
इम्फाळ – मणिपूरची राजधानी इम्फाळ शहरातील खुयाथाँग भागात आज सकाळी दहशतवाद्यांनी घडविलेल्या बॉम्बस्फोटात तीन नागरिकांचा मृत्यू झाला. तर, चार जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुयाथाँग मार्केटजवळच्या रस्त्याच्या कडेला हा स्फोट झाला. अतितीव्र स्फोटकांच्या सहाय्याने हा स्फोट घडविण्यात आल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. या स्फोटानंतर परिसरात नाकेबंदी करण्यात आली असून पोलिसांनी छापासत्र सुरू केले आहे.
Archive for December 21st, 2014
0
इम्फाळमध्ये बॉम्बस्फोट; ३ ठार
0
आमदारांचा रेल्वेत गोंधळ

नागपूर – साधेपणाचे उदाहरण देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः स्पेशल फ्लाइटने प्रवास करण्याचे टाळतात. मात्र, राज्याच्या पाच आमदारांनी रेल्वेच्या एसी डब्यातील प्रवासाकरिता शुक्रवारी रात्री नागपूर रेल्वे स्थानकावर गोंधळ घातला. इतकेच काय तर स्वतःच्या सोयीसाठी प्रवाशांना वेठीस धरत तब्बल दहावेळा चेन पुलिंग केली. या गोंधळात ही गाडी मुंबईला पोहोचण्यास तब्बल चार तास उशीर झाल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.
सेवाग्राम एक्स्प्रेस नागपूर रेल्वे स्थानकावरून शुक्रवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास सुटण्यास सज्ज होती. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला दोन दिवस सुटी असल्याने अनेक आमदारांनी घरची वाट धरली. मात्र, पाच आमदारांना स्लीपर क्लासची तिकिटे मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. आपल्याकरिता रेल्वेने एसीचा वेगळा डबा जोडावा, असा आग्रह या आमदारांनी धरला. ‘रेल्वे प्रशासनाने हा आग्रह मान्य न केल्याने या आमदारांनी चक्क दहा वेळा चेन पुलिंग केली. त्यामुळे ही गाडी नागपूर रेल्वेस्थानकावरून सुटण्यास उशीर झाला. तसेच वर्धा रेल्वेस्थानकावरूनसुद्धा ही गाडी उशिरा सुटली. यामुळे पुढील वाहतुकीच्या वेळांमध्ये फरक पडल्याने ही गाडी मुंबईला चार तास उशिरा पोहोचली,’ अशी माहिती या गाडीतील प्रवासी नीलेश वाणी यांनी दिली. ‘या गाडीकरिता अनेक आमदारांनी एसी कोचमध्ये आरक्षण मागितले होते. परंतु नागपूर स्थानकाचा व्हीआयपी कोटा संपल्याने केवळ पाच आमदारांना एसी क्लासमध्ये आरक्षण न देता स्लीपर क्लासमध्ये देण्यात आले. त्यामुळे या आमदारांनी एसी डब्याची मागणी केली. परंतु, प्रत्येक गाडीची डबे खेचण्याची एक विशिष्ट क्षमता असते आणि या गाडीला नवा कोच जोडणे आम्हाला शक्य नसल्याने आमदारांच्या मागणीला नकार देण्यात आला. यादरम्यान चेन पुलिंगसुद्धा झाले. परंतु ते आमदारांनीच केले काय, हे सांगता येणार नाही. या गोंधळात गाडी नागपूर स्थानकाहून २० मिनिटे तर वर्धा स्थानकाहून १० मिनिटे उशिरा सुटली’, अशी माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांनी दिली.
0
उस्मानाबाद : दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

