्यू  , डॉक्टरवर गुन्हा 0

बालकाचा मृत्यू , डॉक्टरवर गुन्हा

images
यवतमाळ – डॉक्टरच्या हलगर्जीपणामूळे बालकाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले असून, याप्रकरणी पोलिसांनी शीतल भंडारी या महिला डॉक्टरवर गुन्हा नोंद केला आहे. जानेवारी २०१४ मध्ये सुरेश अढाव (२९) रा. पाथरवाडी यांनी मुलाला भंडारी यांच्या पुसद रुग्णालयात भरती केले होते. चुकीच्या उपचारामुळे बालकाचा मृत्यू झाला होता. याबाबतची तक्रार देण्यात आल्यानंतर चौकशीमध्ये डॉ. शीतल भंडारी यांच्या हलगर्जीपणामुळे बालकाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून, पुसद शहर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

December 25, 2014 in विदर्भ
खातेदारांची नऊ लाखाने फसवणूक 0

खातेदारांची नऊ लाखाने फसवणूक

download
यवतमाळ, दि. २५ – खातेदारांची नऊ लाखाने फसवणूक केल्याची घटना महागाव येथे घडली असून, याप्रकरणी पोलिसांनी कोळते पाटील मल्टी स्टेट सोसायटीच्या अध्यक्षासह १३ जणाविरुद्घ गुन्हे नोंद केले आहे.
श्रीधर कोळते रा. हातगाव यांनी महागाव येथे कोळते पाटील मल्टी स्टेट सोसायटी शाखा उघडली आहे. शाखेत गंतवणूक वाढविण्याच्या दृष्टीने अध्यक्ष व संचालकांनी खातेदारांना व्याजाचे आमिष दाख्विले. इतर बँक व सोसायटीच्या तुलनेत व्याजदर जास्त मिळत असल्याचे पाहून अंनता नागरगोजे (४५) रा. महागाव यांच्यासह असंख्य नागरीकांनी सोसायटीमध्ये गुंतवणूक केली. दरम्यान सोसायटीतून रक्कम काढण्यासाठी गेले असता, त्यांना टाळाटाळ करण्यात आल्याने अध्यक्ष व संचालक मंडळाने आपली फसवणूक केल्याचे खातेदारांच्या लक्षात आले. ८ लाख ९४ हजार ६६० रुपयांनी फसवणूक केल्याची तक्रार महागाव पोलीस स्टेशनला देण्यात आली असून, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

December 25, 2014 in विदर्भ
मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ 0

मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

55
यवतमाळ, दि. २५ – बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह जगदंबा अभियांत्रिकी कॉलेजच्या मागे असलेल्या शेतातील विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. मोहिनी गायकवाड (१६) रा. झाडकीन्ही हल्ली मुक्काम यवतमाळ असे मृत मुलीचे नाव आहे. झाडकीन्ही येथील किरण गायकवाड यांच्या दोन मुली येथील दांडेकर ले-आऊटमध्ये भाड्याने राहत होत्या. मोठी बहिण खासगी रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत आहे. तर मृतक मोहिनी गायकवाड (१६) ही दहावीचे शिक्षण घेतल्यानंतर घरीच होती. दोघी बहिणी आंनदाने राहत असताना, अचानक २३ डिसेंबरला मोहिनी घरून निघून गेली. उशिरापर्यंत बहिण घरी न परतल्याने घाबरलेल्या मोहिनीच्या मोठ्या बहिणीने वडगाव रोड पोलीस स्टेशनला तक्रार केली. पोलिसांनी मोहिनीचा शोध सुरू केला असताना, दरम्यान आज सकाळी १० वाजताच्या सुमारास आर्णी मार्गावरील जगदंबा अभियांत्रिकी कॉलेजच्या मागे असलेल्या शेतातील विहिरीत मृतदेह असल्याची माहिती ग्रामीण पोलीस स्टेशनला मिळाली. ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंडीत आखरे यांच्या शेतातील विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. यावेळी मृतदेहाचे वर्णन व अंगावरील कपड्यावरून हा मृतदेह मोहिनीचा असल्याची ओळख पटली. पोलिसांनी मोहिनीच्या घरच्यांना माहिती दिल्यानंतर तिची बहिण व नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चौकशी केली असता, मोहिनी गेल्या दोन वर्षापासून मानसिक आजारी असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यामुळे मोहिनीने आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून मृतदेह श्वविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली. यावेळी घटनास्थळाला एसडीपीओ डॉ. शीतल जानवे यांनी भेट दिली होती.

