पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for December 3rd, 2014

बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार 0

बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

IMG-20141203-WA0076
यवतमाळ – बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना आज बुधवारी जोडमोहा नजिक घडली. गणेश मडावी (२८) रा. वटबोरी असे मृतकाचे नाव आहे. गणेश आपल्या एम. एच. २९ पी ५९८४ क्रमांकाच्या दुचाकीने यवतमाळ जात असताना, यवतमाळवरून पांढरकवडाकडे जाणाºया एम. एच. ४० ८९६७ क्रमांकाच्या बसने त्याला जोडमोहानजिक समोरासमोर धडक दिली. या धडकेत गणेशच्या डोक्याला व शरीराला गंभिर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली असून, पोलिसांनी बसचालक प्रमोद मनवर याचेविरुध्द गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

December 03, 2014 in मुख्य पान
नगराध्यक्ष व मुख्याधिकाºयात खडाजंगी 0

नगराध्यक्ष व मुख्याधिकाºयात खडाजंगी

images
यवतमाळ – शहरातील साफसफाईच्या क त्रांटाचा विषय सतत वादात ठरत असताना, आज बुधवारी नगर पालिकेत आयोजित सर्वसाधारण सभेत टेंडरच्या मुदतवाढीवरून नगराध्यक्ष व मुख्याधिकाºयात खडाजंगी झाली. यावेळी नगरसेवकांनीही आक्रमक पवित्रा घेतल्याने रस्त्यांच्या कामांना मंजूरी देवून उद्या साफसफाईच्या कत्रांटासाठी विशेष जीबीचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील साफसफाईचा कत्रांट अमरावती येथील ठेकेदाराला देण्यात आला आहे. कत्रांटाच्या मुदतवाढीवरून पालिकेत वाद सुरू असताना, आज पालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत हा मुद्दा मांडण्यात आला. हा विषय प्रशासकीस्तरावरील असल्यामुळे याचा निर्णय मुख्याधिकाºयांनी घ्यायला अपक्षित असताना, नगराध्यक्ष व नगरसेवकांपुढे हा विषय उपस्थित करण्यात आल्याने नगरसेवक मुख्याधिकाºयावर जाम भडकले. दरम्यान नगराध्यक्ष सुभाष राय यांनी सुध्दा मुख्याधिकाºयांची चांगलीच कानउघाउणी केली. साफसफाईच्या कत्रांटातच बैठकीचा अर्धा वेळ गेल्यानंतर आमदार निधीतील दोन तर खासदार निधीतील एका रस्त्याच्या कामाला मंजूरात देण्यात आली. दलीतवस्तीच्या रस्त्यांनाही बैठकीत मंजूरात देण्यात आली असून, साफसफाईच्या टेंडरसाठी उद्या विशेष जीबी बोलाविण्यात आली आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीत पुन्हा खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

December 03, 2014 in मुख्य पान
भारी येथे इसमाचा खून 0

भारी येथे इसमाचा खून

index.jpeg00
यवतमाळ – किरकोळ कारणावरून इसमाचा वस्तºयाने खून केल्याची घटना काल रात्री भारी येथे घडली. गजानन गेडाम असे मृताचे नाव असून, रमेश बावणे (५५) व राकेश बावणे (२२) या बापलेकास पोलिसांनी अटक केली आहे.
तालुक्यातील भारी येथील या बापलेकांनी गजानन गेडाम याच्याशी म्हशीचे केस काढण्याच्या कारणावरून वाद घातला. या वादात रमेश व राकेश यांनी गजानन गेडाम याच्या गळ््यावर वस्तºयाचे घाव घातले. रक्ताच्या थारोळ््यात पडलेल्या गजाननला पाहुन दोघानीही घटनास्थळावरून पळ काढला. मुलाला रक्ताच्या थारोळ््यात पाहून त्याची आई जोष्णा गेडाम घरातून धावत आली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्याच्या तयारीत असताना, गजाननचा मृत्यू झाला. याबाबत शहर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली असून, पोलिसांनी दोघाविरुध्द गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली आहे.