उस्मानाबाद – सततचा दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस आणि कर्जबाजारीपणाला वैतागून उस्मानाबाद जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी शनिवारी जीवनयात्रा संपविली. २० डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ६४ झाली आहे. त्यापैकी १६ शेतकऱ्यांच्या कुटुंबाना शासकीय मदत मिळाली आहे.
रूई (ता. परांडा) येथील शेतकरी नवनाथ लिमकर (वय ६५) याने बुधवारी १७ डिसेंबर रोजी विषप्राशन केले होते. शनिवारी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. नागराळ (ता. लोहारा) येथील युवा शेतकरी रवी राजेंद्र गोरे (२२) याने शनिवारी नापिकी व कर्जबाजारपणाला कंटाळून शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. जानेवारी २०१४ ते २० डिसेंबर पर्यंत जिल्ह्यातील ६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी पॅकेजची घोषणा केल्यानंतरही आत्महत्याचे हे सत्र सुरूच आहे. या आत्महत्येमुळे जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती भयावह असल्याचे चित्र समोर आले आहे. जिल्ह्यात २०१४ मध्ये २० डिसेंबरपर्यंत झालेल्या ६४ आत्महत्यांपैकी केवळ १६ आत्महत्या शासकीय अर्थसहाय्यास पात्र ठरल्या आहेत. १३ आत्महत्यांचे प्रकरण निर्णयासाठी राखून ठेवण्यात आले आहेत.
0
जागतिक युद्धांमागे मुस्लिम व ख्रिश्चन

नवी दिल्ली , दि. २१ – धर्मांतराच्या मुद्द्यावरून देशात सुरू असलेल्या वाद-प्रतिवादाला विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांनी नवे वादग्रस्त वळण दिले आहे. सिंघल यांनी मुसलमान आणि ख्रिश्चनांवर थेट टीका केली असून हे दोन धर्मच जगातील युद्धांना कारणीभूत आहेत,’ असा आरोप केला आहे. सिंघल यांच्या या वक्तव्यामुळे देशातील धार्मिक वातावरण तापण्याची शक्यता आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सिंघल यांनी हिंदुत्ववादी संघटनांकडून सुरू असलेल्या धर्मांतराच्या ‘घर वापसी’ मोहिमेची पाठराखण केली आहे. ‘आम्ही धर्म परिवर्तन करण्यासाठी नाही तर मनं जिंकण्यासाठी निघालो आहोत,’ असं ते म्हणाले. ‘जगातील सध्याच्या परिस्थितीवरून जागतिक महायुद्ध अटळ असल्याचे दिसत आहे. या युद्धातील खरे ‘खिलाडी’ मुसलमान आणि ख्रिश्चन आहेत. हिंदू त्याच्यापेक्षा वेगळा आहे, असे सांगून, ‘सध्या जग इस्लामी दहशतवादाच्या सावटाखाली आहे,’ असे ते म्हणाले.
सिंघल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केंद्र सरकारचे कौतुक केले. ‘गेला काही काळ धर्म आणि संस्कृतीला गुलाम बनविण्यात आले होते. मात्र, आता तसं होणार नाही. सध्याचं सरकार हिंदूंचे संरक्षण करणारं आहे,’ असेही सिंघल म्हणाले.
0
१०९ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना मदतीचा हात, जि.प.कर्मचारी सहकारी पतसंस्थेचा पुढाकार
यवतमाळ, दि. २१ – जगाचा पोशिंदा सततच्या दुष्काळामुळे संकटात सापडला आहे. आर्थिक विवंचनेतून शेतकरी आत्महत्या करीत आहे. १०९ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुबांना ५ हजार रुपये व साडीचोळी असा आर्थिक मदतीचा हात देण्यात आला. हा कार्यक्रम जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सर्व महोत्सवी वर्षानिमित्त सहकार भवन येथे रविवारी पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे महसूल मंत्री ना. संजय राठोड होते. प्रमुख पाहुणे म्हणून आ. मदन येरावार, आ. ख्वॉजा बेग, आ. राजू तोडसाम, पतसंस्थेचे अध्यक्ष राजूदास जाधव, पवन आत्राम, राजेंद्र राऊत यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी ओळखून पतसंस्थेच्या वतीने मदतीचा हात देण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते ५ हजार व साडीचोळी अशी मदत करण्यात आली. कुटुंबप्रमुखाने जीवन संपविल्यामुळे शेतकºयांचे कुटुंबच उघड्यावर पडले आहे. शेतकरी विधवा, त्यांची मुलं, मुली यांच्या चेहºयावरून उद्याची काळजी स्पष्टपणे दिसत होती. कपाशीला जन्म देणाºया जिल्ह्यातच आत्महत्येचे पीक आले, शेतकरी जगला तरच देश जगेल, राज्य सरकार शेतकºयांप्रती संवेदनशील असल्याचे प्रतिपादन आ. मदन येरावार यांनी केले. शेतकºयांवर आत्महत्येची पाळी येणार नाही. यासाठी राज्य सरकारकडून दिघकालीन उपाययोजना करण्यात येणार आहे. शेतकºयांनी हिंमत सोडू नये. राज्यात कष्टकºयांचे सरकार आले आहे. एक दिवस शेतकरी ‘फिनिक्स’पक्षाप्रमाणे भरारी घेतील, असा आशावाद ना. संजय राठोड यांनी अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केला. यावेळी आ. ख्वॉजा बेग, आ.प्रा. राजू तोडसाम यांनी आम्ही शेतकºयांच्या पाठीशी आहो, जीवन संपवू नका, असे आवाहन केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दादाराव पवार, गौतम वानखेडे, सरला दाडे, अर्चना बेले, प्रियंका चौधरी, मिना भगत, सुनिता चव्हाण, मंगला कुमरे यांच्यासह आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्यात आला. प्रास्ताविक राजूदास जाधव यांनी केले. यावेळी संजय गावंडे, सुमाला पुडके, शरद घाटोड, डॉ. दिलीप चौधरी, विजय डंभारे, संदीप श्रीरामे, शेख लुकमान, अनिल सरताबे, दीपक दोडके, रामराव टेकाळे, नंदेश चव्हाण, सुरेश घावडे, साहेबराव राठोड यांच्यासह शेतकरी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
विवाहीतेची आत्महत्या, दहाजणांवर गुन्हा