December 25, 2014 in विदर्भ
८० लाखांचा मुंद्राक शुल्क घोटाळा , विस्तार अधिकाºयाविरूद्ध गुन्हा दाखल 0

८० लाखांचा मुंद्राक शुल्क घोटाळा , विस्तार अधिकाºयाविरूद्ध गुन्हा दाखल

images (2)
यवतमाळ, दि. २५ – गेल्या अनेक वर्षापासून चौकशीत असलेल्या मुंद्राक शुल्क घोटाळ््यात ८० लाख रुपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी वडगावरोड पोलिसांनी तत्कालिन विस्तार अधिकारी प्रल्हाद पारवे यांच्याविरुद्घ गुन्हा नोंदविल्याने यवतताळ पंचायत समितीमध्ये अनेकांचे धाबे दणाणले आहे.
तत्कालीन विस्तार अधिकारी पारवे यांनी ग्राम पंचायतींना अनुदानाची रक्कम नियबाह्य रित्या वितरीत केली. ग्राम पंचायतीना कमी जादा रक्कम वितरीत केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. चौकशी समितीपुढे अनुदानित रक्कमेचे अभिलेख, खर्चाची उपप्रमाणके, कामाची अंदाजपत्रके, मूल्याकंन, नोंदवह्या, रोखपंजी विस्तार अधिकाºयाने सादर केली नाही. सन २००९-१०, १०-११, ११-१२ या वर्षामध्ये ग्राम पंचायतींना मुंद्राक शूल्क अनुदानही अधिक वितरित केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर विस्तार अधिकाºयावर २९ लाख २६ हजार ५७५ रुपयांच्या अपहाराचा ठपका ठेवण्यात आला होता. तसेच ग्रामीण क्षेत्रामध्ये प्रशासक म्हणून कार्यरत असताना, पारवे यांनी प्राप्त ५१ लाख ७ हजार ८०४ रुपयांचाही घोळ केला. एकूण ८० लाख ३४ हजार ५४९ रुपयांचा निधी शासकीय निर्देशानुसार ग्राम पंचायतींना वाटप न करता पदाचा दुरूपयोग करून आर्थिक फायद्यासाठी कमी अधिक प्रमाणात निधी वितरीत केल्याचा प्रकार चौकशीत सिद्घ झाल्यानंतर काल बुधवारी गटविकास अधिकारी संजय ईश्वरकर यांनी वडगाव रोड पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. पोलिसांनी याप्रकरणी पारवेविरुद्घ शासनाची फसवणूक व अपहार केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. या घटनेमुळे पंचायत समितीच्या कामात घोटाळे करणाºया कर्मचाºयात खळबळ उडाली आहे.

December 25, 2014 in विदर्भ
आसाराम प्रकरणातील महिला बेपत्ता 0

आसाराम प्रकरणातील महिला बेपत्ता

download (2)
अहमदाबादः स्वघोषित बाबा आसाराम याच्याविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल करणारी ३३ वर्षांची विवाहित महिला पती व मुलासह गेल्या आठवड्यापासून बेपत्ता असल्याचे पोलिसांनी गुरुवारी सांगितले. आम्ही अमरोली येथे लग्नासाठी जात असून, संरक्षणाची अवश्यकता नसल्याचे या कुटुंबाने त्यांच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या चार पोलिसांना सांगितले होते. मात्र, हे कुटुंब घरी परतलेच नाही. अमरोलीतील लग्नाची बतावणीही असल्याचे नंतरच्य चौकशीत उघड झाले आहे.

December 25, 2014 in मुख्य पान
अमरिंदर युवक काँग्रेस अध्यक्ष 0

अमरिंदर युवक काँग्रेस अध्यक्ष

download (1)
नवी दिल्लीः लोकसभा निवडणुका आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पिछेहाट झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये फेरबदल होऊ घातले असून, त्याची सुरुवात म्हणून युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून खासदार राजीव सातव यांना हटवून पंजाबमधील आमदार अमरिंदर राजा ब्रार यांची गुरुवारी नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्रातील हिंगोणीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सातव यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्वीच संपला असून, पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्यांच्या फेरनियुक्तीस नकार दिल्याचे सांगण्यात आले.

December 25, 2014 in मुख्य पान
मालवीयांना ‘भारतरत्न’ देणं चुकीचं! 0

मालवीयांना ‘भारतरत्न’ देणं चुकीचं!