December 03, 2014 in मुख्य पान
तेलाचे चटके देऊन चिमुकलीची हत्या 0

तेलाचे चटके देऊन चिमुकलीची हत्या

2014-12-03~news_ns
सोलापूर : पोटाची खळगी भरण्यासाठी चिंचोली औद्योगिक वसाहतीत आलेल्या एका जोडप्याच्या पाच वर्षीय मुलीला प्रियकराने दारूच्या नशेत उकळत्या तेलाचे चटके देऊन तिचा निर्घृण खून केला. चिंचोली औद्योगिक वसाहतीतील धर्मराज नगरात मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या प्रकारामुळे अख्खे धर्मराजनगर हळहळले. आरुषी ईश्वर वंजारी (५) असे खून झालेल्या बालिकेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अडीच वर्षांपूर्वी गोंदिया येथून ईश्वर वंजारी हा पोटाची खळगी भरण्यासाठी आपली पत्नी संगीता, आरुषी (वय-५) आणि अंजली (वय-६) यांना घेऊन चिंचोली औद्योगिक वसाहतीत आले होते. वसाहतीतील धर्मराज नगरात त्यांनी भाड्याने घरही घेतले होते. ईश्वर आणि संगीता एका कारखान्यात काम करीत आपल्या संसाराचा गाडा हाकत होते. दरम्यान, याच भागातील शिवाजी भालेराव (३०) याने संगीताबरोबर प्रेमसंबंध जुळविले. सहा महिन्यांपूर्वी शिवाजीने ईश्वरला मारहाण करून तेथून हाकलून दिले. त्यानंतर शिवाजी हा संगीता आणि तिच्या दोन मुलींसमवेत राहत होता. मंगळवारी सकाळी दोघे नेहमीप्रमाणे गॅस कंपनीत कामाला गेले. शिवाजी हा काही वेळाने घरी आला. पुन्हा दुपारी बारा-साडेबाराच्या सुमारास शिवाजी कंपनीत जाऊन संगीताला घरी आणले. त्यावेळी दोन्ही मुली घरात खेळत होत्या. दुपारी संगीता पुन्हा कामावर गेली तर अंजली खेळण्यासाठी बाहेर गेली.
दरम्यान, शिवाजीने कढईत तेल ओतून ते गरम केले. तेलात चाकू बुडवून आरुषीच्या अंगावर चटके देत होता. बराच वेळ चटके दिल्यानंतर त्याची राक्षसी वृत्ती काही शांत झाली नाही. शेवटी बेलण्याने तिच्या डोक्यावर प्रहार करीत तिचा जागीच खून केला. त्याने मुलीला इतके चटके दिले की मृत आरुषिचे शरीर पूर्णत: काळे-निळे पडले होते. घटनेचे वृत्त समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा डुबुले, मोहोळचे पोलीस निरीक्षक सूरज बंडगर आदींनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी आरोपी शिवाजी भालेराव यास अटक केली असून, रात्री उशिरापर्यंत मोहोळ पोलीस ठाण्यात आरोपीची चौकशी सुरु होती.