यवतमाळ, दि. २१ – हुंड्याच्या कारणावरून मुलीच्या सासरच्यांनी अपमानस्पद वागणूक दिल्याने विवाहितेच्या वडीलाने आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी दहाजणाविरुद्व गुन्हा नोंदविला आहे. महादेव लंबे असे मृतकाचे नाव असून, मुकेश वानखडे, रवी वानखडे, शितल वानखडे, गुंफा वानखडे, अनिता धवने, वनिता नारमूदे, माया भगत, रमेश वानखडे, नितीन धवने, संध्या राऊत अशी आरोपींची नावे आहे. महादेव लंबे यांच्या मुलीचा विवाह काही महिन्यापूर्वी मुकेश वानखडे रा. किन्ही याचेशी झाला होता. सुरुवातीचे दिवस गुण्यागोंविदाने विवाहितेने सासरी घालविल्यानंतर पतीसह सासरच्यांनी विवाहितेचा छळ सुरू केला. माहेरवरून ५० हजार रुपये घेऊन ये म्हणून तगादा लावला. पती व सासू, सासरे पैशासाठी मारहाण करीत असल्याची बाब विवाहितेने वडील महादेव लंबे यांना सांगितली. त्यांनी मुलीच्या सासरी जाऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता, वरील आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून घरातून हाकलून लावले. मुलीच्या सासरकडून मिळालेली वागणूकीमुळे त्यांना मानसिक धक्का बसून, लंबे यांनी आत्महत्या केली. याबाबत ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली असून, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
0
पुलावरून पडल्याने इसमाचा मृत्यू

यवतमाळ, दि. २१- पुलावरून खाली पडल्याने इसमाचा मृत्यू झाल्याची घटना हिवरा संगम येथे शनिवारी रात्री घडली. वसंतरा कानु पवार (५०) रा. आनंदनगर असे मृतकाचे नाव आहे. हिवरा येथून अनंतवाडी येथे काल रात्री ते जात होते. अशातच वाटेत असलेल्या पुलावरून पडून त्याचा मृत्यू झाला. हिवरा ते फुलसावंगी या रस्तयावर हा पुल असून पाच वर्षापूर्वी पुरात कठडे वाहुन गेले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलावरील कठडे बसवले असून आतापर्यत खाली पडून सहा जणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने बांधकाम विभागाप्रती रोष व्यक्त केला आहे. या घटनेची माहीती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठविला.
0
फेसबूकवर फोटो अपलोड करण्याची धमकी
यवतमाळ, दि. २१- अश्लील फोटो काढून फेसबूकवर अपलोड करण्याची धमकी देऊन पैशाची मागणी केल्याची घटना बोरी अरब येथे घडली. शुभम जाधव (२०) व अन्य एक अशी आरोपींची नावे आहे. दोन महिन्यापूर्वी या दोघांनी संगणमत करून फिर्यादीचे अश्लील फोटो काढले. तेव्हा पासून हे फोटो फेसबूकवर अपलोड करण्याची धमकी देत पैशाची मागणी करीत होते. याबाबत लाडखेड पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली असून, पोलिसांनी याप्रकरणी दोघाविरुद्व गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.