Guha
नवी दिल्ली – हिंदू महासभेचे नेते व बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक पंडित मदनमोहन मालवीय यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर प्रख्यात इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी सडकून टीका केली आहे. ‘मालवीय यांना भारतरत्न देणं हे चुकीचं आणि असमर्थनीय आहे,’ असं परखड मत गुहा यांनी मांडलंय. त्यांच्या या मतामुळं नवा वाद पेटण्याची चिन्हं आहेत.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी बुधवारी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व पंडित मदनमोहन मालवीय यांना ‘भारतरत्न’ देण्याचं जाहीर केलं. राष्ट्रपतींच्या या घोषणेचं सर्वत्र स्वागत होत असताना इतिहासकार गुहा यांनी मात्र काहीसं वेगळं मत मांडलं आहे. ‘भारतरत्न’च्या वृत्तावर गुहा यांनी एकामागोमाग एक ट्वीट्स केले आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांना ‘भारतरत्न’ देण्याचं स्वागत करताना गुहा यांनी मालवीय यांना हा सन्मान दिल्याबद्दल जोरदार आक्षेप नोंदवला आहे.
गुहा यांचे ट्वीटस्
”वाजपेयींना भारतरत्न देणं ठीक आहे. त्याबद्दल आक्षेप घेण्याचं काहीच कारण नाही. पण मृत्यू होऊन बराच काळ लोटलेल्या किंवा इतिहासातील व्यक्तीला ‘भारतरत्न’ देणं योग्य वाटत नाही. मालवीयांच्या बाबतीतही माझं तेच मत आहे. आणि मालवीयांना द्यायचंच होतं तर मग रविंद्रनाथ टागोर, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले, स्वामी विवेकानंद, अकबर, शिवाजी महाराज, गुरुनानक, कबीर, सम्राट अशोक यांना हा सन्मान का नाही?”

December 25, 2014 in मुख्य पान
राजकीय पक्षांना ९० टक्के निधी कॉर्पोरेट कंपन्यांकडून 0

राजकीय पक्षांना ९० टक्के निधी कॉर्पोरेट कंपन्यांकडून

images (3)
नवी दिल्ली- राजकारण म्हटले की पैसा आलाच, सध्या देशातील सर्वच राजकीय पक्षांना मग ते राष्ट्रीय असो की प्रादेशीक राजकारणासाठी एक तर सत्ता किंवा पैसा याची गरज असते. तर असे राजकारण करताना या पक्षांना पैसा कोठून मिळतो? ‘असोशिएशन ऑफ डेमोक्रॅटीक रिफॉम्स’ या संघटनेच्या नुसार राजकीय पक्षांना तब्बल ९० टक्के निधी हा कॉर्पोरेट कंपन्या आणि मोठ्या उद्योग घराण्यांकडून मिळतो. तर या एकूण निधी पैकी सर्वाधिक निधी देशाची राजधानी दिलीतून येतो. त्यानंतर महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांचा क्रमांक लागलो.
राजकीय पक्षांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या अहवालातील माहितीनुसार केंद्रातील सत्ताधारी भाजपने अद्याप २०१३-१४मध्ये करण्यात आलेल्या निधीची माहिती सादर केलेली नाही. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सीपीआय यांना २०१२-१३च्या तुलनेत २०१३-१४मध्ये ५१७ टक्के अधिक निधी मिळाला आहे.
देशातील राष्ट्रीय पक्षांना ८८१ व्यक्तींकडून ७६.९३ कोटी रुपयांचा निधी देण्यात आले आहे. यातील महत्त्वाची बाब म्हणजे काँग्रेस मिळालेल्या निधीमध्ये ४०८ टक्क्यांची वाढ झाली आहे. काँग्रेसला २०१२-१३ या वर्षात ११.७२ कोटींची निधी मिळाला होता. त्याच २०१३-१४मध्ये वाढ होत तो निधी ५९.५८ कोटींवर गेला.
यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे देण्यात आलेल्या माहितीचे विश्लेषण केल्यास ९० टक्के निधी कंपन्यांकडून येतो. यामुळे या कंपन्या अप्रत्यक्षरीत्या राजकीय पक्षांवर नियंत्रण ठेवत असल्याचे दिसेत अस ‘एडीआर’चे संस्थापक आणि विश्वस्थ प्रा. जगदीप छोकर यांनी सांगितले. तसेच सत्ताधारी पक्षाकडून मिळालेल्या निधीबद्दल माहिती दिली जात नाही ही गोष्ट लोकशाहीसाठी चांगली नसल्याचे ते म्हणले.
देशाच्या राजधानी दिल्लीतून राष्ट्रीय पक्षांना सर्वाधिक म्हणजे ४५.४९ कोटींचा निधी देण्यात आला आहे. त्यानंतर महाराष्ट्रातून १८.१२ कोटी तर गुजरातमधून ३.०१ कोटींची निधी पक्षांना मिळाला आहे.
काँग्रेस पक्षाला दिल्लीतून सर्वाधिक म्हणजे ३९.०५ कोटींचा निधी मिळाला आहे. तर ‘सीपीआय’ला ५४.६ लाख आणि ‘माकप’ला १.८८ कोटींचा निधी राजधानीतून मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रातून सर्वाधिक ८.०२ कोटींचा निधी मिळाला आहे.
२०१३-१४ या वर्षात देण्यात आलेल्या निधीपैकी २.३९ कोटींचा निधी हा रोख स्वरुपात दिल्याचे ‘एडीआर’ने म्हटले आहे.

December 25, 2014 in मुख्य पान