December 03, 2014 in मुख्य पान
शिवसेनेचे १२ मंत्री शपथ घेणार शुक्रवारी 0

शिवसेनेचे १२ मंत्री शपथ घेणार शुक्रवारी

yutisb
मुंबई -राज्यातील शिवसेना-भाजप युतीचं घोडं अखेर गंगेत न्हहालं. शिवसेनेचे १२ तर भाजपच्या १० मंत्र्यांचा शपथविधी विधानभवनाच्या प्रांगणात शुक्रवारी सकाळी दहा वाजता होणार आहे. खातेवाटप अजूनही गुलदस्त्यात असलं तरी शिवसेना, भाजपतील नेत्यांमध्ये मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू झाल्याची चर्चा आहे.
शिवसेनेतून आता मंत्रिपदावर कोणाची वर्णी लागते याची सर्वांना उत्सुकता आहे. कॅबिनेट मंत्रीपदासाठी सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, दिवाकर रावते आणि डॉ. नीलम गोऱ्हे यांची नावं आघाडीवर आहेत. तर राज्यमंत्री पदासाठी दादा भुसे, विजय आवटी, रविंद्र वायकर, गुलाबराव पाटील, संजय राठोड, अर्जुन खोतकर, दीपक केसरकर किंवा उदय सामंत, दीपक सावंत यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे शिवसेनेत आता मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू झाल्याचं बोललं जातंय. शिवसेनेबरोबर भाजपमधील कोणत्या आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलंय.
शिवसेना-भाजपमध्ये मंत्रीपदाचं वाटप झालं असलं तरी शिवसेनेने कोणती खाती पदरात पाडून घेतली आहेत, हे अजून जाहीर झालेलं नाही. पण ‘शिवसेनेला कमी महत्त्वाची खाती असं म्हणणं चुकीचं आहे. एमएसआरडीसी, परिवहन ही खातीही महत्त्वाची आहेत. याशिवाय शिवसेनेने केंद्रात एक कॅबिनेट आणि एका राज्यमंत्रीपदाची मागणी केलीय. पण भाजपकडून अद्याप उत्तर आलेलं नाही’, असं शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांनी सांगितलं.

December 03, 2014 in मुख्य पान
घसरून पडल्याने शरद पवार यांच्या पायाला फ्रॅक्चर 0

घसरून पडल्याने शरद पवार यांच्या पायाला फ्रॅक्चर

index
नवी दिल्ली –  दिल्लीतील निवासस्थानी पाय घसरून पडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. पवार पुढील उपचारासाठी मुंबईकडे हेलिकॉप्टरने रवाना झाले असून अजित पवार यांनी दुष्काळग्रस्त भागातील नियोजीत दौराही रद्द केला आहे.
बुधवारी सकाळी पवार हे दिल्लीतील जनपथ येथील निवासस्थानी पाय घसरून पडले. यामुळे त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला असून त्यांच्या हातालाही किरकोळ दुखापत झाली आहे. शऱद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जाणार आहे. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी प्रतिभा आणि कन्या सुप्रिया सुळे आहेत.

December 03, 2014 in मुख्य पान
चिमुरड्याचे गुप्तांग कापले 0

चिमुरड्याचे गुप्तांग कापले

2014-09-12~manwithknife_ns
जयपूर – कौटुंबिक वादातून १७ दिवसाच्या मुलाचे गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना जयपूरमध्ये घडली आहे. पिडीत मुलाच्या आईवडिलांनी या क्रूरकृत्यासाठी कुटुंबातील व्यक्तींवरच संशय व्यक्त केला असून याप्रकरणी पोलिसांनी तपासही सुरु केला आहे.
जयपूरमध्ये राहणारे  अखिल जैन हे कामानिमित्त बाहेर गावी गेले होते. तर त्यांची पत्नी  पारुल या आंघोळीसाठी गेल्या होत्या. या दरम्यान त्यांचा १७ दिवसांचा मुलगा जोरजोरात रडू लागला. यामुळे घाबरुन पारुल बाहेर आल्या असता त्यांना मुलाचे गुप्तांग कापल्याचे आढळले. यानंतर पारुल व त्यांच्या सास-यांनी रक्तबंबाळ अवस्थेतील चिमुरड्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र मुलगा खूपच लहान असल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करता येत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पाच वर्षानंतरच ही शस्त्रक्रिया करणे शक्य असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. कुटुंबातील काही जणांनी तुमचे वैवाहीक जीवनच उध्वस्त करु अशी धमकी दिल्याचे अखिल जैन यांनी पोलिसांना सांगितले आहे. पोलिसांनी या आधारे तपास सुरु केला असून प्रकरण अतिशय संवेदनशील असल्याने चौकशीनंतरच पुढील कारवाई करु असे जयपूर पूर्वच्या पोलिस उपायुक्तांनी सांगितले.

December 03, 2014 in मुख्य पान